✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सापडला पठ्ठ्या एकदाचा!!

ब
बाजीप्रभू यांनी
Fri, 06/03/2016 - 16:04  ·  लेख
लेख
Yamato सापडला पठ्ठ्या एकदाचा!! आई-बाप, अख्खा जपान आणि थायलंडमध्ये माझ्या सारख्याच्या जिवाला घोर लाऊन तब्बल ६ दिवसांनी एका मिल्ट्री कॅम्पच्या शेल्टरमधे सापडला. असल्या प्रकरणात माझे बाबा असते तर कानाखाली एक जाळ काढला असता आणि एका सेकंदात मॅटर क्लोज केला असता, पण इकडे जपानमधे आपल्या भारतातल्या सारखं मुलाच्या कानपटवायची सोय/मानसिकता नसल्यामुळे 'ताकायुकी तानुका' नावाच्या जापनीस बापाने मध्यम मार्ग स्वीकारला. ट्रेकिंगला जातांना खूप दंगा करत होता म्हणून आपल्या 'यामाटो' नावाच्या खोडकर मुलाला म्हणाले, "मस्ती करायची असेल तर चालता हो गाडीतुन"!! आणि चक्क दरवाजा उघडून हाथ धरून बाहेर काढलं, बाहेर काढायच्या आधी 'नालायका, राक्षसा, भxxx, रांडेच्या' वैगरे बोल्ला कि माहित नाही पण अतिव भडकलेल्या त्या बाबाला भान राहिलं नाही कि आजूबाजूला किर्र जंगल आहे. पंधरा-विस मिनिटाने राग शांत झाल्यावर परत आले तर ते अतरंगी पोरगं गायब!! इकडे-तिकडे शोधत हाका मारूनहि रिस्पॉन्स नाही पाहिल्यावर बापाच्या पोटात भितीचा गोळा आला कारण त्या जंगलात होती रानटी अस्वलं. पोलिसांना फोन गेले. सुरवातीच्या मिसगाईड नंतर कबूल केलं कि मिच मुलाला जंगलात एकटं सोडलं म्हणून. अख्या जपानमधे हि गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. वडिलांची हजामत झाली, माफी मागून मागून बिचारा कमरेतून पार मोडला. २०० पोलिस, अख्खं 'होकैडो' गाव आणि तितक्याच संख्येने हौशी लोकं, सात वर्षाच्या 'यामाटो' ला शोधायला निघाले. तब्बल सहा दिवस जंगल परिसर पिंजून काढला पण पठ्या सापडेल तर शपथ. इकडे बाबा लोकांच्या शिव्या तर आई देव पाण्यात ठेवून बसली होती. तिकडे शिंचान अंगात शिरलेला आपला नायक, तब्बल ३ नद्या पार करत जवळजवळ ३५ किलोमीटर अंतर कापत उत्तर जपान मधल्या एका मिल्ट्री कॅम्पमधे पोहोचला होता. तिथे एका अर्धवर्तुळाकार शेल्टर हाउसमधे चिंतन करत फक्त पाणी पिऊन दिवस काढत होता. शिकाबेमधल्या एका आर्मी ऑफिसरला हा पोट्ट्या सापडला आणि अख्या जपानमधे दिवाळी साजरी झाली. 'यामाटो'च्या नसलेल्या वाढदिवसाचे केक लोकांनी बापाला शिव्या देत खाल्ले. बिच्चारा बाबा!! खूप वर्षांपूर्वी बोअरवेल मधे पडलेल्या आपल्या 'प्रिन्स' ची आठवण करून देणारी जपान मधली हि साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली हे बरं झालं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
5829 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

हा सापडल्यानंतरचा फोटो आहे?

किसन शिंदे
Fri, 06/03/2016 - 16:14 नवीन
हा सापडल्यानंतरचा फोटो आहे? दुपारी एका व्हॉट्सअप ग्रुपवर पहिल्यांदाच या बातमीबद्दल कळाले. बॉलीवूडवाल्यांसाठी कथेचा चांगला प्लॉट आहे. ;)
  • Log in or register to post comments

होय! सापडल्या नंतरचा फोटो आहे .

बाजीप्रभू
Fri, 06/03/2016 - 16:21 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सापडल्यानंतरचा फोटो नसावा.

गवि
Sat, 06/04/2016 - 11:43 नवीन
सापडल्यानंतरचा फोटो नसावा. जुना शाळेतला फाईल फोटो असा उल्लेख त्याखाली होता. शाळेचा फळाही मागे दिसतोय. आत्ता सापडल्यानंतर तो शाळेत किंवा प्रेससमोर आणला गेलेला नाही. इस्पितळातच थेट उपचारार्थ नेला हेलिकॉप्टरने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

काय आगाव कार्ट आहे राव

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 06/03/2016 - 16:27 नवीन
काय आगाव कार्ट आहे राव दिसायलाच! बाप नक्कीच राक्षसा वगैरे बोलला असेल :D
  • Log in or register to post comments

वैतागून बाप गाडीतुन हाकलून

संजय पाटिल
Sat, 06/04/2016 - 10:25 नवीन
वैतागून बाप गाडीतुन हाकलून जंगलात सोडून जातो, म्हणजे बघा किती आगाव कार्टं असेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

च्या आयला....

सरल मान
Fri, 06/03/2016 - 17:12 नवीन
कुणावर गेलय बेण काय माहित......
  • Log in or register to post comments

ही बातमी आठवडाभर फॉलो करुन

गवि
Fri, 06/03/2016 - 17:46 नवीन
ही बातमी आठवडाभर फॉलो करुन वाईट वाटत होतं. आता हुश्श झालं. बाकी किंचित मोठंच करेक्शन म्हणजे ३५ किलोमीटर नव्हे, ४ ते ५ किलोमीटरच दूर चालून हे आश्रयस्थान त्याला सापडलं. मुख्य मुद्दा म्हणजे लहान पोरगा जंगलातून डोंगर चढून एकटा गेला आणि त्या ठिकाणी सहा दिवस अन्नाशिवाय, विशेषतः रात्री पूर्ण काळोख झाल्यावर एकटाच कसा झोपला / तगला असेल. भीती तर वाटलीच असेल. त्या शेडवजा जागेत वीज, अन्न, हीटर वगैरे नव्हतं)
  • Log in or register to post comments

हुश्श

चेक आणि मेट
Fri, 06/03/2016 - 18:59 नवीन
हुश्श
  • Log in or register to post comments

मुलगा चांगला धीट आहे

नयना डोन्गरे
Fri, 06/03/2016 - 19:01 नवीन
मुलगा चांगला धीट आहे
  • Log in or register to post comments

बापाने मुलाला धडा

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/03/2016 - 19:05 नवीन
बापाने मुलाला धडा शिकविण्याऐवजी मुलाने बापाला धडा शिकविला म्हणायचा ! :) ;)
  • Log in or register to post comments

सापडला हे वाचुन बरे वाटले.

मृत्युन्जय
Fri, 06/03/2016 - 19:55 नवीन
सापडला हे वाचुन बरे वाटले. बातमी ऐकुन मी सुद्धा हळहळलो होतो. पोरगं सहा दिवस अन्नावाचुन कसे राहिले म्हणे. इतक्या लहान मुलांना दम धरत नाही आणि मिलिटरी कँप मध्ये कुणालाही ६ दिवस पोरगं दिसले नसेल तर कँपमधल्या सगळ्यांना घरी बसवा. सुरक्षेत अक्षम्य ढिलाई आहे ही.
  • Log in or register to post comments

तो मुलगा मिळाल्याची बातमी

पद्मावति
Fri, 06/03/2016 - 22:01 नवीन
तो मुलगा मिळाल्याची बातमी ऐकून खरंच हायसं वाटलं. त्याचे आई वडील एक मूर्ख पण मला एक कळलं नाही कि त्याचे वडील पाच एक मिनिट नंतर त्याला घ्यायला गेले तर हा मुलगा तितक्या वेळात असा कसा गायब झाला. आई बाबांना गिल्ट द्यायला हा मुलगा आगाऊ पणे लपून बसला होता की काय? काही समजत नाहीये.
  • Log in or register to post comments

मी तर बापालाच दोष देईन.

बोका-ए-आझम
Sat, 06/04/2016 - 00:26 नवीन
कितीही मस्ती जरी केली मुलाने, तरी बापाला जबाबदारी वगैरेचं भान आहे की नाही? मुलगा सापडला म्हणून ठीक आहे. काही बरंवाईट झालं असतं तर कितीत पडला असता बापाला त्याचा राग?
  • Log in or register to post comments

काय टारगट पोरगं आहे!

रेवती
Sat, 06/04/2016 - 00:38 नवीन
काय टारगट पोरगं आहे!
  • Log in or register to post comments

सगळेच मूर्ख

पैसा
Sat, 06/04/2016 - 09:08 नवीन
मुलाला जंगलात सोडणारा बाप मूर्ख. तिथून लगेच पळून जाऊन लपणारा मुलगा महामूर्ख आणि ७ दिवस कँपमधे लपलेला मुलगा ज्याना सापडला नाही ते मिलिटरीवाले शतमूर्ख. पण मला वाटते त्याला काहीतरी खायला मिळत असेल. नुसते पाणी पिऊन सात दिवस तब्बेतीत काहीच फरक पडला नाही हे कसे? आणि इतकी लहान मुले काही खायला मिळाले नाही तर थोडा वेळसुद्धा गप्प बसू शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments

+११

नाखु
Sat, 06/04/2016 - 09:18 नवीन
मी नशीब हा शब्द वापरणार नाही धागा हाय्जॅक होईल आणि बापाचा आततायी मुर्खप्णा आणि मिलेटरीवाल्यांची हलगर्जी नजरेआड केली जाईल.

अवांतराचे दु:ख नाही पण डुआयडी सोकावतो

म्हणून मौनातला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बरं झालं बाबा सापडला. मी पण

स्रुजा
Sat, 06/04/2016 - 09:12 नवीन
बरं झालं बाबा सापडला. मी पण ही बातमी फॉलो करत होते. आधीच मला ते बोन्स , क्रिमिनल माईंड्स वगैरे सीरिअल अधुन मधुन बघायची खोड आहे. त्यात हा पोरगा गायबला, माझंच बीपी वाढलं ! त्याच्या आईबाबाचं काय झालं असेल देव जाणे.
  • Log in or register to post comments

बाबा तर मूर्ख निघालाच पण,

दिग्विजय भोसले
Sat, 06/04/2016 - 10:09 नवीन
बाबा तर मूर्ख निघालाच पण, पोरगं आगाऊ दिसतयं,दुसरं एखादं असतं तर रडत बसलं असतं त्याच ठिकाणी:'(
  • Log in or register to post comments

लै अवलादी दिसतंय पोरगं!

चतुरंग
Sat, 06/04/2016 - 11:07 नवीन
ह्याला धमकावून सोडून दिला तर रडत बसेल हा बापाचा आडाखा बहुदा चुकला आणि पोरानं सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं! सापडलं ते फारच बरं झालं.
  • Log in or register to post comments

काल आमच्या वाट्सअ‍ॅप गृपवर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/04/2016 - 12:35 नवीन
काल आमच्या वाट्सअ‍ॅप गृपवर यमाटा टमानूची चर्चा होती. यमाटो सापडला आणि आम्ही निश्चिंत झालो. मला लाईफ ऑफ पाय चित्रपटाची आठवण झाली. पोट्टही आघवच होत म्हणे. लोकांच्या गाड्यावर दगड भिरकावत होतं म्हणे, म्हणून बापाला राग आला. आणि दिलं भोकाडीच्या हवाली करुन. राग शांत झालं आणि ही चित्तर कथा घडली. बाकी, आता त्याने या सहा सात दिवसात काय केलं त्याची चित्तर कथा यमाटोच्या मुखातून ऐकायला, वाचायला मजा येईल. कुठं काही सापडलं तर इथे डकवा भो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हे घ्या

इरसाल
Sat, 06/04/2016 - 15:26 नवीन
डोरेमॉनच्या गॅजेटच्या मदतीने मी तुमच्याशी मराठीत टायपुन बोलत आहे. वर कोण कोण मला आगाउ, वात्रट वगैरे म्हणत आहे.आधी माझं म्हणणं तर ऐकुन घ्या भैताडांनो मग मला आगाउ वगैरे बोला. फेकले ४/५ दगड गाड्यांवर काय बिघडलं.तो एक मिचमिच्या ढेबरा मला टमाटा यमानु (तुम्ही ते बोलता ना खोतानुं तसं मग मला राग नाय येणार फेकले मग दगड) म्हटला, मी बोल्लो माझं नाव यमाटा टमानुं भेंडी ऐकतच नव्हता. गेला ना पळत माझ्या बाबा जवळ, बाबाचं कंबरड वाकलं सॉरी म्हणुन म्हणुन. त्यात माझी आई तिने तेल ओतलं बघ बघ कसा तुझ्यासारखा वागतोय अस काहीतरी बडबडली बाबाला.मग काय म्हातारं भडकलं, आमच्यात काय झापडबिपड नाय मारत मग, बोल्ल उतर उतर आधी गाडीतुन. जंगलात उतरवला ना मला.(मी बोंबलेल, कंबर वाकवेल अस वाटुन केलं असावं) आणी काढली ना राव गाडी पुढं. त्या तिथ एकटाच ....बास्स्स लास्ट मंथलाच जंगल बुक बघितला होता म्हट्ल चला प्रॅक्टिकलला चान्स आहे. घुसलो जंगलात पण मी ना पायी निघालो जमिनीवरुन, झाडावरुन नाय हं(लाल चड्डी नव्हती नां), ह्या जंगलात लय म्हणजे लयच बल्लु आहेत अस ऐकलं होतं म्हटल पाहु.कसलं काय एक पण नाय.मग पुढ गेलो तर....... थांबा बाकीचं नंतर.
  • Log in or register to post comments

मग मी किनि पुढे चालतच गेल

महासंग्राम
Sat, 06/04/2016 - 16:38 नवीन
मग मी किनि पुढे चालतच गेल चालतच गेलो ... मग र्स्तायात एक गुरव भेटला त्याला बोल्लो "काय गुरवानु कस काय चाललाय" ते एकून तो पळतच सुटला जल्ला मला काय कळलच नाय. मग पुढे जंगलात एक मिलिटरी कॅम्प लागला तिथे सगळे लोक तो समुराईचा ड्रेस घालून फिरत होते, नुसते कंबर वाकवून फिरत होते मग मी गेलो त्यांच्या मागून लपून शेल्टर मध्ये रायलो... राती भूक लागली का जायचो मग किचन मध्ये आणि खायचो उकडलेल्या शेवया, आणि तिखटमिठाचे मोदक, तुम्हाला सांगतो अन्ना तीथला शेफ ना असला घाबरला होता ना, एकदा मला पकडलं होत त्याने म्हणे, " कोण तू" मी बोल्लो' शिंचान मग तो म्हणाला अरे लबाडा तो तू इथे लपून बसला होय. आणि मग काय बोलावलं ना त्याने अख्या गावाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा