[शतशब्द कथा स्पर्धा कथा : त्याग] भाग दोन (सीक्वल)
आधीचा भाग (स्पर्धेत लिहिलेली कथा)
*******************
अन केला सर्वस्वाचा
त्याग...
*******************
कोळस्याच्या राखेने, जागरणाने, इंग्रजांच्या रागाने डोळे रेलवेच्याच लाल बावट्याप्रमाणे तांबारलेले.
बनारस, पॅरिस ऑफ़ द ईस्ट, इथे क्रन्तिकारी-ब्रिटिश लपछपी खेळत रोज. बनारस,पोटात धर्मदाय शिधा ,झोपायला घाट, आस एकच क्रांतिगुरु भेटावा.
हाती चुरगाळलेले पत्र "पोरगा आग आहे तुम्हीच पदरात घेऊ शकता, स्नेही, बाबाराव" कानी शब्द घुमत "राम,बनारसला विद्यापीठाबाहेर तिसऱ्या खांबाबुडी ऊभा रहा, 'ते' भेटतील"
बनारस, पाय शिवनगरीला लागल्याच्या 15व्या दिवशी पोटात भुक डोळ्यात आग पाठीला तिसरा खांब,
"का हो बबुआ पखवाड़ा से देखत बा कौन चाही?" सावळासा होता विचारणारा. वेंधळेपणामागे लपवलेली जरब ओकणारी नजर.
"कुछ नहीं ऐसे ही..."
"आज़ाद से मिलना है क्या ?"
डोके गरगरले श्वास अडकला पण तोंडून निघाले "हाँ"
"तो मिलो ना!" क्षणात विश्वरूपदर्शन घडले. हेच पंडित चंद्रशेखर आज़ाद.
लोहरसासम दग्ध क्रांतिमार्गावर हसत खेळत पहिले पाऊल पडले . फळला होता...
...माझा त्याग.
याद्या
4338
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
धग जाणवली!
_/\_
सलाम!
_____/\_____
भारी
एकच शब्द
आईशपथ, जाळ हाय नुस्ता.
अत्यंत प्रभावी.
कांडका
सही बापू!
मस्त
1+
__/\__
जबरदस्त!
"राम,बनारसला विद्यापीठाबाहेर
नाही हो , राम आपल्या
In reply to "राम,बनारसला विद्यापीठाबाहेर by बोका-ए-आझम
काल्पनिक कथानायक आहे का बापु?
In reply to नाही हो , राम आपल्या by कैलासवासी सोन्याबापु
होय जाधव साहेब काल्पनिक आहेत
In reply to काल्पनिक कथानायक आहे का बापु? by वैभव जाधव
बरोबर.
In reply to नाही हो , राम आपल्या by कैलासवासी सोन्याबापु
वाह!
जबरदस्त !