परवा संध्याकाळी चालता चालता रस्त्याच्या बाजूला जांभळाच्या एका झाडाखाली पक्षाचं एक पिलू दिसलं. दोन-तीन फुटापर्यंत ते उडत होतं अन परत खाली बसत होतं. त्याच्या बाजूलाच एक बुलबुल येउन बसला. अस्वस्थपणे तो चिवचिव करत होता. बहुतेक त्या पिलाचा बाबा असावा. कारण त्याचा गळा लाल होता. मादी तशी असते कि नाही माहिती नाही. कोणी माणूस येताना दिसलं कि तो बुलबुल उडून झाडावर बसत होता अन मग परत खाली त्या पिलाजवळ येत होता. मी बाजूला पडलेली एक वाळकी डहाळी घेतली अन त्या पिलापुढे धरली. पिलू त्या डहाळीला पकडून बसलं अन मग मी ती त्या झाडाच्या फांदिजवळ नेली. पिलाने झाडाची एक बारीक डहाळी पकडली. मग मी बाजूला झालो. पिलाचा बाबा त्याच्या जवळच्या एका डहाळीवर जाऊन बसला. त्या झाडावरच त्यांचं घरटं असेल असं मी गृहीत धरलं कारण आजूबाजूला मोठं झाड नव्हतं. आणखी काही करता येत नाही हे पाहून मी तिथून निघालो तेव्हा ते पिलू तसंच त्या डहाळीला पकडून होतं आणि त्याचा बाबा बाजूला चिवचिव करत बसला होता आणि अंधार वाढत होता. पुढे काय झालं असेल ते जाणकार बहुदा सांगू शकतील…
वाचने
2279
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
;)
चांगलाय लेख !!
छान आहे लेख. मदत करण्याची
बाबा त्याला ओरडले असतील.. "
In reply to छान आहे लेख. मदत करण्याची by जडभरत
ते पिलू नक्कीच वाचलं असेल. ते
In reply to छान आहे लेख. मदत करण्याची by जडभरत
बरोबर.
In reply to ते पिलू नक्कीच वाचलं असेल. ते by पथिक
आमच्या घराच्या बाल्कनीतल्या
छान वाटलं!
जाणकार?.... वेल. !