✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?

अ
अमृता_जोशी यांनी
Mon, 04/04/2016 - 02:01  ·  लेख
लेख
आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या ad ad हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे' "क्या हुआ म्याडम?" "मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?" "आं? चेष्टा करताय काय म्याडम?" "नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?" "ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही' "ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?" "याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते." "ती म्हणजे कोण?" "ही फोटोतली बाई" "हो, पण ती आहे कोण?" "अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा." "कशावरून?" आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला. "सांगाना कशावरून ती अडाणी आहे?" "काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात." "वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले. "ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला. "काय दिसतंय या फोटोत?" "त्या मोडेलचे कपडे वैगेरे." "तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत." "का भांडताय?" "कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे." "मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. " "ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे." "ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला. घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
40138 वाचन

💬 प्रतिसाद (200)

प्रतिक्रिया

मुद्दा पटला !!

खटपट्या
Mon, 04/04/2016 - 02:10 नवीन
मुद्दा पटला !!
  • Log in or register to post comments

:-)

अमृता_जोशी
Mon, 04/04/2016 - 02:13 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खरेतर या झैरातीत राहुल गांधी

विजुभाऊ
Tue, 04/12/2016 - 13:52 नवीन
खरेतर या झैरातीत राहुल गांधी आणि नरेन्द्र मोदींचे फोटो द्यायला हवे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

त्यात एवढं चिडायला काय झालं

गरिब चिमणा
Mon, 04/04/2016 - 03:50 नवीन
त्यात एवढं चिडायला काय झालं,साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे.पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड( अकलेने)
  • Log in or register to post comments

तुमच्या घरातील स्त्रीयांनाही

खटपट्या
Mon, 04/04/2016 - 07:47 नवीन
तुमच्या घरातील स्त्रीयांनाही तुम्ही हाच नियम लावता का ? कीती तो काडया टाकण्याचा प्रयत्न !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

भुर्रर्र !!!!

मितान
Mon, 04/04/2016 - 08:19 नवीन
भुर्रर्र !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

=))

अजया
Mon, 04/04/2016 - 09:49 नवीन
गरीब बिचारा चिमणा साहेब, काड्या कमी पडल्या वाटतं घरट्यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

ओ...कपडे घट्ट झाले की

टवाळ कार्टा
Mon, 04/04/2016 - 14:04 नवीन
ओ...कपडे घट्ट झाले की डोक्यातली अक्कल वाढते असे म्हणायचे आहे त्यांना...मस्तय ना...खानावळीचे पिच्चर बघताना उघडेबंब बसायचे...डोक्याची विचार करायची क्षमताच नाहिशी होणार...मग खानावळीच्या पिच्चर मध्ये लॉजिक नाही शोधत बस्णार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तुम्हाला भेटली का

भुमी
Mon, 04/04/2016 - 10:08 नवीन
जीनटॉपवाली फक्कड(अकलेने) चिमनी?अन् घरटं कुठं केलंत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

सहकारनगर ,पुणे इथे आमचे घरटे

गरिब चिमणा
Mon, 04/04/2016 - 14:46 नवीन
सहकारनगर ,पुणे इथे आमचे घरटे आहे, चिमणा चिमणी व चिमणुकले असे तीघेही राहतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमी

कमाल आहे. तुम्ही सहकार नगर

अप्पा जोगळेकर
Tue, 04/05/2016 - 12:54 नवीन
कमाल आहे. तुम्ही सहकार नगर मध्ये राहून ऊसाची शेती कशी करता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

.

