तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ
मिसळपाव साईट एका तयार प्रोग्रामवर चालते त्या Drupal CMS (Content Management System) code चे पाच सहा जाणकार सभासद हवेत. म्हणजे साईट सातत्याने सुरू ठेवण्यास गती मिळेल आणि ते काम फक्त एक दोघांवर पडणार नाही. आपापली इतर मुख्य कामं संभाळून हे काम करावे लागते.
बरेच दिवसांच्या खटपटीनंतर मिपा अद्ययावत होत आहे. ( Drupal 7>>Drupal 11) गुढी पाडव्याला नूतनीकरण झाले पण नंतर संस्थळ बंद पडले. आपल्याला जुन्या मिपाची सवय आहे. पण नवीन CMS code अद्यतन झाल्यावर 'खरडफळा' आणि 'व्यक्तिगत संदेश' बाद झाले. यांची उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे.
आपल्या तांत्रिक अडचणी लिहिण्यासाठी हा चाचणी लेख धागा उघडला आहे.
वाचने
1670
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो रीसाईज करणे
माहीत आहे. पण वीस फोटोंच्या धाग्याचे काम करणे सोपे नाही. धागा, मजकूर, कोड सारखा हलत राहतो वर खाली. पुढे कधीतरी मीच करेन रीसाईज. ही चाचणी आहे.
डू आयडी काढायचा पर्याय…
डू आयडी काढायचा पर्याय अजूनही आलेला नाही.
हाहा.
In reply to डू आयडी काढायचा पर्याय… by अमरेंद्र बाहुबली
गरज नाही, ते आपोआप काजव्यांसारखे चमकायला लागतात.
आता देवाभाऊ घरोघर महिला आरक्षण घेऊन येतील तेव्हा
दिसायला लागतील.
चाचणी प्रतिसाद आहे. ;)
-दिलीप बिरुटे
@अबा...आता मिपावर सुद्धा
In reply to डू आयडी काढायचा पर्याय… by अमरेंद्र बाहुबली
SIR (Specific Intensive revision ) विशेष गहन पुनरावृत्ती चालू आहे.
थेट संगणकाहुन .मोबाईलहुन…
थेट संगणकाहुन .मोबाईलहुन इमेज देण्याची सुविधा बंद केली कती.ती जास्त सोयीची होती.
आता लिंकनेच फोटो देऊ शकतो.
त्याने सर्व फोटो थेट…
In reply to थेट संगणकाहुन .मोबाईलहुन… by Bhakti
त्याने सर्व फोटो थेट मिपाच्या सर्व्हरवर येऊन वेब स्पेस आणि साईटला ताण येऊ शकतो म्हणून अपलोड फ्रॉम वेब सुरू केले असावे असे वाटते.
अच्छा ,मग ठीक आहे👍️
In reply to त्याने सर्व फोटो थेट… by प्रचेतस
अच्छा ,मग ठीक आहे👍️
आजच्या दणदणीत सोयी....
१. आज खराखुरा खाजगी खरडफळा सुरू झाला. ... फक्त लॉगिन केलेल्या मिपासदस्यांनाच त्यावरचे लेखन दिसते आणि प्रतिसाद देता येतात. नवीन प्रतिसाद वरतीच दिसतात.
२. खरडवही सुरू...
२अ. लॉगिन केलेल्या सभासदांना एकमेकांशी संपर्क करता येतो.
२ब.. त्यावरच्या नोंदी इतर सभासदही वाचू शकतात.
२क.. खरडवहीत पत्र आले की त्याची सूचना खरडवही(संख्या) अशी मिळत आहे. हे छान झाले.
२ड.. काही नकोशी वाटणारी पत्रे एक एक किंवा अनेक एकदम रद्द करता ये आहेत. कुणी त्रासदायक पत्रे पाठवत असेल तर ती काढता येण्याची सोय झाली.
३. गूगल फोटोजच्या लिंक्सने फोटो चढवता येत आहेत. यामुळे जे सभासद भरपूर फोटो असलेले लेखन करतातत्यांना फायदा होईल.
एकूण नवे ड्रुपल ११ वरचे मिसळपाव संस्थळ एक नंबरच झाले आहे.
Test google photo links
फोटो
Flickr फोटो लिंक वापरता येईल का? गुगल ची काही जमली नाही बुवा...
फ्लिकर फोटो
Tiny view
मोबाईलवर अवाढव्य साईझचे फोटू दिसताहेत म्हणून ही चाचणी.
फोटो
In reply to Tiny view by सुमो
माझं काहितरी चुकतंय . कसं कारायचं सांगाल का ?
ख फ मधे कोणाच्या पण नावावर…
ख फ मधे कोणाच्या पण नावावर क्लिक केले तर स्वतः चे ख वही दिसते
लाल रंग खूपच वापरला आहे थीम मधे
लाल रंग खूपच वापरला आहे थीम मधे. यामुळेच चर्चा विषयावर (शाब्दिक) हाणामाऱ्या लै म्हणजे लैच प्रमाणात होतील असे कुडमुडे भाकीत वर्तवतो.
:)
(No subject)
Test
काही जमत नाही bua
काही जमत नाही बुवा
फ्लिकर वरुन फोटो असा टाका.
In reply to काही जमत नाही bua by किल्लेदार
फ्लिकर फोटो ब्राउझर मधे उघडा.
फोटोखाली उजव्या कोपर्यात असलेल्या बाणावर क्लिक करा. Medium size वर क्लिक करा. डाऊनलोड विंडो उघडेल.
डाऊनलोड लिंक कॉपी करा. मिपाच्या एडिटर मधे inseart image url च्या खिडकीत पेस्ट करा.
फोटो दिसेल.
Test full size 4.0mb photo
Test
एक विचार मनात आला तो मांडावा…
एक विचार मनात आला तो मांडावा म्हणतो. मिपा असे चालत नाही याची कल्पना आहे. पण तरीही राहवत नाही म्हणून मांडावे म्हणतो.
मिपाच्या तांत्रिक देखभालीसाठी एखाद्या कंपनीला AMC दिली तर जास्त सोय होणार नाही काय?
जे आत्ता मिपाची देखभाल करत आहेत त्यांनीच त्या कंपनी कडून कामं करून घेणं जास्त सोयीचं ठरेल असं मला वाटतं.
७-८ कोटेशन्स जरी घेतले, त्याबरहुकुम लागणारी वार्षिक रक्कम इथे एका स्वतंत्र धाग्यात मांडली आणि निनावी ऐच्छिक देणगीसाठी सदस्यांना मुभा दिलीत तर मला वाटतं की लोकं हातभार लावायला सहज तयार होतील. जेवढी रक्कम लागेल, तेवढी झाली की देणगीचा पर्याय बंद करता येईल.
माझ्यामते यावर एक चर्चा आयोजित करायला हरकत नसावी.
अडचणी मांडायच्या आणि त्यावर उपाय शोधायचे. जास्तीत जास्त काय होईल? की जैसे थेच बरे हे समजेल. पण लोकांचे विचार तरी समजतील.
जाणकारांनी मत मांडावे अशी विनंती.