आयुष्यात अश्या बर्याच प्रेमकहाण्या सुरु होण्या आधीच संपून जातात .
अशीच एक गम्मत माझ्या आयुष्यातली
मी एका कंपनी मध्ये नवीन कामाला लागलो होतो . मला लहान पणा पासून साउथ च्या मुली खूप आवडायच्या. काळ्या सावल्या, छान चंदनाचा आडवा टिक्का, अबोलीचे भरपूर गजरे , बारीक पण रेखीव काजळ आणी मुख्य म्हणजे मोकळे सोडलेले केस ( वेणी असली तरी छानच दिसतात)
असो
तर एक तामिळ मुलगी मला आवडू लागली, मी मुद्दाम तिच्या भोवती घुटमळू लागलो, ती दुसर्या विभागात काम करायची . तरी पण मी काही तरी काम काढून तिच्या dEPARTMENT मध्ये जात असे. आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही पण , नजरानजर रोज व्हायची. ,मला नेहमी वाटायच तिला पण मी आवडत असेन…
एके दिवशी पोंगल होता, ती आज खूप सुंदर दिसत होती. मस्त पांढरी साडी सोनेरी किनाराची ( टिपिकल साउथ इंडियन ), छान चंदनाचा आडवा टिक्का, अबोलीचे भरपूर गजरे वगैरे वगैरे…
आमची नाईट शिफ्ट असे ( कॉल सेंटर), ती हळूच ११ वाजता सीट वरून उठली, आणी पार्किंग मध्ये येऊन एका टू व्हीलर वर बसली. मी पण तिच्या मागे मागे पार्किंग मध्ये गेलो. ती थोडा वेळ अशीच बसून काही तरी गाणं गुणगुणत होती. मला वाटला हीच ती वेळ हाच तो क्षण…. बस आई हीच तुझी सून… आज तिला विचारूनच टाकतो …
मी पुढे सरसावलो , तेवढ्यात तिने पर्स उघडली . पर्स मधून सिगारेट च पाकीट काढलं , लायटर नि सिगारेट शिलगावली. आणि मस्त SUTTA लावता. तिला बघून माझ्या तर छातीत कळच आली … आई ग ! तुझी सून कॅन्सल…
वार झाला माझ्या हृदयावर … तिने मला बघितला एक स्माईल दीली … म्हणली यु अल्सो टेक वन … म्हणल बाई धन्य आहात तुम्ही …
खूप वाईट वाटल त्या रात्री, मग काय,
हमको मनकी शक्ती देना….
हमको मनकी शक्ती देना….
हमको मनकी शक्ती देना….
हमको मनकी शक्ती देना…. ओल्ड मोंग रम.
नंतर काही दिवसांनी आणि एक गम्मत झाली… मी असाच तिच्या बॉस बरोबर काही कामा निमित्त चर्चा करत होतो . ती समोर येउन उभी राहिली … परत माझ्या मनात ढवळाढवळ सुरु झाली
ती समोर उभी, तिचा बॉस म्हणाला "काय झालं काय काम आहे"… तो ओरडूनच म्हणाला ( मी मनात : का रे ओरडतो बिचारीला . . बिचारी माझी नाही झाली तरी काय झालं क्रश होतं ते माझं कधी काळच )
ती म्हणाली " सुटी हवी आहे , लग्न आहे माझं " ( मी पूर्ण पणे घायाळ रक्तबंबाळ …लगेच हमको मनकी शक्ती देना म्हणून प्रार्थना आरंभली )
तिचा बॉस : अगं किती वेळा लग्न करशील… किती वेळा तुला सुटी देऊ , गेल्या दोन वर्षात आता हि तिसर्यांदा लग्नाची सुटी मागते आहेस.
मी फक्त चक्कर येउन पडायचा बाकी होतो… तिसर्यांदा लग्न?
मग कळलं खरंच तिचं हे तिसरं लग्न होतं गेल्या दोन वर्षात .
मग काय … घेतली तिने सुटी… झाल तिचं लग्न आम्ही मात्र हमको मनकी शक्ती देना म्हणून प्रार्थना करत बसलो .
बरेच दिवस झालेत या घटनेला…. सध्या तिने परत सुटी साठी अप्लाय केलं आहे ! मला मेसेज पण टाकलाय ' शादी मे जरूर आना "
मिसळपाव
प्रतिक्रिया
तेरे कारण तेरे कारण
तेरे कारण तेरे कारण
तेरे कारण मेरे साजन.
