"ये आये, पाच्चा ठोकळा दिना मला"
"लई किरकिर नगस करू. तुला कह्याला रे पाच्चा ठोकळा? चल गुमान्, तेवढ्यात कोथमिरिचि जुडी येईन" म्हणत मायनं, रागातच् त्याला पुढं खेचलं.
तेव व्हरगाडत चालु लागला.
पर त्याची नजर तिकडच हुती, म्हवरं परात मांडून बसलेल्या त्या खप्पड़ म्हताऱ्या कडं.
पुढच्या माळणीजवळ माय वांगं निवडत बसली.
तेव म्हताऱ्याकडच बघत हुता, टाचा उचकुन अन मान तानुन.
माय वांगं पिशीत घिउन उठली अन कोथमिरीवाल्याकडं कोथमिर निवडु लागली.
तेव हळुच माई जवळ येऊन हुभा ठाकला.
मायणं कोथमीर पिशीत टाकली अन झंपरातल्या पाकिटातून पाच्चा ठोकळा काढला.
तसा त्यानं हिसका दिला अन् ठोकळा घिउन पळत सुटला.
माय खड़बडून उठली अन जोरात पावलं टाकत त्याच्या मागणं निघाली.
तेव पळत म्हताऱ्यापशी आला अन त्याच्या परातीत पाच्चा ठोकळा टाकुन तसाच उभा ऱ्हायला, पुढणं आलेल्या मायच्या डोळ्याकडं बघत.
परातीत झालेलं 'ठण्ण' ऐकून आंधळा म्हतारा खुलला पर 'तेव' स्वास रोखुन तिथच् थांबला.
रागत आलेल्या मायची डोळं डबडबलं.
तिनं आपल्या चिमुकल्याला उचललं अन त्याचं डोस्कं हातात धरुन मटकन मुका घेतला.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
हृदयस्पर्शी !
लिखाण आवडलं. 'पाच्चा ठोकळा' म्हणजे पाच पैशाचे नाणे असावे असे धरून चालतोय.
छोटीशी गोड कथा आवडली.
छोटीशी गोड कथा आवडली.
मस्त!!!
आवडले बुवा लिखाण...
मस्तच
पाच चा ठोकळा म्हणजे पाच रू चे नाणे
अच्छा ?
In reply to मस्तच by मनिमौ
माहितीबद्दल आभार.
छान!
आवडली!
मस्त कथा!
छान लिहिली आहे! आवडली!
Sandy
लहान पण छान
लहान पण छान कथा... आवडली.
छान कथा
छान कथा, लेख वाचण्यापूर्वी चिमुकल्याला उचललं अन त्याचं मुंडकं हातात धरुन मटकन मुका घेतला. हे शेवटचं वाक्य वाचलं अन कथा भीत भीतच वाचली,परंतू सुखद धक्का मिळाला.
छान लिहिलीये कथा.
छान लिहिलीये कथा.
छान .
छान .
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
चिमुकल्याला उचललं अन त्याचं मुंडकं हातात धरुन
मुंडकं जागी डोस्क चालेल बघा कारण मुंडकं हे शरीरापसून अलग झालेल्या भागास संबोधतात चू भू दे घे... जाणकार आपल्या विजेर्यांचे झोत टाकतीलच.
नित आनंद वाचक
हेच म्हणायचं होतं. मुंडकं नको
In reply to कथा आवडली. by नाखु
हेच म्हणायचं होतं. मुंडकं नको होता शब्द; डोसकं चालला असता.
हो
In reply to कथा आवडली. by नाखु
हो 'डोस्क' चपलख बसेल.
आता
In reply to हो by आनंद कांबीकर
सा सं काही मदत करु शक्तात का बघा
नायतर फक्त 'मालिक तेरा सहारा'
+१ आवडली.
In reply to कथा आवडली. by नाखु
+१
आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
छान लिहिलिय
छान लिहिलिय ही कथा
आनंददादा,
लई म्हंजे लईच्च भारी!
वा!
सुरेख कथा!
खुप छान !!!!
खुप छान !!!!
मस्तच अानंदराव!
तुम्ही आणि जव्हेरभौ यांची कथांची जुगलबंदी लय भारी चालू आहे! और आन्दो!
+1
In reply to मस्तच अानंदराव! by बोका-ए-आझम
+1
आवडली
आवडली
आवडली
.
आवडली !
आवडली !
धन्यवाद
धन्यवाद
लहानशी कथा पोहचली.
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
thankyou sir
In reply to लहानशी कथा पोहचली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
मस्त
छान