Skip to main content

भारतरत्न अब्दुल कलाम

लेखक विकास यांनी सोमवार, 27/07/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
APJ Kalam
भारतरत्न अब्दुल कलाम हे अधुनिक भारतातले एक विरळ आणि सुखद उदाहरण आहे. एक संशोधक जो नंतर राष्ट्रपती झाल्याने राजकारणी म्हणता येईल अशी ही व्यक्ती जी तरी देखील जनसामान्यात लोकप्रिय झाली. कलामांची वाक्ये सुविचार म्हणून आजही जालावर फिरत असतात. आणि ती त्यांची आहेत म्हणून लोकांना प्रेरणा घ्यावीशी वाटते, यात बरेच काही आले. आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात तमाम जनता आषाढी पाळत आहे आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहे. त्यामुळे आज परत एकदा "विठ्ठलाच्या पायी थरारली वीट" ह्या ओळी आठवल्या शिवाय राहवत नाहीत... कलामांना विनम्र श्रद्धांजली!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16684
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली. TIFR बरोबर त्यांनी वेळोवेळी खूपच संपर्क ठेवला होता.