अधुरी एक कहाणी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आयुष्यात अश्या बर्याच प्रेमकहाण्या सुरु होण्या आधीच संपून जातात .
अशीच एक गम्मत माझ्या आयुष्यातली
मी एका कंपनी मध्ये नवीन कामाला लागलो होतो . मला लहान पणा पासून साउथ च्या मुली खूप आवडायच्या. काळ्या सावल्या, छान चंदनाचा आडवा टिक्का, अबोलीचे भरपूर गजरे , बारीक पण रेखीव काजळ आणी मुख्य म्हणजे मोकळे सोडलेले केस ( वेणी असली तरी छानच दिसतात)
असो
तर एक तामिळ मुलगी मला आवडू लागली, मी मुद्दाम तिच्या भोवती घुटमळू लागलो, ती दुसर्या विभागात काम करायची . तरी पण मी काही तरी काम काढून तिच्या dEPARTMENT मध्ये जात असे. आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही पण , नजरानजर रोज व्हायची. ,मला नेहमी वाटायच तिला पण मी आवडत असेन…
एके दिवशी पोंगल होता, ती आज खूप सुंदर दिसत होती. मस्त पांढरी साडी सोनेरी किनाराची ( टिपिकल साउथ इंडियन ), छान चंदनाचा आडवा टिक्का, अबोलीचे भरपूर गजरे वगैरे वगैरे…
आमची नाईट शिफ्ट असे ( कॉल सेंटर), ती हळूच ११ वाजता सीट वरून उठली, आणी पार्किंग मध्ये येऊन एका टू व्हीलर वर बसली. मी पण तिच्या मागे मागे पार्किंग मध्ये गेलो. ती थोडा वेळ अशीच बसून काही तरी गाणं गुणगुणत होती. मला वाटला हीच ती वेळ हाच तो क्षण…. बस आई हीच तुझी सून… आज तिला विचारूनच टाकतो …
मी पुढे सरसावलो , तेवढ्यात तिने पर्स उघडली . पर्स मधून सिगारेट च पाकीट काढलं , लायटर नि सिगारेट शिलगावली. आणि मस्त SUTTA लावता. तिला बघून माझ्या तर छातीत कळच आली … आई ग ! तुझी सून कॅन्सल…
वार झाला माझ्या हृदयावर … तिने मला बघितला एक स्माईल दीली … म्हणली यु अल्सो टेक वन … म्हणल बाई धन्य आहात तुम्ही …
खूप वाईट वाटल त्या रात्री, मग काय,
हमको मनकी शक्ती देना….
हमको मनकी शक्ती देना….
हमको मनकी शक्ती देना….
हमको मनकी शक्ती देना…. ओल्ड मोंग रम.
नंतर काही दिवसांनी आणि एक गम्मत झाली… मी असाच तिच्या बॉस बरोबर काही कामा निमित्त चर्चा करत होतो . ती समोर येउन उभी राहिली … परत माझ्या मनात ढवळाढवळ सुरु झाली
ती समोर उभी, तिचा बॉस म्हणाला "काय झालं काय काम आहे"… तो ओरडूनच म्हणाला ( मी मनात : का रे ओरडतो बिचारीला . . बिचारी माझी नाही झाली तरी काय झालं क्रश होतं ते माझं कधी काळच )
ती म्हणाली " सुटी हवी आहे , लग्न आहे माझं " ( मी पूर्ण पणे घायाळ रक्तबंबाळ …लगेच हमको मनकी शक्ती देना म्हणून प्रार्थना आरंभली )
तिचा बॉस : अगं किती वेळा लग्न करशील… किती वेळा तुला सुटी देऊ , गेल्या दोन वर्षात आता हि तिसर्यांदा लग्नाची सुटी मागते आहेस.
मी फक्त चक्कर येउन पडायचा बाकी होतो… तिसर्यांदा लग्न?
मग कळलं खरंच तिचं हे तिसरं लग्न होतं गेल्या दोन वर्षात .
मग काय … घेतली तिने सुटी… झाल तिचं लग्न आम्ही मात्र हमको मनकी शक्ती देना म्हणून प्रार्थना करत बसलो .
बरेच दिवस झालेत या घटनेला…. सध्या तिने परत सुटी साठी अप्लाय केलं आहे ! मला मेसेज पण टाकलाय ' शादी मे जरूर आना "
प्रतिक्रिया
=))
मला लहान पणा
मीउमेश
काळ आला होता पण वेळ आली नव्हती
"बद्दल अभिनंदन. ता.क. जर जमलेच असते तर आपला विडी-काडी (मोड नसलेला) खर्च त्या तिघांपेक्षा जास्त झाला असता म्हणून आजच देवाला नारळ वाढवून या आणि इकडे खोबरं वाटा.अरे काय चाललंय काय !!!
भारीच :)
जिसकी बीवी सुट्टी
मजाक मजाक में बहोत सारी
लवकरच येतोय अधुर्या काही निवडक कहाण्या घेऊन
कशाला कशाला.. उग्गीच. असु
चालायचंच.
Pagination