✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा - अभिरूची कट्टा....

प
प्रभाकर पेठकर यांनी
Sun, 08/24/2008 - 00:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20161 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sun, 08/24/2008 - 00:51 नवीन

वा पेठकर काका..

सह्ही जमला आहे कट्टा. पण मिपा च्या अन्नपूर्णा स्वाती ताईंचा फोटो पहायचा होता.. त्या दिसत नाहियेत. धम्याची तब्बेत जरा सुधारलेली दिसते.. ;) फोटो एकदम खासच. एकूणच जबरदस्त मजा केलेली दिसते.. कुंभाराची कलाकुसर अप्रतिम.... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 08/24/2008 - 00:52 नवीन

मिपा कट्टा.

पेठकर काका, वृत्तांत आवडला. फोटो जबर्‍याच आलेत. पण एक कळाले नाहि, आंद्या,धम्या ह्यांचे फोटो दिसत नाहित. अन तुमचा स्वतःचा एकहि फोटो नाहि. ?? विजुभाईंचा बासरी वादनाचे हे अंग माहित नव्हते. विजुभाउंमध्ये अजुन काय काय कला लपून आहेत हे एकदा तपासून बघायला पाहिजे. त्यांच्या बासरीवादनाचे रेकॉर्डींग केलेले आहे का? कट्ट्याला कोण कोण आले होते हे कळालेच.परंतु इथुन पुढे येतो म्हणून सांगुन ऐनवेळि कट्टेकरांचा "कात्रज" करणार्‍या मिपाकरांची नावेहि जाहिर करण्यात यावीत काय? अभि़ज्ञ.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 08/24/2008 - 01:20 नवीन

उत्तम........... आनंद आहे ...

कट्टा जबर्‍या झाला आहे ... पण .. हजर सभासद कमीत कमी २५ असावेत असे कळले होते.. रिपीट फोटूंपेक्षा सगळ्या ग्रुपचे फोटू मज्जा करताना दिसले असते तर कट्टा आम्ही अफ्रिकेतुन अनुभवला असता -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 01:53 नवीन

चांगले

चांगले चालले आहे. हॉटेलात चहा नाही?. अरे कोण आहे रे तिकडे? (टाळी) सर कलम कर दो उनका ;) (स्वगतः च्यायला सर्व शहरे एकाच मार्गावर चाललीत का? २००५ मध्ये बँगलोर मध्ये ३ मित्रांना रात्री १० वाजता फिरविले होते माझी चहाची तल्लफ भागविण्याकरीता) बहुतेकांचे लेख, प्रतिक्रिया वाचून मनात एक प्रतिमा तयार झाली असते त्याहून बहुतेक जण वेगळे निघाले :) लिखाणतील आणि प्रत्यक्ष प्रतिसाद ह्यात किती फरक आहे ते तुम्हीच सांगा. पुढे मी ही कधीतरी भेटेनच ;)
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 08/24/2008 - 06:23 नवीन

ओळखीओळखीचे

ओळखीओळखीचे (चेहरे आणि ठिकाणे दोन्ही) वाचून आणि पाहून आनंद झाला. पेठकर काका वृत्तांत झकास! पुणेरी टोळीचा दंगा आवडला... एकलव्य
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 08/24/2008 - 10:41 नवीन

+१

असेच म्हणतो, झकास वृत्तांत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/24/2008 - 07:59 नवीन

मस्त !!!

कट्ट्याचे फोटो आणि वर्णन मस्त..
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 08/24/2008 - 08:12 नवीन

पेठकरकाका,

पेठकरकाका, मस्त लिहिला आहे वृत्तांत , फोटोही छान... तो घाटपांडे यांचा ढँण्टडँण.. ओळखा पाहू?फोटो म्हणजे कमाल आहे... सस्पेन्स किती ठेवायचा?? :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sun, 08/24/2008 - 09:15 नवीन

सहीच!

