✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा - अभिरूची कट्टा....

प
प्रभाकर पेठकर यांनी
Sun, 08/24/2008 - 00:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20161 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला Mon, 08/25/2008 - 13:22 नवीन

यमी आजीच

यमी आजीच दर्शन नाय झाल !! कुठली दुर्बीण वापरावी लागेल ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/25/2008 - 13:55 नवीन

स्वातीच्य

स्वातीच्या कॅमेय्रात माझे दातपण आहेत, तेव्हा हे तिलाच विचारा! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
प
पक्या Mon, 08/25/2008 - 14:02 नवीन

कट्टा छान

कट्टा छान रंगलेला दिसतोय. सचित्र वृत्तांत वाचून मजा आली. पुढच्या वेळेस मलाही हजेरी लावायला आवडेल.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/25/2008 - 22:25 नवीन

झकास

खूप मजा केलेली दिसते आहे. फोटो आणि टिप्पणी तर मस्तच!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/26/2008 - 11:42 नवीन

कट्ट्याला

कट्ट्याला हजेरी लावलेल्या मंडळीनी आमच्या विनंतीचा मान ठेऊन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत :) सखाराम गटणे आणि कोण बरे? ओळख करून घ्यायची राहूनच गेली. काका, तो सखाराम बरोबर बसलाय तो वरद. उशीरा आला तो. आणि तब्येत बरी नव्हती त्यामुळे एकदम मलुलच होता. त्यामुळे त्याची ओळख करुन द्यायची राहिली. धम्याची तब्बेत जरा सुधारलेली दिसते.. खरं सांगतेस प्राजुताई? थ्यांक्यु थ्यांक्यु...वाचुनच लगेच २० ग्रॅम मांस चढलं अंगावर.
बाकी श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते हो! कृ. ह. घे.
=)) आमच्या लग्नाच्या वेळी आमचे तिर्थरुप म्हणाले होते, खिशात जरा लायसन्स वगैरे ठेवा दोघांची. उगाच पोलीस आले म्हणजे बालविवाह लावताय म्हणुन आम्हालाच अटक करायचे :) धम्या ..... तुझे हे हास्य.. हत्तीचे दात तर नव्हेत ? दाखवायला एक.. व खायला एक ? लग्न झालेला असे मनमुराद हसू शकतो ? क्या बात है ! नाय हो...शप्पथ नाय. खोटं वाटत असेल तर भडकमकर मास्तरांना विचारा, त्यांना ठाऊक आहे माझ्या दातांची हिश्ट्री-जॉग्राफी. धम्या तुला हसताना काहि दिसतं का रे? =)) ॠष्या, कुणीकडुन बोललास रे? माझ्या डावीकडे की उजवीकडे??? हसताना मला ऐकुपण नीट येत नाय. शेवटी बरेच मिपाकर पान आणायला म्हणून जे गेले ते बराच काळ वापस आलेच नाहीत (पानवाल्याकडेच गेले की आणी कुणीकडे ? डॉक्टरसाहेब, माफी असावी. तो पानवाला लेकाचा शिकाऊ उमेदवार होता..एकेक पान लावायला तब्बल १० मिनिटे घेत होता.तिथे त्याचं काम होईपर्यंत नुसता वैत्ताग आला. अवांतरः डाक्टर, तुम्ही एकदम 'रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा' मधुन 'लकी' झाल्यामुळे पाहिल्या पाहिल्या तुम्हाला ओळखलंच नव्हतं मी ;) जेवल्यावर 'ईऽऽ कमोड पे जाते है, कुछ सुऽऽऽऽऽऽस्त कदम रस्ते...' अशी अवस्था होती. ???? =)) काका...अशक्य आहात तुम्ही! खरोखर! अहो अजून पहिलंच वर्ष आहे. नंतर येईलच आपल्या खांद्यावर दोन अश्रू ढाळायला. तेंव्हा मध्ये 'खंबा' घेऊन बसू आणि 'सामुदायिक अश्रूपतन' कार्यक्रम सादर करू हा हा हा!!! मी तर आत्ताही तयार आहे ह्या कार्यक्रमाला. पण अजुन बायको परवानगी देत नाही. सध्या 'सात च्या आत घरात' चालु केलंय माझ्यासाठी. :( घाटपांडे काकांचा फोटो कसला कल्ला काढलाय. एकदम जेम्स बॉन्ड. पेठकर काकांचा कॅमेरा लै लै भारी होता बॉ. काका, मी इतका येड्यासारखा हसतानाचा फोटो कुठे आणि कधी काढलात हो? मला तर कळलंच नाही. बाकी, पेठकर काकुंची आणि आमच्या सौ.ची छान गट्टी जमली असं दिसतंय. घरी गेल्यावरही काकुंचे गोडवे गाणं चालु होतं. :) (धमाल्याची पँट मस्त होती बुवा, आवडली आपल्याला). खोटं सांगताहेत काका, ते म्हणाले, "धमाल्यानं चुकुन माझी पँट नाही ना घातली? केव्हढी मोठी आहे ती...त्या पँटच्या वजनानं त्याला चालता येत नाहीय्ये नीट" मी, आंद्या, डान्या, इनोबा ही चांडाळ चौकडी आणि आमच्या ग्यांगचा ब्रेन विजुभौ - आम्ही मस्त दंगा केला :) मजा आली. आणि हो, ह्या कट्ट्याची सगळी तयारी करणं, बुकींग करणं वगैरे सगळं सगळं शेखरभाऊंनीच पाहिलं. मी नुसत्याच उंटावरुन शेळ्या हाकल्या. शेखरभाऊ....पेश्शल थ्यांक्यु टु यू !!! बाकी, पेठकर काका, मनोबा आणि मंडळी, त्यादिवशी मला जरा लैच्च उशीर झाला यायला, आय याम यक्श्ट्रीमली स्वारी!!! आता पुढचा कट्टा....संगीत कट्टा!!!! काय तात्या, घेताय ना मनावर?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/26/2008 - 13:04 नवीन

