✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रासंगिक

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Fri, 11/23/2007 - 20:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6920 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sat, 11/24/2007 - 09:25 नवीन

मस्त!

त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. क्या बात है बिरुटेशेठ, मस्त कथा.. तुळस ही अत्यंत औषधी असून आम्हालाही खूप प्रिय आहे. तुळशीची रोज दोनचार पानं खाल्ल्यास, ते आरोग्यास अत्यंत लाभदायी आहे... बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/24/2007 - 10:14 नवीन

लिहिणार पण,

बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या, मिसळपाव संकेतस्थळ अग्रेसर बनावे यासाठी लिहिता येईल तितके इथे लिहिणारच आहे. पण या कथांच्या बाबतीतले विचार विज्ञान युगात न पटणारे असतात. जसे, एक वीतभर तुळशीचे रोप दारात लावून त्याला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आरोग्य वाढण्याचा संभव नाही. तसेच, हवा शुद्ध होऊन कौटुंबिक आरोग्य राहील हे संभवनीय नाही. तसेच कथेतील विष्णूने असे का करावे वगैरे.......वगैरे ! तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. अवांतर :- तुळशीच्या पानावरुन आठवले, शाळेत परिक्षेचा पेपर अवघड जाऊ नये, म्हणून कंपॉस बॉक्स मधे स्मरणासाठी तुळशीचे पाने नेलेली आठवतात, अन खाल्लेलीही आठवतात ! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 11/24/2007 - 10:27 नवीन

सुंदर विचार

>>तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. मुळ कथेपेक्षा उत्कृष्ट विचार सर!!! हा विचार स्पष्ट मांडलात ते बरे केलेत. विचीत्र कथा वाचून मुळ मुद्दा-विचार बाजूला पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 11/24/2007 - 11:56 नवीन

तिसरे लग्न- तुलशी महात्म्य

आमच्या दोन पिढ्या 'भाउबंदकी 'व 'कोर्ट 'यात गेल्या. आमचे एक चुलत आजोबा कोर्टाच्या कागदपत्रे , नियम याकडे वेगळ्याच नजरेने बघत. त्यांना सरळ वाट म्हणे दिसतच नसे. कागदपत्राकडे भिंगातून बघताना त्यांना म्हणे 'ध' चा 'मा' दिसे. त्यांची म्हणे दोन लग्ने झाली होती.त्यात बायका मेल्या म्हणे. त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/24/2007 - 12:15 नवीन

सही !!!

त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. लग्न टिकावे म्हणून तुळशीशी लग्न केले- ही माहिती खरीच असावी. आम्हीही अनेक मुले किंवा विवाहित माणसे तुळशीशी लग्न करतांना पाहिले आहे. मात्र ते असे का करतात ? त्याचा अर्थ अजूनही कळलेला नाही ! पण, आपण म्हणतात तसे लग्न टिकून राहणे हा उद्देश असेल तर मात्र जरा आश्चर्यच आहे ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ब
बेसनलाडू Sat, 11/24/2007 - 12:47 नवीन

माहिती

तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट मला माहीत नव्हती. येथे सांगितल्याबद्दल सरांचे अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Fri, 06/15/2012 - 14:39 नवीन

हल्ली डबल बॅरल थंड पडलेली

हल्ली डबल बॅरल थंड पडलेली दिसत आहे.. असो बदलीन.
  • Log in or register to post comments
त
तर्री Fri, 06/15/2012 - 15:35 नवीन

तुळशीच्या लग्नाच्या काही आठवणी !

आमच्या मोठ्या कुतुंबात तुळशीचे लग्न मोठया थाटात होत असे. घरच्या बायका मस्त नटून थटून असायच्या. आई दिवाळीच्या फराळाबरोबर अजून काही गोड-धोड करीत असे. अंतर्पाठ धरण्याचे काम मी आणि मझा भाऊ करित असु. लग्न लागले की अंतर्पाठ टाकुन फटाके वाजवायला पळायची घाई होत असे. करवल्या मुली - पेढा , फुल , गुलाब-पाणी , अत्तर वाटप करित असत. मग फराळाचा कार्यक्रम. तुळशीच्या लग्नानतर , घरातील ऊपवर मुलींच्या वर संशोधन मोहिमेला सुरवात होत असे. मग त्या वयातील बहिणीं थट्टा करणे हा भावांचा मुख्य ऊद्योग ! आपल्या बहिणी मग लाजताना पहाण्यात कही वेगळीच मज्जा असे. आता ते तसे लग्न ही लागत नाही आणि मुलींना तसे लाजताना पहाण्याचे प्रसंग ही विरळाच!
  • Log in or register to post comments
र
रुमानी Fri, 06/15/2012 - 17:55 नवीन

माहितिपुर्ण लेखन ! आभारी

माहितिपुर्ण लेखन ! आभारी आहोत. प्रासंगिक मालिक सदर येउदेत..........! तसे आता सणावाराचेच दिवस आहेत. श्रावण आलाच कि?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/15/2012 - 18:00 नवीन

नाना, बस करा राव हे उद्योग :(

च्यायला, हे जुने धागे कोण वर आणतंय रे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 06/15/2012 - 18:52 नवीन

का? का?

आम्ही काय वाचु नये काय काही तरी जुन जुन नव्यान? बाकि तुळशीच्या लग्नाला मी रांगोळी घालायचे . तेंव्हा छान वाटायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा