Skip to main content

'शिग्रेट'!

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 15/12/2015 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
'शिग्रेट'! शिग्रेट लागती काकाला. मला दोन रुपय दिलं आन मनालं "जांब्या, जारं बिस्टाल घीऊनं यं" बिस्टाल दिड रुपायाची आन आठाण्याचं चाकलेट मला. सुरकीच्या दुकानातनं म्या बिस्टाल घीतली आन एक काफी चाकलेट. लय गॉड आसतं. मज्जा. चिमणीच्या दातानं तायडीला ऊल्स. बाकी समदं मला. पण हातात बिस्टाल. लय पांढरी, मागं मऊ मऊ गादी. घातली तोंडात. आहा! मज्जा! दोन झुरकं बी घेतलं. खोटंखोटं. चुटकी वाजवून राख पण झाडली. आहा! मज्जा! मग काका दिसला. शिग्रेट दिली. त्यानं तोंडात घालून काडी वढली. "तोंडात घालून आणली कारं?" "न्हाय बी" मग हातात घीऊन त्यानं बघीतली "हि काय, समदा फिल्टर वला वला झालाय, लका त्वा तोंडातच घातली हुती, पळ भाड्या" मग आमी पण सुटलो. शिग्रेट तोंडात घातल्यावर म्हागच्या गादिला जीभ लावायची नसती, हे तवाच समजलं, जरा लवकरच न्हाय का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5513
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

आंजी ची आठवण आलि... :))

In reply to by होबासराव

+१

मस्त जव्हेरभाऊ. एखादे कॅरॅक्टर करुन टाका तयार मस्तपैकी आंजीसारखेच. ड्यांबिस अन चाब्रे.

भारी... पोतडी खोला जरा..

:)

एवढ्या कथा सुचतात कशा? डोळ्यांच्या ठिकाणी magnifying glass आहे तुमच्या!

_/\_

:-)

आवडली.

मस्त आहे!

म्हंजी आनुभव हाय....