Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आवाहन.

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 26/01/2017 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, सालाबादप्रमाणे यंदाही आपण शतशब्दकथा स्पर्धा आयोजित करतोय. दरवर्षी आपण शतशब्दकथांना विषय देत असतो आणि त्यावर कथा मागवत असतो. यंदा उपक्रमामधे थोडासा बदल करणार आहोत. ह्या वर्षीच्या स्पर्धेचा विषय आहे "A picture speaks in 100 words" अर्थातचं "छायाचित्राची गोष्ट १०० शब्दांमध्ये". आवाहनाच्या धाग्यामधे तुम्हाला काही छायाचित्रं दिली जातील त्यापैकी एकावर तुम्हाला १०० शब्दांमधे एक कथा लिहायची आहे. स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा २६ जानेवारी २०१७ ००:०० भाप्रवेला सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१७ २३:५९ भाप्रवेला संपेल. २. स्पर्धकांनी आपली शशक "साहित्य संपादक" या आयडीला व्यनिमार्फत पाठवायची आहे. कुठल्याही साहित्य संपादकांच्या वैयक्तिक मिपाखात्यावर अथवा साहित्य संपादकांच्या जीमेल पत्त्यावर कथा पाठवू नयेत हि विनंती. ३. प्रत्येक व्यक्ती (आयडी नव्हे!) एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील. ४. २६ जानेवारी २०१७ ते २१ फेब्रुवारी २०१७ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचं नाव जाहीर होणार नाही. ("कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात" हा आक्षेप घेतला जाऊ नये म्हणून हे करण्यात आलेलं आहे.). स्पर्धा संपल्यावर लेखकांची ओळख जाहिर करायचीचं आहे. ५. मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाऊंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल. ६. साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधनाची वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल. ७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही. ८. तसंच, कथेत कोणतीही चित्रं, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल. ९. जातिधर्माला दुखावणारं वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात. १०. कथेला आपण देऊ इच्छित असणारं नावं व्यनिच्या विषयामधे लिहिलेलं असावं. तर स्पर्धेसाठीची छायाचित्रं आणि विषय असे आहेत. ०१. (छायाचित्रः आपले मिपाकर एस भाऊ). aa ०२. (आंतरजालावरुन साभार): a ०३. (सी.एन.एन. वरुन साभार): aaa ०४. (आंतरजालावरुन साभार): aaaaaaa ०५. नवा पैसा: (आंतरजाल, मोदी, रिझर्व बँक ऑफ इंडिया कडुन साभार ;) ) aaaaaa स्पर्धेविषयी काही मदत हवी असल्यास कॅप्टन जॅक स्पॅरो, आदूबाळ, स्रुजा, स्नेहांकिता, वेल्लाभट किंवा साहित्य संपादक ह्यांच्याशी संपर्क साधावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21663
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

शशक स्पर्धेला वेगळा टॅब का बरे नाही यावेळी? स्पर्धेतल्या कथा या नेहमीच्या लेखांप्रमाणेच इतरत्र विखुरलेल्या आहेत! मग त्यात फरक असा काही राहात नाही... नवीन आलेल्या कथा मुद्दाम शोधून वाचायला लागत आहेत...

In reply to by चांदणे संदीप

वेगळा टॅब हवा होता. ब-याच शशक आता मागे गेल्या आहेत.

३. प्रत्येक व्यक्ती (आयडी नव्हे!) एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील.
याबद्दल पुनर्विचार व्हावा. मला वाटतं काही लेखकांकडे बरंच कसब असू शकतं , शिवाय स्पर्धेमुळे लिहण्याचा उत्साहही वाढतो. झालंच तर त्या निमित्ताने जास्त कथा येणार असतील तर वाचकांनाही तितकीच मेजवानी नाही का ? शिवाय यावेळी 'साहित्या संपादक' आयडीनेच कथा प्रकाशित होत आहेत म्हणजे कुणी आयडी बघून मत देण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे मला वाटतं कुणालाही हव्या तितक्या कथा पाठवू द्याव्यात. फक्त एकच कथा दुरुस्ती/पुनर्लेखन करुन पुन्हा पाठवू नये (अर्थात तसं सहसा कुणी करणार नाहीच म्हणा) इतकीच अट असावी. यामुळे जास्त कथा येतील आणि एकूणातच स्पर्धेतली रंगत खूप वाढेल. मिपाकर काय म्हणता यावर ?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तसं तर कधीही कथा लिहिता येतात आणि टाकता येतात. पण माझं म्हणणं हे आहे की स्पर्धेमुळे लिहिण्याचा उत्साह दुणावतो, शिवाय जास्त कथा आल्याने स्पर्धेची रंगत वाढेल हे महत्वाचं. झालंच तर 'साहित्य संपादक ' कथा प्रसिद्ध करणार असल्याने एखाद्या लेखकाला स्वतःला खर्‍या अर्थाने जोखता येईल.

बहुतेक आजपासून सुरु होईल मतदान. कारण कालची शेवटची मुदत होती शशक पाठवायची. नवीन धागा निघणार आहे का मतदानासाठी?

27th jan एकचं फेरी. निकाल २७ फेब्रुवारीला. 29th jan मतदानासाठी एक वेगळा धागा काढण्यात येणार आहे. तो कथा स्वीकारायची मुदत संपल्यानंतर येईल. यासंदर्भात काहीच दिसत नाही. जरा नीट समजू शकेल का? स्पर्धा संपली म्हणजे कथा स्वीकारणे संपले. पण मतदानाचे काय?

एक सुचवणी: शशकसाठी अनुक्रमणिका का तयार करत नाही? गोष्टमध्ये वा भाषा दिनाला आहे तशी. कदाचित ती पटकन वर लावणं सोपं होईल?

मी पाठवलेली कथा प्रकशित झालीच नाही. कदाचित रद्दबातल ठरवली असेल. हरकत नाही. पुढच्या वेळी परत प्रयत्न करू. पण साहित्य संपादक ह्या स्पर्धेच्या बाबतीत काही खुलासा करत नाहीयेत. ह्या धाग्यावर माहिती नाही, व्य.नि.ला उत्तर नाही, शशक स्पर्धेचा वेगळा धागा येणार होता तो आलेला नाही आणि मतदानासाठीचा धागाही आलेला नाही. नक्की काय झालंय कळू शकेल का?

In reply to by निरु

पण साहित्य संपादक ह्या स्पर्धेच्या बाबतीत काही खुलासा करत नाहीयेत. ह्या धाग्यावर माहिती नाही, व्य.नि.ला उत्तर नाही, शशक स्पर्धेचा वेगळा धागा येणार होता तो आलेला नाही आणि मतदानासाठीचा धागाही आलेला नाही. नक्की काय झालंय कळू शकेल का?
अस्वीकृत कथांच्या लेखकांना साहित्य संपादकांनी उत्तर पाठवून खूलासा करायला हवा

In reply to by मराठी कथालेखक

अस्वीकृत कथांच्या लेखकांना साहित्य संपादकांनी उत्तर पाठवून खूलासा करायला हवा
सगळ्या अस्वीकृत कथांना आणि स्वीकारलेल्या कथांना वेळेत पोहोचं दिलेली आहे.

निकाल 28 तारखेला लागणार असं या धाग्यावर सांगितलं गेलं होतं. काही प्रॉब्लेम असला तर जरूर सांगा. परंतु काहीच न समजल्याने अनेकजण गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत. तरी संपादक मंडळाने याची नोंद घ्यावी ही विनंती

नमस्कार, साहित्य संपादकांच्या वतीने, शतशब्दकथा स्पर्धा आयोजकांच्या वतीने मी तुम्हा सर्वांना हे कळवतो की काही तांत्रिक अडचणींमुळे शतशब्दकथेच्या मतदानाची व निकालाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. सदर अडचण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघून, मतदान व निकालाकडे या स्पर्धेची वाटचाल होईल. तरी आपण सर्वांनी निश्चिंत रहावं, व आयोजकांच्या अडचणीला समजून घ्यावं अशी नम्र विनंती. स्पर्धेच्या प्रक्रियेला आणि हे कळवायलाही झालेल्या उशीराबद्दल क्षमस्व.

In reply to by वेल्लाभट

वेल्लाश्री.. तोपर्यंत एका धाग्यात सर्व शशकचे टायटल एकत्र करून आणि त्यांना लिंका देवून प्रकाशीत करता का..? निदान सगळे धागे डोळ्यासमोर राहतील..!

उशीर होण्या बद्दल काहीच म्हणणं नाही. फक्त साहित्य संपादक यांच्याकडून काही उत्तर येत नव्हत म्हणून मनात थोडा गोंधळ उडाला होता इतकंच. काहीच घाई नाही.

सध्या मिपावर अनेक उपक्रम चालू आहेत (मराठी भाषा दिन, महिला दिन ई) त्या गडबडीत ही स्पर्धा विसरली गेली आहे की काय ?

In reply to by मराठी कथालेखक

सध्या मिपावर अनेक उपक्रम चालू आहेत (मराठी भाषा दिन, महिला दिन ई) >> अजून नवीन वर्षाचे ७० दिवसदेखील झाले नाहीत आणि इथे चारचार विशेषांक/उपक्रम आलेत! हे वाचकांच्या दृष्टीने थोडे ओवरकील वाटत नाहीय का माझ्याखेरीज इतर कोणाला? अनाहिता आणि साहित्य संपादक या दोन्ही कन्सेप्ट मिपाला अतिशय फायद्याच्या ठरल्यात. दोघांनी मिळून गेल्यावर्षी फारच छान उपक्रम राबवलेत. पण यावर्षी वाचताना खरंच दमायला होतंय. महिन्यातून एकच उपक्रम पुरेसा होइल. आणि ते एकापाठोपाठ येणार नाहीत याची काळजी घेतल्यास बरे. हेमावैम.

In reply to by एमी

सहमत आहे. खासदिनानिमित्त येणार्‍या लेखमाला समयोचितच असाव्यात. पण श.श.क. स्पर्धा मागच्या वर्षी वाचकांना पर्वणीच होती, तसे यावेळी वाटले नाही. सर्व उपक्रम आणि मिपाच्या नवीन थीमची सवय व्हायलाही थोडा वेळ लागला, त्यामुळे मलाही वाचायला वेळ कमी पडत आहे असे वाटले खरे.

In reply to by रुपी

नवीन थीम इफेक्ट विसरलेच होते! त्यामुळे ७० नव्हे ५५ दिवसच म्हणायला हवं खरंतर. थीम सेट होण्यात १५ दिवस गेलेले. मला वाटतं प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला अंक यावा. मराठी भाषा दिन २७ ला असला तरी अंक १४/१५ फेबलाच येइल आणि महिला दिन ८ ला असला तरी अंक १५ मार्चलाच येइल. आणि वर्षातले दोनेक महिने श्रमपरिहार म्हणून किंवा नवीन आयड्या राबवायला मोकळे ठेवावे. दहा अंक भरपूर झाले वर्षभरात. गणपती दसरा दिवाळी देखील असेच एकापाठोपाठएक येणार आहेत. सो आधीच प्लान करा. रादर हे विशेषांक/उपक्रम राबवणार्यांनी वर्षाच्या सुरवातीलाच कायकाय करणार ठरवून टाकावं आणि तेवढंच करावं. कदाचीत ती लोकं हे आधीच करत असतीलही. पण सध्या खरंच थोडं दमानं घ्या :-) === यावर्षीची शशक मलातरी ठीकठाक वाटली. इतरांना मजा न येण्यामागे चित्र देऊन विषय रेस्ट्रीक्ट करणे, महिनाभर कथा येत राहणे, बर्याच नवलेखकांनी कथा पाठवणे वगैरे कारणं असू शकतील.

निकालाला एवढा उशीर का होतोय कळत नाहीये. आता तर महिला दिनपण संपला, मतदान धागा काढायला अडचण नसावी.

एकूणच विलंबामुळे मतदान आणि औपचारिक निकाल यातली रंगत निघून जात आहे. आता निदान आम्हा वाचकांना आवडलेल्या कथा कुणाच्या होत्या हे कळायला हवं. मला वाटतंय आता मतदान आणि निकाल प्रक्रियेची वाट पाहून सगळेच कंटाळलेत त्यापेक्षा ज्या त्या लेखकांनी आपापल्या कथेवर (आणि हवे असल्यास या धाग्यावरही ) आपली ओळख जाहीर करावी.

In reply to by वेल्लाभट

संयम आणि सहकार्य आहेच. पण निदान पुढची प्रक्रिया केव्हा सुरु होईल , केव्हा पुर्ण होईल याचे वेळापत्रक तरी किमान जाहीर व्हावे ही अपेक्षा.

कृपया धीर धरावा अशी विनंती. साहित्यसंपादक नक्कीच मतदानाबद्दल काही उपाययोजना करतील. यात काही तांत्रिक अडचणी असतील.

अगोदरच पूर्ण वर्षाचं प्लॅंनिंग करणं फार पटत नाही. त्यातून मिपा मध्ये असणारी सहजता निघून जाईल. त्याशिवाय साहित्य संपादक हा आयडी जरी एक असला तरी तो अनेकांकडून operate होत असावा. म्हणजे अनेकांच्या मनातल्या नवनवीन योजना इथे थोड्या चर्चेनंतर आणि convince झाल्या नंतर राबवण्यात येत असाव्यात. हे खरं आहे की यावर्षी थोडा over डोस झाला. पण त्यातही मजा आहेच की. त्याशिवाय प्रत्येकजण प्रत्येक योजनेत भाग घेत नसतो. आपापल्या आवडीप्रमाणेच वाचन आणि लिखाण होते. त्यामुळे नवनवीन कल्पनांचे कायम स्वागतच असेल. आता शशक संदर्भात.... काही नवीन मतदान पद्धत संपादक मंडळाच्या मनात असावी असं वाटत. आमच्या सारख्या जरा जास्तच उत्साही आयडींसाठी तरी त्यांनी काहीतरी उत्तर द्यावं ही विनंती.

In reply to by ज्योति अळवणी

वेल... इट डिपेंड्स... कोणाला (मालक > अनाहिता+सासं > नियमीत सदस्य ज्यांना खरंच मिपामधे जेन्युन रुची आहे > इतर) काय वाटतं/हवंय... आम्हाला क्रिकेट/फुटबॉल/आटापाट्या/जिलबी/गोट्या खेळायला आवडते म्हणून आम्ही ते खेळतच राहणार! मग कोणी प्रेक्षक मिळाले नाहीत तरी चालेल! आमचंआम्ही बिल्डींग क वि. ख किंवा गल्ली प वि. फ किंवा पिंपळगाव वि. बोरगाव सामने घेत राहु! म्हणणे असेल तर ठीक आहे. ब्रँडनेम बनवायचे असेल तर क्वांटिटी कमी करुन क्वालिटी वाढवावी लागेल. एनीवे मी '>इतर' गटात येते त्यामुळे माझ्या मताला शुन्य किंमत आहे. तरीही मांडतेय ;-) === मला वाटतं गेल्या दोन/तीनेक वर्षात बोलीभाषा, महिलादिन, गणपती, दसरा, दिवाळी हे पाच विशेषांक ठरलेलेच आहेत. अजूनेक एप्रिल/मेमधे काहीतरी उपक्रम ठरवा. हे सहा अनाहिता आणि सासंमधे वाटुन घ्या. महिलदिन, दसरा अनाहिताकडे; बोलीभाषा, दिवाळी सासंकडे; बाकीचे दोन्ही दोघे मिळून करतील. ऑफिशिअली मिपाकडून हे एवढंच दरवर्षी, नियमीत, क्वालिटी वाढवत करत रहायचं. त्याखेरीज सदस्यांना स्वतःहून, स्पाँटेनियसली काही करायचं असेल तर त्यांचंते करु शकतात. फक्त त्याला ऑफिशिअल बैकींग नसेल. आणि ते दरवर्षी होइलच असेल नाही. === एनीवे धाग्यावरुन रजा. टाटा.

In reply to by एमी

अ‍ॅमी, तुम्ही इथे धाग्यावर सल्ले देण्यापेक्षा संबंधितांना व्यनि करा की. सूचना, सल्ले आहेत तर ते सूचना, सल्ले म्हणूनच पोचूद्यात.

In reply to by मराठी कथालेखक

जाऊ द्या हो, अनेक उपक्रमांच्या ओझ्याखाली ही स्पर्धा साफ फसलीय. आयोजकांनी निदान काही महिने आता कुठलाच उपक्रम सुरू करू नये.

In reply to by प्रचेतस

सहमत! इतके उपक्रम आणि विशेषांक चालले होते कि कधी कुठला उपक्रम सुरु होत होता आणि कुठला संपत होता हे पण कळत नव्हतं! मेनबोर्ड सगळा कुठल्या कुठल्या लेखमालेनेच भरला होता... त्यात वाचनीय गोष्टी असल्या तरी मग इच्छा राहिली नाही... किती आणि कोणाकोणाच्या मुलाखती वाचणार शेवटी! आणि आता या स्पर्धेचं मतदान घेण्यातही काही अर्थ नाही वाटतंय, निव्वळ उपचार म्हणून केल्यासारखं होईल ते... असो पुढे कृपया वाचकांना दम खाऊन द्यावा विशेषांकाच्या मध्ये...