✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ति, तेव अण म्या..

आ
आनंद कांबीकर यांनी
गुरुवार, 11/05/2015 - 00:23  ·  लेख
लेख
सगळी मागल्या वर्सातुन फुढं आलेली, म्या एकटाच् नवा. त्याहीच्यात मिसळा मनलं त् म्या खेड्यातला, सुतच् जमाना. वर्गात कई उल्हासच् राइला नवता, पर एकदा तिला हसताना पाइलं अन् सगळा अंगच् नाचू लागला. ति साऱ्या नसाहितातून व्हावू लागली. मागल्या बाकावर बसून, हाताचा कोपाकरुण बोटाच्या सांदीतून तिला टापू लागलो. ति गदगदून हसायची न् म्या खुश व्हायचो. मजाच मजा यायाची. एकदा ति खेटुण गेली अन् म्या अंगाला माराइचा फवाराच् ईकत आणला. दिसभर एकटाच तिच्या मागणं फिरायचु. कदीच्याला बी तिच्यावरच् नजर लावून बसायचो. ति रोज चोरून मह्याकडच् बघायची पर हळू हळू ध्यानात आलं, ति माह्या शेजारी बसणाऱ्या विश्याला चोरून पायची. तेव दिसला कि पोरी तिला कोपरं हानायच्या. पोटात आग आग व्हायला लागली. विश्या दिसला कि दगुड उचलायचा इच्चार मनात यायला लागला. पर इलाज नवता. तेव गाडी घीऊन येणारा वर्गात एकटाच. तेव किरकेट बी खेळायचा सारे पोरं पोरी त्याच्यावर जाम खुश. एकदा विश्यान् ग्राउंड मदी गाडी घातली अन गोल चकरा हानल्या. ति खुळ्यागत त्याच्याकडं पाह्त बसली. तव्हा डोकं खनकलं. सुन्याच्या दप्तरातून करकटक काढलं अन् लपत लपत विश्याच्या गाडीच्या दुंही टायरातून हवा काढली. वर्ग सूटल्यावर तेव गाडी ढकलत निगाला, ति पोरिहिच्या घोळक्यातून त्वांड पाडून पाहत हुती अन् म्या लपून मजा घेत हुतु. त्या दिशी लए आनंद झाला. म्या तिच्यावर जिव ओवळायचो अन ति त्या फुगीर विश्यावर. पर दोघायचं अजुन जमलं नवतं. दोघ्ं बी एकमेकाईला नुसतं चोरून पायचे. अजुन पक्क झालं नव्हतं. पर मनी त्याहीच्ं पक्क करायच्या इराद्यात हुती, दोघायच्या मदी सारखी लुडबुडायचि. 'ति' लाजायचि पर मनी विश्यासंगट बडबड करायची, 'ति' ला विश्याच्या नावानं हाकांमारुन मोठ्यांन् खिदळायाचि. मनीचं पारगांवच्या रम्यासंग चालु हुतं. म्या मनी वर ध्यान ठीवायला चालु केलं. एकबार शेवटचा पीरियड संपल्यावर सगळी पळाली. मनी एकटीच वर्गात थांबली. म्या चुपचाप बाजूच्या वर्गात जाउन बसलू. रम्या वर्गात घुसला, त्यानी आतून दार लावलं. मनी अन तेव दोघच् आंत. म्या हळूच भायरून कड़ी घातली. पळतच खाली आलू अन् "वरच्या मजल्यावरच्या २०१बी वर्गात पिसाळं कुत्रं शिरलय. म्या कड़ी घालून आलू. तुमि जा लवकर" असं शिपयाला सांगून टाकलं. शिपाई अजुन दोन शिपइं, मोठी काठी अन चार दोन धीट पोराइला घेऊन वर गेला. म्या पळून आलू. रातच्याला मेसवर दोन चपात्या जादा खाल्ल्या. सगलिकड़ं बोभाटा झाला. मनीचं कॉलिजात येणं बंद झालं, म्या जाम खुश. मनी हुती मनुन ति जास्तीची हिम्मत करायची, अता उलशिक निवाळ्ली. मंग माही हिम्मत व्हाढली. एकदा तिला लेडीज हतरुमाल दिला, तिना वापस दिला. मनलं पिरेम हळू हळू हुईल्. चार दिसान् मेकपचा डबा दिला, तिना वाकडं थुबाड करुण तेव बी मागं दिला. एकदा विश्या नवा कोरा पेन पाकीटात घालून घिउन आला अन तिला गिफ्ट द्यायच्या हिंदनानं भायर थांबला. म्या दप्तरात काचाचा ताजम्हल आणलेला. वर्गात घुसून तिच्या म्हवरं ठीवला. ति चवताळली. महल घिउन मह्या मागन् आली. विश्या सुन्याबर लांब हुबा, म्या सुन्याला आवाज दिला तस्स दोघायनि माहयाकड़ं पायलं. तिना ताजम्हाल् माह्या हातात ठीवला. "पुन्हा कई देशिल त् मुस्काटच् फोडिल" मनली. ति वर्गात घुसली. सुन्या अन विश्याला कई ऐकायला गेलं नवतं. म्या जवळ जाउन त्याहिला महल दाखिला अन जोरात "यार ति पोरगी म्हागच लागलिया. सारखं कई न कई आणून देती" मनलं. सुन्याच्या खांद्यावर हात टाकून बोलत हुतो तवा म्या तिरप्या नजरानं पाइलं. विश्यान् हातातल्या पेणाचे टुकड़े केले अन तेव गाड़ीकडं निघुन गेला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
विनोद

प्रतिक्रिया द्या
6774 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

सुंदर लिहता हो तुम्ही....

संदीप डांगे
गुरुवार, 11/05/2015 - 00:35 नवीन
सुंदर लिहता हो तुम्ही.... अजून येऊद्या. जव्हेरगंज आणि तुम्ही गावाकडची झुळूक आणली राव मिपावर... (आधीच्या वादळांबद्दल आपल्याले काय मैत नै बाप्पा - एक नवाट मिपाकर)
  • Log in or register to post comments

सुंदर ष्टाइल,आणि मस्त कंटेन्ट

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 11/05/2015 - 00:53 नवीन
सुंदर ष्टाइल,आणि मस्त कंटेन्ट
  • Log in or register to post comments

अर्रर एवढा दु दु पणा :(

रातराणी
गुरुवार, 11/05/2015 - 01:13 नवीन
अर्रर एवढा दु दु पणा :(
  • Log in or register to post comments

लै डेंजर बेनं हाय. सोताच्या

सायकलस्वार
गुरुवार, 11/05/2015 - 01:23 नवीन
लै डेंजर बेनं हाय. सोताच्या स्वार्थापायी चार जनांचं लुस्कान... कथा भारी!
  • Log in or register to post comments

नवीन शब्द कळला, "नसाहिता";)

दमामि
गुरुवार, 11/05/2015 - 09:36 नवीन
नवीन शब्द कळला, "नसाहिता";)
  • Log in or register to post comments

लय भारी...

रिम झिम
गुरुवार, 11/05/2015 - 10:34 नवीन
डोकेबाज बेणं दिसतय.. आवडली कथा.
  • Log in or register to post comments

नाही आवडली....चुकीच्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/05/2015 - 10:59 नवीन
नाही आवडली....चुकीच्या वागणाचे उदात्तीकरण आहे असे वाटले...
  • Log in or register to post comments

उदात्तीकरण ??

कपिलमुनी
गुरुवार, 11/05/2015 - 12:01 नवीन
उदात्तीकरण कुठे दिसला ओ ह्यात ? साधी सरळ कथा आहे .कॅरेक्टरमध्ये थोडा गावाकडंचा कावेबाजपणा आहे एवढाच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१ कथेला

नाखु
गुरुवार, 11/05/2015 - 12:15 नवीन
एक कहानी ऐसी भी म्हणूनच वाचणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

१. पोरीला पटवण्यासाठी स्वतः

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/05/2015 - 18:14 नवीन
१. पोरीला पटवण्यासाठी स्वतः काही न करता दुस्र्याला त्रास देणे २. पोरीने स्पष्टपणे नकारघंटा वाजवल्यावर परत परत लाळघोटेपणाने तिच्याकडे जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

प्रेमात

कपिलमुनी
गुरुवार, 11/05/2015 - 18:59 नवीन
टका , प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते एकदा आश्रमात शिक्षणासाठी ये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्रेमात आणि युद्धात सारे

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/05/2015 - 19:32 नवीन
प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य असते
रिंकू पाटील टैप केसेस सुध्धा याच वाक्याच्या य्झ पणामुळे होतात रे
एकदा आश्रमात शिक्षणासाठी ये ;)
प्रॅक्टिकल्स अस्तील तरच विचार केला जैल ... त्यात सुध्ध सुध्धा सामानाची सोय आश्रमाने केल्यास नक्की येईन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

@टक्या , हातरुमाल ,मेकअप चा

पियुशा
गुरुवार, 11/05/2015 - 19:25 नवीन
@टक्या , हातरुमाल ,मेकअप चा डब्बा , वर्तुन ताजमहाल देऊन प्रयत्न केलाय् न इंप्रेश करण्याचा अस काय म्हणतो रे काही केल नाही नीट वाच न,काही पोर तर धागा पण काढ़तात " सुन्दर मुलीला कसे पटवावे " म्हणून याद करो कुच्छ :प =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हातरुमाल ,मेकअप चा डब्बा ,

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/05/2015 - 19:35 नवीन
हातरुमाल ,मेकअप चा डब्बा , वर्तुन ताजमहाल
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

ओ तै, पोरं काय पोरं, ऑ?

सूड
गुरुवार, 11/05/2015 - 20:55 नवीन
ओ तै, पोरं काय पोरं, ऑ? पोपशास्त्री म्हणा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

+१

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 11/05/2015 - 18:44 नवीन
विश्याबद्दल सहानुभुती निर्माण झाली आणी मि बद्दल तिरस्कार. कदाचित लेखकाचा हाही हेतु असु शकतो. म्हणजे उद्या कोणी दुर्योधनाच्या नजरेतुन महाभारत लिहिले तर त्याला तकलादु म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लेखनविषय:: कथाविनोद

पीके
गुरुवार, 11/05/2015 - 12:42 नवीन
हे वाचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यावयात..

आनंद कांबीकर
गुरुवार, 11/05/2015 - 17:27 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ह्यो कथेचा नायक म्हनायचा कि

पियुशा
गुरुवार, 11/05/2015 - 11:16 नवीन
ह्यो कथेचा नायक म्हनायचा कि व्हिलन ? लिहिलय चान चान :)
  • Log in or register to post comments

तू हो म्हन न्हायतर नाय म्हन

प्यारे१
गुरुवार, 11/05/2015 - 11:26 नवीन
तू हो म्हन न्हायतर नाय म्हन तू हाय माजी क क क क क किरन.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

अजया
गुरुवार, 11/05/2015 - 11:39 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments

छान लिहीलय. 'शाळा' आठवला.

जातवेद
गुरुवार, 11/05/2015 - 12:06 नवीन
छान लिहीलय. 'शाळा' आठवला.
  • Log in or register to post comments

आवडली..

संजय पाटिल
गुरुवार, 11/05/2015 - 12:40 नवीन
कथा आवडली..
  • Log in or register to post comments

हाण्ण.

बॅटमॅन
गुरुवार, 11/05/2015 - 12:47 नवीन
हाण्ण.
  • Log in or register to post comments

कथा आवडली..

सोनल परब
गुरुवार, 11/05/2015 - 14:19 नवीन
कथा आवडली..
  • Log in or register to post comments

एकदम कडक.

चित्रगुप्त
गुरुवार, 11/05/2015 - 17:29 नवीन
एकदम कडक.
  • Log in or register to post comments

भारी लिहिता भाऊ.

नाव आडनाव
गुरुवार, 11/05/2015 - 17:48 नवीन
भारी लिहिता भाऊ.
  • Log in or register to post comments

खल्लास कथा ! प्रचंड आवडली .

उगा काहितरीच
गुरुवार, 11/05/2015 - 19:35 नवीन
खल्लास कथा ! प्रचंड आवडली .
  • Log in or register to post comments

आवडली गोष्ट

टुकुल
गुरुवार, 11/05/2015 - 20:36 नवीन
आवडली गोष्ट
  • Log in or register to post comments

लय भारी

दत्ताभाऊ गोंदीकर
गुरुवार, 11/05/2015 - 20:59 नवीन
जाम आवडली!
  • Log in or register to post comments

तुमची शैली चांगली आहे.

बिन्नी
गुरुवार, 11/05/2015 - 22:24 नवीन
तुमची शैली चांगली आहे. प्रत्यक्षात अशी भाषा ऐकायला खरंच गोड वाटते.
  • Log in or register to post comments

पिच्चरात रजनीअण्णा करतात त्या

चित्रगुप्त
Fri, 11/06/2015 - 13:55 नवीन
पिच्चरात रजनीअण्णा करतात त्या करामती आपण जशा बघतो, तसे वाचायचे. उगाच चिरफाड न करता. आणि जीवनही तसेच जगावे. पिच्चर बघत असल्यासारखे. उगा त्रास करून न घेता. लई मजा येते मग, स्वत:ची गोची झाली, तरिही.
  • Log in or register to post comments

आवडली

जगप्रवासी
Fri, 11/06/2015 - 15:07 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

मस्तच!

बोका-ए-आझम
Sat, 11/07/2015 - 08:27 नवीन
असल्यांना आमच्या शाळेत मस्त शब्द होता - जळकुटे! बाकी कथा भारी. अजून येऊ द्या!
  • Log in or register to post comments

झक्कास!!

फिलोकॅलिस्ट
Sun, 11/08/2015 - 18:16 नवीन
लय भारी..
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय

सोनुली
Wed, 07/13/2016 - 18:09 नवीन
छान लिहिलंय
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली.

विवेकपटाईत
Wed, 07/13/2016 - 20:05 नवीन
गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली.

विवेकपटाईत
Wed, 07/13/2016 - 20:05 नवीन
गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

मला नाय तर कुनाला नाय :)

विखि
Wed, 07/13/2016 - 20:30 नवीन
मला नाय तर कुनाला नाय :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा