Skip to main content

थोरले माधवराव यांचे अस्सल चित्र

लेखक मनो यांनी शनिवार, 23/01/2016 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझे संशोधन प्रसिद्ध झाले त्याबद्दल हा एक छोटा लेख. कुणाला अजून काही माहिती असेल अथवा काही प्रश्न असतील तर जरूर विचारावेत यासाठी (आणि चित्राला व मला थोडी अजून प्रसिद्धी मिळावी या स्वार्थी हेतूने) इथे मिसळपाववर लेख टाकत आहे. या शोधात मिसळपाव सदस्य बॅटमॅन यांचीही थोडीफार मदत झाली त्याबद्दल त्यांचे आभार! "या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानपतचा आघात काहीच नव्हे" -- ग्रॅंट डफ थोरला माधवराव पेशवा. बुद्धिमान, मानी आणि तेजस्वी. लहान वयातच मोठमोठी कृत्ये करून तरुणपणीच निजधामी गेलेला असा हा कर्तृत्ववान पेशवा. रणजित देसाई यांच्या स्वामी कादंबरीचा नायक. अवघ्या ११ वर्षांच्या काळात पानिपतचे अपयश त्याने धुवून काढले, भोळ्या आणि सतत त्रास देणाऱ्या रघुनाथरावासारख्या चुलत्यास त्याने निष्प्रभ केले. कडक शिस्त, निःसंदिग्धता, रेखीव कारभार ही त्याची वैशिष्ट्ये. त्याची खाजगी राहणी ही साधी होती, चैन अथवा आराम त्याने कधी केला नाही. उत्तर पेशवाईत प्रसिद्ध अशी अनेक माणसे (पटवर्धन, पेठे, हरिपंत फडके, नाना व मोरोबा फडणीस, विसाजी कृष्ण बिनीवाले) त्याच्या काळात तयार झाली. अश्या या कर्तृत्ववान पेशव्याचे एकही अस्सल चित्र आजपर्यंत उजेडात आले नव्हते, त्यामुळे तो कसा दिसत असे याची कल्पना करणे भाग होते. चित्र
From Madhavrao
मागची बाजू जिथे नाव लिहिले आहे
From Madhavrao
आजच्या पेपरमधील मूळ बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/madhavrao-peshv…
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12327
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

अभिनंदन! असे भारतात आणि बाहेरही किती काय काय असेल देव जाणे! तुमचे इतिहासावर काही उत्तम प्रतिसाद पाहिले आहेत. वेळ काढून जरूर लिहीत जा!

हो, अज ही बातमे वर्तमानपरामधून वाचली. तुम्ही मनोद दाणी का?

In reply to by नाखु

आमच्या ब्याट्याचे कौतुक आहेच. वृत्त सकाळीच वाचले होते.

In reply to by यशोधरा

सकाळीच ही बातमी वाचली होती. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. खरंच या चित्राच्या शोधामागची माहिती वाचायला नक्कीच आवडेल.

शिवाजीमहाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांच्यानंतर ' जर जास्त जगले असते तर...' अशी हळहळ थोरल्या माधवराव पेशव्यांबद्दलही वाटते.

चित्राबद्दल धन्यवाद. खूप खूप वर्षांपूर्वी पर्वती येथे पेशव्यांचे असेच हातात फूल असलेले चित्र पाहिल्याचे स्मरते, ते कोणत्या पेशव्यांचे ते आठवत नाहीये. त्याबद्दल काही माहिती मिळू शकेल का? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय सांगणे अवघड आहे. माझ्या आठवणीप्रमाणे १५ वर्षांपूर्वी नानासाहेब पेशव्यांच्या समाधीस्थळी सर्वच पेशव्यांची ओळीत चित्रे होती. त्यातली काही वास्तवावर आधारित असली तरी काही मात्र चित्रकाराने आपल्या कल्पनेने बनवलेली होती.

In reply to by मनो

माहितीबद्दल धन्यवाद. खूप वर्षांपूर्वी पर्वतीवर पाहिले होते , त्यामुळे मलाही नीट आठवत नाहीये.. हा लेख वाचताना त्या आठवणी ताज्या झाल्या.. स्वाती

चित्रासाठी धन्यवाद. बातमीतल्या वेल्सच्या बाकीच्या चित्रांची पण तुम्हाला वेळ होइल तशी माहिती लिहा.

वाह मस्तं. या फोटो आणि माहितीबद्द्ल तुमचे मन:पूर्वक धन्यवाद.
शिवाजीमहाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांच्यानंतर ' जर जास्त जगले असते तर...' अशी हळहळ थोरल्या माधवराव पेशव्यांबद्दलही वाटते.
+१

सुरेख लेख.... मला राम माधव पण आवडला उत्तम सादरीकरण.... :D पुन्हा एकदा स्वामी सारखी मालिका आपल्या मराठी वाहिनी प्रेक्षकांसमोर आणावयास हवी..

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद. अजूनही बरयाच अप्रकाशित गोष्टी उजेडात आणायच्या आहेत. त्या येलमध्ये नसून जगभर विखुरल्या आहेत. शिवाजीराजांचे तरुणपणीचे एक चित्र आहे, रघुनाथरावाचे अटकेपार भरारी मारल्यानंतरचे चित्र आहे. जसा वेळ होईल तसे पुढचे काम चालू ठेवेन. यावेळी एक गोष्ट नमूद करण्याजोगी वाटते. राजवाडे, ग. ह. खरे, पोतदार, पगडी, गजानन मेहेंदळे आणि इतर अनेक संशोधकांनी रोज काही न काही संशोधन करून ज्या परिस्थितीतून मूळ कागदपत्रे जमा केली, वाचली, प्रकाशित केली आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवली, त्यांच्याशिवाय आज काहीच शक्य झाले नसते. खरे यांच्या कामाला तपस्या म्हणणेच योग्य होईल. मेहेंदळे यांच्या पहिल्या भागाच्या पुरवण्या केवळ १००० पानांच्या वरती आहेत. या संशोधकांच्या कामाचा थोडाफार परिचय आणि वापर मला करता आला ते माझे मोठे भाग्य. पत्रकार काही म्हणोत, आजकाल श्री मानसिंग कुमठेकर आणि त्यांच्यासारखे अनेक (आपले वल्ली अथवा प्रचेतस यांचे उदाहरणच पहा) आपल्या परीने थोडीफार इतिहासात भर घालतच असतात, त्यामुळे इतिहासाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे असाच मी म्हणेन.

उत्तम संशोधन. ते कसे केले याबद्दल वाचायला नक्की आवडेल. तुमचे व बॅटमन यांचे हार्दिक अभिनंदन !

अशी मूळ तात्कालीन चित्रे उजेडात येणे हे थोरच. परंतु माधवरावांची आणखी चित्रे उपलब्ध असल्यास त्यांचे तौलनिक निरिक्षण करण्यातून ते खरोखर कसे दिसत होते यावर प्रकाश पडायला मदत होईल. जालवर उपलब्ध असलेले एक चित्रः . Madhu Rao Narayan the Maratha Peshwa with Nana Fadnavis and attendants Poona 1792 by James Wales या दोन्ही चित्रात चेहरेपट्टीतील साम्य दिसून येत नाही, असे म्हणता येईल. यातील कोणते प्रत्यक्ष समोर बसून रंगवले गेले होते, याबद्दल माहिती उपलब्ध आहे का? (हे Madhu Rao Narayan म्हणजे तेच माधवराव ना?)

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त, वरील चित्रातली व्यक्ती सवाई माधवराव असावेत. ज्याअर्थी नाना फडणीस त्यांच्या शेजारी बसलेत त्यावरून हा तर्क बांधला आहे. माधवराव १७७२ साली स्वर्गवासी झाले. वरील चित्राचे साल १७९२ आहे. तसेच हे चित्र विकिवरही द्वितीय उपाख्य सवाई माधवरावांचे म्हणून दाखवले आहे. आ.न., -गा.पै.

मनोज साहेब, धन्यवाद ! बाकी त्या काळातल्या चित्रांवरून लोकांच्या फारफारतर पोशाखाचा अंदाज येवू शकतो बाकी कसे दिसत असतील वगैरेचा अंदाज बांधणे शक्यच नाही.

अभिनंदन आणि धन्यवाद! हि बातमी पेपरमध्ये वाचल्याचं आठवतंय आणि तेव्हा अनोळखी व्यक्तीबद्दल वाटलेलं कौतुक ती व्यक्ती मिपाकर मनो आहेत हे कळल्यावर ते कौतुक दुणावल्याचंही जाणवतंय :):).