सहीच! जबर्या धमाल आलेली दिसतीय.. एखादा जेवणाच्या ताटाचा फोटो नाही काढलात वाटतं(आम्हाला जळवायला??) :) फोटो मस्तच.. कुंभारकाम तर अप्रतिम! हे नविनच सुरू झालेलं दिसत आहे.. कधी पाहील्याचं आठवत नाही.. बाय द वे, आमराईत फिरकलाच नाही की काय??
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 08/24/2008 - 09:38 नवीन

दूरुस्ती

इनोबा आणि विनायक ह्यांनी दोन बाजूंनी आवर घातल्यामुळे (मधला) 'चित्त' थार्‍यावर आहे. हे काय काका! माझा डब्बलरोल केला तुम्ही. Image removed. डावीकडून छोटा डॉन, चित्तर आणि इनोबा(विनायक) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 08/24/2008 - 09:46 नवीन

झकास व्रुतांत!

वा! पेठकरकाका, झकास व्रुतांत! वाचून इतकी मजा आली तर तिथे असणार्‍यांना किति आली असेल!!? :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/24/2008 - 11:06 नवीन

+१

असेच म्हणतो. "डबल एजंट" घाटपांडे यांचा फोटो तर खल्लास!! नुकत्याच केलेल्या विक्रमामुळे डॉ. दाढे यांच्या अंगावर मूठभर मांस चढले असे दिसतेय ;-) [स्वगत- सहजा काय जीभेला हाड वगैरे अजुन दाढा शाबुत ठेवायच्या आहेत ना?] बाकी श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते हो! कृ. ह. घे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मुक्तसुनीत Sun, 08/24/2008 - 11:08 नवीन

खो खो !!

बाकी श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते हा हा हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/24/2008 - 14:17 नवीन

हा हा हा हा

श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते हो! हा हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
शितल Sun, 08/24/2008 - 10:26 नवीन

मस्त.

फोटो आणि वृत्तांत मस्तच. पण सगळे मिपाकर जे कट्याला होते त्याचा का नाही फोटो घेतला. धम्या, कसला हसतोय :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 10:29 नवीन

सचित्र

सचित्र वृत्तांताबद्दल धन्यवाद पेठकरराव! चित्रांची एका वाक्यातील कॉमेन्ट्रीही मस्तच! मिपाकरांना पाहून बरं वाटलं! :) इनोबा आणि छोटा डॉन ह्यांनी दोन बाजूंनी आवर घातल्यामुळे (मधला) 'चित्त' थार्‍यावर आहे. अरे वा! मिपा कट्ट्याला काही थोर मनोगतींनीही हजेरी लावली होती हे पाहून आनंद वाटला! :) आंबेहळदीचे लोणचे, वाळवून तळलेल्या तुरीच्या शेंगा (मला वाटतं त्या गवारीच्या होत्या), भजी, तळलेल्या पापड-पापड्या, भाकरी, पिठलं (सपक होतं सालं. एखादी हिरवी मिरची हवी होती. नाही मिळाली.),अळूचे फदफदे (वा..वा..वा माझ्यासारख्या भटांसाठी पक्वान्न), शेवयांची भाजी, कढी, कोशिंबीर, खीर, श्रीखंड आणि मसालेभात सदृश काही पदार्थ होता. जेवण चांगलं होतं. क्या बात है! :) असो, सर्व कट्टेकरींचे मन:पूर्वक अभिनंदन... तात्या. अवांतर - चला! आता हा अभिरुचीचा आणि अमेरिकेतला असे लागोपाठ दोन सात्विक कट्टे झाले. आता एखादा कट्टा लिंबूसरबताचा आणि मांसाहारी जेवणाचाही करू! :) म्हणजे आम्हालाही त्या कट्ट्याला हजेरी लावता येईल! आणि त्यानंतर मस्तपैकी गाण्याची बैठकही करू! :) तात्या.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sun, 08/24/2008 - 10:43 नवीन

मस्त फोटू

मस्त फोटू !!! वर्णन एकदम सुरेख... पेठेकर साहब ... आवडलं आपल्याला !! काय हे साधा चहा मिळत नाही तेथे ? (एकवेळ अमृत ना मिळो पण चहा पाहीजेच ! ) विजु भाउच्या आत अजून काय काय लपलं हाय हे सोधावयाला पाहीजे... नजर राखावी गड्यावर ! डोन्या व ईनो'बा..... जरा गडी बघून तरी बसायचे रे लोकांनो.... त्यांचे चित्त जरा जरी भरकटले व तुम्हाला प्रेमाने (रागाने) आलिंगन दिले तर कुसकरुन टाकेल .. ! दाढे साहेब नुस्ती मजाच बघत बसला की राव.... जरा मुद्दे (गुद्दे) संभाळायचे.... स्मित हास्य म्हणजे काय हे तुमच्याकडून शिकावे म्हणतो ;) छत्रपती... राजेंचे जिवन असेच हो.. सदा सर्वदा आराम !!!!! धम्या ..... तुझे हे हास्य.. हत्तीचे दात तर नव्हेत ? दाखवायला एक.. व खायला एक ? लग्न झालेला असे मनमुराद हसू शकतो ? क्या बात है ! फुल्ल्टू मजा केलेली दिसते सर्वांनी !!!!! यशस्वी कट्ट्याबद्दल सर्वांचे अभिनंदन !!! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 08/24/2008 - 11:24 नवीन

:)

धम्या ..... तुझे हे हास्य
धम्या तुला हसताना काहि दिसतं का रे? ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sun, 08/24/2008 - 14:19 नवीन

>>>धम्या

>>>धम्या तुला हसताना काहि दिसतं का रे =)) एकदम चायनीज हास्य !! ********** बाकी विजुभाउ ला विचार ले पाहीजे कि कृष्णासारखी फक्त बासुरीच वाजवता की कधी कधी राधेचे रुप पण घेता ;) (खफ वासीयांना समजलेच असेल मी काय म्हणतो आहे ते ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सखाराम_गटणे™ Sun, 08/24/2008 - 16:26 नवीन

बाकी

बाकी विजुभाउ ला विचार ले पाहीजे कि कृष्णासारखी फक्त बासुरीच वाजवता की कधी कधी राधेचे रुप पण घेता (खफ वासीयांना समजलेच असेल मी काय म्हणतो आहे ते नाही ते, पर्यायाने दुसरे रुप घेतात. सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
म
मुक्तसुनीत Sun, 08/24/2008 - 11:01 नवीन

बहोत अच्छे !

अरे वा ! जोरदार झाला की कट्टा ! वृत्तांत आणि फोटु वगैरे जबरा ! मजा आली ! पेठकरांनी उत्तम लिहिलाय , पण अजून येऊ द्या ! इतरांकडून पुरेसा मसाला आला नाही असे वाटले !
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 08/24/2008 - 11:53 नवीन

अरे वा !

मस्तच झालेला दिसतोय कट्ट..मी नाही येऊ शकलो. पण असा सहकुटुंब कट्टा करू पुन्हा, तेव्हा येईन! :) पुढच्या वेळेस संस्कृती???
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 08/24/2008 - 11:58 नवीन

कट्टा..

कट्टा मस्त धमाल झालेला दिसतो आहे.. फोटो आणि त्यावरची टिपण्णीही मस्त! स्वाती स्वगत- स्वाती,तू नुसतीच आश्वासनं दे.. वॄतांताची.. तुमची ट्रीप आता शिळी झाली तरी येतोय अजून वृतांत..जर्मनीतून मुंबईत पोहोचायला ८ तास लागतात .. म्हणून सहलीचे वर्णन लिहायला ८ दिवस लावते आहेस?
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 08/24/2008 - 12:11 नवीन

माझाही अनुभव....

आज सकाळी ११ वाजता सिंहगड रस्त्यावर (नरवीर तानाजी मार्ग) 'अभिरुची बागेत' भेटायचे ठरले होते. धमाल्याचा तसा ऑफिशियल फोनच आला होता. मी तर जाम उत्सुक होतो. ठीक ११ वाजता 'अभिरूची'ला धडकलो. सामसूम. ठार शांतता. ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी जाणं आणि इतर सदस्य न आल्याने अर्धा-एक तास लटकणे हे नेहमीचेच.
'The trouble with being punctual is, there is no one to appreciate it!' हे आठवल, हा माझाही नेहमीचा अनुभव. बाकी अकत्र सगळ्या ग्रुपचा फोटो नाही का? पेठकर काकांची शैली खासच! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 12:15 नवीन

अवांतर,

'The trouble with being punctual is, there is no one to appreciate it!' वा! ही म्हण आवडली.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
ल
लिखाळ Sun, 08/24/2008 - 16:32 नवीन

छान

वा वा ! मस्त कट्टा झालेला दिसतो.. खुप मजा आली असे दिसतेय ! मस्त ! फोटो सुद्धा छान.. सर्वांचा एकत्र फोटो असता तर अजून मजा आली असती. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/24/2008 - 17:35 नवीन

+१

हेच म्हणतो.. "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 08/24/2008 - 20:07 नवीन

पुढचा कट्टा स॑गीत स्पेशल

मी थोडा उशीरा पोचल्यामुळे माझ्या सगळ्या॑शी डिट्टेल गप्पा काही होऊ शकल्या नाहीत :( बेटर लक नेक्स्ट टाईम (पण एक॑दरीत नूर पाहता सगळ्या गप्पा घुमून फिरून गटणेसाहेबा॑वर येत असाव्यात.. ) मदनबाण, ब्रिटिश टि॑गी या॑नीही फोनवरून हजेरी लावली होती. पेठकर काका॑नी एक लई भारी कॅमेरा आणला होता टेलीफोटोलेन्सवाला. ज्या क्यामेर्‍याने ज॑गलात दूरून रानरेड्या॑चे फोटू काढायचे त्यावर आमचे काढल्यामुळे मी एव्हढा प्रच॑ड दिसतो आहे, प्रत्यक्षात मी सडपातळच आहे.. :) विजूभाऊ बासरी मस्तच वाजवतात (मला गाणे ओळखता आले (त्या॑नी सा॑गितल्यावर) :) ह.घ्या. शेवटी बरेच मिपाकर पान आणायला म्हणून जे गेले ते बराच काळ वापस आलेच नाहीत (पानवाल्याकडेच गेले की आणी कुणीकडे ? :) आता पुढचा कट्टा स॑गीत स्पेशल केला पाहिजे (तात्या॑चे गाणे ऐकण्याची बहूत दिवसा॑ची तमन्ना आहे)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2008 - 21:17 नवीन

घाऊक धन्यवाद....

प्राजु, सह्ही जमला आहे कट्टा. पण मिपा च्या अन्नपूर्णा स्वाती ताईंचा फोटो पहायचा होता.. त्या दिसत नाहियेत. स्वाती आणि यमी (सहकुटुंब) जेवल्या-जेवल्या सटकणार आहेत ह्याची मला कल्पना नव्हती. मी म्हंटले निवांत जेवल्यावर फोटो काढू. त्यामुळे ते फोटों बाहेर घरंगळले. धम्याची तब्बेत जरा सुधारलेली दिसते.. ह्याला म्हणतात 'मायक्रोस्कोपिक' नजर. अभिज्ञ, पण एक कळाले नाहि, आंद्या,धम्या ह्यांचे फोटो दिसत नाहित. आंद्या छायाचित्र क्रमांक १४ आणि धम्या छायाचित्र क्रमांक १२. अन तुमचा स्वतःचा एकहि फोटो नाहि. ?? मी चौकटीत मावत नाही. माझ्या साठी 'सिनेमास्कोप' लागतो. हा:हा:हा:! विजुभाईंचा बासरी वादनाचे हे अंग माहित नव्हते. आम्हालाही तो एक सुखद धक्का होता. त्यांच्या बासरीवादनाचे रेकॉर्डींग केलेले आहे का? मोठे कलाकार परवानगी देत नाहीत. म्हणून आम्ही प्रयत्नही केला नाही. कट्ट्याला कोण कोण आले होते हे कळालेच.परंतु इथुन पुढे येतो म्हणून सांगुन ऐनवेळि कट्टेकरांचा "कात्रज" करणार्‍या मिपाकरांची नावेहि जाहिर करण्यात यावीत काय हा प्रांत संयोजकांचा. मी निव्वळ फोटोग्राफर. टारझन, कट्टेकरी उशिरा जमल्यामुळे लगेच जेवले आणि सुस्तावले. आणि कमी उपस्तिथीच्या तांत्रीक कारणामुळे रिपीट फोटो काढावे लागले. देवदत्त, माझा स्वतःचा फोटो नसण्याचे तेही एक कारण आहे. एकलव्य, नंदन आणि डॉ. बिरुटेसाहेब, धन्यवाद. तुम्ही कधी हजेरी लावताय एखाद्या कट्ट्याला? आता 'तामसी' कट्टाही होऊ घातला आहे असे ऐकले. भडकमकर मास्तर, ढँण्टडँण.. आहेच जबरा. भाग्यश्री, एखादा जेवणाच्या ताटाचा फोटो नाही काढलात वाटतं(आम्हाला जळवायला??) अजून काही (इतरांनी काढलेले) फोटो आहेत. त्यांचे वृत्तांतही येतीलच सफोटो... फोटो मस्तच.. कुंभारकाम तर अप्रतिम! हे नविनच सुरू झालेलं दिसत आहे.. कधी पाहील्याचं आठवत नाही.. गेली तीन वर्षे तरी मी पाहतो आहे. आधीचे माहित नाही. बाय द वे, आमराईत फिरकलाच नाही की काय?? जेवल्यावर 'ईऽऽ कमोड पे जाते है, कुछ सुऽऽऽऽऽऽस्त कदम रस्ते...' अशी अवस्था होती. आमराईत कोण जातोय. पण मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पुढच्यावेळी लवकरात लवकर जमून मस्ऽऽऽत भटकलं पाहिजे. विनायक, सॉरी इनोबा, चूक झाली खरी. अभिज्ञने ती मला व्यनीतून कळवली आणि मीही ती तात्यांना तत्परतेने कळवून सुधारली. सॉरी, छोटा डॉन, पहिली चूक समजून अभय द्यावे ही थरथरती विनंती. ऋषिकेश, खरंच खूप मजा आली. सहज, "डबल एजंट" घाटपांडे यांचा फोटो तर खल्लास!! नुसता फोटो बघूनच खल्लास? म्हणजे माणूस जबरदस्त 'डेंजरस' असणार. नुकत्याच केलेल्या विक्रमामुळे डॉ. दाढे यांच्या अंगावर मूठभर मांस चढले असे दिसतेय कुठला विक्रम बाबा? मी गेले कित्येक दिवस (आणि रात्री) मिपावर फिरकू शकलो नाही त्यामुळे अज्ञानात आहे. बाकी श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते हो! कृ. ह. घे. प्राजुच्या म्हणण्यानुसार धमाल्या (तरी निदान) आता गुटगुटीत होऊ घातला आहे. आणि 'कृ. ह. घे.' कोणाला? मला? मी कशाला जड घेईन? असो. शितल, काही मिपाकर मध्येच 'कल्टी' मारणार आहेत हे मला माहित नव्हते. विसोबा खेचर, सचित्र वृत्तांताबद्दल धन्यवाद पेठकरराव! लाजवताय राव तुम्ही आम्हाला धन्यवाद-बिन्यवाद मानून. आता एखादा कट्टा लिंबूसरबताचा आणि मांसाहारी जेवणाचाही करू! मांसाहारी जेवणाबरोबर लिंबूसरबत? गर्भितार्थ जरी उमगला तरी ताकाला जाऊन भांडे लपविणे कशापायी. सुरापान आणि सामिष भोजन म्हणा की .... राजे, लग्न झालेला असे मनमुराद हसू शकतो ? अहो अजून पहिलंच वर्ष आहे. नंतर येईलच आपल्या खांद्यावर दोन अश्रू ढाळायला. तेंव्हा मध्ये 'खंबा' घेऊन बसू आणि 'सामुदायिक अश्रूपतन' कार्यक्रम सादर करू. मुक्तसुनित, इतरांकडून पुरेसा मसाला आला नाही असे वाटले ! होय. मीही वाट पाहतोय. मनिष, असा सहकुटुंब कट्टा करू पुन्हा आम्हा पामरांचे मत विचाराल की नाही? स्वाती दिनेश, मी सुद्धा स्वाती (राजेश)च्या कट्टा रेसिपीची (आय् मिन्...वृत्तांताची) वाट पाहतो आहे. लिखाळ, सर्वांचा एकत्र फोटो असता तर अजून मजा आली असती. पुढच्या वेळी पारंपारीक 'ग्रुप फोटो' नक्की..... मदनबाण, "First, believe in the world-that there is meaning behind everything." खांद्यांवरून गेले. आपणा सर्वांस प्रेमळ धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 08/24/2008 - 22:50 नवीन

