Skip to main content

एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 01/04/2021 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा मंडळी, बरोबर २ वर्षापूर्वी दर महा १०% परतावा शक्य आहे का? हा लेख मी मिसळपाववर लिहीला होता. त्यावर बरीच धूळ उडाली. मला काही आह्वाने दिली गेली. पण मी माझ्या स्वतःवरच्या ठाम विश्वासाने माझी वाटचाल आणि संशोधन इथे न येता चालूच ठेवले. सांगायला आनंद वाटतो की मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही आज माझी मान ताठ आहे. याचे कारण माझा स्वतःवरचा विश्वास. असो. या कालावधीत मी पूर्णपणे माझी दोन तंत्रे विकसित केली. ही तंत्रे अशी - ० स्मार्ट मनी फुट प्रिंट - महाजनो येत गतः स पन्थः या सुप्रसिद्ध श्लोकातून प्रेरणा घेऊन स्मार्ट मनी कोणत्या दिशेने जातो आहे हे फक्त OHLC डेटा वरून ओळखण्याचे तंत्र. या तंत्राने FII, DII प्रमोटर्स कुठे खरेदी करत आहेत याचा शोध घेता येतो. तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह मला सध्या तरी नाही. कारण यासाठी मी ChartAlert आणि R ही दोन सॉफ्टवेअर्स वापरतो. Daily, Weekly आणि Monthly टाईमफ्रेमवर NIFTY 500 मधिल समभाग अभ्यासून मग ते खरेदीसाठी निवडले जातात. ० प्राईस डेव्हीएशन प्रोफाईल - समभागाची किंमत रास्त आहे की नाही हे ठरवणे. ब-याच आपण महाग अथवा अवाजवी किंमतीला समभाग खरेदी करतो. स्मार्ट मनी फुट प्रिंट तंत्राने सुचवलेला एखादा स्टॉकची किंमत अवाजवी वाढलेली असू शकते आणि ते धोक्याचे असते. या तंत्रावर मी मिडीयमवर लिहिलेला लेख जिज्ञासूनी जरूर वाचावा. ज्यांना याचा स्वत:च्या जबाबदारीवर फायदा घ्यायचा असेल त्यांनी माझा फेसबुक समूह अवश्य जॉईन करावा...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 39723
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

व्वा...! म्हणजे ही तुमच्या फेसबुक समूहाची जाहिरात आहे तर..

In reply to by प्रचेतस

:)

माफ करा .. पण एक कळले नाही .. तुमच्याकडे दरमहा १०% परतावा देणारी जादूची कांडी असूनही तुमचा पोर्टफोलिओ ६०% लॉस मध्ये कसा काय गेला ?

In reply to by युयुत्सु

दूसरे असं की माझा ट्रेडींग पोर्टफोलिओ अनेक प्रयोगांची आणि तंत्राची खिचडी झाला आहे. मी शक्यतो तोट्यात शेअर्स विकत नाही.

मार्च २०२० नंतर माझा पोर्टफोलिओ देखील खाली आला होता ... पण मे २०२० मध्ये तो पूर्वपदावर आला ... कुठलीही जादूची कांडी ना फिरवता

स्मार्ट मनी फुट प्रिंट हे तंत्र विकसित करण्यासाठी तुम्ही जे संदर्भग्रंथ अभ्यासलेत त्यांची नावे देऊ शकाल का?

In reply to by सतिश गावडे

मी कोणतेही संदर्भग्रंथ यासाठी आधार म्हणून वापरलेले नाहीत. ही कल्पना ११०% माझी स्वत:ची आहे.

In reply to by युयुत्सु

ही खूपच चांगली गोष्ट आहे. मात्र संदर्भग्रंथ तुम्ही वापरले नाहीत आणि तंत्र गुंतागुंतीचे असून मराठीत वा इंग्लीश्मध्ये समजावायचा उत्साह तुम्हाला सध्या तरी नाही. थोडक्यात या धाग्याचा तुमचा उद्देश आपल्या तंत्राची जाहिरात करुन मासे गळाला लावणे इतकाच आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. असो, त्यातूनही कुणाला फायदा होणार असेल तर ती ही चांगली गोष्ट आहे. (बाकी कोणाला फायदा होईल वा ना होईल मात्र तुम्हाला फायदा होईल असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. ;) )

In reply to by सतिश गावडे

थोडक्यात या धाग्याचा तुमचा उद्देश आपल्या तंत्राची जाहिरात करुन मासे गळाला लावणे इतकाच आहे असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. असो, त्यातूनही कुणाला फायदा होणार असेल तर ती ही चांगली गोष्ट आहे. (बाकी कोणाला फायदा होईल वा ना होईल मात्र तुम्हाला फायदा होईल असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. ;) )
माझा तुम्हाला उद्देश कळला नाही आणि दोन वर्षांपूर्वी लोकांनी माझ्यावर जसा संशय घेतला, तसेच तुम्ही करत आहात याचे दू;ख झाले. पण परत एकदा सांगतो की मला लोकांकडून पैसे गोळा करायची काहीही गरज नाही आणी मी जे कमवत आहे त्यात मी आणि माझे कुटुंबिय सुखी आहोत.

In reply to by युयुत्सु

माझा तुम्हाला उद्देश कळला नाही
शक्यता आहे, मात्र एखादी व्यक्ती शेयर मार्केटमधील एखाद्या तंत्राबद्दल सूतोवाच करुन नंतर आपल्या वैयक्तिक समूहाचे सदस्य होण्याचे आवाहन करते तेव्हा त्यात काही सुप्त हेतू आहे असा संशय नक्कीच येतो. असो, मी तुमचा मिडीयमवरील लेख वाचून तो प्रॉमिसिंग वाटल्यानंतरच तुमच्याकडे संदर्भग्रंथांची विचारणा केली होती. मात्र तुम्ही विकसीत केलेले तंत्र ही सर्वस्वी तुमची बौद्धिक मालमत्ता असल्याने त्याबद्दल लिहावे की न लिहावे हा तुमचा निर्णय असेल. मात्र जेव्हा मिसळपावसारख्या मंचावर जेव्हा लेखन होते तेव्हा एखाद्या गोष्टीचे केवळ सूतोवाच करून आपल्या वैयक्तिक समूहात सामील होण्याचे आवाहन न करता त्यात काही ठोस वाचायला मिळावे ही अपेक्षाही अवाजवी नसावी :)

In reply to by सतिश गावडे

तुमची बौद्धिक मालमत्ता असल्याने त्याबद्दल लिहावे की न लिहावे हा तुमचा निर्णय असेल.
या एक मुद्दा आहेच. पण त्याहीपेक्षा तंत्र गुंतागुंतीचे असल्याने ते मराठीत आणणे सध्या तरी अशक्य आहे. पण आपण मिडीयमवरील लेख वाचलात याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

माझा एक मित्र १९७६ सालापासून आहे ! त्याने स्टेट बँकेत नोकरी करता करता पैसे साठवून सुमारे २५ वर्षापूर्वी पुणे स्टॉक एक्सचेंज ची ब्रोकर मेंबरशिप घेतली. त्याने स्वतः कधी ट्रेडिंग केले नाही .फक्त कमिशनवर समाधान मानले. ट्रेडिंगच्या नादाला लागून अनेक लोक श्रीमंत व अनेक कफल्लक होताना त्याने पाहिले . मी एकदा त्याच्या ओफिसमध्ये गेलो असताना तो मला म्हणाला " त्या ट्रेडिंग वाल्या खुर्च्या पुढे मांडल्यात बघ ! मला कमिशन वाली मागची खुर्चीच प्रिय आहे ! "

In reply to by चौकटराजा

त्यांनी तुम्हाला सांगितले नसेल, कमिशन वालेच खुप जास्त कमावतात.. मी सब ब्रोकर होण्याच्या हालचाली केल्या अलीकडे, तरी लाखो(४० लाखाच्या पुढे )रुपये आधी लागतात असे कळल्यावर विचार करायची गरज उरली नाही.. ते तेव्हडे सोप्पे हि नाही..

