खरंतर त्या 'उपट्या'चं चुकलंच म्हणा, एक 'आळापणं जन्माला घातलं, वरुन त्याला शिकवलबी. आन खुशाल दिलं सोडून तुमच्यावर उडायला. ते पण तुमच्यावर आसं काय उडालं की तुमाला उपटायला हातंच शिल्लक ठेवलं न्हायीत. तुमी बसलात त्याच्या घराबाराची उपटत.
त्या लंगड्याला तुमी का सोडलं कळलं नाय, पाय काढायचा कनाय गुडग्यातनं, आन त्या 'सल्या'ला कापून फेकायचा उसात. तेवढंच जिवाला बरं वाटलं असतं.
आन आर्ची, कुणाला इचरुन बुलट न्हीलती तिनं, माज आलाय आयघालीला, घरादारावरनं नांगुर फिरवून, पोरांना पळवून घीऊन गेली.
टॅक्टरचं त्वांड घीऊन थेट शेतात जाणार म्हणली, पण ती तर थेट हायद्राबादेत पोचली. थेट तुमच्या डोळ्याम्होरनं गेली आन तुमची खानदानी इज्जत थेट गटारात घातली.
जगणं सोपं काय वाटलं आयघाल्यास्नी. खायप्यायचे वांदे झाले. कुठं ती मऊमऊ गादी, आन कुटं ती कुबट वासाची गोधडी. किड्यामुंग्यासारखं खोपट्यात जगत राहिले वो.
वाघिणीसारखी पाटलाची पोरगी मांजर होऊन जगायला शिकली हो. आख्ख्या जगाला फाट्यावर मारुन त्या 'आळापण्या'चा संसार फुलवत बसली.
त्या आळापण्याचं जावू द्या, ते आपल्या मौतीनं मेलं. पण मला एक खरंखरं सांगा, सख्ख्या बहिणीचं तुकडं करताना तुमचा हात जरा पण थरथरला न्हाय का वो?
प्रतिक्रिया
8 May 2016 - 12:24 pm | रातराणी
:(
8 May 2016 - 12:28 pm | रातराणी
बाकी अख्या जगाला फाट्यावर मारून संसार फुलवनारी, आयुष्यात स्वतःच्या कर्तबगारीन पुढं जाणारी, एका साध्या खेडेगावातून येऊन स्वतःच्या पायावर उभी राहणारी मांजर नाहीच. वाघीणचं ती.
8 May 2016 - 12:34 pm | तर्राट जोकर
+१००
8 May 2016 - 5:27 pm | संजय पाटिल
+१०००००००
8 May 2016 - 12:32 pm | आतिवास
शेवट सांगून टाकलात तर ..
8 May 2016 - 12:43 pm | रातराणी
मी नाही म्हणणार याला शेवट. खरा शेवट इथून पुढे आहे आणि काळीज हलवून टाकणारा आहे.
8 May 2016 - 12:35 pm | तर्राट जोकर
खास जव्हेरगंज टच!
8 May 2016 - 3:08 pm | कानडाऊ योगेशु
+१
हेच म्हणतो!
8 May 2016 - 12:44 pm | बोका-ए-आझम
तुकडे करताना हात थरथरला नसणारच. विचार मनात आणताना जर मन थरथरलं नसेल तर हाताची काय मातब्बरी! :(
9 May 2016 - 12:45 pm | नाखु
आणि जव्हेरगंजानी लेखणी झिअजवावी अशी त्या "प्रिन्सांची" लायकी पण नाही.
किमान १०-१२ ९६ कुळींना "सैराट" बद्दल विचारल्यावर "छ्या अस्म काही होतं नाही म्हाराष्ट्रात (तुम्च्या युपी-बिहारात असल) जरा जास्तीच दावलयं अशी "प्रिन्स"वाणे ऐकलीय.
१०-१२ पैकी किमान निम्मे उच्चशिक्षीत आणि आञ्टीवाले आहेत.(आणि त्याच पट्ट्यातले कोल्हापुर ते थेट बाश्री उस्मानाबाद)
मोठ्या(म्हतार्या,अनुभवी) माणसांनी वेळीच हात धरला नाही आणि हात थरथर्ला पाहिजे अस्म कधी वाटूच दिलं नाही तर खानदान कशी "हळवी+बहिणीची माया असलेली" निपजणार !!!
थेट रोखठोक नाखु
9 May 2016 - 12:58 pm | तर्राट जोकर
सुन्न करणारं आहे नाखुकाका हे...
तमिलनाडूत अशाच प्रकरणातील भर रहदारीच्या रस्त्यावर हत्येचा सीसीटीवी विडियो बघून बरेच दिवस अस्वस्थ होतो, सैराट पाहून ती अस्वस्थता अजून वाढली.
9 May 2016 - 1:07 pm | टवाळ कार्टा
त्यात भर म्हणजे त्या भागातल्या लोकांना यात वावगे काहिही वाटत नाही
9 May 2016 - 1:11 pm | तर्राट जोकर
:(
मला तर ते मेसेजेस फिरत होते ना की आपल्या मुली बैनी अशा प्रेमात सैराट झाल्या तर चालतील का टैप, ते अशा कृत्यांना मूक संमती देणारे आहेत असेच वाटत होते. पालकांची मुलांबाबतची का़ळजी कबूल पण मुलांपेक्षा इज्जतीची काळजी जास्त असते बहुसंख्य लोकांना असेही वाटते.
9 May 2016 - 1:56 pm | टवाळ कार्टा
8 May 2016 - 3:04 pm | सत्याचे प्रयोग
सैराट पाहिला आणि शेवट मात्र एकदम सुन्न करणारा आहे. माझ्या मुलीने शेवटी असे का म्हणून विचारले नाही सांगू शकलो तिला.
8 May 2016 - 3:17 pm | याॅर्कर
सैतानी प्रवृत्ती असलेल्यांचा हात थरथरत नाही.
शेवट डोळ्यातून पाणी आणणारा.
8 May 2016 - 3:31 pm | अत्रुप्त आत्मा
जब्बरदस्त!
8 May 2016 - 3:33 pm | उगा काहितरीच
काय बोलणार...थिएटरमधून सुन्न , मुकाट मनाने बाहेर आलोय! नागराजाचा शेवटचा डंखच जब्राट असतो राव ! :-(
8 May 2016 - 6:21 pm | अभ्या..
तेज्याच्या त्या प्रिन्श्याच्या.
8 May 2016 - 6:41 pm | पाषाणभेद
सैराटने सगळ्यांना कामाला लावले हे नक्की. हेच त्या चित्रपटाचे यश आहे.
8 May 2016 - 7:02 pm | उगा काहितरीच
U like me or hate me but u can't ignore me ! अशी काहीशी म्हण आहे ना इंग्रजीत ?
8 May 2016 - 7:24 pm | स्वामी संकेतानंद
सुन्न!!
9 May 2016 - 1:54 pm | पिलीयन रायडर
सैराट बघितलेला नाही.. बघणारही नाही.. रादर.. बघवणार नाही.. कारण आता शेवट काय असेल ह्याची कल्पना आली आहे. तेव्हा नंतर प्रचंड अस्वस्थता येते हे माहिती आहे. सहन होत नाही..
जात ह्या मुद्द्यासोबतच अशी मानसिकता कमालीच्या पुरुषप्रधानेतुन येत असावी. केवळ मी भाऊ किंवा बाप आहे म्हणुन माझ्या मानापमानासाठी मी हिचा जीवही घेऊ शकतो ही फार विकृत विचारसरणी आहे.
सगळं गणित मुळातुनच चुकलंय आपल्या समाजाचं असं वाटतं कधी कधी...
9 May 2016 - 1:57 pm | टवाळ कार्टा
चुकलेय हे माहित असते...पण ते बदलायची तयारी नस्ते
9 May 2016 - 2:13 pm | तर्राट जोकर
सहमत आहे. पुरुषप्रधानता प्रधान आहे, जात दुय्यम मुद्दा आहे.
9 May 2016 - 2:37 pm | चिगो
अवांतर : मला आणि माझ्या बायकोला 'सैराट' बघायचाय. तो मेघालयात प्रदर्शित होण्याचा चान्स नाही आणि त्यामुळे थेटरात पाहण्याचा प्रश्नच नाही. पायरेटेड प्रिंट नकोय. ऑनलाईन किंवा ऑथराईज्ड सिडी मिळू शकते का? धन्यवाद..