सापडला पठ्ठ्या एकदाचा!!
आई-बाप, अख्खा जपान आणि थायलंडमध्ये माझ्या सारख्याच्या जिवाला घोर लाऊन तब्बल ६ दिवसांनी एका मिल्ट्री कॅम्पच्या शेल्टरमधे सापडला.
असल्या प्रकरणात माझे बाबा असते तर कानाखाली एक जाळ काढला असता आणि एका सेकंदात मॅटर क्लोज केला असता, पण इकडे जपानमधे आपल्या भारतातल्या सारखं मुलाच्या कानपटवायची सोय/मानसिकता नसल्यामुळे 'ताकायुकी तानुका' नावाच्या जापनीस बापाने मध्यम मार्ग स्वीकारला. ट्रेकिंगला जातांना खूप दंगा करत होता म्हणून आपल्या 'यामाटो' नावाच्या खोडकर मुलाला म्हणाले, "मस्ती करायची असेल तर चालता हो गाडीतुन"!! आणि चक्क दरवाजा उघडून हाथ धरून बाहेर काढलं, बाहेर काढायच्या आधी 'नालायका, राक्षसा, भxxx, रांडेच्या' वैगरे बोल्ला कि माहित नाही पण अतिव भडकलेल्या त्या बाबाला भान राहिलं नाही कि आजूबाजूला किर्र जंगल आहे.
पंधरा-विस मिनिटाने राग शांत झाल्यावर परत आले तर ते अतरंगी पोरगं गायब!! इकडे-तिकडे शोधत हाका मारूनहि रिस्पॉन्स नाही पाहिल्यावर बापाच्या पोटात भितीचा गोळा आला कारण त्या जंगलात होती रानटी अस्वलं. पोलिसांना फोन गेले. सुरवातीच्या मिसगाईड नंतर कबूल केलं कि मिच मुलाला जंगलात एकटं सोडलं म्हणून. अख्या जपानमधे हि गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. वडिलांची हजामत झाली, माफी मागून मागून बिचारा कमरेतून पार मोडला.
२०० पोलिस, अख्खं 'होकैडो' गाव आणि तितक्याच संख्येने हौशी लोकं, सात वर्षाच्या 'यामाटो' ला शोधायला निघाले. तब्बल सहा दिवस जंगल परिसर पिंजून काढला पण पठ्या सापडेल तर शपथ.
इकडे बाबा लोकांच्या शिव्या तर आई देव पाण्यात ठेवून बसली होती. तिकडे शिंचान अंगात शिरलेला आपला नायक, तब्बल ३ नद्या पार करत जवळजवळ ३५ किलोमीटर अंतर कापत उत्तर जपान मधल्या एका मिल्ट्री कॅम्पमधे पोहोचला होता. तिथे एका अर्धवर्तुळाकार शेल्टर हाउसमधे चिंतन करत फक्त पाणी पिऊन दिवस काढत होता. शिकाबेमधल्या एका आर्मी ऑफिसरला हा पोट्ट्या सापडला आणि अख्या जपानमधे दिवाळी साजरी झाली. 'यामाटो'च्या नसलेल्या वाढदिवसाचे केक लोकांनी बापाला शिव्या देत खाल्ले. बिच्चारा बाबा!!
खूप वर्षांपूर्वी बोअरवेल मधे पडलेल्या आपल्या 'प्रिन्स' ची आठवण करून देणारी जपान मधली हि साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली हे बरं झालं.
सापडल्यानंतरचा फोटो नसावा. जुना शाळेतला फाईल फोटो असा उल्लेख त्याखाली होता. शाळेचा फळाही मागे दिसतोय. आत्ता सापडल्यानंतर तो शाळेत किंवा प्रेससमोर आणला गेलेला नाही. इस्पितळातच थेट उपचारार्थ नेला हेलिकॉप्टरने.
ही बातमी आठवडाभर फॉलो करुन वाईट वाटत होतं. आता हुश्श झालं.
बाकी किंचित मोठंच करेक्शन म्हणजे ३५ किलोमीटर नव्हे, ४ ते ५ किलोमीटरच दूर चालून हे आश्रयस्थान त्याला सापडलं.
मुख्य मुद्दा म्हणजे लहान पोरगा जंगलातून डोंगर चढून एकटा गेला आणि त्या ठिकाणी सहा दिवस अन्नाशिवाय, विशेषतः रात्री पूर्ण काळोख झाल्यावर एकटाच कसा झोपला / तगला असेल. भीती तर वाटलीच असेल.
त्या शेडवजा जागेत वीज, अन्न, हीटर वगैरे नव्हतं)
सापडला हे वाचुन बरे वाटले. बातमी ऐकुन मी सुद्धा हळहळलो होतो.
पोरगं सहा दिवस अन्नावाचुन कसे राहिले म्हणे. इतक्या लहान मुलांना दम धरत नाही आणि मिलिटरी कँप मध्ये कुणालाही ६ दिवस पोरगं दिसले नसेल तर कँपमधल्या सगळ्यांना घरी बसवा. सुरक्षेत अक्षम्य ढिलाई आहे ही.
तो मुलगा मिळाल्याची बातमी ऐकून खरंच हायसं वाटलं.
त्याचे आई वडील एक मूर्ख पण मला एक कळलं नाही कि त्याचे वडील पाच एक मिनिट नंतर त्याला घ्यायला गेले तर हा मुलगा तितक्या वेळात असा कसा गायब झाला. आई बाबांना गिल्ट द्यायला हा मुलगा आगाऊ पणे लपून बसला होता की काय? काही समजत नाहीये.
कितीही मस्ती जरी केली मुलाने, तरी बापाला जबाबदारी वगैरेचं भान आहे की नाही? मुलगा सापडला म्हणून ठीक आहे. काही बरंवाईट झालं असतं तर कितीत पडला असता बापाला त्याचा राग?
मुलाला जंगलात सोडणारा बाप मूर्ख. तिथून लगेच पळून जाऊन लपणारा मुलगा महामूर्ख आणि ७ दिवस कँपमधे लपलेला मुलगा ज्याना सापडला नाही ते मिलिटरीवाले शतमूर्ख. पण मला वाटते त्याला काहीतरी खायला मिळत असेल. नुसते पाणी पिऊन सात दिवस तब्बेतीत काहीच फरक पडला नाही हे कसे? आणि इतकी लहान मुले काही खायला मिळाले नाही तर थोडा वेळसुद्धा गप्प बसू शकणार नाहीत.
बरं झालं बाबा सापडला. मी पण ही बातमी फॉलो करत होते. आधीच मला ते बोन्स , क्रिमिनल माईंड्स वगैरे सीरिअल अधुन मधुन बघायची खोड आहे. त्यात हा पोरगा गायबला, माझंच बीपी वाढलं ! त्याच्या आईबाबाचं काय झालं असेल देव जाणे.
काल आमच्या वाट्सअॅप गृपवर यमाटा टमानूची चर्चा होती. यमाटो सापडला आणि आम्ही निश्चिंत झालो. मला लाईफ ऑफ पाय चित्रपटाची आठवण झाली. पोट्टही आघवच होत म्हणे. लोकांच्या गाड्यावर दगड भिरकावत होतं म्हणे, म्हणून बापाला राग आला. आणि दिलं भोकाडीच्या हवाली करुन. राग शांत झालं आणि ही चित्तर कथा घडली. बाकी, आता त्याने या सहा सात दिवसात काय केलं त्याची चित्तर कथा यमाटोच्या मुखातून ऐकायला, वाचायला मजा येईल. कुठं काही सापडलं तर इथे डकवा भो.
-दिलीप बिरुटे
डोरेमॉनच्या गॅजेटच्या मदतीने मी तुमच्याशी मराठीत टायपुन बोलत आहे.
वर कोण कोण मला आगाउ, वात्रट वगैरे म्हणत आहे.आधी माझं म्हणणं तर ऐकुन घ्या भैताडांनो मग मला आगाउ वगैरे बोला.
फेकले ४/५ दगड गाड्यांवर काय बिघडलं.तो एक मिचमिच्या ढेबरा मला टमाटा यमानु (तुम्ही ते बोलता ना खोतानुं तसं मग मला राग नाय येणार फेकले मग दगड) म्हटला, मी बोल्लो माझं नाव यमाटा टमानुं भेंडी ऐकतच नव्हता.
गेला ना पळत माझ्या बाबा जवळ, बाबाचं कंबरड वाकलं सॉरी म्हणुन म्हणुन. त्यात माझी आई तिने तेल ओतलं बघ बघ कसा तुझ्यासारखा वागतोय अस काहीतरी बडबडली बाबाला.मग काय म्हातारं भडकलं, आमच्यात काय झापडबिपड नाय मारत मग, बोल्ल उतर उतर आधी गाडीतुन. जंगलात उतरवला ना मला.(मी बोंबलेल, कंबर वाकवेल अस वाटुन केलं असावं) आणी काढली ना राव गाडी पुढं.
त्या तिथ एकटाच ....बास्स्स लास्ट मंथलाच जंगल बुक बघितला होता म्हट्ल चला प्रॅक्टिकलला चान्स आहे. घुसलो जंगलात पण मी ना पायी निघालो जमिनीवरुन, झाडावरुन नाय हं(लाल चड्डी नव्हती नां), ह्या जंगलात लय म्हणजे लयच बल्लु आहेत अस ऐकलं होतं म्हटल पाहु.कसलं काय एक पण नाय.मग पुढ गेलो तर.......
थांबा बाकीचं नंतर.
मग मी किनि पुढे चालतच गेल चालतच गेलो ... मग र्स्तायात एक गुरव भेटला त्याला बोल्लो "काय गुरवानु कस काय चाललाय" ते एकून तो पळतच सुटला जल्ला मला काय कळलच नाय. मग पुढे जंगलात एक मिलिटरी कॅम्प लागला तिथे सगळे लोक तो समुराईचा ड्रेस घालून फिरत होते, नुसते कंबर वाकवून फिरत होते मग मी गेलो त्यांच्या मागून लपून शेल्टर मध्ये रायलो... राती भूक लागली का जायचो मग किचन मध्ये आणि खायचो उकडलेल्या शेवया, आणि तिखटमिठाचे मोदक, तुम्हाला सांगतो अन्ना तीथला शेफ ना असला घाबरला होता ना, एकदा मला पकडलं होत त्याने म्हणे, " कोण तू" मी बोल्लो' शिंचान मग तो म्हणाला अरे लबाडा तो तू इथे लपून बसला होय. आणि मग काय बोलावलं ना त्याने अख्या गावाला.
प्रतिक्रिया
हा सापडल्यानंतरचा फोटो आहे?
होय! सापडल्या नंतरचा फोटो आहे .
सापडल्यानंतरचा फोटो नसावा.
काय आगाव कार्ट आहे राव
वैतागून बाप गाडीतुन हाकलून
च्या आयला....
ही बातमी आठवडाभर फॉलो करुन
हुश्श
मुलगा चांगला धीट आहे
बापाने मुलाला धडा
सापडला हे वाचुन बरे वाटले.
तो मुलगा मिळाल्याची बातमी
मी तर बापालाच दोष देईन.
काय टारगट पोरगं आहे!
सगळेच मूर्ख
+११
म्हणून मौनातला नाखु
बरं झालं बाबा सापडला. मी पण
बाबा तर मूर्ख निघालाच पण,
लै अवलादी दिसतंय पोरगं!
काल आमच्या वाट्सअॅप गृपवर
हे घ्या
मग मी किनि पुढे चालतच गेल