नमस्कार मिपाकरांनो,
सालाबादप्रमाणे यंदाही आपण शतशब्दकथा स्पर्धा आयोजित करतोय. दरवर्षी आपण शतशब्दकथांना विषय देत असतो आणि त्यावर कथा मागवत असतो. यंदा उपक्रमामधे थोडासा बदल करणार आहोत.
ह्या वर्षीच्या स्पर्धेचा विषय आहे "A picture speaks in 100 words" अर्थातचं "छायाचित्राची गोष्ट १०० शब्दांमध्ये". आवाहनाच्या धाग्यामधे तुम्हाला काही छायाचित्रं दिली जातील त्यापैकी एकावर तुम्हाला १०० शब्दांमधे एक कथा लिहायची आहे. स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
१. स्पर्धा २६ जानेवारी २०१७ ००:०० भाप्रवेला सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१७ २३:५९ भाप्रवेला संपेल.
२. स्पर्धकांनी आपली शशक "साहित्य संपादक" या आयडीला व्यनिमार्फत पाठवायची आहे. कुठल्याही साहित्य संपादकांच्या वैयक्तिक मिपाखात्यावर अथवा साहित्य संपादकांच्या जीमेल पत्त्यावर कथा पाठवू नयेत हि विनंती.
३. प्रत्येक व्यक्ती (आयडी नव्हे!) एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील.
४. २६ जानेवारी २०१७ ते २१ फेब्रुवारी २०१७ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचं नाव जाहीर होणार नाही. ("कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात" हा आक्षेप घेतला जाऊ नये म्हणून हे करण्यात आलेलं आहे.). स्पर्धा संपल्यावर लेखकांची ओळख जाहिर करायचीचं आहे.
५. मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाऊंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६. साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधनाची वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.
८. तसंच, कथेत कोणतीही चित्रं, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल.
९. जातिधर्माला दुखावणारं वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०. कथेला आपण देऊ इच्छित असणारं नावं व्यनिच्या विषयामधे लिहिलेलं असावं.
तर स्पर्धेसाठीची छायाचित्रं आणि विषय असे आहेत.
०१. (छायाचित्रः आपले मिपाकर एस भाऊ).
०२. (आंतरजालावरुन साभार):
०३. (सी.एन.एन. वरुन साभार):
०४. (आंतरजालावरुन साभार):
०५. नवा पैसा: (आंतरजाल, मोदी, रिझर्व बँक ऑफ इंडिया कडुन साभार ;) )
स्पर्धेविषयी काही मदत हवी असल्यास कॅप्टन जॅक स्पॅरो, आदूबाळ, स्रुजा, स्नेहांकिता, वेल्लाभट किंवा साहित्य संपादक ह्यांच्याशी संपर्क साधावा.
०२. (आंतरजालावरुन साभार):
०३. (सी.एन.एन. वरुन साभार):
०४. (आंतरजालावरुन साभार):
०५. नवा पैसा: (आंतरजाल, मोदी, रिझर्व बँक ऑफ इंडिया कडुन साभार ;) )
स्पर्धेविषयी काही मदत हवी असल्यास कॅप्टन जॅक स्पॅरो, आदूबाळ, स्रुजा, स्नेहांकिता, वेल्लाभट किंवा साहित्य संपादक ह्यांच्याशी संपर्क साधावा.
वाचने
21664
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो दिसत नाहियेत......
जीमेल ला लॉगीन लागेल फोटो
In reply to फोटो दिसत नाहियेत...... by संदीप डांगे
लॅपटॉपवरुन दिसले नाहीत जिमेल
In reply to जीमेल ला लॉगीन लागेल फोटो by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या स्वतःच्या पिकासा मधुन
In reply to लॅपटॉपवरुन दिसले नाहीत जिमेल by संदीप डांगे
हत्तीशिवाय बाकीचे फोटोज दिसत
In reply to माझ्या स्वतःच्या पिकासा मधुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
मलाही फक्त हत्तीचा दिसत आहे.
In reply to माझ्या स्वतःच्या पिकासा मधुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला फायरफॉक्स मधे आणि क्रोम
In reply to मलाही फक्त हत्तीचा दिसत आहे. by रुपी
@मोबाइलवर तपासले तेव्हा
In reply to लॅपटॉपवरुन दिसले नाहीत जिमेल by संदीप डांगे
पण अजून ह्या समस्येवर उपाय
In reply to @मोबाइलवर तपासले तेव्हा by अत्रुप्त आत्मा
जरा थांबा. फोटोबकेटमधे शेअर
In reply to पण अजून ह्या समस्येवर उपाय by मराठी कथालेखक
या बात!
वर्ड काउन्ट मध्ये 'आणि' 'पण'
हो. शीर्षक वगळता सगळे शब्द
In reply to वर्ड काउन्ट मध्ये 'आणि' 'पण' by फेदरवेट साहेब
असे अव्यय तोडून १०० शब्द झाले
In reply to हो. शीर्षक वगळता सगळे शब्द by आदूबाळ
तो लेखकाचा चॉईस झाला ना. सासं
In reply to असे अव्यय तोडून १०० शब्द झाले by रुपी
"शंभरपेक्षा कमी अथवा जास्त
In reply to तो लेखकाचा चॉईस झाला ना. सासं by पिलीयन रायडर
अव्यय तोडणं ही मराठी
In reply to "शंभरपेक्षा कमी अथवा जास्त by रुपी
नाही.
In reply to अव्यय तोडणं ही मराठी by कॅप्टन जॅक स्पॅरो
१०० होण्यासाठी ट्रीक करुन
In reply to "शंभरपेक्षा कमी अथवा जास्त by रुपी
सहमत
In reply to तो लेखकाचा चॉईस झाला ना. सासं by पिलीयन रायडर
झकास!
मस्त
मस्त
पुण्याच्या जवळ असल्याने
In reply to मस्त by प्रचेतस
अरे वा! मस्तच!
उत्तम कल्पना!! आवडेश!
छान
दोन्ही चालेल :)!
In reply to छान by आनंदयात्री
छान.
शंभरपेक्षा कमी अथवा जास्त
जय हो!!
चित्रांना शिर्षके का दिली
Ho na
निकाल केव्हा जाहीर होणार?
एकचं फेरी. निकाल २७
In reply to निकाल केव्हा जाहीर होणार? by रुपी
वाह वा..
मस्त. नक्कीच लिहिणार.
मस्त. नक्कीच लिहिणार.
छायाचित्र बघून मला काय वाटतं
माझ्या मते
In reply to छायाचित्र बघून मला काय वाटतं by सूड
फोटोज फक्त क्रोमबर दिसत आहेत.
फोटो फोटोबकेटवर टाकलेत आता
दिसत आहेत. धन्यवाद!
In reply to फोटो फोटोबकेटवर टाकलेत आता by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो. आता दिसत आहेत. लॅपटॉपवर.
कथा आवडली आणि मतदान करायच
मतदानासाठी एक वेगळा धागा
In reply to कथा आवडली आणि मतदान करायच by ज्योति अळवणी
""" २६ जानेवारी २०१७ ते २१
In reply to मतदानासाठी एक वेगळा धागा by कॅप्टन जॅक स्पॅरो
यगक्साक्टली
In reply to """ २६ जानेवारी २०१७ ते २१ by जव्हेरगंज
येईल. आज संध्याकाळी किंवा
In reply to """ २६ जानेवारी २०१७ ते २१ by जव्हेरगंज
आता मला फोटो दिसत नाहीये.
एखादा नवीन टॅब बनवून त्यातून
हेच लिहिणार होते. मुद्दाम
In reply to एखादा नवीन टॅब बनवून त्यातून by रुपी
+१
In reply to हेच लिहिणार होते. मुद्दाम by यशोधरा
+१
In reply to +१ by खेडूत
आणखी एक.. शक्य असल्यास कथा
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to आणखी एक.. शक्य असल्यास कथा by रुपी
+१
In reply to +१ by खेडूत
सगळ्या कथा एकत्रित इथे वाचता
In reply to एखादा नवीन टॅब बनवून त्यातून by रुपी
अजून फक्त सहाच शशक अपलोड
व्यनि केलीय पण .....
कृपया,
In reply to व्यनि केलीय पण ..... by विनीत संखे
मराठी कथा मायक्रोसॉफ्ट वर्ड
इथे पहा, हे मी नेहेमी वापरतो.
In reply to मराठी कथा मायक्रोसॉफ्ट वर्ड by शब्दबम्बाळ
धन्यवाद!
In reply to इथे पहा, हे मी नेहेमी वापरतो. by खेडूत
फोटो दिसत नाहीयेत, इथलेही आणि
अरे तुला आधी दिसत होते ना?
In reply to फोटो दिसत नाहीयेत, इथलेही आणि by सूड
हो आधी दिसत होते,
In reply to अरे तुला आधी दिसत होते ना? by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to हो आधी दिसत होते, by सूड
मला सर्व प्रतिमा सदासर्वकाळ
In reply to +१ by पैसा
अबे हापिसात वेगवेगळ्या
In reply to हो आधी दिसत होते, by सूड