मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

रत्नागिरीकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जेष्ठ अभिनेत्री श्री.जयश्री गडकर यांचे आज पहाटे निधन झाले. या चतुरस्त्र अभिनेत्रीला माझी आदरांजली. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3420004.cms रत्नागिरीकर

वाचने 8863 वाचनखूण प्रतिक्रिया 25

मनस्वी 29/08/2008 - 10:55
मराठी कृष्ण-धवल चित्रपट स्मरताना त्यांचा चेहेरा अगदी सहजतेने समोर येतो. तसेच रामायण मधील कौसल्याही आठवते. त्यांचा सहज साधा सरळ अभिनय स्मरणात राहतो. ऐरणीच्या देवा आणि माळ्याच्या मळ्यामंदी गाणी चटकन डोळ्यासमोर येतात. या मराठी चित्रसृष्टीच्या सम्राज्ञीला माझी आदरांजली. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

नंदन 29/08/2008 - 10:57
सोज्वळ, खानदानी मराठमोळं सौंदर्य म्हणजे काय, असं विचारल्यावर ज्यांचं उदाहरण द्यावं, अशा मोजक्या अभिनेत्रींत जयश्रीबाई असाव्यात. ऐरणीच्या देवाची आठवण होणे अपरिहार्यच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मृगनयनी 29/08/2008 - 11:10
पहाटे ३ वाजता, प्रदीर्घ आजाराने ६८व्या वर्षी "जयश्री गडकर" यांचे निधन झाले..... सांगते ऐका, मोहित्यांची मंजुळा, लव-कुश, सुगंधी-कट्टा, खिचडी.... अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमधून त्यांनी आपला वेगळा ठसा चित्रपटसृष्टीत उमटवला.... ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना...... *****____/\____*****

सुनील 29/08/2008 - 12:05
जयश्री गडकरांचे नाव घेताच माझ्या डोळ्यासमोर त्यांचा "बुगडी माझी सांडली ग..." ह्या गाण्यातील चेहरा डोळ्यासमोर येतो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मराठी चित्रपट सृष्टीत जयश्री गडकर ह्या एक चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेकानेक चित्रपटांमधून सकस अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. तसे म्हंटले तर ६८ हे काही फार वय नाही. देवाने त्यांना अजून आयुष्य द्यायला हवे होते. असो.

II राजे II 29/08/2008 - 14:37
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना...... राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

मनीषा 29/08/2008 - 15:33
चित्रपट पाहिले आहेत... त्यातला सुद्धा साधी माणसं आणि त्यातील "माळ्याच्या माळ्यामंदी.." आणि "ऐरणीच्या देवा तुला .." ही गाणी आणि त्यातील जयश्रीबाईंचा अभिनय ..

विकास 29/08/2008 - 16:49
बातमी वाचून वाईट वाटले. असे जेंव्हा कधी न भेटलेल्या, सध्याच्या काळात अजिबात सोनेरी पडद्यावर/प्रकाशात नसताना, मध्यंतरी एकही त्यांचा चित्रपट न पहाता देखील जर बातमी वाचून जेंव्हा अनेकांना वाईट वाटते, धक्का बसतो, तेंव्हा त्याचा अर्थ अनेक जण जे चांगले होते ते कुठेतरी "मिस" करत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण त्याचा विचार करत नाही. पण अचानक असे व्यक्तिमत्व जेंव्हा निघून जाते तेंव्हा कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात त्याची जाणीव होते. साधी माणसं , सांगत्ये ऐका, मानिनी आदी अनेक आपल्यातील (माझ्यासकट) अनेकांच्या जन्माच्या आधीचे/वेळ्चे चित्रपट सजीव करून लक्षात ठेवायला लावणारे अभिनय करणार्‍या या अभिनेत्रीस माझी श्रद्धांजली.

शितल 29/08/2008 - 16:58
बातमी दुखःदायक आहे. कोल्हापुर येथील केशवराव नाट्यगृहात त्यांना आणि मराठीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना जवळुन पाहण्यांची संधी मिळाली. त्यांच्या चेहर्‍यातील गोडवा हा कायमचा मनात घर करून गेला. त्यांच्या अभिनया बद्दल काय बोलावे शब्दच नाहीत. :)

चंबू गबाळे 29/08/2008 - 18:21
माझी आवडती अभिनेत्री! माझीही त्यांना आदरांजली मराठी स्त्री म्हटले की नजरेसमोर येते ती नऊवारी साडीतील जयश्री गडकर यांची प्रतिमा..! पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

केशवराव 29/08/2008 - 19:26
जयश्री गडकर - धुरी गेल्याचे कळले, खुप खुप वाईट वाटले. समजायला लागल्या पासून मराठी चित्रपट पहातो आहे. 'गाठ पडली ठका ठका ' पासून जयश्री बाईंना पहात आहे. बुगडीने तर कहरच केला होता.' जयश्री गडकर - सुर्यकांत ' ही जोडी कित्येकांची आवडती जोडी होती. जयश्री बाईंना विनम्र आदरांजली!

"ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे" हे गाणं आणि जयश्रीबाईंचा तो पापभिरू चेहरा का कुणास ठाऊक आज ही दुःखद बातमी ऐकून माझ्या मनाला सतावत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अनिल हटेला 30/08/2008 - 07:24
भावपूर्ण आदरांजली !!!! ( बूगडी माझी सांडली चा पंखा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..