✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका वेडाला पुनश्च सुरुवात!

M
mayu4u यांनी
Tue, 09/12/2017 - 15:21  ·  लेख
लेख
“मी पुन्हा सायकलिंग सुरु करणार आहे!" (भीत भीत) अस्मादिक. “उत्तम कल्पना! चांगलीशी सायकल घे आणि सुरु कर.” तीर्थरूप. (चेहऱ्यावर sadist हसू) “शाळेत पण नाव घालूया का?” सौ. “किती पैसे उडवणार आहेस?” मातोश्री. “साधारण १५ - २० हजार" (पडलेल्या आवाजात) मी. “एवढे? त्यापेक्षा बँकेत ठेव!” (अर्थातच) मातोश्री. “त्यापेक्षा घरी टीव्ही घे!” (फणकाऱ्याने) सौ. =============================================================================== काही दिवसांपूर्वी एका रविवारी दुपारी जेवणानंतर आमच्या घरी झालेला हा सुखसंवाद. भरल्या पोटी घरच्या दोन्ही अनाहिता सहज रुकार देऊन टाकतील अशा समजुतीने मी माझा मनसुबा मांडला, आणि पुढल्या काही दिवसांच्या कोल्ड वॉर ची सोय करून टाकली. =============================================================================== कुठल्याही सामान्य मुलाप्रमाणेच शाळकरी वयात मला सायकलीचं वेड लागलेलं. आधी दासन आणि मग हर्क्युलिस वर मी मनसोक्त भटकायचो. शिवाय फाफे सारखी माझी पण हडकुळीच असल्याने मित्रांवर शाईन मारायचो. शाळा आणि क्लास ला तर सायकलशिवाय जाण्याचा विचार करणंही अशक्य होतं तेव्हा. शिवाय मी आणि माझे मित्र सायकलींवरून दहिसर-बोरीवली भागात उंडारत असायचो, ते वेगळच. पुढे कॉलेज ला गेल्यावर सायकल चालवणं कमी झालं. बायकांचा, म्हणजे बाईक्स चा, छंद लागला. सायकल नुसतीच उभी होती, म्हणून ती पण कुणाला तरी देऊन टाकली. सायकलीचे दिवस संपले… … असा माझा गैरसमज होता. वस्तुस्थिती लौकरच ध्यानात आली. भले स्वत:ची नसली, तरी मित्रांच्या आणि त्यांच्या धाकट्या भावांच्या सायकली बघितल्यावर चालवल्याशिवाय चैन पडत नसे. म्हणून हौसेने पुन्हा एकदा सायकल घेतली. हिरो ऑक्टेन! एव्हाना शिक्षण संपून चाकरी सुरु झालेली. हौसेने चारचाकी पण घेतलेली. तरीही माझं मन सायकलवर बसलेलं! आणि अवघ्या तीन महिन्यात माझी नवी सायकल चोरीला गेली. पोलिसात तक्रार वगैरे देऊन झाली; पण काही फायदा झाला नाही. आणि मी एवढा नाराज झालो, की पुढली जवळपास ५ वर्षं सायकल घ्यायचा विचारही केला नाही. =============================================================================== अलिकडेच, म्हणजे गेल्या एक सहा-सात महिन्यांपूर्वी “सायकल सायकल” नावाच्या एका मिपाकरांच्या कायप्पा समूहात सहभागी झालो. आणि जुन्या प्रेमाला पुन्हा धुमारे फुटले! समूहात एकसो एक दिग्गज सभासद त्यांचे सायकलिंग चे अनुभव शेअर करतायत, नवख्यांना मार्गदर्शन करतायत, सारे एकमेकांना प्रोत्साहन देतायत… आणि, मिपाकर असल्याने, भरपूर दंगा सुद्धा करतायत! धमाल! सुरुवातीला मी या समूहात वाचनमात्रच होतो. एकतर सायकलिंग करत नव्हतो. त्यातून बाकीचे सदस्य रोज लांबलांबच्या ट्रीपा मारतायत, ब्रह्म (BRM) मारतायत, पंक्चर काढतायत, सायकल कट्टे करतायत… मी निमूट एका कोपऱ्यात उभा राहून सगळा दंगा बघायचो. हळू हळू भीड चेपली. मी सुद्धा माझ्या शंका विचारू लागलो. आणि सगळे अगदी आपुलकीने मला उत्तर देतायत हे पाहून धीर वाढला. पुन्हा एकदा सायकल घ्यायच्या विचाराने उचल खाल्ली. आणि उपरोल्लेखित संवाद घडला! =============================================================================== शेवटी “आधी स्वस्तातली सायकल घेऊन ती नित्यनियमाने चालव” या मातोश्रींच्या आज्ञेनुसार आणि “दिवाळीत TV घ्यायचाच!” या सौंच्या धमकीला मान देऊन स्वस्त सायकलीचा शोध सुरु केला. २-४ सायकली शोर्टलिस्ट केल्या. नेमकी तेव्हाच समूहातल्या सुमित ने ६०० ची ब्रह्म मारलेली. तो म्हणाला, कि कुणीतरी BTWIN ची MyBike घेऊन आलेला, BRM ला. माझ्या यादीत ही सायकल होतीच. लगोलग मी समूहात MyBike घेण्याविषयी पृच्छा केली. आणि सर्व दादा लोकांच्या आशीर्वादाने घेऊन सुध्दा टाकली! गेल्या शनिवारीच माझ्या बायकोच्या या सवतीला (तिचाच शब्द!) घरी घेऊन आलो… छोट्या छोट्या राईड मारायला सुरुवात केलीये… ३० किमीवर असलेल्या माझ्या कार्यालयात रोज सायकलवरून जायचं लक्ष्य आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आणि खात्री आहे की तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांच्या जोरावर लौकरच लक्ष्यभेद करेन. याचं कारण या समूहाचं घोषवाक्य, जे आता माझा मंत्र बनलंय: धर हँडल आणि मार पँडल!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
16436 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

अरे व्वा.. अभिनंदन..!!

मोदक
Tue, 09/12/2017 - 15:30 नवीन
अरे व्वा.. अभिनंदन..!! सायकलचा फोटो..?
  • Log in or register to post comments

मस्त जमलाय...भारी!

केडी
Tue, 09/12/2017 - 15:31 नवीन
मस्त जमलाय...भारी!
  • Log in or register to post comments

अरे वाह अभिनंदन!

दशानन
Tue, 09/12/2017 - 15:42 नवीन
अरे वाह अभिनंदन! ग्रुप मेम्बर कसे व्हावे हो?
  • Log in or register to post comments

धर हँडल आणि मार पँडल!

कपिलमुनी
Tue, 09/12/2017 - 15:48 नवीन
तुमच्याकडून ब्रह्म होवो ह्याच शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

भलतंच झक्कास. मी फक्त

ज्योति अळवणी
Tue, 09/12/2017 - 16:04 नवीन
भलतंच झक्कास. मी फक्त स्वप्नात विचार करते हो सायकलचा. खर तर खूप आवडतं सायकल चालवायला. शाळेत असेपर्यंत खूप चालवली होती. लग्नानंतर पण 3 वर्ष चालवायचे. पण मग एकूण संसारात अडकत गेले आणि आता सायकल म्हणजे स्वप्न झालं आहे. पण सायकल ग्रुप ची माहिती द्याना इथे. मी पण किमान वाचक होते. कुणी सांगावं तुमच्या सारखं कधीतरी सायकल घ्यायचं आणि चालवायचं धाडस देखील करीन
  • Log in or register to post comments

खंग्री. आता तुमच्याकडून

एस
Tue, 09/12/2017 - 16:07 नवीन
खंग्री. आता तुमच्याकडून बीआरएम घडो ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

चंबा मुतनाळ
Tue, 09/12/2017 - 16:18 नवीन
सायकल कंपूत स्वागत आहें. आता फोटो येउंदेत !!
  • Log in or register to post comments

व्वाह

स्वच्छंदी_मनोज
Tue, 09/12/2017 - 16:40 नवीन
व्वाह व्वाह.. नमनाचा लेख मस्त जमलाय. आता ग्रूपचा मोटो डोळ्यासमोर ठेऊन लांब लांब ट्रिप्स करा आणि इथे त्याचे लेख आणि फोटो टाका.. रच्याकने: त्या तुमच्या सवतीचा फोटो कुठाय? :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा आहेतच

मी-सौरभ
Tue, 09/12/2017 - 16:47 नवीन
रच्याकने कार्यालयात शॉवर घ्यायची सोय आहे ना? हे बघून ठेवा ;)
  • Log in or register to post comments

मुद्द्याचं बोललात!

mayu4u
Wed, 09/13/2017 - 10:51 नवीन
आहे सोय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

नक्की जमेल

स्थितप्रज्ञ
Tue, 09/12/2017 - 16:55 नवीन
प्रथम तुम्हाला नवीन सायकलीच्या (आणि नव्याने सायकलिंगच्या) शुभेच्छा! रोज चालवत राहा...३० किमी लांब कचेरीत अगदी आरामात जाल. तेवढं सायकलचा फोटू डकवायला विसरू नका ;)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

बाजीप्रभू
Tue, 09/12/2017 - 17:30 नवीन
धर हँडल आणि मार पँडल!
आवडलं घोषवाक्य.. छान लिहिलंय हेवेसानगे.
  • Log in or register to post comments

हभीणंदण हो भाऊ!!!

देशपांडेमामा
Tue, 09/12/2017 - 18:17 नवीन
सास्वांच्या कळपात आपले स्वागत आहे! सायकल सोबतच्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा !!! ग्रुपची नीयमावली वाचली असेलच....त्यातला वरुन मधला नियम म्हणतो की नविन सायकल घेण्यार्याने सर्व ग्रुप मेंबरांना मिसळपावाचा नैवेद्य दाखवणे कंपल्सरी आहे! :P देश
  • Log in or register to post comments

वरुन मधला नियम राहू दे...

mayu4u
Wed, 09/13/2017 - 10:37 नवीन
सर्वांना प्रत्येक मुंबई भेटीत माम्लेदारची मिसळ माझ्याकडून लागू आहे. त्वरा करा, ऑफर अमर्यादित कालावधीसाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडेमामा

...

धडपड्या
Tue, 09/12/2017 - 18:25 नवीन
सयकलींसोबतच लेखणीलाही पुनरुज्जीवन मिळालेलं पाहून आनंद झाला... आता सायकलींग करा, आणी लेख लिहा(च).. (फोटो नसले, तर फाऊल धरतात म्हणे... तस्मात... फोटो हवेच)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ! चालूद्यात जोरदार

वेल्लाभट
Tue, 09/12/2017 - 18:40 नवीन
शुभेच्छा ! चालूद्यात जोरदार पँडल !
  • Log in or register to post comments

मस्त ! शुभेच्छा.

हेमंतकुमार
Tue, 09/12/2017 - 20:24 नवीन
मस्त ! शुभेच्छा. धर हँडल आणि मार पँडल! >>> लय भारी! याच्या पुढचे एक भारी वाक्य : "दोन पाय जगातील सर्वांत सुंदर वाहन इच्छा शक्ती हेच त्याचे इंधन .
  • Log in or register to post comments

दोन पाय जगातील सर्वांत सुंदर वाहन, इच्छा शक्ती हेच त्याचे इंधन!

mayu4u
Wed, 09/13/2017 - 10:38 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हाहा!

पैसा
Tue, 09/12/2017 - 20:35 नवीन
मस्त लिहिलंय!
  • Log in or register to post comments

भारी ! लेखन आणि वेड, दोन्हीही

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/12/2017 - 20:54 नवीन
भारी ! लेखन आणि वेड, दोन्हीही ! भरपूर सायकलस्वार्‍या गाजवा आणि इथे सचित्र वर्णन टाकायला विसरू नका. या लेखावरून, ती वर्णने चटकदार असतिलच याची खात्री झाली आहे !
  • Log in or register to post comments

वा, मला पण फार आवडतं सायकल चालवायला

आगाऊ म्हादया......
Tue, 09/12/2017 - 21:05 नवीन
  • Log in or register to post comments

मी बी ले इचार कर्तो

सोमनाथ खांदवे
Tue, 09/12/2017 - 21:21 नवीन
मी बी लै इचार कर्तो , दोन चार येळ पोरा ची सायकल चालवून पन बगीतली . सीट लै टोचायच अन दोन्ही मांड्या ला सीट घासुन लै अगाग व्हायची , शेवटी वाकिंग वर समाधान मानलया .
  • Log in or register to post comments

मलाही फार आवडतं सायकल चालवायला

आगाऊ म्हादया......
Tue, 09/12/2017 - 22:06 नवीन
  • Log in or register to post comments

मलाही फार आवडतं सायकल चालवायला

आगाऊ म्हादया......
Tue, 09/12/2017 - 22:12 नवीन
  • Log in or register to post comments

दादाने हिरोची k10 सायकल

आगाऊ म्हादया......
Tue, 09/12/2017 - 22:13 नवीन
  • Log in or register to post comments

अभिनंदन

लिओ
Tue, 09/12/2017 - 22:43 नवीन
तुम्ही तुमच्या कार्यालयात ये जा करण्यासाठी जर सायकल वर्षातले ६ महिने जरी वापरलात तर कार्यालयात ये जा करण्यासाठी होणार्‍या खर्चात बचत, तुमच्या आरोग्य खर्चात बचत, जिमच्या खर्चात बचत, पुढच्या दिवाळिची काय खरेदी याचे नियोजन आत्ताच करा शुभेच्छा
  • Log in or register to post comments

पुढच्या दिवाळीची खरेदी...

mayu4u
Wed, 09/13/2017 - 10:39 नवीन
नवीन सायकल! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ

हे वेडाच खरं लक्षण, अभिनंदन :

sagarpdy
Wed, 09/13/2017 - 12:37 नवीन
हे वेडाच खरं लक्षण, अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

मी ही सायकल पुन्हा हातात

दुर्गविहारी
Wed, 09/13/2017 - 10:39 नवीन
मी ही सायकल पुन्हा हातात धरावी या विचारात आहे. अगदी तुमच्या सारखे सायकलिंग नाही तरी माझ्या ऑफिसमधे आणि शक्य तर ईतरत्र वापरण्याचा विचार आहे. उत्तम व्यायाम आणि प्रदुषणमुक्त सफारी म्हणजे सायकलिंग.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

mayu4u
Wed, 09/13/2017 - 10:52 नवीन
त्वरित अमलात आणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

उत्तम व्यायाम आणि प्रदुषणमुक्त सफारी म्हणजे सायकलिंग.

रघुनाथ.केरकर
Wed, 09/13/2017 - 11:08 नवीन
१०० टक्के खरय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

नक्की करा जमतेच

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/13/2017 - 12:15 नवीन
मी मागची आठ वर्षे रोज सायकलने घरापासुन ते कंपनीच्या बसस्टॉप पर्यंत येतो. (साधारण ४ किमी) म्हणजे रोजचे किमान ८ किमी सायकल चालवतोच. या शिवाय जवळपासची सगळी अंतरे शक्यतो सायकलनेच जातो. मागचे सहा महिने (म्हणजे मोदकाचा धागा आल्या पासुन) सुटीच्या दिवशी साधारण १५ ते २० किमी सायकलींग होतेच होते. सुरवातीचे काही दिवस मला सायकल चालवण्याचा प्रचंड त्रास झाला कारण जवळजवळ १५ वर्षांच्या गॅपने सायकल हातात घेतली होती. पण आता सवय झाली आहे. तुम्हाला तुमच्या संकल्पासाठी मनापासुन शुभेच्छा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

प्रोत्साहनासाठी, शुभेच्छांसाठी, प्रतिसादांसाठी...

mayu4u
Wed, 09/13/2017 - 10:49 नवीन
सर्वांचे मन:पूर्वक आभार! सर्वांना धन्यवाद! समूहाच्या स्त्रावा क्लब चा दुवा लेखात ऍडवल्याबद्दल व्यवस्थापनाचे विशेष आभार! BRM एक स्वप्न आहे, पाहू कसं जमतंय ते. आणि हो, फोटो टाकतो लौकरच! पुनश्च धन्यवाद! धरलंय हँडल आणि मारतोय पँडल! (सायकल आणि मिपा प्रेमी) मयुरेश
  • Log in or register to post comments

सास्वांच्या कळपात आपले स्वागत

दाते प्रसाद
Wed, 09/13/2017 - 11:15 नवीन
नवीन सायकल खरेदीबद्दल अभिनंदन आणि कळपात आपले स्वागत !! भरपूर सायकल चालवा , आणि ब्रह्म लवकरात लवकर पुर्ण करा !! आणि हो . . . . . . ते नैवेद्याचं बघा जरा
  • Log in or register to post comments

मुंबईत कधी येताय कळवा...

mayu4u
Wed, 09/13/2017 - 11:45 नवीन
... मी पुण्यास येणार असलो तर मी कळवतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दाते प्रसाद

वा वा!

