मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतिय वंशाचा बाबुशा पोर्तुगालचा पंतप्रधान !

डॉ सुहास म्हात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भारतिय वंशाचे अंतोनिओ लुई सान्तोस दा कोस्टा हे २६ नोव्हेंबर २०१५ पासून पोर्तुगाल या देशाचे पंतप्रधान झाले आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये ते सोशियालिस्ट पार्टी या पोर्तुगालच्या मुख्य विरोधी पक्षाचे सेक्रेटरी जनरल बनले. ते लिस्बन या पोर्तुगालच्या राजधानीचे मेयर (२००७ ते २०१५) होते. या अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर (१९९७ ते १९९९), मिनिस्टर ऑफ जस्टिस (१९९९-२००२) व मिनिस्टर ऑफ स्टेट अँड इंटर्नल अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन (२००५ ते २००७) या पदांवर काम केलेले आहे.

लुई अल्फोन्सो मारिया दा कोस्टा हे त्यांचे आजोबा गोव्यात जन्मले होते. गोव्यात जन्मलेले त्यांचे वडील ओरलँडो दा कोस्टा लेखक व कवी होते. १९६१ मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या अंतिनिओंना त्यांचे वडील बाबुशा या टोपणनावांने हाक मारत असत. त्या नावाने ते सद्याही ओळखले जातात असे बातमीत म्हटले आहे. त्यांचे गोव्यात नातेवाईक आहेत आणि आजही मडगावमध्ये वडीलोपार्जित घर आहे. त्यांच्या काटकसरी जीवनपध्दतीमुळे त्यांना "लिस्बनचे गांधी (Gandhi of Lisbon)" असेही म्हटले जाते !

वाचन 9886 प्रतिक्रिया 0