In reply to by चौकटराजा

पॅसिव्ह ब्रोकर असणं ठीकच पण शेअर्सट्रेडींग करून दुसर्‍याला फायदा करून देण्याच्या ध्यासाने झपाटलेल्यांच मला भयंकर कौतुक आहे. यात ट्रेनींग देणारे, तुमच्या नावाने ट्रेडींग करणारे, फेसबूकपेज-युट्युब चॅनल काढणारे सगळे येतात. यांच्या ज्ञानदानाच्या सेवाभावी वृत्तीने माझे डोळे भरून येतात. शून्यापासून सुरवात करून ज्ञान मिळवण्याच्या अश्या कुठल्या पायरीवर त्यांना असा साक्षात्कार होत असेल की जो वेळ ट्रेडींग करणं, मार्केटचा आभ्यास करणं यात घालण्यापेक्षा लोकांची शाळा घेतल्यावर जास्त पैसे सुटू शकतील? की निव्वळ मानवजातीचं (यात टार्गेट ऑडीयन्सची भाषा, प्रांत, लिंग अशी विभागणीसुद्धा केली जाते) कल्याण करण्याची वृत्ती जागृत होते?

In reply to by तुर्रमखान

"की निव्वळ मानवजातीचं (यात टार्गेट ऑडीयन्सची भाषा, प्रांत, लिंग अशी विभागणीसुद्धा केली जाते) कल्याण करण्याची वृत्ती जागृत होते?" अनेक वर्षांपूर्वी (~२५) अमेरीकेतील श्री० सुनील देशमुख यांनी मराठी साहित्याला पारितोषिके देण्यासाठी १ कोटी रुपयांची ठेव स्वरुपात देणगी देण्याचे जाहिर केले, तेव्हा माधव गडक-यांनी यात काही तरी काळबेरे असावें तेव्हा ही लक्ष्मी स्वीकारावी का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची आठवण झाली. :)

In reply to by युयुत्सु

हे दार्तूत्व आवडतं क्षेत्र म्हणजे कला-साहित्य वगैरेंसाठी असू शकतं. पण, मी लोकांना दोन रुपये कसे मिळवावेत? हे ज्ञान दोन पैश्यात विकतो हे लॉजिक कळलं नै. ज्या व्यक्तीला शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे हे माहीत आहे ती व्यक्ती तुलनेने अत्यंत कमी पैश्यात दुसर्‍यांना पैसे कसे मिळवायचे हे शिकवतात. यात मात्र नक्की काहितरी गोम असते. यात मनुक्षस्वभाव म्हणून जनरल अवेअरनेस वाढावा म्हणून सोशल साईटवर धागे काढणारे येत नाहीत. पण आधिच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे आर्थिक फायदा मिळवणारे येतात.

तुमचा मिडीयमवरील लेख वाचला. लेख आवडला. अनुभवांती आपल्याला आलेल्या संकल्पना/हायपोथॅसिस जरूर मिसळपाव वर लिहा, वाचायला आवडतील माझ्या सारख्याला

In reply to by युयुत्सु

तंत्र गुंतागुंतीचे असल्याने ते मराठीत आणणे सध्या तरी अशक्य आहे.
माझ्या सारख्या वाचकांना तुम्ही तंत्र नाही सांगितले तरी चालेल. तुम्ही तुम्हाला अनुभवांती लक्षात आलेले पॅटर्न/हायपोथॅसिस स्वरूपात, इथे मिपावर लेख लिहून टाकले, तरी वाचकांना काहीतरी चांगलं वाचायला मिळेल. उदा. Hdfc bank चा डेली प्राईस स्टॅंडर्ड डेव्ह +- २.५ च्या रेंज मध्ये बहुतेक वेळा असतो, हे माझे वैयक्तिक निरीक्षण... जे कोणी एस आय पी मोड सारखे दर महिन्याला एखादा शेअर लॉंग टर्म साठी जमा करत असेल, तर त्याने जेव्हा किंमत विकली सरासरीच्या खाली 2.5 टक्के किंमत आल्यावर खरेदी केली तर् त्याचा थोडा अजून फायदा होण्याची शक्यता आहे... अश्या स्वरूपाचे तुमचे अनुभव/निरीक्षण/पॅटर्न वाचायला आवडेल...

In reply to by आंद्रे वडापाव

"अकस्मात वा जाहली जेथ गर्दी तिथे चवकशी जा करायास आधी" - झेंडूची फुले मनाच्या श्लोकाच्या विडंबनातील हा श्लोक स्टॉकमार्केटला चपखल लागू पडतो. जिथे खरेदी मोठ्याप्रमाणात होत आहे, तिथे मोहरा वळवल्यास फायदेशीर व्यवहारांची शक्यता हमखास वाढते. यासंदर्भात माझा मिडीयम वरील नवा लेख अवश्य वाचा.

In reply to by युयुत्सु

तुमचा दुसरा लेख , मिडीयम वरील वाचला, चांगला आहे. तुम्ही असेच डेटा वापरून लेख लिहीत रहा, चांगलं वाटतं कोणी असे अभ्यासपूर्वक लेख लिहिले की ...

तुमचा मिडीयमवरील लेख वाचला. लेख आवडला. अनुभवांती आपल्याला आलेल्या संकल्पना/हायपोथॅसिस जरूर मिसळपाव वर लिहा, वाचायला आवडतील माझ्या सारख्याला

पुन्हा एकदा आपले मिपावर स्वागत. बाय द वे, मिपाशिवाय करमत नाही हे खरं आहे, काही लोक इथे लॉगीन नसुनही मिपाच्या इत्यंभूत घटनांवर लक्ष ठेवून असतात, वाचत असतात आणि म्हणतात, बरेच दिवस झाले मिपा पाहिलं नाही. सहज आठवलं म्हणून पाठवलं -दिलीप बिरुटे

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

१००० रुपयाचे एक महिन्यात १० टक्के प्रमाणे म्हणजे एका वर्षात रुपये ३१३८, दोन वर्षात ९८५०, तीन वर्षात ३०९१२, ४ वर्षात ९७०००, ५ वर्षात ३ लाख ५ हजार सहा वर्षात ९ लाख ५५ हजार सात वर्षात ३० लाख आणि आठ वर्ष १ महिन्यात एक कोटी रुपये होतात याचे कोष्टक खाली दिलंय https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestc… हायला आठ वर्षात आपले कोट्यवधी लोक कोट्याधीश होणार असतील तर अगोदर श्री युयुत्सु याना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिकच द्यायला पाहिजे आणि काही वर्षांनी अर्थशास्त्राचे युयुत्सु पारितोषिक जाहीर करायला हरकत नाही.

In reply to by सुबोध खरे

डॉ० सुबोध खरे अरे व्वा! तुम्ही अजुन आहात तर... :) पण तुमच्या खोडसाळ प्रतिक्रियेमुळे आनंद झाला. आता चुकल्यासारखे वाटणार नाही. या धाग्याचे शीर्षक एका महिन्यात १०% परतावा देणारे शेअर्स शोधता येऊ शकतात का? असे आहे. तुमच्या उपस्थितीमुळे आता नेहेमीसारखि मौज येणार हे नक्की.

In reply to by युयुत्सु

खोडसाळ प्रतिक्रिया? मी तुम्हाला १००० रुपये देतो आठ वर्षात त्याचे आपल्याच कोष्टकाप्रमाणे १ कोटी रुपये होतील. तुम्ही त्यातले ७० लाख ठेवा आणि मला ३० लाख द्या. आपल्या ज्ञानाची किंमत माझ्या लाभापेक्षा जास्त असणार हे मी मुळात मान्यच केले आहे. कराराचा मुद्रांक शुल्क आणि इतर खर्च माझा. काय म्हणताय?

In reply to by सुबोध खरे

काय म्हणताय? मला तुमच्या उथळपणे केलेल्या ऑफर मध्ये जरा देखिल इंटरेस्ट नाही. पण तुमचा हटवादीपणा आणि खोडसाळपणा तुमच्या पदरात (आता माझ्या खर्चाने ) घालायची इच्छा मात्र नक्की आहे (सार्वजनिक व्यासपीठ असल्याने संयम बाळगला आहे). वेळ मिळाला की पुण्याला मला येऊन भेटा. मग सविस्तर बोलू. तुमचा जायचा यायचा खर्च मी करेन. काय म्हणताय?

In reply to by युयुत्सु

अरेच्या मी साधं गणितीय कोष्टक दिलंय ज्यात "तुम्ही" म्हणताय त्याप्रमाणे दरमहा १० % परतावा मिळाल्यास आठ वर्षे एक महिन्यात एक हजाराचे १ कोटी होतात. यात खोडसाळपणा काय बुवा? तुम्हाला झेपत नसेल तर तसं प्रामाणिकपणे कबुल करण्याचं धारिष्ट्य तरी दाखवा

In reply to by सुबोध खरे

तुमचा यायचा जायचा खर्च करायची दाखवली आहे. तुम्ही यायचं धारिष्ट्य दाखवा. मग मी कबूल करायचा प्रश्न निकालात निघेल.

In reply to by युयुत्सु

पुण्याला जायचा यायचा खर्च करण्याची फडतूस तयारी कसली दाखवता आहात? तो मला सहज परवडतो जे आहे ते समोर आहे. त्याबद्दल बोला अन्यथा सोडून द्या

मार्च २०२० मध्ये माझा ट्रेडींग पोर्ट्फोलिओ ६०% तोट्यात जाउनही कोणतेही ट्रेडिंग न करता माझा पोर्टफोलिओ काल ०१ एप्रिल रोजी ३० टक्के वर होता. म्हणजेच ९० % वाढ एक वर्षात. यात कोणतेही तंत्र किंवा गुपित नाही. चांगले समभाग घेतलेले होते. ते केवळ लॉक डाऊन मुळे पडले होते. ते वर आले कारण मुळात ते समभाग चांगलेच होते. याच मार्च २०२० महिन्यात विकत घेतलेले समभाग मला १०० % च्या वर परतावा देऊन गेले. उदा २३ मार्च २०२० रोजी मी ७२५ रुपयाला घेतलेले लार्सन अँड टुब्रो चे समभाग काळ १४४४ ला बंद झाले आहेत. हेच ८ फेब्रुवारी ला १५०० च्या वर होते. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब .. एकदम बरोबर ... बरोब्बर एक वर्षांपूर्वी (३ एप्रिल २०२०) निफ्टी ८०८३ अंकांवर बंद झाला आज (४ एप्रिल २०२१) ला निफ्टी १४८६७ वर आहे ... एका वर्षात ८४% वाढ थोडक्यात काय कुठलाही ऍनालिसिस न करता निफ्टी मधले शेअर्स घेतले असते तर एका वर्षात ८४% वाढ मिळाली असती .. दरमहा दहा टक्क्यांचे काय घेऊन बसलात ?

रिस्क है तो इश्क है असा स्वभाव असेल तर बिटकॉईन, फ्युचर ऑप्शन्स्, बँक निफ्टी, मार्जिन मध्ये खेळा, कुठे १० टक्के घेउन बसलायत??दिवसाला २०० टक्के कमवाल किवा गमवाल. नपेक्षा पी पी एफ्,म्युचुअल फंडच्या एस आय पी आहेतच गरीबाला

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

दिवसाला २०० टक्के कमवाल किवा गमवाल.
अतिलोभो न कर्तव्यः लोभं नैव परित्यजेत|

जर Index fund मधे असते तरी पोर्ट्फोलिओ आज उत्तम परतावा दिला असता , बाजाराचे आणि technical analysis चे ज्ञान नसले तरी

शेअर बाजार हा काही लाभांश मिळविण्यासाठी नसतो हे तेथील प्रथम तत्व आहे ! लाभांश नाही मग धंदा कसला ? तर जुगाराचा ! शेअर बाजार हा जुगारच असतो सबब गुंतवणूक ही धोक्याची ठरू शकते असा इशारा देखील दिलेला असतो. मी ज्यातून गेलो आहे त्यावरून सांगतो की कॅल्क्युलेटेड रिस्क ची एक स्थिती सोडली तर जीवन एक जुगार " हे गीत अगदी सत्य आहे मग त्यामुळेच तर नो रिस्क नो गेन हा विचार पुढे आलेला आहे. मानवी मन हे दारुड्यासारखे असते .दारुडा सुख आले तर आनंद म्हणून दारू पितो ,दुःख आले तर ते विसरण्यासाठी पितो. शेअर बाजारात आपण जी लाईन धरली आहे ती यश देते आहे म्हणून आणखी पैसे लावले जातात. व तोटा झाला ते तो भरून काढण्यासाठी पुन्हा हिरीरीनं पैसे लावले जातात. दीर्घ काळ चालेल अशी कोणतीही थिअरी कोणत्याच धंद्यात नसते ! शेअर बाजार ही त्याला अपवाद नाही .सबब १००० चे १ कोटी ८ वर्षात ही ऑफर फक्त एकच जन स्वीकारू शकेल पण त्यालाच आपण अनादी अनंत म्हणतो ना ?

In reply to by चौकटराजा

'शेअर्स म्हणजे जुगार कसा नाही' याने प्रत्येक ट्रेनर आपल्या ट्रेनींगची सुरवात करतो. म्हणूनच तर शेअर्स ट्रेडींग करून लाखो रुपये मिळवण्यापेक्षा काही शे रुपये नियमीत मिळाले तर बरे असा विचार करत असावेत.

मला आठवतेय, रशीयात एक माकडीण स्टॉक लिहिलेल्या चिट्ठ्या निवडायची. जी चिट्ठी येईल त्या कंपनीचा शेअर ९५% इन्व्हेस्ट्मेंट गुरूंच्या पोर्ट्फोलीयो पेक्षा चांगला परफॉर्मन्स द्यायचा. असे सलग आठ वेळा त्या माकडीणीने करून दाखवले होते. सापडली लिंकः https://www.dailymail.co.uk/news/article-1242575/Lusha-monkey-outperfor… तात्पर्यः financial knowledge does not play a great role in giving forecasts to how the market will change.

लोक हो, एक कायम स्वरूपी घोषणा करणे आवश्यक आहे. म्हणजे मूर्खासारखी दिलेली आह्वाने का स्वीकारता येत नाही हे सगळ्यांना कळले नाही तरी थोड्या लोकांना कळेल. ० चक्रवाढीने केलेल्या गुंतवणुकीचे १०००चे १कोटी कसे होतात, हे सांगण्यासाठी एक दुवा देण्यात आला आहे. या दुव्याचा फारसा उपयोग नाही. कारण या ठिकाणी केलेल्या गणितामध्ये तिन महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव नाही. हे घटक असे - ० ब्रोकरेज आणि exchange चे टॅक्सेस ० short term capital gains tax ० सर्वात महत्त्वाचे म्हणजे strategy चा सक्सेस रेट (जो परिस्थितीनुसार बदलतो)- सोप्या strategy चा सक्सेस रेट back testing करुन सहज काढता येतो. पण इथे प्रत्येक टप्प्यावर, विशेषत: PDP विश्लेषण करताना १० वर्षे जुना विदा विचारात घेतला जातो. शिवाय मी दोन वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरत असल्याने विदा एकातून दूस-यात पाठवून तपासण्यात भरपूर वेळ जातो. prediction कन्फर्म करण्यासाठी मी जे न्युरल नेट तंत्रज्ञान वापरतो, ते पण अतिशय वेळ खाउ असल्याने strategy चे back testing करुन सक्सेस रेट काढणे शक्य झालेले नाही. याशिवाय सुबोध खरे मला १००० रुपडे देणार म्हणजे सुरुवातीला मला अनेक संधी (१००० खाली किंमत असलेले समभाग विकत घ्यावे लागणार) गमवाव्या लागणार. या शिवाय इतक्या कमी गुंतवणुकीसाठी ब्रोकरेज जास्त द्यावे लागते, हे वेगळेच. असो. हे सगळे मूर्खासारखी आह्वाने देणारांना समजावे अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. तेव्हा डॉ० सुबोध खरे माझा आदर पूर्वीच गमावला आहे, पण ही व्यक्ती माझ्यासाठीतरी एक toxic person ठरली आहे.