आता पुढचा

आता पुढचा कट्टा....संगीत कट्टा!!!! काय तात्या, घेताय ना मनावर? नक्कीच! सध्या जरा गणेशोत्सवाची १० दिवसांची गडबड संपू दे, मग पितृपक्षात आपल्या सोबत कावळ्यालाही दोन थेंब पाजून पितरांनाही मिपा सांगितिक कट्टा घडवू! :) आपला, (काकप्रेमी) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
भ
भडकमकर मास्तर Wed, 08/27/2008 - 13:40 नवीन

मी

मी नुसत्याच उंटावरुन शेळ्या हाकल्या. तरीच म्हटलं ते उंट स्टॉप काय प्रकार आहे ?? आत्ता कळालं.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ड
डोमकावळा Tue, 08/26/2008 - 14:08 नवीन

तात्या

ते तुमच्या सोबत दोन थेंब प्यायला तर आम्ही कधीच तयार आहोत.... पण ते पितरांचं जरा अवघड दिसतय बॉ... त्या करता आम्हाला एकदा (की एकदाचं ?) त्यांना भेटायला जावं लागेल. ;) आपला, (थेंबप्रेमी) डोम Image removed.
  • Log in or register to post comments
म
मन Tue, 08/26/2008 - 18:02 नवीन

वा.

अख्खा कट्टा मस्तच कव्हर केलात की. बाकी अजुनही कही फोटु मिशिंग असावेत असं वाटतय. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 18:46 नवीन

धन्यवाद...

पक्या, कट्टा छान रंगलेला दिसतोय. सचित्र वृत्तांत वाचून मजा आली. पुढच्या वेळेस मलाही हजेरी लावायला आवडेल. धम्या नांव नोंदवून घे. सात्विक की असात्विक कट्टा ह्याचे स्पष्टीकरण करून घे. धन्यवाद धनंजय. धमाल मुलगा, काका, तो सखाराम बरोबर बसलाय तो वरद. उशीरा आला तो. आणि तब्येत बरी नव्हती त्यामुळे एकदम मलुलच होता. त्यामुळे त्याची ओळख करुन द्यायची राहिली. ओके. धन्यवाद धमाल मुला. आणि सॉरी वरद. मी तर आत्ताही तयार आहे ह्या कार्यक्रमाला. पण अजुन बायको परवानगी देत नाही 'परवानगी मागतो आहेस' म्हणजेच अजून कच्चा नवरा आहेस. घाटपांडे काकांचा फोटो कसला कल्ला काढलाय. एकदम जेम्स बॉन्ड. पेठकर काकांचा कॅमेरा लै लै भारी होता बॉ. बऽऽस काऽऽऽऽय..! म्हणजे सगळं क्रेडीट कॅमेराला? हे म्हणजे नवदांपत्याला पहिला मुलगा झाला की, 'त्यांच्याकडे मस्त सागवानी पलंग आहे' असे म्हणणयासारखे झाले. मी इतका येड्यासारखा हसतानाचा फोटो कुठे आणि कधी काढलात हो? हा: हा: हा: अरे सहज गावलास फ्रेम मध्ये. पेठकर काकुंची आणि आमच्या सौ.ची छान गट्टी जमली असं दिसतंय. घरी गेल्यावरही काकुंचे गोडवे गाणं चालु होतं. सावधान! हार्ड डिस्क करप्ट होऊ शकते. भरपूर व्हायरस आहेत. "धमाल्यानं चुकुन माझी पँट नाही ना घातली? केव्हढी मोठी आहे ती...त्या पँटच्या वजनानं त्याला चालता येत नाहीय्ये नीट" खर पाहता, पँट स्वतःच्याच वजनाने खाली सरकेल असे मी म्हणालो होतो. पण पँट मला आवडली हे सत्यच. पेठकर काका, मनोबा आणि मंडळी, त्यादिवशी मला जरा लैच्च उशीर झाला यायला, आय याम यक्श्ट्रीमली स्वारी!!! पुढच्या कट्ट्याला किती वेळेवर पोहोचतोस त्यावर अवलंबून आहे 'यक्श्ट्रीमली सॉरी' स्विकारायची की नाही ते.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Tue, 08/26/2008 - 18:52 नवीन

उशीर होणारच काका ....

>>पुढच्या कट्ट्याला किती वेळेवर पोहोचतोस धम्याला उशीर होणारच काका, नवीन नवीन लग्न झालय. समजुन घ्या जरा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ध
धमाल मुलगा Wed, 08/27/2008 - 10:59 नवीन

धम्या नांव

धम्या नांव नोंदवून घे. सात्विक की असात्विक कट्टा ह्याचे स्पष्टीकरण करून घे. नोंद करणेत आलेली आहे. पक्याभाय, माफी असावी, पुर्वकल्पना देण्यास चुकलो. बऽऽस काऽऽऽऽय..! म्हणजे सगळं क्रेडीट कॅमेराला? नाही हो...ती दोन वेगवेगळी वाक्यं आहेत. चुकुन एकत्र झाली असावीत. तुमच्या पर्फेक्ट फ्रेमिंगच्या कौशल्याबद्द्ल आम्ही पामरांनी काय बोलावं? हे म्हणजे नवदांपत्याला पहिला मुलगा झाला की, 'त्यांच्याकडे मस्त सागवानी पलंग आहे' असे म्हणणयासारखे झाले. =)) __/|\__ सावधान! हार्ड डिस्क करप्ट होऊ शकते. भरपूर व्हायरस आहेत. असुद्यात हो...फार तर फार काय होईल? माझा पेठकर काका क्र.२ होईल...आवडेल की ते मला :) पण पँट मला आवडली हे सत्यच. धनन्यवाद्स :) पुढच्या कट्ट्याला किती वेळेवर पोहोचतोस त्यावर अवलंबून आहे 'यक्श्ट्रीमली सॉरी' स्विकारायची की नाही ते. आयला, सॉल्लीड पाचरच मारुन ठेवलीत की राव तुम्ही... जरा कुंदनशेठचं ऐका ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 08/27/2008 - 12:10 नवीन

पेठकर काका

पेठकर काका तुम्हा॑ला साष्टा॑ग द॑डवत! तुम्ही कधी कुणाची आणि कशी विकेट काढाल ते सा॑गण॑ ब्रम्हदेवालाही अशक्य आहे!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 01/31/2010 - 10:24 नवीन

जुने फोटो

जुने फोटो पुन्हा पाहिले की कसे नॉस्टॅल्जीक व्हायला होते. खरेच त्या कट्ट्या सारखी मजा परत आणायचीय पुन्हा एकदा Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 02/01/2010 - 06:58 नवीन

पुढच्या 'मिपा' कट्टा स्नेहसंमेलनाबद्दल जरा आधीपासून कळवावे

पेठकरसाहेब, पुढच्या 'मिपा' कट्टा स्नेहसंमेलनाबद्दल जरा आधीपासून कळवावे. मलाही बांसरी वाजवायची विजूभाऊंसारखी आवड आहे. त्यांच्याइतकी नसेल पण बरी वाजवतो. मला आवडेल 'मिपा'च्या स्नेहसंमेलनात वाजवायला! ------------------------ सुधीर काळे Parkinson's Laws 1. Work expands to occupy time available. 2. Bureucrats add subordinates, not rivals. 3. In meetings, time spent on a point is inversely proprtional to its importance!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/11/2013 - 15:04 नवीन

मिपाकरांचे स्नेह सम्मेलन असे

मिपाकरांचे स्नेह सम्मेलन असे होते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 10/11/2013 - 15:21 नवीन

हे असं पण होते बरं का.

हे असं पण होते बरं का. ;) http://www.misalpav.com/node/21411
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रमोद देर्देकर Fri, 10/11/2013 - 15:31 नवीन

पण आत्ता ते फोटो का बरे दिसत

पण आत्ता ते फोटो का बरे दिसत नाहीयेत? आणि आम्हाला आमन्त्रण का नव्हते बुवा?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 10/11/2013 - 17:29 नवीन

तुम्ही आलात २ महिन्या पुर्वी.

तुम्ही आलात २ महिन्या पुर्वी... ते झालय ५ वर्षांपुर्वी.. कसं बोलवायचं बुवा?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा