नवीन शहर, नवीन भाषा. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. चारही बाजूला हजार मैलांपर्यंत कोणीही ओळखीचं नाही. मी रेल्वेमधून उतरलो. गर्दीच गर्दी होती. भरपूर लोक होते. कानावर पडणारी भाषा अगदीच वेगळी. सगळीकडे लिहिलेलं त्या वेगळ्या भाषेतच होतं. लोक मात्र माझ्या शहरात होते तसेच होते. रंग, उंची, फारसा फरक नव्हता. मला जरा हायसं वाटलं. खूप मोठा प्रवास झाला होता, म्हणलं जरा श्वास घ्यावा. एका उपहारगृहात गेलो. कोपऱ्यातलं टेबल बघितलं, एका खुर्चीवर बॅग ठेवली, एका खुर्चीवर मी बसलो. सुरुवातीपासून शेवटपर्येंत मेन्यूकार्ड काळजीपूर्वक वाचून काढलं. पाकीट काढून पैसे किती आहेत बघितलं. वेटर आला. मी हव्या असलेल्या पदार्थासमोर बोट ठेवलं. तो गेला. मी उत्सुकतेने वाट पाहत बसलो काय येतय म्हणून. चहा किंवा कॉफी येईल असं मला वाटत होतं. वेटर हातात एक ताटली घेऊन आला. त्याने ती माझ्यासमोर ठेवली, झरकन निघुनपण गेला. मी विचारात पडलो. हे काय आणून ठेवलं याने? दुसऱ्या कोणाची ऑर्डर तर नाही. अचानक डोक्यात प्रकाश पडला. माझीच ऑर्डर आहे. मेन्युकार्डमध्ये एक अंकी किंमत असलेला एकमेव पदार्थ होता - एक्स्ट्रा पाव. मी पाव खाल्ला, पाणी प्यायलं आणि निघालो.
वाचने
3722
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर मग?
ओके
छान प्रयत्न
फक्त एक्स्ट्रा आयटेमचे हॉटेल
जबरदस्त..थरारक कथा !! खिळवून
शैली आवडली!!!!
छान
एक्स्ट्रा पाव.
कथा ठीकठाकच.. पण जव्हेरगंज
ठीकठाक प्रयत्न पण काहीतरी
साॅरी समजले
In reply to ठीकठाक प्रयत्न पण काहीतरी by अभिजीत अवलिया
त्यांचे पण आकडे अरबीच असतील
In reply to साॅरी समजले by अभिजीत अवलिया
धन्यवाद मित्रांनो.
आवर्जून लिहा, तुमच्यात सशक्त
In reply to धन्यवाद मित्रांनो. by प्रतिक कुलकर्णी