खरंतर त्या 'उपट्या'चं चुकलंच म्हणा, एक 'आळापणं जन्माला घातलं, वरुन त्याला शिकवलबी. आन खुशाल दिलं सोडून तुमच्यावर उडायला. ते पण तुमच्यावर आसं काय उडालं की तुमाला उपटायला हातंच शिल्लक ठेवलं न्हायीत. तुमी बसलात त्याच्या घराबाराची उपटत.
त्या लंगड्याला तुमी का सोडलं कळलं नाय, पाय काढायचा कनाय गुडग्यातनं, आन त्या 'सल्या'ला कापून फेकायचा उसात. तेवढंच जिवाला बरं वाटलं असतं.
आन आर्ची, कुणाला इचरुन बुलट न्हीलती तिनं, माज आलाय आयघालीला, घरादारावरनं नांगुर फिरवून, पोरांना पळवून घीऊन गेली.
टॅक्टरचं त्वांड घीऊन थेट शेतात जाणार म्हणली, पण ती तर थेट हायद्राबादेत पोचली. थेट तुमच्या डोळ्याम्होरनं गेली आन तुमची खानदानी इज्जत थेट गटारात घातली.
जगणं सोपं काय वाटलं आयघाल्यास्नी. खायप्यायचे वांदे झाले. कुठं ती मऊमऊ गादी, आन कुटं ती कुबट वासाची गोधडी. किड्यामुंग्यासारखं खोपट्यात जगत राहिले वो.
वाघिणीसारखी पाटलाची पोरगी मांजर होऊन जगायला शिकली हो. आख्ख्या जगाला फाट्यावर मारुन त्या 'आळापण्या'चा संसार फुलवत बसली.
त्या आळापण्याचं जावू द्या, ते आपल्या मौतीनं मेलं. पण मला एक खरंखरं सांगा, सख्ख्या बहिणीचं तुकडं करताना तुमचा हात जरा पण थरथरला न्हाय का वो?
वाचने
7869
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
:(
बाकी अख्या जगाला फाट्यावर
+१००
In reply to बाकी अख्या जगाला फाट्यावर by रातराणी
वाघीणचं ती....
In reply to बाकी अख्या जगाला फाट्यावर by रातराणी
हं..
मी नाही म्हणणार याला शेवट.
In reply to हं.. by आतिवास
खास जव्हेरगंज टच!
+१ हेच म्हणतो!
In reply to खास जव्हेरगंज टच! by तर्राट जोकर
जव्हेरभौ
सहमत आहे
In reply to जव्हेरभौ by बोका-ए-आझम
सुन्न करणारं आहे नाखुकाका हे.
In reply to सहमत आहे by नाखु
त्यात भर म्हणजे त्या
In reply to सुन्न करणारं आहे नाखुकाका हे. by तर्राट जोकर
:(
In reply to त्यात भर म्हणजे त्या by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to :( by तर्राट जोकर
सुन्न करणारा शेवट
जबरा!!
जब्बरदस्त!
काय बोलणार...थिएटरमधून सुन्न
तेज्याच्या त्या
सैराटने सगळ्यांना कामाला
U like me or hate me but u
In reply to सैराटने सगळ्यांना कामाला by पाषाणभेद
सुन्न!!
सैराट बघितलेला नाही.. बघणारही
चुकलेय हे माहित असते...पण ते
In reply to सैराट बघितलेला नाही.. बघणारही by पिलीयन रायडर
सहमत आहे. पुरुषप्रधानता
In reply to सैराट बघितलेला नाही.. बघणारही by पिलीयन रायडर
अवांतर : मला आणि माझ्या