नूतन सावंत
Mon, 04/04/2016 - 18:15 नवीन
संपादित सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

व्यक्तिगत होतंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/04/2016 - 18:17 नवीन
असं वाटतंय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

चिमणु म्हणु नका ओ. गरिब किंवा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/05/2016 - 11:52 नवीन
चिमणु म्हणु नका ओ. गरिब किंवा दरिद्री चिमण्या म्हणा. चिमणु म्हणलं की मला हाक मारल्यासारखं वाटतं (काही मिपाकर मित्रं फोनवर चिमणु म्हणतात म्हणुन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

फुरोगामी आत्मकुन्थन कि काय

साहना
Tue, 04/05/2016 - 12:33 नवीन
फुरोगामी आत्मकुन्थन कि काय म्हणतात ते हेच का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

त्यात एवढं चिडायला काय झालं,

हेमंत लाटकर
Mon, 04/11/2016 - 11:51 नवीन
त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात या मताचा मी आहे.
तुम्ही मठ्ठ धोतरवाले आहात की हुश्शार जिन्सवाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा

पहिल्या जाहिरातीमधे पण

अत्रे
Mon, 04/04/2016 - 06:36 नवीन
पहिल्या जाहिरातीमधे पण प्रॉब्लेम आहे. "सदगृहस्थाची" व्याख्या सेक्सिस्ट आहे. नेहमी बिल "सदगृहस्थाने" द्यावे असे छुपे गृहितक त्यात आहे.
  • Log in or register to post comments

हा हा. मी अगदी उलटा अर्थ

रेवती
Mon, 04/04/2016 - 06:55 नवीन
हा हा. मी अगदी उलटा अर्थ घेतला होता. आता समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

मुद्दा पटला. तुमचा आक्षेप

तर्राट जोकर
Mon, 04/04/2016 - 08:19 नवीन
मुद्दा पटला. तुमचा आक्षेप योग्य आहे. सद्गृहस्थ वाली जाहिरात तर येडपटपणाचा कळस आहे. कशाचा कशाला पत्ता नाही. इंग्रजी भ्रष्ट रुपांतर. लॉस्ट इन ट्रान्सलेशन.
  • Log in or register to post comments

थांकू!

अमृता_जोशी
Mon, 04/04/2016 - 12:01 नवीन
थांकू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

कैच्या कै जाहिरात. आज मी पण

मितान
Mon, 04/04/2016 - 08:21 नवीन
कैच्या कै जाहिरात. आज मी पण जाणारे स्टार बझारात. तिथे दिसली जाहिरात तर मी ही तक्रार करून येईन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

अमृता_जोशी
Mon, 04/04/2016 - 11:55 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

अर्र स्वाक्षरी टाकायची राहिली

मितान
Mon, 04/04/2016 - 08:24 नवीन
अर्र स्वाक्षरी टाकायची राहिली... प्यारीस,लंटन, फ्रँकफुर्ट आणि हाँगकाँगातही पारंपारीक पंजाबी सलवार कुडता घालून रस्त्यावर पोळीचटणीचा रोल खात हिंडणारी अडाणी गावंढळ मितान ;)
  • Log in or register to post comments

:)

अजया
Mon, 04/04/2016 - 09:40 नवीन
:) असेच करणारी गावंढळ मितानची गावठी मैत्रीण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

मी पण तुमचीच गावठी सखी बरका

इशा१२३
Mon, 04/04/2016 - 16:03 नवीन
मी पण तुमचीच गावठी सखी बरका अजया मितान :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मिपाला काय नवं आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/04/2016 - 16:22 नवीन
पण आपण कसे आहात हे सिद्ध करण्याची ही अहमीका कशासाठी ? कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही ओळखत नाय का ? (भोगा आता फळं) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही

सूड
Mon, 04/04/2016 - 16:48 नवीन
कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही ओळखत नाय का ?
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर मास्तर,

अभ्या..
Mon, 04/04/2016 - 17:04 नवीन
मास्तर मास्तर, नमस्कार करतो हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

औक्षवंत हो, अष्टपुत्र

सूड
Mon, 04/04/2016 - 17:10 नवीन
औक्षवंत हो, अष्टपुत्र सौभाग्यवान हो!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१००

अजया
Mon, 04/04/2016 - 18:05 नवीन
कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही ओळखत नाय का ?
अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरे देवा..

ब़जरबट्टू
Mon, 04/04/2016 - 17:05 नवीन
तुम्ही स्व:ता प्यारीस, जर्मनी मध्ये असे कपडे घातले म्हणून स्वत:ला गावठी म्हणता, वर कपड्यावरून लायकी काढु नये म्हणता. आय डोंट केअर हा मुद्दा असेल तर ठिक आहे, पण विदेशात पंजाबी ड्रेस घातला म्हणून जर तुम्हाला गावठी दिसतो असे अंश्ताजरी वाटत असेल तर वर दिलेली जाहिरात बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

क्या बात है!

विवेक ठाकूर
Mon, 04/04/2016 - 17:13 नवीन
पण विदेशात पंजाबी ड्रेस घातला म्हणून जर तुम्हाला गावठी दिसतो असे अंशतः जरी वाटत असेल तर वर दिलेली जाहिरात बरोबर आहे. मस्त मुद्दा पकडलायं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/04/2016 - 17:19 नवीन
मुद्दा १००% बरोबर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/04/2016 - 17:16 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

चिमण्याला उपहासाने म्हंटलंय

अजया
Mon, 04/04/2016 - 18:09 नवीन
चिमण्याला उपहासाने म्हंटलंय हेही लक्षात आलेले दिसत नाही तुमच्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

खिक्क..

ब़जरबट्टू
Tue, 04/05/2016 - 09:04 नवीन
चिमण्याने पंजाबी सुट घालणा-यांना स्मार्ट म्हंट्लय..भारतात .. :) तुम्ही तोच ड्रेस विदेशात घातल्यास आपल्याला गावठी समजतिलच हे पहिलेच गृहीत धरलेय. किंवा आता चिमण्यासारखेच तुम्ही विदेशात पंजाबी ड्रेस घालणा-यांना (स्वत:सकट) गावठी समजता असा अर्थ आम्ही का घेऊ नये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

खिक्क ! जाऊ द्या :))

मितान
Mon, 04/04/2016 - 20:43 नवीन
खिक्क ! जाऊ द्या :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

मीबी न्यूझीलंडमध्ये पैठणी

नूतन सावंत
Mon, 04/04/2016 - 18:23 नवीन
मीबी न्यूझीलंडमध्ये पैठणी नेसून लग्नाला मिरवनारी तुमची ताई बर्का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

मुद्दा अगदी रास्त आहे.

गवि
Mon, 04/04/2016 - 08:28 नवीन
मुद्दा अगदी रास्त आहे. जाहिरात हटवली पाहिजे हे लक्षात आणून दिलंत ते बरं झालं. मागे एकदा एक मोठी पोस्टर अॅड एका मॉलमधे होती. ब्यूटी ट्रीटमेंट न घेतलेली म्हणून एक साधी केशरचनावाली विनामेकप मुलगी दाखवून तिचं वर्णन खास मराठी फॉन्टमधे "काकूबाई" असं छापलेलं आणि तिथेच बाजूला पाश्चात्य मेकअप आणि केशरचना करुन तिथे रोमन लिपीत Beautiful smart की आणि काहीतरी वर्णन. कुठेतरी खटकलं होतं तेव्हाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

अमृता_जोशी
Mon, 04/04/2016 - 11:59 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वर आठवणीनुसार मोघम तपशील

गवि
Mon, 04/04/2016 - 12:25 नवीन
वर आठवणीनुसार मोघम तपशील लिहीला होता. त्यात शब्द चुकलेत. नेमके शब्द आत्ता आठवले ते खाली देतोय. साधी वेषभूषा आणि केशरचना असा मुलीचा फोटो. त्याचं शीर्षक : "अगंबाई" look मेकअप आणि केशभूषावाली दुसरी मुलगी. शीर्षकः Hi-Fi look. एकवेळ काकूबाई चालला असता (प्रौढ लुक असल्यास) पण अगंबाई हे अगदी आवर्जून हेटाळणीयुक्त लिहिणं आणि इंग्लिश लिपीतली बाकी संपूर्ण जाहिरात असताना तो एक शब्द देवनागरी फाँटात लिहिणं हे आवडलं नाही. मराठीचा कट्टर पुरस्कर्ता किंवा अस्मिताधारक नसूनही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

धन्यवाद

नाखु
Mon, 04/04/2016 - 09:14 नवीन
किमान स्त्रीयांनी तरी जोरदार आक्षेप घ्यायला हवा अश्या जाहीरातींना. किमान अश्या साठी की फक्त पुरुषांनी तक्रार केली तर हेटाळणीच जास्त केली जाते.आणि आजू बाजूच्या स्त्रीयाही तटस्थ राहिल्यास जास्त पंचाईत होते अलिकडेच आर टी ओ त स्वतंत्र रांग स्त्रीयांसाठी आहे हे सांगण्याच्या प्रयत्नात इतरांकडून अपमान्जनक टीपण्णी अनुभवलेला नाखु
  • Log in or register to post comments

अगदी योग्य

स्मिता.
Mon, 04/04/2016 - 09:38 नवीन
तुम्ही केलेली तक्रार अगदी योग्य आहे. पोषाखावरून पात्रता नक्कीच ठरत नाही, पण समाज मात्र ठरवत असतो. नेहमीच्या सार्वजनीक ठिकाणांवर मला स्वतःला पोषाखावरून मिळणारी वेगवेगळी वागणून अनुभवली आहे. 'सो-कॉल्ड' अडाणी बाईकरता असलेली जाहिरात इंग्रजीत कशाला बरं लावली असावी हा प्रश्न आहेच. तसेच दोन्ही जाहिराती डिस्क्रिमिनेशन दाखवणार्‍याच आहेत. त्यातून हेच दिसतं की स्त्रिला ना आर्थिक स्वातंत्र्य आहे ना शिक्षण! बाकी उरले ते मराठीतले भाषांतर!! त्याबद्दल तर काय बोलावे? आताच एका मोठ्या रस्त्यावरच्या भल्यामोठ्या बोर्डवर एका दुचाकीची जाहिरात वाचून आलेय, 'इंडियाची नवी उम्मीद'
  • Log in or register to post comments

मराठीची मोडतोड हा एक मुद्दा

खेडूत
Mon, 04/04/2016 - 09:47 नवीन
मराठीची मोडतोड हा एक मुद्दा आहेच. सर्वदूर मूर्खपणा सुरुच असतो. रेडिओ, व्रुत्तपत्रे वाहिन्या, सर्वत्र मराठी सक्तीने सुधारायची चळवळ उभी रहायला हवी. लेखाचा मूळ मुद्दाही महत्वाचा आहे. आमच्याच उद्योग समूहाचे हे दुकान दिसते.त्यामुळे यावर नाराजी पोहोचवत आहे, बघूया कसा प्रतिसाद मिळतो ते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

उपरोक्त जाहीरात छायाचित्रात

माहितगार
Mon, 04/04/2016 - 11:07 नवीन
उपरोक्त जाहीरात छायाचित्रात दाखवल्या प्रमाणे https://www.starbazaarindia.com ही स्टार बझारची वेबसाईट असावी. A TATA & TESCO ENTERPRISE असे वेबसाईट्च्या तळाशी लिहिले आहे, टाटाग्रूपचा हा कोड ऑफ कंडक्ट बहुधा यांना लागू पडावयास हवा. कंपनीचे नाव Trent Hypermarket Limited असावे, कस्टमर फिडबॅक दुवा (बहुधा उघडत नाही). कॉंटॅक्ट अस दुवा (अर्थात तेथील पत्ता इमेल पत्ता वरीष्ठांपर्यंत संदेश पोहचवण्यास पुरेसा असेल असे वाटत नाही). Jamshed S. Daboo हे मॅनेजींग डायरेक्टर अथवा सिईओ असावेत आणि या इन्व्हेस्टर रिलेशन पानावर कॉर्पोरेट ऑफीसचे फोनक्रमांक उपलब्ध असू शकण्याची शक्यता वाटते. अशा तक्रारीच्या बाबतीत टाटा सारख्या मोठ्या ग्रुप मध्ये स्टोअर मॅनेजरच्या लेव्हलवरून पानही हलण्याची शक्यता कमीत कमी असेल. मोठ्या कार्पोरेट्स मध्ये तुमची तक्रार लेखी मॅनेजींग डायरेक्टरच्या नावाने असेल आणि सिईओच्या सेक्रेटरीशी तुम्ही बोलत नाही तो पर्यंत हलचालीची खूपही अपेक्षा ठेवू नये. तुम्ही जो पर्यंत अशा लेव्हल पर्यत पोहोचत नाही तो पर्यंत अशी एखादी जाहीरात पुन्हा येणार नाही हे सांगणे कठीण असावे. असो. जाहीरातींवरील आक्षेप नोंदवण्याची एक स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांची अधून मधून जाहीरात दिसते. त्यांच्याकडे सुद्धा तक्रार नोंदवली पाहीजे.
  • Log in or register to post comments

अवांतर पुरवणी

स्मिता.
Mon, 04/04/2016 - 11:35 नवीन
बरेच वेळा जाहिराती ह्या गंडलेल्या असतात. त्यातला संदेश आपल्याला स्वतःच समजून घ्यावा लागतो. ज्या जाहिरातीमधे प्रतिभेसोबत समंजसपणा आणि संवेदनशीलता असते ती जाहिरात जास्त प्रभावी असते. अन्यथा अनेक उथळ जाहिराती आपण नेहमीच बघतो. आजच एक गंडलेली जाहिरात पाहिली, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत जनजागरण करण्याच्या उत्तम विचाराचे समर्थन करणारी दैनिक भास्करची जाहिरात. त्यात दाखवलेय की एका सरकारी शाळेतून एक माणूस त्याच्या लहानश्या मुलीला ओढून घरी घेवून जात असतो तेव्हा त्या मुलीच्या वर्गातील इतर लहान मुले तिला धरून पुन्हा शाळेकडे खेचतात. त्या चिमुरडीची एकीकडून वडील आणि दुसरीकडून वर्गमित्र-मैत्रिणी अशी बराच वेळ ओढाताण झाल्यावर वडिलांना साक्षात्कार होतो आणि ते मुलीचा हात सोडतात. सगळी मुले खाली पडतात पण विजयी मुद्रेने उठत कपडे झटकतात. संदेश काहिसा असा, 'बुरी जिद के आगे अच्छी जिद जरूरी है' या जाहिरातीत संदेश कितीही चांगला असला तरी (माझ्या) लक्षात राहिली ती त्या चिमुरडीच्या हाताला धरून केलेली ओढाताण! अश्याप्रकारे खरंच ओढलं तर एवढ्या कोवळ्या जीवाचा हात खांद्यातून नक्कीच सरकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

माझे मत

माहितगार
Mon, 04/04/2016 - 11:45 नवीन
सुयोग्यतेचे निकष आणि अप्रत्यक्ष प्रबोधन म्हणून आपण करतो अशा चर्चांचे मुल्य आहे, त्याच वेळी प्रत्यक्ष जाहीरात एजन्सी आणि त्यांचे स्पॉन्सर्स पर्यंत तुमचे म्हणणे पोहोचत नाही तो पर्यंत परिवर्तनासाठी लागणारी शृंखला पूर्ण होण्याची शक्यता कमी असेल असे माझे मत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

बरोबर आहे

स्मिता.
Mon, 04/04/2016 - 11:50 नवीन
तुमचं मत अगदी बरोबर आहे. योग्य ठिकाणी तक्रार केल्याशिवाय परिणाम दिसण्याची शक्यता नाहीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अमितेश कुमार

समाधान राऊत
Mon, 04/04/2016 - 19:40 नवीन
याला उत्तर आहे अमितेश कुमार--अम्रुता जोशी यांच्या लेखावरुन असे समजते की हि घटणा औरंगाबाद मधील प्रोज़ोन mall ची आहे.. औरंगाबाद चे cp ((police commissioner))पोलिस आयुक्त अमितेश कुमार. हे अशा विषायांच्या पुर्णपणे विरोधात आहेत..खास करुन स्त्रिंयावरील अत्याचार आणि हेटाळणी((मग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असेना)) त्याना फक्त ही बाब कळायला उशिर.. पण तक्रार योग्य हवी या विषयावर त्याना लेखि पत्र किंवा तोंडी सांगितले तरी भरपुर झाले..पुढील कर्यवाही ते स्वता: करतात हे सर्व औरंगाबाद कराना माहितीच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

लेख पटला.

मृत्युन्जय
Mon, 04/04/2016 - 12:10 नवीन
लेख पटला.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा