मी आज केलेला व्यायाम...!!
नमस्कार,
गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.
व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया.
व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा.
सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती व्यायाम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)वर्गीकरण
प्रतिक्रिया
आज कार्डियो ...
८ नो. पासून पोहायला शिकतोय.
८ नो. पासून पोहायला शिकतोय.
व्यायाम सुरू आहे.
व्यायाम सुरू आहे.
आज अजीबात ईच्छा नव्हती .....
आज ३९ किमी सायकलिंग करून
मस्त!
हाफिस २० च किमी लांब आहे..
हाफिस ते घर 21 किमी.
अछा ओके!
ऑफिस कोणत्या फेजमध्ये आहे..?
फेज २
भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व
नॉट दॅट सुटेबल
सूस चांदे नांदे रस्त्यावरील
मी भूमकर चौक ते फेज २ पर्यंत
धन्यवाद बाळदादा,
आजचा व्यायाम.....
माझा आजचा (छोटासा) व्यायाम...
१५-११-१६
८००० स्टेप्स अॅपमधे दाखवल्या
मागच्या आठवड्यात सोमवार ते
असा अर्थ काढू शकता. जेव्हा
दॅट्स अ गुड साइन
दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात,
दरवेळी जेव्हा स्नायु तुटतात, तेव्हा परत जुळतांना त्यांची क्षमता थोडीशी वाढते. म्हणुन त्रास कमी कमी होत जातो अन आपला फिटनेस वाढतो.मला पण हेच वाटल या वेळी. म्हणजे पूर्वी माझे मसल्स एव्हढे तयार नव्हते या व्यायामासाठी. पण खूप वर्ष कमी अधिक व्यायाम केल्यामुळे त्यांची मुळची ताकद वाढली आणि त्यामुळे या वेळी काही महिन्यांच्या गेप नंतर सुध्धा हा त्रास झाला नाही कारण एक कमीत कमी ताकद तयार झाली होती मसल्स ची.जी
किंचित दुरुस्ती
म्हणजे व्यायामाची तीव्रता
म्हणजे व्यायामाची तीव्रता वाढवायची वेळ आलीये.हो तो पण विचार केला आहेच. फक्त २-३ दिवस खोकला सर्दीने बेजार झाले आहे त्यामुळे खूप जास्त वाढवला नाहीये व्यायाम.येस!
आजची सुटी...
पंधरा मिनीटे फुलपाखरी
फुलपाखरी हात का पाय (कंबर
फुलपाखरी तडाख्याचा
काहीच्याकाही भारी !
फुलपाखरी तडाखा! लोहल!
सायकलनेच हाफिसला....
३३२ किमि
मी samsung health (google S
In google Play S Health App.
आज ३९ किमी सायकलिंग करून
(No subject)
काल Racquetball खेळलो
सायकल चालवली थोडीशी.
वाह
१५३.९ किलोमीटर....
वाह.. १५०+ किमीसाठी ताशी२२+
धन्यवाद...
हा वीकान्त दिल्ली हाफ
अभिनंदन..!!!