Skip to main content

ईशावास्य उपनिषदातला शांतीमंत्र

लेखक विवेक ठाकूर यांनी रविवार, 24/04/2016 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ... ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्‍यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे. वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे. _________________________________ आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , ( कारण ) ..... ( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते | ................... (तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) , केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35967
प्रतिक्रिया 263

प्रतिक्रिया

In reply to by विवेक ठाकूर

'सगळीकडे' कशाला, आधी मला स्वतःमध्ये भरपूर अहंकार दिसतो, वर अर्थ लिहीलाय तो सगळ्यात आधी मला लागू होतो मग इतरांना हेही माहित आहे, बाकी आमचे थीम साँग ' सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी, सच है दुनियावालों के हम है अनाडी' आहे, आम्ही आमच्या अज्ञानात समाधानी आहोत.

In reply to by विवेक ठाकूर

मला वाटतंय "सगळं अज्ञान एकाच जागी असलेलं फ्युचर रेफरंस साठी बरं" असं त्यांना वाटलं असेल. बरोबर का नीमो ? :) (चुकिचं असलं तर हाणू ने. सगळ्यांचा राग माझ्यावर काढू ने.)

In reply to by नाव आडनाव

गएवढे सगळे अज्ञानी जन एका ठिकाणी सापडणं म्हणजे चेष्टा आहे काय !! पण काही म्हणा, अर्थ नाही आपल्या जगण्याला... वेस्ट आहे सगळं... टोटल अँड कंप्लिट वेस्ट

खरं तर प्रतिसाद देणार नव्हतो पण तुमचे भलतेच गैरसमज झालेत, म्हणून लिहीतो. >> माझे गैरसमज झाले हे ठरवणारे तुम्ही कोण? उचलली जीभ लावली टाळूला. वा भै वा. त्या श्लोकाचा शब्दानुवाद आणि त्यावर ओशोंचं भाष्य असं आहे >> ओशो तुमची प्रायवेट प्रॉपर्टी आहे काय? किंवा फक्त जगात ओशो तुम्हालाच समजला इतरांना छाट माहितीनाही हे कसे ठरवले? तस्मात, ज्यांना समजलं ते सिद्ध झाले. आणि असे सिद्ध हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही नाहीत. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी विस्तार केला जातो. थोडक्यात, नुसतं वाचून लोकांना सत्य समजलं असतं तर सर्वत्र शांतता आणि सौहार्द दिसला असता, पण वास्तविकता नेमकी विपरित आहे. >> किती विरोधाभास. वाचून समजत नाही हे कबुल करताय मग एवढा लेख लिहून एका शब्दासाठी एवढी बुंदी पाडन्याची गरज काय? ज्यांना समजलं त्यांना असले श्लोक-बिक वाचून नाही समजलं एवढं तरी कळतं का? तुम्हाला अध्यात्माची शून्य माहिती आहे ते एकवेळ ठीक, पण काँटेक्स्ट न कळवा हे दुर्दैव. >> मला शून्य महिती आहे ह्याचं डिक्लेरेशन देण्याचा तुमचा काय संबंध? तुम्ही इथे सरळ माझी किव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात. हास्यास्पद आहे हे. =)) सारं अध्यात्म हा अमृताचा शोध आहे. आणि शांतीमंत्र वैकुंठात ज्यानं डिस्प्ले केलायं त्याचं खरं कौतुक आहे. त्या मंत्राचा अर्थ उलगडला तर मृत्यू देहाला आहे याची जाणीव जनसामान्यांना होईल आणि राहत मिळेल असा उद्देश आहे. >> कोण अमृता?? स्मशानात जाऊन शोध घेतात तीचा? मंत्राचा अर्थ उघड आहे हे तुम्हाला कळलं नाही यातच काय ते आले. "उलगडला तर" ह्या शब्दातून तुम्हालाच जणू उलगडलाय अशी टिमकी वाजवणे दिसते. जनसामान्यांना राहत वैगरे फेकंफाक आहे. इथे पुन्हा अध्यात्मिक अनाकलानाची किमयागिरीच आहे. `हे' आणि `ते' म्हणजे ज्याला पूर्णत्व म्हणतात ते तत्त्व (अणू रेणू वगैरे नाही) आणि आपण एकच आहोत. तस्मात, पूर्णत्वात उप्तत्ती, स्थिती आणि लय या घटना उघड दिसल्या तरी पूर्णत्वाला त्यानं बाधा येत नाही. हे `पूर्ण तत्त्व' काय आहे याचा शोध म्हणजे अध्यात्म आहे. >> मग काय मी हिब्रूत बोललो? ज्याला पूर्णत्व म्हणतात ते काय आहे हेच शोधणं चाललंय ना तुमचं? मग अणू रेणू नाही हे सांगितलं पण मग ते काय आहे हे का नाही सांगत. तुम्हाला तर उलगडा झालाय म्हणं. येस, मला पूर्णत्वाचा उलगडा झालेला आहे. >> शाब्बास. मोक्षाच्या काउंटरवरुन टोकन घेतलं का? सत्यमेव जयते म्हणजे ते `पूर्णतत्व' सदाविजयी आहे. अर्थात, तुम्हाला सत्य म्हणजे काय याचा अनुभवच नाही. आणि त्यामुळे सत्य म्हणजे जनसामान्य समजतात ते `खरं' इतका फक्त `शब्दार्थ' माहिती आहे. "सत्य नेहमी जळते" इतकं भंपक विधान करुन तुम्ही स्वतःचंच हसं करुन घेतलं आहे. आता तुम्हाला कल्पना येईल की ते पूर्णतत्त्व सदाविजयी आहे कारण ते एकच आहे. तिथे हारजित हा प्रश्नच नाही. >> हारजीत हा प्रश्नच नाही तर 'जयते'चा का उल्लेख आहे? तुमचा हा आडंबरी खटाटोप जनसामान्यांना त्या श्लोकाचा अर्थ कळावा म्हणुन आहे ना? मग मी ही ते उदाहरण जनसामान्य श्लोकाचे काय अर्थ घेतात ह्यासाठी दिलंय. बाकी तुम्ही ठोकून विधानं करता त्याने भारी करमणूक होते. जोकर मी आहे पण कला खरी तुमच्यात आहे ब्वॉ. _/\_ आपण ते पूर्णत्व आहोत कारण ते पूर्णत्व एकच आहे. त्या पूर्णत्वाशिवाय इतर काहीही नाही, त्यामुळे तो अनुभव साधना आणि आकलनाची कुशाग्रता यांनी येतो. अर्थात, तुम्हाला त्याची सुतराम कल्पना नाही त्यामुळे मेडिसिन आणि फायनान्सची टर्मिनॉलॉजी वगैरे घोळ केला आहे आणि ज्या प्रतिसादकांची आकलनक्षमता तितपतच आहे त्यांना प्रतिसाद भावला आहे. >> तुमचं खरं दुखणं इथं आहे. इनोचा टेम्पो मागवला आहे. पितांबर घट्ट धरुन ठेवा. क्षुल्लक विरोधही इतका जिव्हारी लावून घेतलाय तुम्ही? ते 'सुखेदुखेसमेकृत्वा' तर सोडाच, प्लेगृपमधेही नाही हे स्पष्ट आहे. आकाशाचा अध्यात्मिक अर्थ शून्य असा आहे. अमर्याद आणि व्यापक स्पेस ज्यात सर्व निर्मिती स्थिती आणि लय आहे. त्यालाच उपनिषदाचा ऋषी पूर्ण म्हणतोय. तुमच्या अज्ञानाचा कळस इतका आहे की `आकाश पृथ्वीला टेकलं की संपतं. (सामान्य जनकल्पना).' असं तुम्ही म्हटलंय. म्हणजे `सामान्य कल्पना हे फक्त बचावात्मक आहे. आकाश पृथ्वीच्या खाली, वर, अणू रेणूमधे, यत्र-तत्र आणि सर्वत्र आहे. आकाश आणि अवकाश एकच आहेत कारण तो फक्त निर्देश आहे. ते 'सार्वभौम' म्हणजे चराचर व्यापून आहे. अर्थात याचा तुम्हाला ना अनुभव ना चिंतन त्यामुळे आकाशाशिवाय सूर्य देखिल निर्माण होऊ शकणार नाही आणि या लाखो-अरबो ग्रहमालिका फिरुच शकणार नाहीत याची कल्पना देखिल करता आली नाही. मग ते आकाशच पूर्णत्व आहे इतका गहन उलगडा न झाला तर नवल काय? >> हे हे. माझा अनुभव चिंतन ठेवू बाजुला. हे आकाश जे चराचर व्यापून आहे. ते 'चराचर'च आकाश व्यापून आहे असे नाही वाटत? हा तुमचा अनुभव नाही ! तुम्हाला केवळ शब्द माहिती आहेत. `अहं ब्रह्मास्मी' ही संकल्पना नाही, वस्तुस्थिती आहे आणि `पूर्णमदः पूर्णमिदं' याचा नेमका तोच अर्थ आहे ! `तत्त्वमसि' ही दुसरी संकल्पना नाही. आपणच ते पूर्णत्व आहोत हे सांगायचा फक्त वेगळा बाज आहे. >> मग तुमचा काय अनुभव. आम्ही तर ऐकलीय एक फकिराची गोष्ट. नाव आठवत नाही. समजुया अब्दुल. काही गैरसमज झाला आणि गावातल्यांनी फकिराला खुप मारलं अगदी रक्त पडेस्तोवर. फकिराने काही विरोध केला नाही. मग गावकर्‍यांना चूक कळली तर त्याची माफी मागून जखमांची सुशृषा करायला लागले. तो गप्प्च. कुणी विचारले फकिराला, काय बाबा, तुला मारनार्‍यांचा राग नाही आला, ह्या सेवा करनार्‍यांबद्दल प्रेम नाही वाटत. तो बोलला. अब्दुलने मारले, अब्दुलने मार खाल्ला, अब्दुल सेवा करत आहे. कुणावर रागावू, प्रेम कुणावर करु? अध्यात्मिक ग्रंथांच शून्य वाचन किंवा केवळ शब्दापलिकडे शून्य आकलन इतकंच म्हणता येईल! सर्व धर्मग्रंथ किंवा गुरु-शिष्य संवाद (उदा. भगवद्गीता) सत्याकडेच निर्देश करतात. आणि सिद्ध पुरुषांची वक्तव्य साधकांना युगानुयुगे मार्गदर्शक ठरतात. या वेगळं त्यांचं काही प्रयोजन नाही. >> मी काय अरबीत सांगितले? सिद्ध पुरुषांना गरज नाही हो आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन आणि आकलन करत बसण्याची. परत यादी काढा. किती सिद्ध पुरुषांमधे वेदशास्त्रौपनिषदसंपन्न होते? "नुसतं वाचून लोकांना सत्य समजलं असतं तर सर्वत्र शांतता आणि सौहार्द दिसला असता, पण वास्तविकता नेमकी विपरित आहे" हे तुम्हीच म्हटलंय. किती विरोधाभासी वक्तव्यं असावित? न तुम्हाला अध्यात्माची काही समज ना आकलन, तस्मात संपूर्ण प्रतिसाद बोगस झाला आहे. >> बोगसांना बोगसच वाटणार. नथिंग सरप्राइजिंग. दिक्षा आणि अनुग्रह हे प्रकार फार जुने झाले याची तर तुम्हाला सुतराम कल्पना नाही. >> =)) तुम्हाला मी काय म्हणतोय हेच कळत नाही, श्लोकाचे अर्थ लावायला चाललात. धन्य आहे. इंटरनेट हे संवादचं माध्यम आहे आणि यावरनं अध्यात्मिक संवाद सुद्धा होऊ शकतो पण ते तुम्हाला समजेल अशी शक्यता नाही. >> चलु द्या. इंटरनेटवरुन आध्यात्मिक संवाद. व्वा. उद्या म्हणाल इंटरनेटवरुन मुलंबाळंही होतात. मला खरंच समजणं शक्य नाही ते. या संकेतस्थळा बाहेरचे माझे असंख्य चाहते माझ्याशी सतत संपर्कात असतात आणि माझं लेखन त्यांना उपयोगी होतं. अर्थात, त्याबद्दल कोणतीही जळजळ न होऊ देता, संपूर्ण प्रतिसाद तुम्ही शांतपणे वाचला असेल तर थोडा फार प्रकाश तुम्हाला आणि इथल्या विरोधकांनाही पडेल हे नक्की. >> चाहते? बिचारे भटकलेले जीव. इश्वर त्यांना सद्गती देओ आणि त्यांच्या कर्माचा विपाक लवकर निस्तरो. बाकी काही असो. जळजळ होण्यामधे तुमचा हात कोणी धरु शकत नाही हे अगदी तुम्ही सिद्ध केलंय हा प्रतिसाद टंकुन. ते माझे गैरसमज वैगरे दूर करण्यासाठी नाही तर माझ्या प्रतिसादाला चार दोन जणांनी व्वा म्हटले म्हणून जळजळ झाली तुमची हे समजायला सूज्ञ असायची गरज नाही. मोह माया मत्सर काम क्रोध लोभ षडरिपूंपासून सुटका नाही, म्हणे मला पुर्णत्व गवसलंय. पैले अपना घसरता पितांबर संभालो, मग लोगोंको ग्यान शिकाओ

In reply to by तर्राट जोकर

कोण अमृता?? स्मशानात जाऊन शोध घेतात तीचा? शाबास! पूर्णत्त्वाचा शोध घेण्यासाठी मनाचा रोख बदलावा लागतो. मृत्यू त्याचं एक कारण ठरु शकतं. आणि स्मशान ही सगळ्यात योग्य जागा ठरू शकते. पण एकूण समज इतकीच म्हटल्यावर बाकीचा प्रतिसाद त्यानुसारच आहे. तस्मात पास!

In reply to by विवेक ठाकूर

स्मशान सगळ्यात योग्य जागा. अगदी अगदी आणि तुम्ही तिकडे त्या श्लोकाचा अर्थ टाकला की तो वाचून तिथे जाणारा प्रत्येकजण पुर्णत्वाने भरुन जाणार आहे. छ्या लै लेट केलं राव तुम्ही, पहिल्या बुद्धाच्या जर्रा आधी आले असते तर इतके बुद्ध, इतके तिर्थंकर, इतके पैगंबर ह्यांची गरज पडली नसती. तुम्हाला वाह वाह करणार्‍या चाहत्यांची संख्या विरोध करणार्‍यांपेक्षा कमी आहे काय हो? जस्ट अ क्युरिओसिटी.

In reply to by तर्राट जोकर

बुद्ध त्याच्याकडे आलेल्या साधकांना तीन महिने स्मशानात ध्यान करायला सांगायचा. हेतू असा की प्रत्येक जीवनाचा शेवट कळला की साधक अंतर्मुख होईल. थोडक्यात , मेडिटेशन ऑन बर्नींग पायर ही फार जुनी आणि अत्यंत प्रभावी साधना आहे .

In reply to by विवेक ठाकूर

बुद्ध त्याच्याकडे आलेल्या साधकांना तीन महिने स्मशानात ध्यान करायला सांगायचा
ह्याचा ऐतिहासिक साधनांमधील संदर्भ मिळेल काय? लैच उत्सुकता वाटून राहिलीय.

In reply to by प्रचेतस

सुदर्शन क्रिया शिकवणारे स्वतःची चिता जळते आहे आणि आपण स्वतः ती दुरून बघत आहोत अशा प्रकारचे एक ध्यान शिकवतात. आधी विचित्र वाटतं पण ध्यानानंतर शांत वाटतं.

In reply to by पैसा

हो. पण ते वायलं, हे वायलं. संक्षी आता आपली पडती बाजू सावरायला काहीच्या काही बोलायला लागलेत. हा धागा नक्की कशासाठी आहे ह्याचा मला खरंच प्रश्न पडलाय आता.

In reply to by तर्राट जोकर

तुमचा वरचा प्रतिसाद पाहा `स्मशान सगळ्यात योग्य जागा.' त्या अनुषंगानं चर्चा चालू आहे. मला बाजू सावरायची गरजच नाही.

In reply to by सतिश गावडे

आपण देहापेक्षा वेगळे आहोत या विदेहत्त्वाची जाणीव होण्यासाठी ती ध्यान प्रक्रिया आहे. आणि तुम्ही उधृत केलेल्या ओवीचा तसाच अर्थ आहे.

In reply to by विवेक ठाकूर

बाउंसर का बरे जाईल? इतराना काहीच कळत नाही असा समज आहे का तुमचा? :) तो संत तुकारामांचा अभंग आहे. आमचे लाडके कीर्तनकार/प्रवचनकार प्रगोमहाराज सातारकर यांच्या वतीने मी दिला आहे.

In reply to by सतिश गावडे

हा काय नवा प्रकार असं वाटायचं म्हणून लिहीलं. इतराना काहीच कळत नाही असा समज आहे का तुमचा? :) दरवेळी याच (स्मायली टाकून का होईना) लेवलला यायची गरज आहे का ? ओवी तर सुरेख आहे हे आधीच म्हटलंय.

In reply to by पैसा

वाटत नाही. हे शाक्तपंथापैकी झाले. नंतर वज्रयानांमध्ये सुरु झालेले असेलही. पण वज्रयान महानिर्वाणानंतर काही शतकांनी आला.

In reply to by प्रचेतस

या जवळवळ साडेबाराशे पानी ग्रंथात, ध्यानाच्या जगात प्रचलित असलेल्या सर्वच्यासर्व म्हणजे एकशेबारा पद्धती आहेत. त्यात हा उल्लेख आहे. मी देखिल हे ध्यान केलंय. नक्की रेफरंस मला आता शोधावा लागेल. सापडला की देतो.

In reply to by विवेक ठाकूर

ओशोंच्या पुस्तकातील संदर्भ मी अधिकृत मानू शकत नाही. ऐतिहासिक साधनं म्हणजे सूत्र, त्रिपिटकं, जातककथा असे बौद्ध तत्वज्ञानावरील ग्रंथ. तत्त्वज्ञान, चरित्र ह्यांसाठी हेच संदर्भ प्रमाण मानले जातात.

In reply to by विवेक ठाकूर

ओशोंच्या पुस्तकातील संदर्भ मी अधिकृत मानू शकत नाही. ऐतिहासिक साधनं म्हणजे सूत्र, त्रिपिटकं, जातककथा असे बौद्ध तत्वज्ञानावरील ग्रंथ. तत्त्वज्ञान, चरित्र ह्यांसाठी हेच संदर्भ प्रमाण मानले जातात.

In reply to by प्रचेतस

साधनाकालात `साधना' काय आहे आणि ती सांगणारा सिद्ध, त्यातून मनाच्या नक्की कोणत्या `धारणेवर' आघात साधतो आहे यात रस होता. इतिहास किंवा तुम्ही म्हणता तशा ग्रंथात रुची नाही त्यामुळे वाचले नाहीत. अर्थात, जे लिहीलंय ते ओशोंनी सांगितलंय हे नक्की. शिवाय साधना प्रत्ययकारी आहे हे निश्चित.

In reply to by विवेक ठाकूर

तसं असेल तर बुद्ध त्याच्या अनुयायांना स्मशानात ध्यान करायला सांगायचा हे विधान पूर्णत: निरर्थक ठरते. केवळ ओशोंनी सांगितलंय म्हणून प्रत्यक्षात तसं आहे हे न मानणेच श्रेयस्कर.

In reply to by प्रचेतस

त्यामुळे ते विनाधार बोलणं अशक्य. शिवाय बुद्ध हा त्यांचा अतिप्रिय विषय तस्मात त्यानं सांगितलेल्या साधनेचं श्रेय त्यालाच दिलं जाईल यात शंका नाही. सरतेशेवटी साधना कमालीचा परिणाम साधते यातही वाद नाही . त्यामुळे मला संदर्भ देता येत नाही म्हणून वाक्य निरर्थक ठरत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

ओशो कोणी महान व्यक्तिमत्व असेलही. पण मी नेहमीच तत्कालीन साधनांवर विश्वास ठेवतो. तत्कालीन बौद्ध साधनांमध्ये हे वाक्य आहे की नाही हे महत्वाचे. ओशोंनी कुठेतरी संदर्भ नक्कीच दिला असावा..शोधून सांगा. बाकी साधना कितपत परिणाम साधते हा मुद्दा नसून उपरोक्त वाक्य हे बुद्धाचे आहे किंवा नाही हा मुद्दा आहे तस्मात् अस्सल संदर्भ मिळाल्याशिवाय वरील वाक्य हे निराधार आणि निरर्थक ठरते.

कांटे का मुकाबला. दोनो प्रतिद्वन्दी ताकदवर और अत्यंत मंजे हुए खिलाडी जाने जाते है| कोई भी पीछे नही हटेगा, देखना है के किसकी होगी जीत| देखिये आज का महामुकाबला!

कांटे का मुकाबला. दोनो प्रतिद्वन्दी ताकदवर और अत्यंत मंजे हुए खिलाडी जाने जाते है| कोई भी पीछे नही हटेगा, देखना है के किसकी होगी जीत| देखिये आज का महामुकाबला!

In reply to by वैभव जाधव

आसं सांगावं बी लागू ने. काळजी घ्या, प्रेमाने राव्हा, चार घ्या, चार द्या. झेंड्याचे कापड फाटलं तर कापड बदला. दांडा शाबूत ठेवा. बास्स का? की और टुसन होना?

In reply to by अर्धवटराव

अब ये कौन है भिया? सिद्धा बताओ, डबल सेंच्युरी होना बोलके. वो अम्मी उधर कुछ बक री, इधर कु आप कुछ बोल रे???? पुरावा द्या रे .... नो!

In reply to by वैभव जाधव

तो काय आहे हे तुम्हाला माहित नसेल तर सांग्ण्यात काहि अर्थ नाहि, आणि माहित असेल तर सांगण्यात काहि पॉइण्ट नाहि :ड

In reply to by वैभव जाधव

नाही नाही... हे एकदम ओरिगिनल असावेत! संक्षी / विठा डुआयडी नसावेत.. त्ते जे जे लिहीत आहेत ते त्यांना खरंच मनापासुन वाटतं. ते फारसं लोकांना पटत नाही ही गोष्ट वेगळी. पण हे बेअरिंग असु शकत नाही.

बरंच काही वाचलं काहीच समजलं नाही याला पूर्ण म्हणावं कि अपूर्ण? कि व्यवहारी अपूर्णांक? आपली पट्टी काळी दोन पांढरी पाच झेपत नाही सोडून द्यावं. चालु द्या

अज्ञानाचा अर्थ सत्य न उलगडलेला इतकाच आहे, मंदमती नाही. तस्मात, कुणाचा उपमर्द करण्याचा कदापी हेतू नाही. प्रतिसाद अज्ञानमूलक आहे म्हणजे त्यातून सत्याचे आकलन दिसत नाही. तव्दत, मी हे सर्वनाम आहे, त्याचा अहंकाराशी काहीएक संबंध नाही . अहंकारचा सरळ संबंध अज्ञानाशी आहे. इतुप्पर कुणाला काय प्रतिसाद द्यायचे ते द्या .

अज्ञानाचा अर्थ सत्य न उलगडलेला इतकाच आहे, मंदमती नाही. तस्मात, कुणाचा उपमर्द करण्याचा कदापी हेतू नाही. प्रतिसाद अज्ञानमूलक आहे म्हणजे त्यातून सत्याचे आकलन दिसत नाही. तव्दत, मी हे सर्वनाम आहे, त्याचा अहंकाराशी काहीएक संबंध नाही . अहंकारचा सरळ संबंध अज्ञानाशी आहे. इतुप्पर कुणाला काय प्रतिसाद द्यायचे ते द्या .

In reply to by विवेक ठाकूर

'तव्दत, मी हे सर्वनाम आहे, त्याचा अहंकाराशी काहीएक संबंध नाही . अहंकारचा सरळ संबंध अज्ञानाशी आहे.' 'खिदळवायला ' तू अहंकारी ' म्हणायची स्टाईल फार जुनाट झालीये.' - दोन्ही तुमचेच प्रतिसाद, तर मग वर जो 'मी' वाला अर्थ लिहिला होता, जो मुळात तुमच्यासाठी नव्हताच, तो वाचून तुम्हाला राग का आला..

In reply to by नीलमोहर

लोकांना 'खिदळवायला ' तू अहंकारी ' म्हणायची स्टाईल फार जुनाट झालीये.' ही वस्तुस्थिती आहे. इथली विडंबनं आणि प्रतिसाद त्याचे साक्षी आहेत. अशा प्रकारामुळे चांगल्या चर्चेची वाट लावण्याचा प्रकार इथे कायम चालू असतो. आणि तुम्हाला याची कल्पना नसेल असं वाटत नाही. आणि हे अहंकार म्हणजे नक्की काय याचं स्पष्टीकरण आहे : 'तव्दत, मी हे सर्वनाम आहे, त्याचा अहंकाराशी काहीएक संबंध नाही . अहंकारचा सरळ संबंध अज्ञानाशी आहे.'

येस, मला पूर्णत्वाचा उलगडा झालेला आहे.
मलापण पूर्णत्वाचा उलगडा झाला आहे :) आणखी कोणकोण आहेत पूर्णत्वाचा उलगडा झालेले?

In reply to by तर्राट जोकर

तो अस्तित्वाचा स्वभाव आहे. म्हणजे कुणाला कळो न कळो तो पूर्णत्वाशी एकरूपच आहे. प्रतिसाद सरकॅस्टिक असला तरी वस्तुस्थितीशी विसंगत आहे .

संक्षी/ विठा अजून 'तू अहंकारी' या उसळत्या चेंडूला बाजूला सरून वाट द्यायला शिकले नाहीत. सार्‍या मिपाकर गोलंदाजांना या कमजोरीची पूर्ण माहिती आहे... रैना झालाय.. प्रत्येक उसळत्या चेंडूला झेल उडतायत.. (विथ ड्यु रीस्पेक्ट टू रैना)

In reply to by बाळ सप्रे

कसं बोललात. हॅट्स ऑफ टू यु. संक्षी, माझे काही तुमच्याशी वैर नाही, मी तुमचा द्वेष करत नाही किंवा तुम्ही अज्ञानी आहात असा काही दावा करत नाही. इतका काळ जालावर वावरुन तुम्हाला घेरणे, रेवडी उडवणे कोणालाही किती सोपे आहे हे तुमच्या लक्षात येत नाही ह्याचे आश्चर्य वाटते. माझ्या आधी कित्येकांनी सांगून झाले असेल पण तुमच्यात सुधार दिसला नाही. आपमें कुच्छ भी बदला नही है. इतर विषयांवर गप्प राहणारे संक्षी अध्यात्म व ब्रेस्ट कॅन्सरवर पिसाळल्यागत (माफ करा माझ्याकडे अजुन वेगळा शब्द नाही) वाद करत सुटतात हे काही गुपित नाही. मी काही तुम्हाला सल्ला देत नाही फक्त निरिक्षण आहे. इथे अनेक विषयातले इतके ज्ञानी लोक आहेत पण कुणीही आपल्या ज्ञानाचे अवडंबर माजवतांना दिसत नाही, जरी त्यांनी तसे केले तरी ते स्विकारार्ह आहे. पण अध्यात्म विषयात कुणी असे करायला लागला तर तो हास्यास्पद ठरण्याशिवाय काही वेगळे होत नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. अध्यात्मात लोक जेवढे पुढे जातात तेवढे ते अहंकारमुक्त, सहज होत जातात असे ऐकुन बघुन आहे. साधना करणारे शांत होत जातात. ते तर प्रत्यक्ष आयुश्यातले भयंकर अपमानही लावून घेत नाहीत, तुम्ही इथले दोन प्रतिसादाने कळवळून जाता. स्ट्रेन्ज. सतत दुसर्याचे आकलन (सभ्य भाषेत अक्कल) काढणे, ज्ञान काढणे हे डोक्यात जाते. बहोत बार हुवा होगा ये. मैंने बी अपनी बात कह दी. बुरा ना मानो अध्यात्म है.