१९६२ मध्ये त्या स्त्रीने शिवणकाम करुन आपल्या मुलांचा सांभाळ करायला सुरवात केली. त्यानंतर आपल्या मुलांना संसारास लावण्याचा काळ कमी केला तर ( २५/३० वर्ष) म्हणजे ती १९९२ ला आपल्या वैयक्तिक जबाबदारीतुन मुक्त झाली असे समजु या. ( ८७ ते ९२).
त्यानंतर तिने जमिनाचा तुकडा अथवा जे काही असेल ते दान केले. ( कोठे, का आणि कश्यासाठी या साठी मूळ अंक वाचावा, मला आठवत नाही).
आता असे जे लोक असतात त्यांना सर्वसाधारण प्रसिद्धीची आवड / हाव नसते. त्यामूळे २००५ ला का होईना लेख आला हे महत्त्वाचे.
आता याचा फायदा काय झाला हे सांगणे अवघड आहे. पण चाकोरीतच जगणार्यासाठी प्रत्येक गोष्ट बाजारी मुल्याच्या चौकटीतच पाहणार्यांना माझ्यासारख्यांना जगात जगण्याचा वेगळाही मार्ग असु शकतो हे समजले.
वस्तुनिष्ठ प्रश्न विचारुन विषय मूळ पदावर आणण्याचे आपले कौशल्य वादातित आहे. मित्रा, आभार आणि अभिनंदन. बाकी व्यनित.
अर्थतज्ञ एम. आर. वेंकटेश यांचा या विषयावरचा एक व्हिडिओ येथे पाहता येईल. ५७ मिनिटांचा असल्याने निवांत पहावा लागेल. आशियाई देशांतील जनतेने केलेली बचत ही डॉलरच्या गंगाजळीतच साठवली गेली असल्याने, डॉलर कोसळला तर त्याचा परिणाम काय होईल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. यात व्यक्त केलेली काही मते टोकाची आहेत (काही कॉन्सिपरसी थिअरीजही आहेत), पण एकंदरीत अमेरिकेचे तुटीचे बजेट, चीनकडे असणारी उधारी आणि नवीन पैसा उभारताना सोने तारण ठेवण्याची मोडीत काढलेली पद्धत याबद्दलची माहिती सोप्या भाषेत दिली आहे.
प्रतिक्रिया देणार्या सर्वांना धन्यवाद.
माझ्या मते तरी मूळ लेखाबद्दलच चर्चा झाली नसली तरी एकंदर विषयाला धरूनच सारे प्रतिसाद होते. त्यामुळे विषय भरकटला असे म्हणू नये.
फॉर द रेकॉर्ड, बचत म्हणजे गुंतवणूक असेच मला म्हणायचे होते. वर मी दिलेल्या एका प्रतिसादातूनच ते स्पष्ट व्हावे.
असो. पुन्हा एकदा धन्यवाद.
-रामशास्त्री
प्रतिक्रिया
प्रयत्न.
खुपच बौध्दिक,माहितीपर आणि उद्बोधक
विषयांतर
एक व्हिडिओ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद.