✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रीत

न
नीलमोहर यांनी
Tue, 05/17/2016 - 14:37  ·  लेख
लेख
1
तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा, ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी, तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी, ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी, एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण. दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं, एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं. ' वाट होते जरी तुझी माझी वेगळी, सोबतीची तरी आस सांग का लागली, जीव तुटतो का असा रे.. सांग ना तुझ्याविना, तुझ्याविना..' आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी... मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली, मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला. तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला.. ' पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..' जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं, काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा.. तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा. ' जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..' आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं. ' कोण होतास तू, काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू..' तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची. त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती. ' गडी अंगानं उभा नि आडवा, त्याच्या रूपात गावरान गोडवा, तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा, काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..' आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा. 'अंगात माझिया भिनलाय ढोलिया, मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली, मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..' त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती, ' बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..' अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले. मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली, 'प्रचू डार्लिंग !!' अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली.. क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले. 'बदलुन गेलया सारं, पिरतीचं सुटलया वारं, अल्लड भांबावयाला, बिल्लोरी पाखरू न्यारं, आलं मनातलं ह्या व्हटामंदी, अन मनासंगं मन जुळलं जी..' ............................................................................................. preet ............................................................................................. क्रमश: * कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती. ** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल, कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही. मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात. अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात. .............................................................................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
31096 वाचन

💬 प्रतिसाद (169)

प्रतिक्रिया

रागावू नका ओ काका. कधीतरी

रातराणी
Wed, 05/18/2016 - 14:02 नवीन
रागावू नका ओ काका. कधीतरी दंगा करायचीच पोरं. :)
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

मग तुम्ही का शिंगं मोडून

रमेश भिडे
Wed, 05/18/2016 - 14:05 नवीन
मग तुम्ही का शिंगं मोडून घुसताय वासरांमध्ये??? पोरांना करु दे दंगा. आणि कोण लहान आहे इथं मुळात म्हणतो मी?
↩ प्रतिसाद: रातराणी

झाले शंभर. टाटा बाय बाय! :)

रातराणी
Wed, 05/18/2016 - 14:08 नवीन
झाले शंभर. टाटा बाय बाय! :)
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

हा हलकटपणा आहे राणे!

रमेश भिडे
Wed, 05/18/2016 - 14:11 नवीन
हा हलकटपणा आहे राणे!
↩ प्रतिसाद: रातराणी

हा हलकटपणा आहे? मग तुम्ही

रातराणी
Wed, 05/18/2016 - 14:15 नवीन
हा हलकटपणा आहे? मग तुम्ही आमचे पेपर नेऊन रद्दी देता परस्पर ते काय आहे अं?
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

हळू बोला हळू!

रमेश भिडे
Wed, 05/18/2016 - 14:19 नवीन
हळू बोला हळू! आणि बास बनवाबनवी आता. संस्थळाची लायकी उंचावेल असं काही करा!
↩ प्रतिसाद: रातराणी

चला मिपावीरहो सुसज्ज व्हा उठा

रातराणी
Wed, 05/18/2016 - 14:23 नवीन
चला मिपावीरहो सुसज्ज व्हा उठा चला! माझे डोळे उघडले तुम्ही काका. माझ्या काही करण्याने संस्थळाची लायकी उंचावेल असं आपल्यासारख्या सन्माननीय सदस्याला वाटतं यातच सर्व काही आलं. ;)
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

अगदी अगदी, हेच म्हणते मी,

नीलमोहर
Wed, 05/18/2016 - 14:30 नवीन
संस्थळाची लायकी उंचावेल असं काही करा! -उदाहरणार्थ ? आम्ही अगदीच अजाण नादान आहोत, आमचे अज्ञान दूर करा.
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

आयडी चुकला का?

पैसा
Wed, 05/18/2016 - 16:49 नवीन
आयडी चुकला का?
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

अशी ही बनवाबनवी

रमेश भिडे
Wed, 05/18/2016 - 17:55 नवीन
तो विश्वास सरपोतदार नावाच्या character च्या तोंडचा संवाद आहे. ते राणी ऐवजी राणे मुद्दाम म्हटलं आहे. माने राणे यमक जुळवायला. आयडी चुकला का कशाबद्दल?
↩ प्रतिसाद: पैसा

धनंजय माने

पैसा
Wed, 05/18/2016 - 18:04 नवीन
धनंजय माने आयडी असल्या प्रतिक्रिया देताना बघितलाय.
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

पळतेस कुठं ? सत्कार कोण करणार

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 14:12 नवीन
पळतेस कुठं ? सत्कार कोण करणार ??
↩ प्रतिसाद: रातराणी

ते काम जेपींच आहे. तस्मात

रातराणी
Wed, 05/18/2016 - 14:18 नवीन
ते काम जेपींच आहे. तस्मात आपला पास. तस पाहिलं तर माझाच सत्कार चाललाय इथं. वेगळा कशाला आणि नीमोचा?
↩ प्रतिसाद: सस्नेह

म्हणजे ?

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 14:19 नवीन
तू आणि नीमो एकच आहात वाट्टं ? =))
↩ प्रतिसाद: रातराणी

...

नीलमोहर
Wed, 05/18/2016 - 14:25 नवीन
"Et tu, Brute?"
↩ प्रतिसाद: सस्नेह

काय हे ?

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 14:35 नवीन
आताच वरती भिडेकाकांनी उंच उंच कामं करा म्हणून सांगितलाय आणि तुम्ही शिव्या देताय ? हर हर... (किती करायचेत आता ? दोनशे ? दे सुपारी )
↩ प्रतिसाद: नीलमोहर

घाला काय तो गोंधळ एकदाचा,

नीलमोहर
Wed, 05/18/2016 - 14:59 नवीन
किती करायचे ते करा, मी नको म्हणून का ते व्हायचे राहणारेत. उंच उंच कामं करत उंची वाढली पण तब्येत बारीक राहिली, म्हणून तो नाद सोडून दिला ;)
↩ प्रतिसाद: सस्नेह

दचकले ना!

पैसा
Wed, 05/18/2016 - 16:47 नवीन
मी चुकून Birute वाचले आणि जाम दचकले! हर हर!
↩ प्रतिसाद: नीलमोहर

=))))))

अजया
Wed, 05/18/2016 - 16:58 नवीन
=))))))
↩ प्रतिसाद: पैसा

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/18/2016 - 17:13 नवीन
मी पण बिरुटेच वाचलं होतं. =)) निमोने वेडं केलं राव पब्लिकला. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: पैसा

()

वपाडाव
Wed, 05/18/2016 - 18:19 नवीन
तरी बरं, item song एकही नव्हतं ह्यात... नैतर शिव शिव...
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्या ह्या ह्या नीमो बघ बाई

रातराणी
Wed, 05/18/2016 - 14:25 नवीन
ह्या ह्या ह्या नीमो बघ बाई काय काय सहन करतीये मी!
↩ प्रतिसाद: सस्नेह

आम्हाला ही काल्पनिक श्टोरी

कंजूस
Wed, 05/18/2016 - 13:53 नवीन
आम्हाला ही काल्पनिक श्टोरी आवडली आहे याची नोंद घ्यावी.प्रचूची खवं आम्ही वाचत असतो आणि तिकडे दुर्लक्ष करत आलोय.आता त्यांना झोप येत नसे असं कित्येकांना वाटून गेलं ( सर) परंतू प्रचूला उशाशी धोंडा घेतला तरी झोप येते.मुग्ध बालिकांच्या तसबिरी त्यांच्या खोलीतल्या भिंतीवर आहेत पण त्यांच्या ध्यानाचा भंग करू शकत नाहीत. # काही महिन्यांपुर्वी ऐसीवर अशीच काही प्रेमपत्रे प्रसिद्ध होत होती." प्रटुल्याची वीणा." लेखक पीडी वीणा. वाचून पाहा.

धागा शतकाबद्दल

नाखु
Wed, 05/18/2016 - 14:42 नवीन
धाग्यातील नायकाचा खालील गाण्याच्या चित्रफीती देऊन भाजे येथील लेण्यात रा रा रा पोपशास्त्री यांचे हस्ते व धागालेखिका प्रमु़ख पाहुणे यांचे उपस्थीतीत करणेत येईल. सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या+प्रीमो) देतील्,टक्या हात+डोळे पुसायचे रुमाल(फक्त ७ नग) प्रायोजीत करीत आहे.वल्ली मित्रमंडळाकडून बांबुची/चटईची हॅट दिली जाईल. अखिल मिपा सचीव जेपी संस्थापित टका संचालित सत्कार महामंडळ (पुणे महानगर शाखा) गाणे क्रं १ गाणे क्रं २ गाणे क्रं ३ गाणे क्रं ३ साहीत्य संपादकांनी विनंती गाणी दृश्य्स्वरूपात रुपांतरीत करावीत.

सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या

अभ्या..
Wed, 05/18/2016 - 15:35 नवीन
सोबत ४ टी शर्ट (डिझाइन अभ्या+प्रीमो) देतील्
आँ.... प्रीमो कधी करायली हे? . आणि @ नाखुन्स असले आयजी बायजी उदार शिलेदार चलणार नाही बरका. आधीच सांगून ठेवतो.
↩ प्रतिसाद: नाखु

अरे देवा

नाखु
Wed, 05/18/2016 - 15:40 नवीन
टी शर्ट निमो करतात का प्रीमो तेच नीट लक्ष्यात नाही आले. अता अमाले डिझाईनमधल< काही कळत नाही तेव्हा तुच एक आधार.
↩ प्रतिसाद: अभ्या..

तेच ना. मी कुठुन आले हित्ते

प्रीत-मोहर
Wed, 05/18/2016 - 17:00 नवीन
तेच ना. मी कुठुन आले हित्ते म्हणते मी?
↩ प्रतिसाद: नाखु

मी हे काम करत नाही नाखु आणि

प्रीत-मोहर
Wed, 05/18/2016 - 17:01 नवीन
मी हे काम करत नाही नाखु आणि अभ्या. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: अभ्या..

छ्ह्या !

विटेकर
Wed, 05/18/2016 - 15:20 नवीन
नुस्ता टारगट्पणा चालला आहे ! मजा गेली ! पोरांचा खेळ होतो पण बेडकाचा जीव जातो

>> पोरांचा खेळ होतो पण

सतिश गावडे
Wed, 05/18/2016 - 15:31 नवीन
>> पोरांचा खेळ होतो पण बेडकाचा जीव जातो हे "पोरांचा खेळ होतो पण हत्तीचा जीव जातो" असं असायला हवं होतं का?
↩ प्रतिसाद: विटेकर

दु दु सगा सर तुम्ही

सस्नेह
Wed, 05/18/2016 - 15:50 नवीन
दु दु सगा सर तुम्ही प्रतिपक्षास फितूर झाला आहात हे आमच्या ध्यानी आले आहे.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

@पोरांचा खेळ होतो पण हत्तीचा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/19/2016 - 21:26 नवीन
@पोरांचा खेळ होतो पण हत्तीचा जीव जातो" असं असायला हवं होतं का?››› Image removed.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अजुन वेळ गेली नाही..

जेपी
Wed, 05/18/2016 - 18:01 नवीन
अजुन वेळ गेली नाही.. धाग्याचे प्रयोजन काय हे सांगावे.. (आता उरले सत्कारापुरता )जेपी

आता उरले सत्कारापुरता )जेपी

पियुशा
गुरुवार, 05/19/2016 - 11:40 नवीन
आता उरले सत्कारापुरता )जेपी काय हे ? उरले का उरलो तुमच्यावर पण दॉ ऊ ट घ्यावा काय ;)
↩ प्रतिसाद: जेपी

लै भारी !!!

जव्हेरगंज
Wed, 05/18/2016 - 18:39 नवीन
लै भारी !!!

हे काही बरे नाही केलेत...

मुक्त विहारि
Wed, 05/18/2016 - 21:24 नवीन
आता मुग्धाच्या ह्या खोडीने हितेश,उद्दाम, सचिन, नाना नेफळे, माई, ग्रेट थिंकर. दादा (द)रेकर ह्यांना काय वाटेल?

माताय, चित्र कुणी टाकलं वर?

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 09:01 नवीन
माताय, चित्र कुणी टाकलं वर?

\o/ \o/ \o/

चांदणे संदीप
गुरुवार, 05/19/2016 - 09:52 नवीन
लोल! .....आणि सांगा राया सांगा ही कशी दिसते? =)) =)) Sandy
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लावून ताडी

अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 10:01 नवीन
लावून ताडी आक्ख टमरेल ओतून आलोया सोडून गाडी विसरून किल्ली पळत आलोया भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंगाट भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंग भिंगाट भिंग भिंग भिंग भिंग भिंग
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

नै नै अभ्या, असं नाही कराचं,

नीलमोहर
गुरुवार, 05/19/2016 - 10:18 नवीन
कथा जोडीची आहे किनई, मग नायिकेचे एकटीचेच का चित्त्तर? नायकही हवा होता त्यात, त्यास हवे तर बदामाच्या दुसर्‍या बाजूस उभे करायचे होते.. चित्त्तर लई भारी हां पण :)
↩ प्रतिसाद: अभ्या..

कशाला उगाच ते, नायिका एकटीच

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 10:27 नवीन
कशाला उगाच ते, नायिका एकटीच पुरेशी आहे. नैतरी नायिकेचेच मनोगत आहे हे.
↩ प्रतिसाद: नीलमोहर

ते कैतरी आत्मरन्जन आत्मकुंथन

अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 10:35 नवीन
ते कैतरी आत्मरन्जन आत्मकुंथन वगैरे तुम्ही म्हणता तशापैकीय का हे?
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते फक्त बुवांचं असतं.

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 10:37 नवीन
ते फक्त बुवांचं असतं.
↩ प्रतिसाद: अभ्या..

होक्का !

नीलमोहर
गुरुवार, 05/19/2016 - 11:08 नवीन
कुठल्या अँगलने ते नायिकेचेच मनोगत वाटतेय हो.. ती सरळसरळ दोघांची कथा आहे. ते कसेय ना, आधी तो पिच्छा पुरवणार, ती बळेच झिडकारणार, आधी इन्कार मग इजहार यात मजा होती, आता नायिकेने प्रेम व्यक्त करून झालेय, मग स्टोरीत काही मजा वाटत नसेल नायकाला. एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तिचं कौतुक, हाती आली की कौतुक संपलं, तसंच. आता मध्यंतरानंतरची सैराटची स्टोरी सुरू झालीय, वास्तव दिसायला लागले असेल समोर :p
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा ना. नुसती बुलेट चलवून काय

अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 11:11 नवीन
हा ना. नुसती बुलेट चलवून काय होनारे? लसून कुठे सोलता येतोय? ;) . आमच्या आर्चीला सगळं येतया ब्वा. :)
↩ प्रतिसाद: नीलमोहर

नक्की का?

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 11:50 नवीन
नक्की का? नायक मुळात पिच्छा पुरवतचं नाहिये, नायिकेलाच हे असं वाटत असेल तर त्याला नायक विचारा काय करणार? राहिता राहिला प्रश्न नायिकेने प्रेम व्यक्त करण्याचा पण नायकाकडून दुसरी बाजू पुढे येतच नाहिये किंवा नायकाचीच बाजू पुढे येत नाहिये मग कसलं कौतुक आणि काय. नायक बिचारा त्या दगडधोंड्यांतच रमलेला दिसतोय अजून. बाकी इथेतरी नको ब्वा सैराट उगाच :)
↩ प्रतिसाद: नीलमोहर

अरेरे,

नीलमोहर
गुरुवार, 05/19/2016 - 12:23 नवीन
सार्‍या पुराव्यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवायला हवे होते, पण तुम्ही असे पलटाल असं कधी वाटलं नव्हतं... 'नायक मुळात पिच्छा पुरवतचं नाहिये' - आत्ता इथे पुराव्यादाखल नायकाचे अनेक प्रतिसाद दाखवून दिले असते, पण ते सध्या शक्य नाहीय, हे त्यासही माहित आहे आणि त्याच गोष्टीचा तो पुरेपूर फायदा घेतोय. 'नायकाचीच बाजू पुढे येत नाहिये.. नायक बिचारा त्या दगडधोंड्यांतच रमलेला दिसतोय अजून.' - हो ना, आणि मी नाही बुवा त्यातला, म्हणून त्याने लोकांचे लक्ष इतरत्र वेधण्यासाठी अर्जंट्मध्ये हिरवाई इ.सोडून पूर्वीप्रमाणे एक लेण्यांवरील धागा टाकून दिला आहे. मला तर मुग्धेची दया येऊ लागलीय आता, बिचारी.. कसं सोसेल ती हे सारं...
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 12:33 नवीन
=)) खूपच हसायला आलं हो. दाखवा बरं ते प्रतिसाद कुठे असले तर (व्यनि केले तरी चालतील) बाकी नायकाचं हे धागे टाकणं नॉर्मल आहे. नायक पूर्वीपासूनच तसं करत आलाय. सध्याचा धागा लेणीवर नसून मंदिरावर असावा ह्याची नोंद घ्यावी. बाकी ती मुग्धा ही डु आयडी होती हे पहिल्यापासून सर्वांनाच माहीत होते. तीही आता उडालीय.
↩ प्रतिसाद: नीलमोहर

तेच तर,

नीलमोहर
गुरुवार, 05/19/2016 - 13:23 नवीन
मुग्धा नसल्यामुळे तिचे प्रतिसाद शोधता येत नाहीत, त्याचाच फायदा नायकास मिळतोय. कुणीतरी म्हटलेलं आहेच की नायक बोलायला पोपट आहे म्हणून, तो बोलण्यात असा सहजासहजी हार जाणार थोडीच, आता कुणी काहीही बोलले तरी त्याच्याकडून निव्वळ शब्दच्छल चालू राहणार, असोच.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)). असोच्च असो.

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 13:29 नवीन
=)). असोच्च असो.
↩ प्रतिसाद: नीलमोहर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा