Skip to main content

मी आज केलेला व्यायाम...!!

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/11/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 112616
प्रतिक्रिया 496

प्रतिक्रिया

गेल्या ७ पैकी ४ दिवस १.५ किमी धावलो

८००० स्टेप्स अ‍ॅपमधे दाखवल्या पुशअप्स १५*४ सेट्स बेंचप्रेस १०*४ सेट्स ट्रायसेप्सचे विविध व्यायाम. आहार - सकाळे एक मोठा कप दुध दुपारी - एक मुदी तेरीयाकी राइस विथ भरपूर चिकन रात्री - छोले आणि दोन पोळ्या व्यायामानंतर लगेच अर्ध्या तासात अर्धा स्कूप व्हे पावडर मिश्रण.

मागच्या आठवड्यात सोमवार ते बुधवार नियमित १ तास जिम मध्ये जाऊन व्यायाम केला. गुरुवार शुक्रवार आणि पुढे विकांताला काही जमले नाही जायला. परत काल सोमवारी जिम ला गेले होते. या वेळी सुरुवाती पासून जाणवलेली गोष्ट म्हणजे मी नेहमी काही काळाची सुट्टी (२-३ महिने )नंतर परत व्यायामाला सुरुवात केली कि पहिले २-४ दिवस चांगलेच दुखते अंग. या वेळी असे अजिबात झाले नाही. बर व्यायाम सुध्धा कमी नव्हे केलेला. याचा अर्थ माझा फिटनेस बरा होता या वेळी असा होऊ शकेल का?

In reply to by सही रे सई

असा अर्थ काढू शकता. जेव्हा आपण सुरवात करतो तेव्हा टीशू दुखावतात (नक्की शब्द काय वापरावा माहीत नाही) जेव्हा तुमचे अंग दुखले त्यावेळी टीशु पुर्ववत झाले नसावेत. स्नायुना आरामाचीही तीतकीच गरज असते. व्यवस्थीत आराम मिळाला असल्यास अंग दुखणार नाही. म्हणून बहूतेक एका प्रकारचा व्यायाम आठवड्यातून एकदा करावा असे म्हणतात. (वजन कमी करण्याचे कार्डीओ व्यायाम यात येत नाहीत)

In reply to by सही रे सई

वर खटपट्या ह्यांनी म्ह्ण्टलेय तसे ते दुखावतात, त्यांना नंतर योग्य आहार अन विश्रांतीची गरज असते. अन ह्यावेळी दुखले नाही, म्हणजे फिटनेस नक्कीच चांगला झालाय! ह्याविषयी अजुन थोडे: जेव्हा आपण व्यायामाला सुरुवात करतो, तेव्हा स्नायुंना व्यायामाची सवय नसते अन म्हणुन ते ओव्हर वर्क आउट होतात. ओव्हर वर्कआउट झाल्यांनंतर बहुतेकवेळा ते अकडतात किंवा दुखतात. ते बहुधा एक प्रकारचे अ‍ॅसीड तयार झाल्याने होते (मला नक्की ठाउक नाहनाही) इंटरनेटवर वाचलेल्या माहीतीप्रमाणे मसल्सच्या पेशी, मसल्स वापरात असतांना तुटतात अन पुन्हा जुळतात. जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा ते जास्त काम करतात अन मग पुन्हा जुळतात. ह्या तोडपाण्यात बर्‍याचदा आपले स्नायु अकडतात. तेव्हा थोडी रेस्ट घेतली की ते पुर्ववत होतात. हा कालावधी साधारण ४८ तासांचा असतो. मग ४८ तासांनी परत तोच व्यायाम केला असता, तीच प्रोसीजर पुन्हा होते, पण ह्यावेळी स्नायुंना थोडा कमी त्रास होतो अन आपण हळु हळु पुर्ण इफेक्टीव्ह होतो. दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो. अन ही सगळी प्रक्रीया भरपुर कॅलरी खाणारी असल्याने, असे म्ह्ण्टले जाते की स्ट्रेंग्थ ट्रेनिंगमध्ये कॅलरीज व्यायाम झाल्यानंतरही जळत राहतात. ह्या सायकलचा उपयोग जीमींगमध्ये स्प्लीट वर्कआउट करुन अधिक क्षमतेने व्यायाम करवुन घेतला जातो. ४८ तासांची एका मसल गृपला विश्रांती म्हणजे नेम़कं काय तर आपण त्या कालावधीत दुसर्‍या मसल गृपला व्यायाम द्यायचा. सुरुवातीस अपर बॉडी पहिल्या दिवशी, लोअर बॉडी दुसर्‍या दिवशी अन कोअर (म्हणजे पोट, कंबर अन पाठ) तिसर्‍या दिवशी असे स्प्लीट करत व्यायाम केले, तर विविध स्नायु डेव्हलप होत जातात अन फिटनेस वाढतो.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो. मला पण हेच वाटल या वेळी. म्हणजे पूर्वी माझे मसल्स एव्हढे तयार नव्हते या व्यायामासाठी. पण खूप वर्ष कमी अधिक व्यायाम केल्यामुळे त्यांची मुळची ताकद वाढली आणि त्यामुळे या वेळी काही महिन्यांच्या गेप नंतर सुध्धा हा त्रास झाला नाही कारण एक कमीत कमी ताकद तयार झाली होती मसल्स ची.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

किंचित दुरुस्ती/छिद्रान्वषीपणा - ह्याला Delayed Onset Muscle Soreness. असं म्हणायचं. तो acute muscle soreness पेक्षा वेगळा असतो. acute muscle soreness, लॅक्टिक अ‍ॅसिड स्नायूंत साठल्यावर, फटिगमुळे जाणवतो - जो व्यायामानंतर काही वेळातच नाहीसा होतो. Delayed Onset Muscle Soreness - जो दुसर्‍या दिवशी म्हणजे बर्‍याच तासांनी - विश्रांती काळात जाणवतो - खरं "बॉडी बिल्डिंग" ह्या विश्रांतीच्या काळात होतं. जर तुम्हाला आता तो जाणवत नाही ह्याचा अर्थ असा की तुमच्या शरीराला त्या तीव्रतेच्या व्यायामाची "सवय" झालीये - म्हणून स्नायूंना (सूक्ष्म) चिरा जात नाहीत - म्हणून Delayed Onset Muscle Soreness जाणवत नाही. म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये.,

In reply to by विंजिनेर

म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये. हो तो पण विचार केला आहेच. फक्त २-३ दिवस खोकला सर्दीने बेजार झाले आहे त्यामुळे खूप जास्त वाढवला नाहीये व्यायाम.

In reply to by विंजिनेर

हा अ‍ॅक्युट मसल सोअरनेस्स, ८ - ९ किमी जॉग केल्यावर जाणवतो. अन मग जॉगींग संपुन नुसतं कसबस रेटणं उरत. हा त्रास कसा संपवावा?

१२*२ असे २४ जोर मारले बास्स एवढच केलं...... उद्या पासुन सायकलींग सुरू.

गेली महिनाभर ऑफीसला जाणे येणे सायकलवर चालू आहे, रविवारी काही मित्रांसोबत मांढरदेवीला सायकल दामटली एकूण जाणे येणे १५० किमी पडले, त्यात कात्रजचा छोटा आणि मांढरदेवीचा साधारण ८-९ किमी चा घाट चढलो. एकूणच धमाल राईड झाली. सोबत मिपाकर केदार दिक्षित आणि बाकी तीन भिडू होते. रोजचे अपडेट्स काही फारसे नाही घर ते ऑफीस केवळ १२ किमीचे अंतर आहे त्यामूळे सायकल हा उत्तम पर्याय वाटतो.तेवढाच काय तो व्यायाम.

या महिन्यात आतापर्यंत ३३२ किमि सायकलिंग झाली. रोज येथे टाकणे शक्य झाले नाहि. उद्यापासुन अपडेटत जाइल (सायकल चालवल्यास ;) ) यात दिनांक १२ ला सिंहगड वारी पहिल्यांदा झाली.. .

मी samsung health (google S Health) हे वापरत आहे, मला खूप मदत होत आहे.

खुप दिवसांनी Racquetball खेळलो काही मित्रांसोबत ४५ मिनीटे. अमेरिकेत सध्या थंडी पडायला लागल्यामुळे बाहेर सायकलिंग बंद झाल्यातच जमा आहे. शनिवार किंवा रविवारी करावे लागेल.

आज पहील्यांदाच १५० किमी पेक्षा जास्त सायकलींग केलं... १०० किमी केलं होतं ह्यापुर्वी पण १५० ची बातच काही और असते... १५३.९ किमी, ६:५६ तास,२२.१किमी/तास वेग !!

In reply to by बाळ सप्रे

कौतुकाचे दोन शब्द उत्साह व्दिगुणित करतात..... पुनश्च धन्यवाद आणि तुमचं देखील अभिनंदन दिल्ली मारल्याबद्दल _/\_.

हा वीकान्त दिल्ली हाफ-मॅरॅथॉनचा होता. मार्ग नेहरू स्टेडीयम, इंडीया गेट, राजपथ, राष्ट्रपतीभवन, संसद असा असतो. दिल्लीची नोव्हेंबरमधील थंडी, अजिबात चढ-उतार/खाच खळगे नसलेला मार्ग यामुळे ही मॅरॅथॉन धावपटूंमधे 'वैयक्तिक विक्रमां'साठी प्रसिद्ध आहे. इथे विजेते धावपटू तर हाफ मॅरॅथॉन एका तासाच्या आत पूर्ण करतात. मलाही या मॅरॅथॉनने निराश केले नाही. वैयक्तिक सर्वोत्तम वेळ १:५९ वरून १:५३ अशी सुधारता आली. प्रदूषण (स्मॉग) च्या बातम्यांमुळे गेले ३-४ आठवडे सर्व धावपटू चिंतेत होते. पण प्रत्यक्षात तसा काहीही अनुभव आला नाही. प्रदूषण निवळले असावे अथवा बातम्या अतिरंजित होत्या. कोणीही धावताना मास्क लावून धावताना दिसले नाही.

In reply to by बाळ सप्रे

मलाही या मॅरॅथॉनने निराश केले नाही. वैयक्तिक सर्वोत्तम वेळ १:५९ वरून १:५३ अशी सुधारता आली.
दणक्यात अभिनंदण!! सब-टू अवर म्हंजे ग्रेट आहेस. पुढच्या रेस मधे १:५३ वरून सब-१:४५ जायला टार्गेट ठेव - नक्की जमेल - मैलाच्या हिशोबात, फक्त ३० सेकंद/मैल सुधारणा करायची आहे :) यू आर हाफ वे देअर.... जाता जाता - नुकत्याच झालेल्या इथल्या हाफमॅरेथॉन मधे १:५७ फिनिश केल्यावर मलासूद्धा लई भारी वाटलं होतं!!
अथवा बातम्या अतिरंजित होत्या.
हा डेलीमेल टॅब्लॉईड मधला फोटो तर वेगळंच चित्र दाखवतोय... mask

मागच्या आठवड्यात एकूण ३०३ किमी सायकल चालवली. मिपाकरांनी मिळून १९४९ किमी सायकल चालवली. (आठवडा - सोमवार ते रविवार)

काल (रविवारी) इंडो सायकलिस्ट क्लबने आयोजीत केलेल्या १०० किमीच्या सायकल रॅलीमध्ये भाग घेतला होता. १०० किमी अंतर (भक्ति-शक्ति ते लोणावळा आणि परत) ४ तास २० मि. मध्ये पुर्ण केले आवर्जुन नमुद करण्याची गोष्ट म्हणजे की हे अंतर विनासायास कापण्याच्या टिप्स बाबत सायकल ग्रुप मधल्या मिपाकरांची खुsssssप मदत झाली ! देश

सर्व प्रथम हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद! मी सुमारे २-३ आठवड्यापूर्वी नवीन शूज घेऊन धावायला सुरुवात केली. पहिले १ किमी धावतानाही दम लागायचा , पण आता सवयीने ३ किमी पर्यंत न दमता पळू शकतो, सुमारे २५ मिनिटे लागतात. रोज जाता येत नाही पण २-३ दिवसातून एकदा तरी जातो. पण संध्याकाळी प्रचंड भूक लागते ऑफिस मधून येताना तेव्हा काय खाऊ कळत नाही. जंक फूड खावं लागतं कधी कधी, पण मग धावण्याचा काही उपयोग नाही, एखादा चांगला पर्याय कोणी सुचवू शकेल काय?

@साधा मुलगा २५ मिनिटात ३ किलोमीटर ही चांगली सुरवात आहे. आता स्पीड वाढवायचा प्रयत्न करा ... संध्याकाळी प्रचंड भूक लागते... हा माझा पण प्रॉब्लेम आहे (तशी मला कायमच भुक लागलेली असते हा भाग वेगळा ) यावरचा उपाय : १. भरपूर पाणी प्या (मी पाण्याच्या बाटलीं लिंबाच्या फोडी घालून ठेवतो. साखर / मिठ काहीही नाही ) चवीला बर लागते व पाणीही प्यायले जाते २. अधूनमधून लवंग / chewing gum तोंडात ठेवा भुकेची भावना कमी होते (सवय लागू देऊ नका ) ३. सर्वात म्हत्वाचे संध्याकाळी ऑफिस मध्ये खात जा ... यासाठी मी ऑफिसला "Musali " (फ्लेक्स)घेऊन जातो . कॉफी मशिन मधून दुध मिळते. तसेच काकडी / गाजर / सफरचंद जवळ ठेवतो. यामुळे जंक फूड खायची वेळ येत नाही. ऑफिसमध्ये फ्रिजची साय असल्यास मोड आलेली धान्येही घेऊन जतला हरकत नाही आपल्या खायचे सोया आपणच केली पाहिजे :)

In reply to by अमर विश्वास

२५ मिनिटात ३ किलोमीटर ही चांगली सुरवात आहे.
अगदी, अगदी... @ सामु - अजून काही सल्ले (तू विचारतोयेस म्हणून) १. भूक लागल्यावर फळे किंवा नटस खावे - केळी/शेंगदाणे उत्तम - स्वस्त आणि मस्त!! २. नवख्या रनरची चूक प्लीज, प्लीज करू नका - थोडक्यात, आधी शरीराला (हृदय्/फुफ्फुसे क्षमता, हाडे-स्नायूंची ताकद) धावण्याची सवय होऊदे. आठवड्यातले धावलेले अंतर मागच्या आठवड्यापेक्षा १०% पेक्षा वाढवून नको, आपण किती हळू धावतोय्/कसे दिसतोय ह्या कशाचाही विचार न करता केवळ धावण्यात सातत्य असण्या कडे लक्ष दे - आठवड्यातले ३ दिवस - एका दिवसा आड खूप रग्गड झाले. जोडीला, स्ट्रेन्थ ट्रेनिंग चालू कर - चक्क कागद पेन्सील घेऊन वेळापत्रक बनव आणि ट्रेनिंग साठी एखादे लक्ष ठेव - जसे ५के/१०के रेस. आरंभीचा उत्साह ओसरल्यावर हे वेळापत्रकच तूला उपयोगी ठरेल. तूला आधी धावण्याचा अनूभव नाहियेस असं तू म्हणालास म्हणून उत्साहाच्या भरात खूप लवकर, खूप जास्त धावायाला लागलास तर इंज्युरी (शीन स्प्लींटस, स्ट्रेस फ्रॅक्टचर्स इ.) ला हमखास बळी पडशील. काही उपयोगी दुवे १. जेफ गॅलोवे २. सीटूफाईवके ३. हाल हिगड्न शुभेच्छा!!

In reply to by विंजिनेर

@अमर विश्वास आणि विंजेनर साहेब, एवढ्या आपुलकीने सल्ले दिल्याबद्दल धन्यवाद! चांगली माहिती दिलीत. दिलेल्या लिंक सावकाश पाहीन.

एकुण ३२.७ किमी सायकलींग, ती पण न थांबता.

आठ नऊ महिन्यांपूर्वी 100 जोर एका दमात मारायचो. मध्ये खूप मोठा गॅप पडला आणि आता 40 मध्ये एनर्जी संपून जातीये.. पण होईल परत असं वाटतंय..

In reply to by जॉनी

100 जोर एका दमात मारायचो
तुम्हाला भेटायला आवडेल. आर्मस बघावेसे वाटतायत तुमचे...

In reply to by खटपट्या

तसं काय बॉडी बिल्डर वगैरे नाय ओ. ते आपलं असंच जिम चं येड लागलेलं आणि कुणीतरी सांगितलं होतं 50 जोर मारल्याशिवाय मशीन अन डंबेल कडे जाऊ नको. आणि मग 50 नंतर त्यात मजा यायला लागली.

एक दिवस पर्वती (५ वेळा चढउतार), एक दिवस पूर्ण तळजाई ला जॉगिंग. छान व्यायाम होतो.

हिंजवडीच्या बेक्कार ट्रॅफिक मधुन २० किमी सायकलींग देश

ह्या धाग्यापासून प्रेरणा घेऊनआणि इतर काही अनेक कारणांमुळे २ आठवड्यापासून मीही सकाळ-संध्याकाळ चालायला जात आहे, पाहू किती दिवस टिकतो उत्साह ते.

मागील सप्ताहाची(१४/११ ते २०/११) एकूण सायकलिंग १३९.५ किमी. रविवार सोडून रोज सायकल चालवली. एका राईड मध्ये किमान १७.१ आणि कमाल ५१.८ किमी चालवली

15 मि. कार्डियो,35 मि. फ्लोर एक्सरसाइजेस आणि 10 मि.स्ट्रेचिंग! देश

सध्या बर्फ़ाळ प्रदेशात वास्त्य असल्यामुळे आउटडोअर सायकलिंग बंद पण हाटेलाच्या छोट्याशा जिम मध्ये ट्रेडमिलवर धावणे आणि स्टेशनरी सायकलवर सायकलिंग चालू आहे. आज अडीच मैल धावलो आणि २ मैल सायकल चालवली (इथे अंतर मैलातच मोजतात).

ह्या आठवड्यात ५२ किमी सायकलींग झालं, त्याशिवाय १७-१८ किमी चालणं... आज पहीली हाफ मॅरेथाॅन पळून चालून पूर्ण केली... ३.०९.३० अशी वेळ नोंदवली, फार भारी नाही पण आधी २१ किमी चालायला ३:३० तास लागायचे पण आज २० मिनीटे कमी लागली... ही खरी अॅचिव्हमेंट .... उद्यापासून सायकलींग आणि वेट ट्रेनिंग चा प्लॅन आहे...

In reply to by डॉ श्रीहास

हाफ मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन... मलाही पहिल्या प्रयत्नात ३ तासाहून अधिक वेळ लागला होता..

In reply to by बाळ सप्रे

तुमच्यासारख्या खंद्या मॅरेथाॅनर कडून कौतुकाचे शब्द खरचं प्रेरणा देणारे आहेत... आता लवकरचं २५० किमी सायकलींगचा पल्ला गाठायचा प्रयत्न होणार.. परत एकदा धन्यवाद!!

शनिवारी ८० किमी सायकलिंग आणि संध्याकाळी ८ किमी चालणे. आज ऑफिसला येताना २७ किमी सायकलिंग देश

गेल्या आठवड्यात (थँक्सगिव्हिंग) १० किमी रेस केली - फ्लॅट कोर्स, ५१:२० फिनिश टाईम. मजा आली.