पाच्चा ठोकळा
लेखनविषय (Tags)
"ये आये, पाच्चा ठोकळा दिना मला"
"लई किरकिर नगस करू. तुला कह्याला रे पाच्चा ठोकळा? चल गुमान्, तेवढ्यात कोथमिरिचि जुडी येईन" म्हणत मायनं, रागातच् त्याला पुढं खेचलं.
तेव व्हरगाडत चालु लागला.
पर त्याची नजर तिकडच हुती, म्हवरं परात मांडून बसलेल्या त्या खप्पड़ म्हताऱ्या कडं.
पुढच्या माळणीजवळ माय वांगं निवडत बसली.
तेव म्हताऱ्याकडच बघत हुता, टाचा उचकुन अन मान तानुन.
माय वांगं पिशीत घिउन उठली अन कोथमिरीवाल्याकडं कोथमिर निवडु लागली.
तेव हळुच माई जवळ येऊन हुभा ठाकला.
मायणं कोथमीर पिशीत टाकली अन झंपरातल्या पाकिटातून पाच्चा ठोकळा काढला.
तसा त्यानं हिसका दिला अन् ठोकळा घिउन पळत सुटला.
माय खड़बडून उठली अन जोरात पावलं टाकत त्याच्या मागणं निघाली.
तेव पळत म्हताऱ्यापशी आला अन त्याच्या परातीत पाच्चा ठोकळा टाकुन तसाच उभा ऱ्हायला, पुढणं आलेल्या मायच्या डोळ्याकडं बघत.
परातीत झालेलं 'ठण्ण' ऐकून आंधळा म्हतारा खुलला पर 'तेव' स्वास रोखुन तिथच् थांबला.
रागत आलेल्या मायची डोळं डबडबलं.
तिनं आपल्या चिमुकल्याला उचललं अन त्याचं डोस्कं हातात धरुन मटकन मुका घेतला.
प्रतिक्रिया
हृदयस्पर्शी !
छोटीशी गोड कथा आवडली.
मस्त!!!
मस्तच
अच्छा ?
छान!
मस्त कथा!
लहान पण छान
छान कथा
छान लिहिलीये कथा.
छान .
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
हेच म्हणायचं होतं. मुंडकं नको
हो
आता
+१ आवडली.
कथा आवडली.
छान लिहिलिय
आनंददादा,
वा!
खुप छान !!!!
मस्तच अानंदराव!
+1
आवडली
आवडली
आवडली !
धन्यवाद
लहानशी कथा पोहचली.
thankyou sir
मस्त