✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"काय झालं प्रिन्सदादा?"

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 05/08/2016 - 12:20  ·  लेख
लेख
खरंतर त्या 'उपट्या'चं चुकलंच म्हणा, एक 'आळापणं जन्माला घातलं, वरुन त्याला शिकवलबी. आन खुशाल दिलं सोडून तुमच्यावर उडायला. ते पण तुमच्यावर आसं काय उडालं की तुमाला उपटायला हातंच शिल्लक ठेवलं न्हायीत. तुमी बसलात त्याच्या घराबाराची उपटत. त्या लंगड्याला तुमी का सोडलं कळलं नाय, पाय काढायचा कनाय गुडग्यातनं, आन त्या 'सल्या'ला कापून फेकायचा उसात. तेवढंच जिवाला बरं वाटलं असतं. आन आर्ची, कुणाला इचरुन बुलट न्हीलती तिनं, माज आलाय आयघालीला, घरादारावरनं नांगुर फिरवून, पोरांना पळवून घीऊन गेली. टॅक्टरचं त्वांड घीऊन थेट शेतात जाणार म्हणली, पण ती तर थेट हायद्राबादेत पोचली. थेट तुमच्या डोळ्याम्होरनं गेली आन तुमची खानदानी इज्जत थेट गटारात घातली. जगणं सोपं काय वाटलं आयघाल्यास्नी. खायप्यायचे वांदे झाले. कुठं ती मऊमऊ गादी, आन कुटं ती कुबट वासाची गोधडी. किड्यामुंग्यासारखं खोपट्यात जगत राहिले वो. वाघिणीसारखी पाटलाची पोरगी मांजर होऊन जगायला शिकली हो. आख्ख्या जगाला फाट्यावर मारुन त्या 'आळापण्या'चा संसार फुलवत बसली. त्या आळापण्याचं जावू द्या, ते आपल्या मौतीनं मेलं. पण मला एक खरंखरं सांगा, सख्ख्या बहिणीचं तुकडं करताना तुमचा हात जरा पण थरथरला न्हाय का वो?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
7826 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

:(

रातराणी
Sun, 05/08/2016 - 12:24 नवीन
:(
  • Log in or register to post comments

बाकी अख्या जगाला फाट्यावर

रातराणी
Sun, 05/08/2016 - 12:28 नवीन
बाकी अख्या जगाला फाट्यावर मारून संसार फुलवनारी, आयुष्यात स्वतःच्या कर्तबगारीन पुढं जाणारी, एका साध्या खेडेगावातून येऊन स्वतःच्या पायावर उभी राहणारी मांजर नाहीच. वाघीणचं ती.
  • Log in or register to post comments

+१००

तर्राट जोकर
Sun, 05/08/2016 - 12:34 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

वाघीणचं ती....

संजय पाटिल
Sun, 05/08/2016 - 17:27 नवीन
+१०००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हं..

आतिवास
Sun, 05/08/2016 - 12:32 नवीन
शेवट सांगून टाकलात तर ..
  • Log in or register to post comments

मी नाही म्हणणार याला शेवट.

रातराणी
Sun, 05/08/2016 - 12:43 नवीन
मी नाही म्हणणार याला शेवट. खरा शेवट इथून पुढे आहे आणि काळीज हलवून टाकणारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

खास जव्हेरगंज टच!

तर्राट जोकर
Sun, 05/08/2016 - 12:35 नवीन
खास जव्हेरगंज टच!
  • Log in or register to post comments

+१ हेच म्हणतो!

कानडाऊ योगेशु
Sun, 05/08/2016 - 15:08 नवीन
+१ हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

जव्हेरभौ

बोका-ए-आझम
Sun, 05/08/2016 - 12:44 नवीन
तुकडे करताना हात थरथरला नसणारच. विचार मनात आणताना जर मन थरथरलं नसेल तर हाताची काय मातब्बरी! :(
  • Log in or register to post comments

सहमत आहे

नाखु
Mon, 05/09/2016 - 12:45 नवीन
आणि जव्हेरगंजानी लेखणी झिअजवावी अशी त्या "प्रिन्सांची" लायकी पण नाही. किमान १०-१२ ९६ कुळींना "सैराट" बद्दल विचारल्यावर "छ्या अस्म काही होतं नाही म्हाराष्ट्रात (तुम्च्या युपी-बिहारात असल) जरा जास्तीच दावलयं अशी "प्रिन्स"वाणे ऐकलीय. १०-१२ पैकी किमान निम्मे उच्चशिक्षीत आणि आञ्टीवाले आहेत.(आणि त्याच पट्ट्यातले कोल्हापुर ते थेट बाश्री उस्मानाबाद) मोठ्या(म्हतार्या,अनुभवी) माणसांनी वेळीच हात धरला नाही आणि हात थरथर्ला पाहिजे अस्म कधी वाटूच दिलं नाही तर खानदान कशी "हळवी+बहिणीची माया असलेली" निपजणार !!! थेट रोखठोक नाखु
आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून बहीण व तिच्या पतीचा खून केल्याच्या घटनेमुळे करवीरनगरीच्या पुरोगामित्वाला धक्का बसला आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या नगरीत घडलेल्या या हत्याकांडामुळे सामान्यजन हादरून गेले आहेत. तर दुसरीकडे पुरोगामित्वाच्या नावाखाली उठसूट गळा काढणाऱ्या पक्ष, संघटना मात्र या घटनेनंतरही शांत आहेत. शालेय शिक्षण घेत असल्यापासून प्रेमसंबंध असलेल्या मेघा पाटील व इंद्रजित कुलकर्णी या दोघांचा प्रेमविवाह मान्य नसल्याबद्दल मेघाच्या भावांनी तिचा आणि तिच्या पतीचा बुधवारी रात्री अत्यंत निर्घृणपणे खून केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. सहा महिन्यापूर्वी याच जिल्ह्य़ात बहिणीने ‘जिन्स पॅन्ट’ घातली म्हणूनही तिची हत्या केली गेली होती. या अशा घटनांनी सामान्यजन हादरून गेले असताना एरवी पुरोगामित्वाच्या नावाखाली उठसूट गळा काढणाऱ्या पक्ष, संघटना या अशा घटनांबाबत मात्र शांत आहेत. दुहेरी खून प्रकरणास दोन दिवस झाले तरी या घटनेचा साधा निषेधही झालेला नाही. एरवी पुरोगामित्वाला आव्हान देणारी छोटीशी घटना घडली तरी ढिगभर पत्रके, मोच्रे, आंदोलने, रस्त्यावर उतरुन मोडतोड अशी टोकाची प्रतिक्रिया उमटत असते. त्या पाश्र्वभूमीवर ही शांतता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनाही धक्का देणारी वाटते. सामाजिक कार्यकर्त्यां साधना झाडबुके म्हणाल्या, जातीअंताच्या लढय़ाला प्रेरणा देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या नगरीत घडलेला हा प्रकार लज्जास्पद आहे. प्रेमविवाह झालेला मुलगा ब्राह्मण समाजाचा आहे म्हणून पुरोगामी कार्यकत्रे रस्त्यावर उतरले नसावे की काय, ही पण एक भीती वाटते आहे. आंतरजातीय, धर्मीय विवाहाची चळवळ सुरु करणारे सामाजिक कार्यकत्रे डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले,की प्रगतीकडे समाज जाताना दिसत असला तरी मी मी म्हणणारे अजूनही जातीशी कसे चिकटून आहेत, हेच या घटनेतून दिसते. सामाजिक कार्यकर्त्यां स्मिता पानसरे यांनी समाजामध्ये जातीअंताची भाषा केली जात असली तरी घराणे, जात याच्या प्रतिष्ठेत अजूनही एक वर्ग अडकला असल्याकडे लक्ष वेधले. सोळाव्या शतकाप्रमाणे अजूनही महिलांनी वागले पाहिजे, अशी परंपरा राखू पाहणाऱ्या प्रवृत्तींकडून या घटना घडत असून ती समाजाच्या चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी समाजाला धक्का घडवणारी घटना घडूनही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त न होण्यास पुरोगामी कार्यकत्रे जबाबदार असल्याची कबुली दिली. ज्या गावास शाहुमहाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे, त्या गावात हा प्रकार मन विषण्ण करणारा आहे. ही घटना आंतर जातीय व आंतर धर्मीय स्वरूपाचा गुन्हा असून याबाबत गुन्हेगारांना शिक्षा करणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगित - See more at: http://www.loksatta.com/kolhapur-news/honour-killing-in-kolhapur-1173581/#sthash.kjaS5GaN.dpuf
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग - दोघा भावांचे कृत्य; तिघांना अटक कोल्हापूर - आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बहीण व तिच्या पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची कबुली सख्ख्या दोन भावांनी दिली. याप्रकरणी त्यांच्यासह शाहूपुरी पोलिसांनी काही तासांत तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची कोठडी दिली. अटक केलेल्या संशयितांची गणेश महेंद्र पाटील (वय 20), त्याचा भाऊ जयदीप (19, दोघे रा. थेरगाव, ता. शाहूवाडी) आणि नितीन रामचंद्र काशीद (22, रा. सातवे, ता. पन्हाळा) अशी नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कसबा बावडा गणेश कॉलनीत राहणाऱ्या इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (वय 23) व त्याची पत्नी मेघा (22) यांचा काल रात्री भोसकून खून झाला. या दुहेरी खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शाहूपुरी पोलिसांनी तातडीने छडा लावला. याप्रकरणी तिघांना अवघ्या काही तासांत लग्नाच्या वरातीतून अटक केली. बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे गावात कुटुंबाची मानहाणी झाली. याच रागातून सख्खी बहीण मेघा व तिच्या पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची कबुली गणेश व जयदीप पाटील यांनी दिली. थेरगाव येथे महेंद्र पाटील हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांची मुलगी मेघा हिने बीएस्सीचे शिक्षण वारणा येथील महाविद्यालयात पूर्ण केले. मुलगा गणेश हा पेठ नाका येथील महाविद्यालयात पॉलिटेक्‍निकचे तर जयदीप हा कोल्हापुरातील महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेतो. त्यांच्या गावाशेजारील बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) मध्ये इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. सुरवातीला तो एका दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून नोकरीस होता. शाळेत त्याची मेघाशी मैत्री होती. कालातंराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दीड वर्षापूर्वी दोघांनी पळून जाऊन विवाह केला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोतोली पोलिस ठाण्यात पाटील कुटुंबीयांनी दिली होती. पण मेघाने पतीसोबत येऊन आपला विवाह झाल्याचे पोलिस ठाण्यात सांगितले होते. यामुळे गावात आपली नाचक्की झाल्याचा राग गणेश व जयदीपच्या मनात होता. बहीण मेघा व तिच्या पतीला संपविण्याची शपथ त्या दोघांनी घेतली होती. कसबा बावडा गणेश कॉलनीतील वंदना माधव यांच्या घरात भाडेकरू म्हणून कुलकर्णी दांपत्य सहा महिन्यांपासून राहत होते. मेघा डी मार्ट येथे तर इंद्रजित खासगी नोकरी करत होते. दरम्यान, रक्षाबंधन व भाऊबीजेच्या सणाचे निमित्त काढून गणेश व जयदीप या दोघांनी तिच्या घराचा पत्ता आणि परिस्थितीचा अंदाज घेतला होता.

काल त्या दोघांच्या चुलत मामाच्या घरी लग्नकार्य होते. या लग्नात बहिणीचा पळून जाण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला. त्यामुळे ते दोघे संतप्त झाले.

त्यांनी मेघा व तिच्या पतीचा काटा काढण्याचा कट रचला. काल रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश, जयदीप आणि त्यांचा साथीदार नितीन काशीद हे तिघेजण मोटारसायकलवरून बावड्यात आले. कुलकर्णी यांच्या घरापासून काही अंतरावर मोटारसायकल घेऊन नितीन थांबला; तर गणेश व जयदीप हे दोघे कुलकर्णी यांच्या घरात आले. त्यांनी बहिणीला (मेघा) चहा करण्यास सांगितला. त्याच वेळी तिचा पती (इंद्रजित) हा दूध आणण्यासाठी दुकानात गेला. दरम्यान, या दोघांनी मेघावर पाठीमागून चाकूचे सपासप वार केले. ती ओरडू नये यासाठी तिच्या तोंडात कापडाचे बोळे घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मेघाला त्यांनी छोट्याशा बाथरूमध्ये टाकले. त्यानंतर तिच्या पतीची वाट पाहत बसले. काही वेळातच तो तेथे आला. त्याच्यावरही त्या दोघांनी चाकूने वार करून त्याला दारातच टाकून पळ काढला. त्यांना पळून जाताना वंदना माधव यांनी पाहिले. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून त्या दोघांना अटक केली. तसेच चरण (शाहूवाडी) येथून मिळालेल्या माहिती आधारे नितीन काशीद याला अटक केली. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, शाहूपुरी पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित आदींनी केली. चाकूसह कपडेही आणले होते... बहीण व तिच्या पतीचा काटा काढण्यासाठी दोन चाकू सोबत घेतले होते. काटा काढल्यानंतर अंगावरील कपडे बदलण्यासाठीही सोबत घेतले होते. काम फत्ते केल्यानंतर ते घाटात फेकून दिल्याची कबुली अटक केलेल्या तिघांनी पोलिसांना दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सुन्न करणारं आहे नाखुकाका हे.

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 12:58 नवीन
सुन्न करणारं आहे नाखुकाका हे... तमिलनाडूत अशाच प्रकरणातील भर रहदारीच्या रस्त्यावर हत्येचा सीसीटीवी विडियो बघून बरेच दिवस अस्वस्थ होतो, सैराट पाहून ती अस्वस्थता अजून वाढली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

त्यात भर म्हणजे त्या

टवाळ कार्टा
Mon, 05/09/2016 - 13:07 नवीन
त्यात भर म्हणजे त्या भागातल्या लोकांना यात वावगे काहिही वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

:(

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 13:11 नवीन
:( मला तर ते मेसेजेस फिरत होते ना की आपल्या मुली बैनी अशा प्रेमात सैराट झाल्या तर चालतील का टैप, ते अशा कृत्यांना मूक संमती देणारे आहेत असेच वाटत होते. पालकांची मुलांबाबतची का़ळजी कबूल पण मुलांपेक्षा इज्जतीची काळजी जास्त असते बहुसंख्य लोकांना असेही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 05/09/2016 - 13:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सुन्न करणारा शेवट

सत्याचे प्रयोग
Sun, 05/08/2016 - 15:04 नवीन
सैराट पाहिला आणि शेवट मात्र एकदम सुन्न करणारा आहे. माझ्या मुलीने शेवटी असे का म्हणून विचारले नाही सांगू शकलो तिला.
  • Log in or register to post comments

जबरा!!

याॅर्कर
Sun, 05/08/2016 - 15:17 नवीन
सैतानी प्रवृत्ती असलेल्यांचा हात थरथरत नाही. शेवट डोळ्यातून पाणी आणणारा.
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त!

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/08/2016 - 15:31 नवीन
जब्बरदस्त!
  • Log in or register to post comments

काय बोलणार...थिएटरमधून सुन्न

उगा काहितरीच
Sun, 05/08/2016 - 15:33 नवीन
काय बोलणार...थिएटरमधून सुन्न , मुकाट मनाने बाहेर आलोय! नागराजाचा शेवटचा डंखच जब्राट असतो राव ! :-(
  • Log in or register to post comments

तेज्याच्या त्या

अभ्या..
Sun, 05/08/2016 - 18:21 नवीन
तेज्याच्या त्या प्रिन्श्याच्या.
  • Log in or register to post comments

सैराटने सगळ्यांना कामाला

पाषाणभेद
Sun, 05/08/2016 - 18:41 नवीन
सैराटने सगळ्यांना कामाला लावले हे नक्की. हेच त्या चित्रपटाचे यश आहे.
  • Log in or register to post comments

U like me or hate me but u

उगा काहितरीच
Sun, 05/08/2016 - 19:02 नवीन
U like me or hate me but u can't ignore me ! अशी काहीशी म्हण आहे ना इंग्रजीत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

सुन्न!!

स्वामी संकेतानंद
Sun, 05/08/2016 - 19:24 नवीन
सुन्न!!
  • Log in or register to post comments

सैराट बघितलेला नाही.. बघणारही

पिलीयन रायडर
Mon, 05/09/2016 - 13:54 नवीन
सैराट बघितलेला नाही.. बघणारही नाही.. रादर.. बघवणार नाही.. कारण आता शेवट काय असेल ह्याची कल्पना आली आहे. तेव्हा नंतर प्रचंड अस्वस्थता येते हे माहिती आहे. सहन होत नाही.. जात ह्या मुद्द्यासोबतच अशी मानसिकता कमालीच्या पुरुषप्रधानेतुन येत असावी. केवळ मी भाऊ किंवा बाप आहे म्हणुन माझ्या मानापमानासाठी मी हिचा जीवही घेऊ शकतो ही फार विकृत विचारसरणी आहे. सगळं गणित मुळातुनच चुकलंय आपल्या समाजाचं असं वाटतं कधी कधी...
  • Log in or register to post comments

चुकलेय हे माहित असते...पण ते

टवाळ कार्टा
Mon, 05/09/2016 - 13:57 नवीन
चुकलेय हे माहित असते...पण ते बदलायची तयारी नस्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सहमत आहे. पुरुषप्रधानता

तर्राट जोकर
Mon, 05/09/2016 - 14:13 नवीन
सहमत आहे. पुरुषप्रधानता प्रधान आहे, जात दुय्यम मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अवांतर : मला आणि माझ्या

चिगो
Mon, 05/09/2016 - 14:37 नवीन
अवांतर : मला आणि माझ्या बायकोला 'सैराट' बघायचाय. तो मेघालयात प्रदर्शित होण्याचा चान्स नाही आणि त्यामुळे थेटरात पाहण्याचा प्रश्नच नाही. पायरेटेड प्रिंट नकोय. ऑनलाईन किंवा ऑथराईज्ड सिडी मिळू शकते का? धन्यवाद..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा