नमस्कार मिपाकरांनो,
सालाबादप्रमाणे यंदाही आपण शतशब्दकथा स्पर्धा आयोजित करतोय. दरवर्षी आपण शतशब्दकथांना विषय देत असतो आणि त्यावर कथा मागवत असतो. यंदा उपक्रमामधे थोडासा बदल करणार आहोत.
ह्या वर्षीच्या स्पर्धेचा विषय आहे "A picture speaks in 100 words" अर्थातचं "छायाचित्राची गोष्ट १०० शब्दांमध्ये". आवाहनाच्या धाग्यामधे तुम्हाला काही छायाचित्रं दिली जातील त्यापैकी एकावर तुम्हाला १०० शब्दांमधे एक कथा लिहायची आहे. स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
१. स्पर्धा २६ जानेवारी २०१७ ००:०० भाप्रवेला सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१७ २३:५९ भाप्रवेला संपेल.
२. स्पर्धकांनी आपली शशक "साहित्य संपादक" या आयडीला व्यनिमार्फत पाठवायची आहे. कुठल्याही साहित्य संपादकांच्या वैयक्तिक मिपाखात्यावर अथवा साहित्य संपादकांच्या जीमेल पत्त्यावर कथा पाठवू नयेत हि विनंती.
३. प्रत्येक व्यक्ती (आयडी नव्हे!) एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील.
४. २६ जानेवारी २०१७ ते २१ फेब्रुवारी २०१७ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचं नाव जाहीर होणार नाही. ("कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात" हा आक्षेप घेतला जाऊ नये म्हणून हे करण्यात आलेलं आहे.). स्पर्धा संपल्यावर लेखकांची ओळख जाहिर करायचीचं आहे.
५. मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाऊंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६. साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधनाची वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.
८. तसंच, कथेत कोणतीही चित्रं, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल.
९. जातिधर्माला दुखावणारं वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०. कथेला आपण देऊ इच्छित असणारं नावं व्यनिच्या विषयामधे लिहिलेलं असावं.
तर स्पर्धेसाठीची छायाचित्रं आणि विषय असे आहेत.
०१. (छायाचित्रः आपले मिपाकर एस भाऊ).
०२. (आंतरजालावरुन साभार):
०३. (सी.एन.एन. वरुन साभार):
०४. (आंतरजालावरुन साभार):
०५. नवा पैसा: (आंतरजाल, मोदी, रिझर्व बँक ऑफ इंडिया कडुन साभार ;) )
स्पर्धेविषयी काही मदत हवी असल्यास कॅप्टन जॅक स्पॅरो, आदूबाळ, स्रुजा, स्नेहांकिता, वेल्लाभट किंवा साहित्य संपादक ह्यांच्याशी संपर्क साधावा.
०२. (आंतरजालावरुन साभार):
०३. (सी.एन.एन. वरुन साभार):
०४. (आंतरजालावरुन साभार):
०५. नवा पैसा: (आंतरजाल, मोदी, रिझर्व बँक ऑफ इंडिया कडुन साभार ;) )
स्पर्धेविषयी काही मदत हवी असल्यास कॅप्टन जॅक स्पॅरो, आदूबाळ, स्रुजा, स्नेहांकिता, वेल्लाभट किंवा साहित्य संपादक ह्यांच्याशी संपर्क साधावा.
वाचने
21664
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
मलाही. सेम हापिसमधून दिसत
In reply to फोटो दिसत नाहीयेत, इथलेही आणि by सूड
फोटोबकेट ब्लॉक आहे का?
In reply to मलाही. सेम हापिसमधून दिसत by यशोधरा
कल्पना नाही. घरुन बघते म्हणजे
In reply to फोटोबकेट ब्लॉक आहे का? by कॅप्टन जॅक स्पॅरो
ठिक आहे. नक्की सांगा.
In reply to कल्पना नाही. घरुन बघते म्हणजे by यशोधरा
घरी दिसतात, कार्यालयातून नाही
In reply to ठिक आहे. नक्की सांगा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
शशक स्पर्धेला वेगळा टॅब का
डिट्टो!
In reply to शशक स्पर्धेला वेगळा टॅब का by शब्दबम्बाळ
सहमत.
In reply to डिट्टो! by चांदणे संदीप
३. प्रत्येक व्यक्ती (आयडी
स्पर्धा संपल्यानंतर कथा पाठवु
In reply to ३. प्रत्येक व्यक्ती (आयडी by मराठी कथालेखक
तसं तर कधीही कथा लिहिता येतात
In reply to स्पर्धा संपल्यानंतर कथा पाठवु by कॅप्टन जॅक स्पॅरो
यावेळीच्या शशक स्पर्धेमध्ये
आजपासून शशक साठीचे मतदान सुरु
बहुतेक आजपासून सुरु होईल
स्पर्धा परवाच संपली !
In reply to बहुतेक आजपासून सुरु होईल by अॅस्ट्रोनाट विनय
२० फेब्रुवारी २०१७ २३:५९ भाप्रवेला संपेल.निकाल कधी कळणार ?
27th jan
आज निकाल ?
In reply to 27th jan by ज्योति अळवणी
एक सुचवणी: शशकसाठी
ह्या स्पर्धेचा निकाल कधी
स्पर्धेचं काय झालंय नक्की ह्या?
पण साहित्य संपादक ह्या
In reply to स्पर्धेचं काय झालंय नक्की ह्या? by निरु
अस्वीकृत कथांच्या लेखकांना
In reply to पण साहित्य संपादक ह्या by मराठी कथालेखक
आयोजकांना या स्पर्धेचा विसर
निकाल 28 तारखेला लागणार असं
मतदानाबाबत कृपया खुलासा करावा
क्षमस्व
वेल्लाश्री.. तोपर्यंत एका
In reply to क्षमस्व by वेल्लाभट
उशीर होण्या बद्दल काहीच
धन्यवाद.
In reply to उशीर होण्या बद्दल काहीच by ज्योति अळवणी
वाढत्या विलंबामुळे स्पर्धेतली
विषयाचा विसर पडायच्या आत
खरंच आहे. आणखी किती वेळ लागेल
विस्मरण
तसं दिसतंय खरं.
In reply to विस्मरण by मराठी कथालेखक
सध्या मिपावर अनेक उपक्रम चालू
In reply to विस्मरण by मराठी कथालेखक
सहमत आहे. खासदिनानिमित्त
In reply to सध्या मिपावर अनेक उपक्रम चालू by एमी
नवीन थीम इफेक्ट विसरलेच होते!
In reply to सहमत आहे. खासदिनानिमित्त by रुपी
श्रमपरिहार म्हणून
In reply to नवीन थीम इफेक्ट विसरलेच होते! by एमी
निकालाला एवढा उशीर का होतोय
एकूणच विलंबामुळे मतदान आणि
कृपया धीर धरावा.
In reply to एकूणच विलंबामुळे मतदान आणि by मराठी कथालेखक
संयम आणि सहकार्य आहेच. पण
In reply to कृपया धीर धरावा. by वेल्लाभट
कृपया धीर धरावा अशी विनंती.
निदान तारीख पे तारीख तरी
अगोदरच पूर्ण वर्षाचं
वेल... इट डिपेंड्स... कोणाला
In reply to अगोदरच पूर्ण वर्षाचं by ज्योति अळवणी
आईशप्पाथ....कसलं भारी.....
In reply to वेल... इट डिपेंड्स... कोणाला by एमी
अॅमी,
In reply to वेल... इट डिपेंड्स... कोणाला by एमी
आयोजकांनी निदान नियमितपणे
जाऊ द्या हो, अनेक
In reply to आयोजकांनी निदान नियमितपणे by मराठी कथालेखक
:)
In reply to जाऊ द्या हो, अनेक by प्रचेतस
सहमत!
In reply to जाऊ द्या हो, अनेक by प्रचेतस
प्रत्येक शब्दाशी सहमत.
In reply to सहमत! by शब्दबम्बाळ