मनात विचारांचे काहूर घेऊन ती रानातून वाट काढत वस्तीवरच्या घरी चालली होती.
महिना झाला तरी गण्या तीचा पिच्छा काही सोडत नव्हता, त्यामुळे घरातून बाहेर निघणं तिच्या जीवावर येत होतं.
एकुलती एक मुलगी शिकावी या बापाच्या एका इच्छेसाठी सर्व भीती वाऱ्यावर सोडून ती कॉलेजला जात होती.
आज गावात "बेटी बचाओ बेटी पढाओ" कार्यक्रमासाठी तालुक्याची माणसे आली होती पुरा गाव तिथंच जमला होता. स्त्री चळवळीने जोर धरला होता. सरपंचाचे भाषण ऐकतच ती चालली होती.
बामनाच्या मळ्यापाशी दबा धरून बसलेला तो एका झडपेत समोर आला आनी तिला उसात घेऊन गेला " बेटी बचाओ बेटी पढाओ" च्या जयघोषात एक किंकाळी हवेत विरून गेली.
वाचने
3584
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
दुर्दैव, तिचं, तिच्या गावचं, देशाचं, आपलं.
या अशा प्रकरणांची दाहकता अजून
In reply to +१ by तुषार काळभोर
या अशा प्रकरणांची दाहकता अजून पण आपल्या लक्षात येत नाहीये खरच दुर्दैव आपल्या देशाचे.
झडपेत....झेपेत म्हणायचे का??
झडपेत....झेपेत म्हणायचे का??
+१
झडपच म्हणायच आहे.
In reply to झडपेत....झेपेत म्हणायचे का?? by विनिता००२
झडपच म्हणायच आहे.
झडप हाच शब्द योग्य आणि चपखल
झडप हाच शब्द योग्य आणि चपखल आहे.
वाघ सावजावर झडप घालतो
मग झडपेत समोर आला असे वाक्य
In reply to झडप हाच शब्द योग्य आणि चपखल by विजुभाऊ
मग झडपेत समोर आला असे वाक्य बरोबर वाटत नाही.
झेपेत समोर आला आणि झडप टा़कून तिला घेवून गेला असे चालेल.
निश्चितच लक्षात राहील.
In reply to मग झडपेत समोर आला असे वाक्य by विनिता००२
निश्चितच लक्षात राहील.
निश्चितच लक्षात राहील.
In reply to मग झडपेत समोर आला असे वाक्य by विनिता००२
निश्चितच लक्षात राहील.
निश्चितच लक्षात राहील.
In reply to मग झडपेत समोर आला असे वाक्य by विनिता००२
निश्चितच लक्षात राहील.
छान !
छान !
+१
+१
+१
+१