In reply to by युयुत्सु

त्यांनी तुमच्याच लेखांवर आधारित साधे आव्हान दिले होते, आता ते अंगाशी येत असलेले पाहून तुम्ही गोलमाल विधाने करत आहात.

In reply to by युयुत्सु

डाॅक्टर सुबोध खरे, यांनी योग्य मुद्दे मांडले आहेत.... शिवाय तुम्हाला 70% प्राॅफिट शेयर दिला आहे... अजून काय हवे?

In reply to by मुक्त विहारि

मला जे कमवायचे आहे ते मी कमावले आहे आणि कमवत आहे. मी मूर्खासारखी आह्वाने स्वीकारत नाही कारण मी १ कोटी मिळवून दाखवतो असा दावा केलेला नाही.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे यांनी, ठराविक काळा पर्यंत नेले आहे.... मला तरी, सुबोध खरे यांच्या, गणितात काहीच चूक दिसत नाही...

In reply to by मुक्त विहारि

गणितात काहीच चूक दिसत नाही...
खरे यांनी ज्या घटकांचा विचार करायचे टाळले आहे, त्याकडे तुम्ही पण जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहात.

In reply to by युयुत्सु

ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन काही आराखडे करता येतात का कोणता स्टॉक घ्यायचा त्याचे? किंवा स्टॉक ची पण कुंडली असते का? (हा प्रश्न मी खवचट पणे विचारतोय असा कृपा करून समज करू नये. आपण ज्योतिषावर ब्लॉग लिहितात म्हणून विचारतोय.)

In reply to by भुजंग पाटील

"ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन काही आराखडे करता येतात का कोणता स्टॉक घ्यायचा त्याचे?" कुणीकुणी हा उद्योग करतात. पण मी नाही.

In reply to by युयुत्सु

हे सगळे मूर्खासारखी आह्वाने देणारांना समजावे बरं बुवा वितंडवाड सोडून द्या पण मला एक सांगा तुमचे जे काही इतर टॅक्सेस ( १५ % STCG) ब्रोकरेज( ०. ०७ %) इ खर्च वजा जाता दर महिना साधारण ८ % टक्के इतका परतावा मिळाल्या हरकत नाही. मग याच तुमच्या तत्वाप्रमाणे रुपये १०,०००/- चे अडीच वर्षात १ लाख रुपये होतात. https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestc… हे तरी तुम्हाला मान्य आहे का? माझे केवळ एकच म्हणणे आहे. दर महिना ८ % सातत्याने महिनोन्महिने शेअर बाजारात पैसे मिळवणे शक्य नाही. कारण ८ % महिना म्हणजे सरळ व्याजाने ९६ % वर्षाला होतात आणि दर महिना चक्रवाढ दराने १५०% टक्के होतात. सरळ व्याजाने ९६ % दर वर्षाला कायमस्वरूपी व्याज देणे कोणाला तरी शक्य होईल का? (अगदी ७% व्याज असेल तरी सरळ व्याजाने ८४ % वर्षाला होतात आणि चक्रवाढ दराने १२५ %.) याचे साधे आणि सुस्पष्ट उत्तर मला हवे आहे. पण ही व्यक्ती माझ्यासाठीतरी एक toxic person ठरली आहे. याला कोण काय करणार?

In reply to by सुबोध खरे

मग याच तुमच्या तत्वाप्रमाणे रुपये १०,०००/- चे अडीच वर्षात १ लाख रुपये होतात. https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestca... हे तरी तुम्हाला मान्य आहे का?
हे मान्य आहे आणि मी स्वत:च्या अकाउंट मध्ये हेच टार्गेट ठेवले आहे. रक्कम वाढल्यावर इतर अनेक प्रश्न होतात. - उदा० एकाच शेअर मध्ये व्यवहार केल्यास सेबी बोम्ब मारू शकते. मग पोर्ट्फोलिओ स्प्लिट करणे आले. स्प्लीट केल्यावर रिस्क वाढते आणि शक्यता कमी होत जाते.

In reply to by युयुत्सु

एकाच शेअर मध्ये व्यवहार केल्यास सेबी बोम्ब मारू शकते. जर तुमचे व्यवहार स्वच्छ असतील तर सेबी का यात बोंब मारेल?

In reply to by सुबोध खरे

"जर तुमचे व्यवहार स्वच्छ असतील तर सेबी का यात बोंब मारेल?" एकदम मोठी ओर्डर दिल्यावर स्टॉक गडगडू शक्तो. लोकांना चवकशीच्या नोटीसा गेलेल्या आहेत. मला स्वतःला ब्रोकर ने सेबीचे सर्क्युलर पाठ्वून अ‍ॅलर्ट केले होते.

In reply to by युयुत्सु

मोघम नको. स्पेसिफिक सांगा. मी २५००० स्टेट बँक एका दिवशी सेल आणि बाय केले तर मला सेबी नोटीस पाठवेल का ? किंवा किती युनिट्सला सेबी नोटीस पाठवते ?

In reply to by ज्ञानव

"मोघम नको. स्पेसिफिक सांगा." मला स्वतःला याची निश्चित उत्तरे मिळालेली नसल्याने मी देऊ शकणार नाही. पण एकदम मोठी डिलिव्हरी ओर्डर दिल्यास आयकर विभाग पण तुम्हाला चवकशीसाठी बोलवतो. अशी एक केस वाचली होती. बेसिकली त्यांना जेव्हा वाटते की एखादी व्यक्ती हावरट पणे किंवा दूष्ट हेतूने मोठे व्यवहार करत आहे. तेव्हा ते तुमच्या मागे लागतात.

In reply to by युयुत्सु

पण माझे अनेक क्लायंट आहेत ज्यांचा दैनिक टर्न ओव्हर काही करोड आहे. पण सेबीची नोटीस त्यांना अजून तरी आलेली नाही. आयकर फक्त तुमच्या आय वर डोळा ठेवून असते त्यामुळे एकदम मोठी ऑर्डरला आयकर विभागाच्या पोटात दुखू नये. युयुत्सुचा मराठी अर्थ सुबोध असा होतो का ? (उगाचच घुमते आहे डोक्यात.)

In reply to by ज्ञानव

पण सेबीची नोटीस त्यांना अजून तरी आलेली नाही. त्याचा जाब पण तुम्ही मला विचारणार का? सेबी त्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवत नसेल कशा वरून?

In reply to by युयुत्सु

Jhunjhunwala sold a little over 1.5 lakh shares at Rs 1,205.19 apiece, valuing the deal at Rs 18.17 crore. २ मार्च याच दिवशी श्री राकेश झुनझुनवाला यांनी समभाग १२०५ रुपयाला एक असे विकले तेंव्हा हा समभाग १२३७वरून १४५० पर्यंत चढून १४०३ ला बंद झाला. https://www.financialexpress.com/market/rakesh-jhunjhunwala-and-his-fir… समभाग चढणे पडणे इतक्या क्षुल्लक गोष्टीवर अवलंबून नसते बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

"समभाग चढणे पडणे इतक्या क्षुल्लक गोष्टीवर अवलंबून नसते बाकी चालू द्या" तुमच्या मार्केट विषयक विद्वत्तेने मी अगोदरच दिपून गेलो आहे. आणखी दिपून जाणे मला झेपणारे नाही.