तीने किती सुट्ट्या घ्याव्यात हे तुम्ही कशाला ठरवताय.
सुटी घेउदे , पण त्याच कारणा साठी
In reply to तेरे कारण तेरे कारण by विजुभाऊ
सुटी घेउदे , पण त्याच कारणा साठी
अवघड आहे
बेक्कार हस्लो!
मला आधी वाटल सिगारेट ओढत असली म्हणून काय झाल…चलता है यार…पण हे वाचून…
मलाही चक्करच आली! ;-)
बरी ही अधुरी(च) कहाणी!!
Sandy
दोन वर्षात तिसरं लग्न... वाह.
दोन वर्षात तिसरं लग्न... वाह... क्या बात है...
च्यायला आम्ही ८ वर्ष झाली एकाच झाडाला लटकलोय....
झाडाने प्रतिसाद वाचला तर
In reply to दोन वर्षात तिसरं लग्न... वाह. by शित्रेउमेश
झाडाने प्रतिसाद वाचला तर फांद्या हालतील. जरा जपून. कधी धप्प होताल सांगता यायचं नै. ;)
=))
=))
मस्त स्टोरी! थोडक्यात वाचलात.
मस्त स्टोरी! थोडक्यात वाचलात.
:):)
:):)
अ-'धुरी' एक कहाणी!
अ-'धुरी' एक कहाणी!
थोड्या वर्षांत त्या इन्द्राणीला कॉम्पिटीशन का काय?
माझा फुल्ल सपोर्ट..."तीला"
माझा फुल्ल सपोर्ट..."तीला"
पोरींनी सिग्रेटी ओढायच्या
पोरींनी सिग्रेटी ओढायच्या नसतात का ?
सुटली ती ! हुश्शय !
चालतंय की. त्यात काय?
In reply to पोरींनी सिग्रेटी ओढायच्या by बिन्नी
चालतंय की. त्यात काय?
ते लेखक जरा मागच्या पिढीतलं पिडीत दिसतंय... तुमचा ब्रॅण्ड कन्चा? आमचा ब्रॅण्ड पिवळा हत्ती.
काय आगाऊ आहात हो !
In reply to चालतंय की. त्यात काय? by प्यारे१
काय आगाऊ आहात हो !
याबाबतीत मला काहीच सांगायचं नाही !!!
आन्ना, असं चिडायचं नाय आन्ना!
In reply to काय आगाऊ आहात हो ! by बिन्नी
आन्ना, असं चिडायचं नाय आन्ना!
आन्ना कोण आता !
In reply to आन्ना, असं चिडायचं नाय आन्ना! by प्यारे१
आन्ना कोण आता !
मी चिडले नाही. माझी प्रतिक्रीया स्पष्ट सांगीतली :)
बिन्नी आन्ना नाय काय?
In reply to आन्ना कोण आता ! by बिन्नी
बिन्नी आन्ना नाय काय?
स्वारी बर्का. आमाला म्हायती न्हवतं.
बंद झाली बे हनीड्यु आता.
In reply to चालतंय की. त्यात काय? by प्यारे१
बंद झाली बे हनीड्यु आता. आयटीसीचे राज्य आहे.
बिड्या हायेत बघ सगळ्या. संभाजी, गणेश, भिकुसा, लाल दोरा, पिवळा दोरा. दिऊ का बंडल.
शिलगीव की. इचारायलायस काय?
In reply to बंद झाली बे हनीड्यु आता. by अभ्या..
शिलगीव की. इचारायलायस काय?
हितं बाय कोन बाप्या कोन काय कळंना झालंय आदीच. जरा झुर्का मारतु.
भीती याची वाटली
In reply to चालतंय की. त्यात काय? by प्यारे१
भीती याची वाटली … मी सुद्धा सिगारेट ओढतो आणि ती पण … म्हणजे पोर हातात चिरूट घेऊन जन्माला येणार
म्हणजे पोर हातात चिरूट घेऊन जन्माला येणार
In reply to भीती याची वाटली by मीउमेश
काहिहि हं मीउमेश
हे बरं हाय. तुम्ही सीगरेट
In reply to भीती याची वाटली by मीउमेश
हे बरं हाय. तुम्ही सीगरेट ओढली तर चालते. पण तीने ओढता कामा नये. ये ना चालबे. अनाहीता मारतील तुमास्नी..
सिगरेट न पिणार्या कुठल्याही
In reply to पोरींनी सिग्रेटी ओढायच्या by बिन्नी
सिगरेट न पिणार्या कुठल्याही व्यक्तीला त्यांचा जोडीदार सिगरेट पित असेल तर ते नाहिच आवडत. बर्याच मुलींची तशी अटच असते. मग तीच अट एखाद्या निर्व्यसनी मुलाची असेल तर काय बिघडले?
असाच उलटा विचार करून ती सुटली
In reply to सिगरेट न पिणार्या कुठल्याही by मृत्युन्जय
असाच उलटा विचार करून ती सुटली अस म्हणायचंय मला
डोळ्यासमोर दोघे मिळून सिग्रेट
डोळ्यासमोर दोघे मिळून सिग्रेट आेेेढत असल्याचे चित्र तरळले. ;)
तरळलेपेक्षा धुरळले म्हणा!
In reply to डोळ्यासमोर दोघे मिळून सिग्रेट by हेमंत लाटकर
तरळलेपेक्षा धुरळले म्हणा! जास्त सूट होतंय!!!
दोघे मिळून सिग्रेट आेेेढत
In reply to डोळ्यासमोर दोघे मिळून सिग्रेट by हेमंत लाटकर
कसे? मिळून? एकच? एक्का वेळी?
काही सुचेना राव :(
.
ते पूर्वी लग्नात एकच थम्सपची बॉट्ल प्रकार चालायचा तसे का?
दोघे मिळून सिग्रेट आेेेढत
In reply to दोघे मिळून सिग्रेट आेेेढत by अभ्या..
दोघे मिळून सिग्रेट आेेेढत असल्याचे चित्र
दोन्ही बाजूंनी पेटवून ... :)
हाहाहा!!!
In reply to दोघे मिळून सिग्रेट आेेेढत by नाव आडनाव
हाहाहा!!!
प्रेम झाले असते. आईने भावी
प्रेम झाले असते. आईने भावी सूनेला सिगारेट पिताना बघितले असते तर!
सुटलात बुवा.
मस्त! आवडली. तिच आयुष्य
मस्त! आवडली. तिच आयुष्य तिच्या इच्छेप्रमाणे जगते आहे. तुमच तुम्ही बघा.
दोन वर्षांत
दोन वर्षांत तीन लग्ने आणि दोन डिवोर्स होऊ शकतात का? कायदेशीर नोटिस, कोर्टाच्या तारखा, समुपदेशन काळ वगैरेचा काही संबंध नाही का?
लिव्ह इन चा प्रकार सगळा
In reply to दोन वर्षांत by राही
लिव्ह इन चा प्रकार सगळा … मंदिरात जाऊन लग्न करायचं, नाही पटल कि वेगळा होऊन परत नवीन शोधायचं
नक्कीच , सुरु करतो
In reply to लिव्ह इन चा प्रकार सगळा by मीउमेश
नक्कीच , सुरु करतो
काय ?
In reply to नक्कीच , सुरु करतो by मीउमेश
काय सुरु करता ? धुम्रपान, लग्न की डिव्होर्स ?
कसे? मिळून? एकच? एक्का वेळी?
तिने पहिले एक झुरका मारून सिगरेट त्याच्या हातात द्यायची.
कोणाला कशाचं न ..... जॊद्या!
कोणाला कशाचं न .....
जॊद्या!
=))
=))
"आर एच टी डी एम" मध्ये माधवन
"आर एच टी डी एम" मध्ये माधवन नवर्या मुलाला स्टेजवर शुभेच्छा द्यायला जातो अन म्हणतो "हाय! मेनी मोअर हॅपी रीटर्नस ऑफ द डे!!!", त्याची आठवण झाली.
त्यांनाही कुणीतरी लग्नदिवशी अशाच शुभेच्छा दिल्या असतील कदाचित!!
मनातल्या वाटांवर आता आहे सुनेपण
पहिल्यांदाच मीपा वर काहीतरी लिहलंय , धन्यवाद सगळ्या मीपाकरन्ना माझ पाहिलं लेखन सहन केल्या बद्दल
अरे साह्यबा, तुम्ही सिग्रेटला
In reply to मनातल्या वाटांवर आता आहे सुनेपण by मीउमेश
अरे साह्यबा, तुम्ही सिग्रेटला नाय म्हणत नाय, मनकी शक्ती ओल्ड माँक मध्ये हुडकता म्हणल्यावर अजून काय पाहिजे.
लिव्हा बिन्धास्त. काढा धूर. नाही सहन झ्झाल्यास हावोच आम्ही पेटवायला. ;)
"आधुरी एक कहाणी", धुरात हरवली
"आधुरी एक कहाणी", धुरात हरवली "
ती तर गेली. नंतर पुढची
ती तर गेली. नंतर पुढची सुबकठेंगणी शोधलीत का नाही?
गुरुजी ,
In reply to ती तर गेली. नंतर पुढची by श्रीगुरुजी
गुरुजी ,
सुबक ठेंगणी तर नाही मिळाली, चांगली उंच धिप्पाड मिळाली.
साउथ ची आवड, आवडच राहिली, आता अजून आवड जपतोय
>चांगली उंच धिप्पाड मिळाली.
In reply to गुरुजी , by मीउमेश
>चांगली उंच धिप्पाड मिळाली.
अंगाखांद्यांवर खेळा मग मनसोक्त.हा.का.ना.का! (ह.घ्या.)
लव्हस्टोरी में शिग्रेट ?
लव्हस्टोरी में शिग्रेट ?
धाग्यापेक्षा प्रतिसादांचाच धुर जास्त होणार !
हर फिक्र को धूएमे उडाती चली
हर फिक्र को धूएमे उडाती चली गयी!
असं गाणं असतं तर ते अजिबात गाजल नसतं.
म्हणूनच दम मारो दम रचलं गेलं.
In reply to हर फिक्र को धूएमे उडाती चली by रातराणी
_/\_ टाळ्या!
In reply to म्हणूनच दम मारो दम रचलं गेलं. by द-बाहुबली
_/\_
टाळ्या!
कहाणी अधुरी राहिली हे चांगलेच
कहाणी अधुरी राहिली हे चांगलेच झाले.दुसरी कहाणी सुरु करा आता.
नवीन कहाणी सुरु झाली , एक कॅलेंडर पण छापलंय
In reply to कहाणी अधुरी राहिली हे चांगलेच by अभिजीत अवलिया
नवीन कहाणी सुरु झाली , एक कॅलेंडर पण छापलंय
=))
=))
मला लहान पणा
मग लहानपणी काही कहाण्या अधूरया राहिल्या असल्या तर त्या पण येऊ द्यात की!
आवडतील वाचायला! ;-)
मीउमेश
श्री रा रा रा रा मीउमेश यांस नवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि "
काळ आला होता पण वेळ आली नव्हती
"बद्दल अभिनंदन.
ता.क. जर जमलेच असते तर आपला विडी-काडी (मोड नसलेला) खर्च त्या तिघांपेक्षा जास्त झाला असता म्हणून आजच देवाला नारळ वाढवून या आणि इकडे खोबरं वाटा.
अरे काय चाललंय काय !!!
अरे काय चाललंय काय !!!
लेख तर आहेच पण प्रतिसाद देखील सुभानल्ला .... कहर आहेत सगळे .
"भीती याची वाटली
मीउमेश - Tue, 20/10/2015 - 18:47 नवीन
भीती याची वाटली … मी सुद्धा सिगारेट ओढतो आणि ती पण … म्हणजे पोर हातात चिरूट घेऊन जन्माला येणार"
>चांगली उंच धिप्पाड मिळाली.
कानडाऊ योगेशु - Wed, 21/10/2015 - 12:52 नवीन
>चांगली उंच धिप्पाड मिळाली.
अंगाखांद्यांवर खेळा मग मनसोक्त.हा.का.ना.का! (ह.घ्या.)
भारीच :)
भारीच :)
जिसकी बीवी सुट्टी
उसका भी बडा नाम है!
धुएं मे घुमा लो
कुंभमेले का क्या काम है!
मजाक मजाक में बहोत सारी
मजाक मजाक में बहोत सारी शादीयां हो गयी....
लय भारी.... अजून लिहा..
लवकरच येतोय अधुर्या काही निवडक कहाण्या घेऊन
लवकरच येतोय अधुर्या काही निवडक कहाण्या घेऊन
कशाला कशाला.. उग्गीच. असु
In reply to लवकरच येतोय अधुर्या काही निवडक कहाण्या घेऊन by मीउमेश
कशाला कशाला.. उग्गीच. असु द्या हो. राहू द्या. ;)
चालायचंच.
चालायचंच.