Skip to main content

हारासाठी काही पण ........... ( शशक २)

खिलजि यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
ती : दोघांसाठी वर्षाला तीन लाख , म्हणजे जर अतीच होतंय . तो : हो ग , पण सुविधा एकदम मस्त आहेत . जरा बरे वाटेल नि आपल्यालाही काळजी नसेल . ती : मी मागे हार मोडून दुसरा बनवते बोलले तर तुम्ही केव्हढं बोलला होता . तो : तुला योग्य वाटतं ते कर. एक मात्र नक्की पैसे दिल्यावाचून आपली यातून सुटका नाही . अगं वेडे चोवीस तास सुरक्षा आहे तिथे. आपलं काय , दोघेही कामावर आणि मुलं शाळेत . कोण आहे इथे ? ती : परवा कळेल तुम्हाला. ठळक बातम्या : क्रूरकर्मा सासूसासऱ्याना पोस्कोअंतर्गत अटक . न्यायालयीन चौकशी सुरु आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर
रांचो

वृद्धाश्रमा ऐवजी जेल ? +१
07/02/2019 - 18:03 Permalink
पलाश

"पोक्सो कायदा(इंग्लिश:POCSO ACT) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे.(विकिपीडिया)" या कायद्याखाली सासूसासर्‍यांना अटक करवून वृद्धाश्रमासाठी द्यावे लागणारे तीन लाख वाचवले. *हारासाठी काहीपण* असा अर्थ असावा. धक्कातंत्र जमलं आहे.
07/02/2019 - 18:09 Permalink
खिलजि

धन्यवाद सर्व प्रतिसाद्क आणि वाचक मंडळींचे. मजा येतेय , मस्त शशक मौसम चालू आहे. सर्वानी निदान स्पर्धेत नाही तर इथे या गंगेत तरी न्हाऊन घ्यावं .
08/02/2019 - 13:42 Permalink