Skip to main content

[शतशब्द कथा स्पर्धा कथा : त्याग] भाग दोन (सीक्वल)

[शतशब्द कथा स्पर्धा कथा : त्याग] भाग दोन (सीक्वल)

Published on गुरुवार, 05/05/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
आधीचा भाग (स्पर्धेत लिहिलेली कथा) ******************* अन केला सर्वस्वाचा त्याग... ******************* कोळस्याच्या राखेने, जागरणाने, इंग्रजांच्या रागाने डोळे रेलवेच्याच लाल बावट्याप्रमाणे तांबारलेले. बनारस, पॅरिस ऑफ़ द ईस्ट, इथे क्रन्तिकारी-ब्रिटिश लपछपी खेळत रोज. बनारस,पोटात धर्मदाय शिधा ,झोपायला घाट, आस एकच क्रांतिगुरु भेटावा. हाती चुरगाळलेले पत्र "पोरगा आग आहे तुम्हीच पदरात घेऊ शकता, स्नेही, बाबाराव" कानी शब्द घुमत "राम,बनारसला विद्यापीठाबाहेर तिसऱ्या खांबाबुडी ऊभा रहा, 'ते' भेटतील" बनारस, पाय शिवनगरीला लागल्याच्या 15व्या दिवशी पोटात भुक डोळ्यात आग पाठीला तिसरा खांब, "का हो बबुआ पखवाड़ा से देखत बा कौन चाही?" सावळासा होता विचारणारा. वेंधळेपणामागे लपवलेली जरब ओकणारी नजर. "कुछ नहीं ऐसे ही..." "आज़ाद से मिलना है क्या ?" डोके गरगरले श्वास अडकला पण तोंडून निघाले "हाँ" "तो मिलो ना!" क्षणात विश्वरूपदर्शन घडले. हेच पंडित चंद्रशेखर आज़ाद. लोहरसासम दग्ध क्रांतिमार्गावर हसत खेळत पहिले पाऊल पडले . फळला होता... ...माझा त्याग.
लेखनप्रकार

याद्या 4338
प्रतिक्रिया 21

इतक प्रखर लिहिलंय! सलाम! Sandy

_/\_

_____/\_____ सुरेख!! तळमळ प्रखर पणे जाणवली.

देवा एकच शब्द बोलतो ...... अफाट बस्स

फारच खास. पुभाप्र.

__/\__

पहिला भागसुद्धा वाचला. दोन्हीही जबरदस्त!

In reply to by बोका-ए-आझम

नाही हो , राम आपल्या कथानायकाचं नाव आहे बोका भाऊ. तो महाराष्ट्रातून क्रांतिकार्यात रुजू व्हायला बनारस ला जातो, बनारस अलाहाबाद हे त्याकाळी (१९२५ काकोरी नंतर) हॉटबेड झाले होते क्रांतीचे तेव्हा बिस्मिल अशफ़ाक़ वगैरे पहिल्याफळीचे क्रांतिकारी जेल मधे होते अन एचएसआरए चे ओझे पंडितजींच्या खांद्यावर होते पूर्णपणे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काल्पनिक कथानायक आहे का बापु? राम, अण्णा, तात्या (पहिला भाग) वाचून नेमकं कोण समजत नव्हतं पण एवढं का याला समजत नाही?, हात दाखवून अवलक्षण वगैरे नेहमीचे शेलके शेरे नको म्हणून गप्प बसलो होतो...

In reply to by वैभव जाधव

होय जाधव साहेब काल्पनिक आहेत सगळे, काही रियल लाइफ पात्रांवर बेस्ड काल्पनिक पात्रे बाकी शेरे गेले जायचे तिथे (आपण सुज्ञ आहातच) मला बिनधास्त विचाराल काय वाटेल ते कारण मी स्वतः काही पुर्ण बृहस्पती नाही हे मला माहीती आहे म्हणून मी पण कळत नाही ते विचारुन घेतोच!. लोभ असावा _/\_

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बिस्मिल आणि अशफाकउल्ला खान यांना काकोरी कटातल्या सहभागावरुनच फाशीची शिक्षा झाली होती. टाईमलाईनचा गोंधळ झाला.

जबरदस्त लिहिलंय!