मार्गी
Wed, 09/13/2017 - 15:17 नवीन
जोरदार!!! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान जमलंय...

Nitin Palkar
Wed, 09/13/2017 - 16:09 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! तुमचा संकल्प नक्की पूर्ण होईल. सरावात कसूर ठेवू नका. पुनश्च एकदा शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मित्रहो
Wed, 09/13/2017 - 20:59 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा आता सायकल सवारी करा आणि त्याविषयी इथे लिहा
  • Log in or register to post comments

मुंबई मधील एखादा ग्रुप असल्यास माहिती द्यावी

विशाल सोनवणे
Wed, 09/13/2017 - 23:40 नवीन
Please let me know if we have any group in Mumbai... I would like to join
  • Log in or register to post comments

सायकल घेताना नक्की काय काय

जेडी
गुरुवार, 09/14/2017 - 18:43 नवीन
सायकल घेताना नक्की काय काय पाहयचे, कोणती चांगली? थोडक्यात टेक्नीक्ल माहिती हवी आहे. http://www.firefoxbikes.com/BikeDetails.aspx?BikeId=147 ही सायकल घ्यायची विचार आहे..कसे समजणार, सीट वर खाली करता येते की नाही? मधली दांडी नको आहे... किंवा दुसरी कोणती घेवु शकतो का?
  • Log in or register to post comments

शक्यतो ट्रिगर शिफ्टरवाली

मोदक
Fri, 09/15/2017 - 00:25 नवीन
शक्यतो ट्रिगर शिफ्टरवाली सायकल घ्या आणि शिमानो टर्नी, अल्टस, अ‍ॅसेरा (चढत्या क्रमाने) या प्रतीचे मागचे डिरेलर असूद्यात. तुम्ही लिंक दिली आहे त्या सायकलला सीटखाली मध्येच एक पर्पल कलरचा पार्ट आहे.. तो सीटचा क्विक रिलीज आहे. सीट वरखाली करता येईल. ही सायकल आवडली असली तर अशीच सायकल पण ट्रिगर शिफ्टर बघा. Image removed. यातला एकदम उजवीकडचा शिफ्टर रोड बाईकचा आहे. आपण साध्यासुध्या कारमधून जाताना जसे फेरारी किंवा लँबॉर्गिनीकडे दुर्लक्ष करतो किंवा जितके लक्ष देतो तितकेच याच्याकडे लक्ष द्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेडी

सायकल घेण्यापूर्वी...

mayu4u
Fri, 09/15/2017 - 11:19 नवीन
...मोदकरावांचा खालील धागा वाचावा: http://www.misalpav.com/node/28858
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेडी

अरे वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 09/14/2017 - 23:24 नवीन
अभिनंदन! सायकलने भटकायची जुनी आवड आता मागे पडली असली तरी सायकल ती सायकलच! स्वाती
  • Log in or register to post comments

अरे वा! अभिनंदन!

रुपी
Fri, 09/15/2017 - 00:39 नवीन
अरे वा! अभिनंदन! स्वतःला जे मनापासून आवडतं ते करत आहात त्याचं खरंच कौतुक वाटतं. माझे एक प्रोफेसर होते, त्यांना सायकलची अत्यंत आवड आहे. त्यांना काही भाषाही अवगत आहेत. जेव्हा त्यांनी जपानी भाषा शिकायचे ठरवले, तेव्हा शिकण्याची सुरुवात करताना त्यांना शिकवणार्‍याने विचारले की सर्वांत आधी तुम्हाला कुठला शब्द शिकायचाय? तर त्यांचे उत्तर होते 'सायकल'.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा