आमची मुंबई
लेखनप्रकार
Wikipedia वरती, अनेक ठीकाणी मुंबई (Mumbai) ऐवजी Bombay असा शब्द वापरलेला आहे.
कोणी माहीती देता का.. या सदरात मी स्वातंत्र्यवीरांवरील माहीतीची वानवा आहे हे सांगितलेच आहे, तिथेच हेदेखील लिहीले आहे. फक्त तिथे ह्याविषयी सविस्तर लिहायच राहून गेल म्हणून ईथे परत लिहीत आहे.
जर मिपावरील प्रत्येकानी थोडे जरी बदलले तरी सगळ्या Wikipedia वरील बदलाला वेळ लागणार नाही.
हे करण्यासाठी Wikipedia वर आपल्याला पुढील गोष्टी कराव्या लागतील.
१. Wikipedia वर खाते तयार करा (ह्याची सक्ती नाही, ह्याशिवायदेखील काम होत. पण त्या वेळेला आपल्या संगणकाच्या IP ची तिथे नोंद होते)
२. ज्या पानावर आपल्याला Bombay हा शब्द असेल त्या पानावरच्या सर्वात वरती असलेल्या चार (article, discussion, edit this page आणि history) पर्यायांपैकी edit this page हा पर्याय निवडावा.
३. या ठीकाणी गेल्यावर आपण Bombay चं Mumbai करु शकता.
४. सगळ्या ठीकाणी बदलल्यावर त्या चौकोनाच्या खाली असलेल्या Save Page च्या पर्यायावर टीचकी द्या.
सगळयांना कल्पना असेलच तरीही फक्त नमूद करतो की अजूनही, मुंबई विद्यापीठ आणि मुंबई ऊच्च न्यायालय यांच्या ईंग्रजी नावात अजूनही Bombay च आहे त्यामुळे ती तशीच राहू द्यावीत.
वाचने
2259
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
अत्यंत
चला बम्बेची बंभेरी ऊडवुया
In reply to चला बम्बेची बंभेरी ऊडवुया by अभिरत भिरभि-या
पोर्तूगिज