Skip to main content

तांत्रिक अडचणी आणि सोयी.

लेखक कंजूस यांनी सोमवार, 13/04/2026 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
तांत्रिक अडचणी मिसळपाव संस्थळ मिसळपाव साईट एका तयार प्रोग्रामवर चालते त्या Drupal CMS (Content Management System) code चे पाच सहा जाणकार सभासद हवेत. म्हणजे साईट सातत्याने सुरू ठेवण्यास गती मिळेल आणि ते काम फक्त एक दोघांवर पडणार नाही. आपापली इतर मुख्य कामं संभाळून हे काम करावे लागते. बरेच दिवसांच्या खटपटीनंतर मिपा अद्ययावत होत आहे. ( Drupal 7>>Drupal 11) गुढी पाडव्याला नूतनीकरण झाले पण नंतर संस्थळ बंद पडले. आपल्याला जुन्या मिपाची सवय आहे. पण नवीन CMS code अद्यतन झाल्यावर 'खरडफळा' आणि 'व्यक्तिगत संदेश' बाद झाले. यांची उणीव प्रकर्षाने जाणवणारी आहे. आपल्या तांत्रिक अडचणी लिहिण्यासाठी हा चाचणी लेख धागा उघडला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1858
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

खरडफळा परत येईल.  व्यक्तिगत संदेश बाबत विचार सुरू आहे. 

 

या शिवाय बेसीक मध्ये म्हणजे लेखन प्रकाशित करताना आणि प्रतिसाद देताना काही अडचण आल्यास येथे कळवता येईल. 


In reply to by नीलकांत

१. धाग्यात प्रतिसाद जुने अगोदर आणि नवीन खालती असे येतात. तो क्रम बदलण्याची सोय करता आली तरी खरडफळा झाला तयार. उरलेला भाग म्हणजे खरडफळ्यावरचे लेखन फक्त login झालेल्या सभासदांनाच वाचता येणे.
२. व्यक्तिगत संदेश email शी जोडले गेले असल्याने आणि त्यांच्या security सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असल्याने Drupal मधून तो code काढून टाकला असावा. त्यात बदल करून शब्दशः: व्यक्तिगत संपर्क करता आला तरी काम होईल.
३. सध्या लेखन प्रकाशित करताना किंवा प्रतिसाद देताना अडचण नाही.


मला यातलं काही कळत नाही परंतू या तीन ठिकाणी misalpav dot com तपासून पाहिले..... Seo check sites 1. https://www.seoreviewtools.com/google-seo-checker/ 2.https://rankmath.com/tools/seo-analyzer/ 3. https://yoast.com/tools/seo-checker/

In reply to by सुमो

असं search केल्यावर SEO बद्दल कळलं. म्हटलं बघू तरी काय अहवाल देतात इतर वेबसाईटचा आणि मिपाचा. पूर्वी एकदा पाहिलं होतं त्या एका चेक साइटवर सर्वर कुठे आहे, किती दिवस फी भरली आहे हेसुद्धा कळायचं . ( त्याचं नाव आठवत नाही.)

प्रतिसादाच्या विषयाचा FONT Size लहान करता येऊ शकेल का? - (मिपाकर) सोकाजी

In reply to by पद्मजा५०

काय ते इथेच विचारा त्यांना, थोडे खडूस असले तरी इथे उत्तर देतील ते (असे वाटते)


In reply to by प्रचेतस

सहमत. धाग्यावर काहीही विचारा. कधीही पडिकच असतात मिपावर.... लोक काही म्हणतील म्हणून थोड़ा वेळ लॉगआउट करतात. पण पुन्हा हजर... :/

 

-दिलीप बिरुटे


In reply to by पद्मजा५०

नमस्कार. वैयक्तिक संपर्क (व्यक्तिगत ईमेल किंवा अन्य मार्गाने मी as a online policy) prefer करत नाही. कथेबद्दल काही मत किंवा प्रतिसाद असेल तर तो धाग्यावर किंवा इथे द्यावा. ती कथा पूर्ण काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्तीशी त्या कथानकाचा किंवा पात्रांचा काही संबंध नाही. त्यात कोणताही वास्तविक मानसिक आजार किंवा उपचार यांचे वर्णन नसून एक संपूर्ण कल्पनेचा विस्तार आहे. त्याचे रसग्रहण किंवा अन्य काही अनुकूल प्रतिकूल मत असेल तर ते धाग्यावर किंवा इथे द्यावे अशी विनंती. धन्यवाद.


मिपा पुन्हा कार्यरत केल्याबद्द्ल धन्यवाद. :-)
जुने line-breaks (जे नंतर HTML <br/> होत असावेत) गेलेत, कुठलीही कविता उघडून पहा.

अर्थात बरेच तांत्रिक काम सुरू ह्या update नंतर चालू असेलच, मी फक्त एक निरीक्षण नोंदवतो आहे.


सर्वप्रथम संकेतस्थळ सुरू केल्याबद्दल आभार. सविस्तर प्रतिसाद लिहीनच. त्याआधी फोटो डकवता येत नाहीयेत असं दिसलं ते नमूद करतो.


दुरुस्ती झाली आहे असे वाटते. मालक नीलकांत आणि प्रशांत यांचे आभार.

 

 

-दिलीप बिरुटे


आता बर्याच अडचणी दूर झालेल्या दिसतात. तरीही काही अडचणी अजूनही आहेत. कोणतीही प्रतिक्रिया द्यायला गेल्यास वर संपादन हा tab दिसतो. त्यातून लेखाचे संपादन करता येत नाही पण लेखाच्या शीर्षकाचे संपादन करता येते असे दिसते- आपण लिहिलेला लेख नसला तरीही. तसेच नव्या प्रतिक्रियांच्या tab मध्ये कोणत्याही प्रतिक्रियेच्या दुव्यावर क्लिक केल्यास प्रतिक्रिया लोड होत नाही. तसेच जुन्या प्रतिक्रिया दुसर्या पानावर गेल्या आहेत असे दिसते आणि नव्या प्रतिक्रिया वर आहेत.

अशा काही अडचणी दूर झाल्या आणि तो खरडफळा परत आला की परत सगळे काही पहिल्यासारखे झाले असे वाटेल. या कामात जीव झोकून कष्ट घेतलेल्या सगळ्या तांत्रिक चमूचे अभिनंदन आणि आभार.


नीलकांत आणि प्रशांतचे खास आभार, कोणतीही बाह्य मदत न घेता आपापले व्याप सांभाळून महत्वाचे काम केले आहे.


आपण न लिहिलेल्या लेखांत संपादन करून फेरफार करता येत आहेत पण आज आपल्याच प्रतिसादाचे संपादन करणे बंद झाले आहे.


एकूण Drupal CMS फारच किचकट रचना आहे असे वाटू लागले आहे.
एखादी नवीन सोय जोडणे किंवा काढून टाकताना इतर रचनाही विस्कटून जाते बहुतेक.


In reply to by Bhakti

मोबाईल/ कंपूटर ते लिहा. मग त्याप्रमाणे उत्तर मिळेल.
गूगल Gboard वर अनुस्वार येतो.


In reply to by कंजूस

नाही समजल ...मिपाच्या बोर्ड्वर लिहिताना कसा अनुस्वार द्यायचा? आनन्द(aanand),शान्ती(shanti) ,क्रान्ती (kranti)...असेच टाइप होत आहे .

 


In reply to by Bhakti

शांती,क्रांती,आनंद .....जमलं 

किती सोप होत,पण कोणीच साध उत्तर दिलं नाही :(  :(

shaaMti,kraaMti,aanMd...

इच्छा तिथे मार्ग !!


In reply to by एकुलता एक डॉन

आपण मिपाच्या कोणत्याही नव्या जुन्या लेखनावर प्रतिसाद दिला की तो धागा टॉपला येतो.
आता तो येत  नै ये..

-दिलीप बिरुटे


In reply to by कंजूस

नाही येत.
नवीन धागयावर प्रतिसाद देऊन पाहिला
जुन्या धागयाना वर आणून पाहिले ( ग + य असे लिहीले की ते ज्ञ असे येतेय.)
मी टैब बंद करून पाहिले
रीफ्रेश करून पाहिले
पूर्ण ब्राउजर बंद करून पाहिले
ब्राऊजर बदलून पाहिले
काहीही फरक पडत नापाहिले......


In reply to by विजुभाऊ

नवीन प्रतिसाद लिहिल्यावर ही धागा वर आला नाही. परंतू नव्या प्रतिसादांची नोंद अचूक होते आहे.
धागे ज्या तारीख वेळेप्रमाणे लिहिले गेले आहेत थोडेफार त्याच क्रमाने ते वरती दिसत राहतात. काही अपवाद आहेत.
____________________
अजून html tags परवानगी सुरू व्हायची आहे. ती झाल्यावरच फोटो आणि लिंका टाकता येतील. धाग्यांच्या संपादनाचे काम बाकी आहे. मध्यंतरी प्रतिसादाचे संपादन सुरू होते ते परत गायब झाले आहे.
[ पूर्वीच्या COBOL प्रोग्राम ची आठवण झाली. एखाद्या नवीन सोयीचा कोड लिहिला की तो पूर्ण कोडचा संच जुन्या प्रोग्रामला जोडता येत असे जुन्याला धक्का न धावता.]


१. धागा वर येत आहेत. 

२. प्रतिसादावर क्लिक केले की थेट प्रतिसादावर पोहचता येत आहे. 
३. नव्या प्रतिक्रिया  कोणाच्या आहेत  पाहता येतात. 
४. संगणकावरुन छायाचित्रे गाणे अपलोड होत आहेत. 
५. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( टंकन व्यवस्थित होतंय )

अजून लिहिते राहीन. 

-दिलीप बिरुटे


छायाचित्रे अपलोड सुविधा प्रतिसादाच्याच बॉक्स मधे वर बोल्ड, इटालिक, च्या रांगेत अवतरण चिन्हाच्या शेजाी एक बाण वर केलेले चित्र आणि बाण असलेले चिन्ह दिसते त्याला क्लिक केले की,  ब्राऊजर मधून थेट संगणकात प्रवेश करुन योग्य ते चित्र अपलोडवता येते. 

मालक चालक, मिपा हितचिंतक,  आणि  टेष्टर,  यांच्यात  अशी  चर्चा  की,  चित्रांचा आकार  कितीही एमबी असतो, व्हीडीयो तसेच, संगीत गाणी यांच्या आकारमानाने डेटा साइज विनाकारण वाढून मिपाडेटावर लोड येईल काय  अशी चर्चा सुत्रांकडून मिळत आहे.  

सध्या तरी ही सुविधा आहे,  प्रयोग करुन बघा. 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

..... ही सुविधा सुरू झाल्याबरोबर लगेचच एक लेख ( भूज पर्यटन) पंधरा वीस फोटोंसह टाकला होता यशस्वीपणे. सर्व फोटो साधारणपणे 1 MB Size चे करून अपलोड केले होते. विचारलेही होते की प्रत्येक सभासदास किती MB storage दिलं आहे. एका ठिकाणी म्हणजे लेखाच्या dp. त्या ठिकाणी 64 MB दिसत होते. तर त्या लेखाला ४ प्रतिक्रियांही आल्या होत्या नंतर तो लेख गायब झाला. असो.
फ्री स्टोरेजवर अवलंबून नाही. html tags सुरू झाले की गूगल फोटोंच्या लिंक्स मार्फत फोटोंसह लेख पुन्हा टाकू शकतो.


👋
ही सोय(!) मालक चालक हितचिंतक आणि टेष्टर यांच्यापुरतीच आहे.

बाकीच्या (अति)सामान्य मेंब्रांना

No HTML tags allowed.

अशा क्याट्यागरीत टाकलंय सध्या. 🙂


आता नवीन प्रतिसाद आला की धागा वरती येत आहे तसेच नवीन प्रतिसादांची संख्या दिसते आहे आणि क्लिक केल्यावर योग्य प्रतिसादावर जात आहे. यामुळे खूप युजर फ्रेंडली झाले आहे.

सुधारणेसाठी धन्यवाद


१. Full HTML/ restricted html  चालू झाल्याने चित्र टाकता आलं.

२. माझ्या लेखाचे नाव संपादन करता आलं.

३. आता गूगल बोर्ड कीबोर्ड वापरून इंग्रजी अक्षरे टंकता येत नाहीत. मराठी फोनेटिकच उमटतात.

४. Full html मधून     html tags अजूनही activate होत नाहीत. Google photos मधून sharing links घेऊन फोटो कसे टाकणार? मला खूप फोटो असलेले लेख टाकायचे आहेत आणि मला दिलेले स्टोरेज लवकरच संपून जाईल. वैयक्तिक अकाउंटला किती स्टोरेज मर्यादा आहे?


१. Full HTML/ restricted html  चालू झाल्याने चित्र टाकता आलं.

२. माझ्या लेखाचे नाव संपादन करता आलं.

३. आता गूगल बोर्ड कीबोर्ड वापरून इंग्रजी अक्षरे टंकता येत नाहीत. मराठी फोनेटिकच उमटतात.

४. Full html मधून     html tags अजूनही activate होत नाहीत. Google photos मधून sharing links घेऊन फोटो कसे टाकणार? मला खूप फोटो असलेले लेख टाकायचे आहेत आणि मला दिलेले स्टोरेज लवकरच संपून जाईल. वैयक्तिक अकाउंटला किती स्टोरेज मर्यादा आहे?


दुरुस्ती झाले आहे.

कखगघ abcd उत्तर EFGH 

OK.

Html tags वापरून 

<img src="/sites/default/files/inline-images/santdnyaneswarsanttukaram.png" width="20%" alt="testing html tags" />