जबराट कट्टा!

आमचं प्रतिसादाचं घोडं ह्यावेळी वरातीमागून आलंय लोकहो त्यामुळे क्षमस्व! L) पेठकरकाका सचित्र वृत्तांत एकदम देशी स्टाईलने खणखणीत! :D पहिल्या फोटोत मला विजूभाऊंच्या बासरी वाजवणार्‍या मूर्तीवर एक मोरपिसांचा मुकुट आपोआप दिसला! B) माणूस बाकी रसिक हां शायरी काय, कविता काय, बासरी काय कमाल आहे! :) दुसर्‍या फोटोतले डॉ.दाढे साहेब अंमळ अमोल पालेकरच्या जवळ जाणारे भाव राखून आहेत :P (डॉ.साहेब ह.घ्या. नाहीतर माझे दात घशात घालाल! ;) ). हाताची घडी, तोंडावर परीटघडी! प्रकाश घाटपांडे काका तर मला पोलीसी हेअरकटवरुनच अंदाज आला, खात्यातल्या सवयी जात नाहीत हेच खरे! :T :O (काका ह.घ्या. नाहीतर माझा गेम कराल!) पुढच्या चित्रातलं विजूभाऊंचं हास्य म्हणजे एकदम मंदतरल स्मित, कोणतं स्वप्न बघत होते कोण जाणे? 8> सखाराम गटणे आणि अनामिक काय गहन चर्चा चालली आहे? :| हॅमॉकवर पहुडलेल्या छत्रपतींचा 'स्वराज्याचा विस्तार' अगदी नजरेत भरण्याजोगा आहे खरा! :> :? (छत्रपती पामराला माफ करा, न राहवून शब्द सांडून जातात कधी कधी! ;) ) छोटा डॉन, चित्त आणि इनोबा फारच 'चित्तथरारक' फोटू! :D :S धमाल! अरे काय खळखळून हसतोयस! :)) (लग्नानंतरही सौ. धमाल ने ह्याला वास्तवापासून दूर ठेवलेले दिसते! येईल, येईल लवकरच भूतलावर :''( . आम्ही वाट बघायला तयार आहे.) सौ.धमाल आणि सौ. पेठकर काकू, ह्म्म.. चार अनुभवाचे बोल ऐकवलेत की नाही लेकीला? ;;) #o कथाकथनकार विजूभै!! एकदम रंगात येऊन चाललेली दिसते कथा! :W :? चावडीला पारावर बसलेली मंडळी एकदम ग्रामपंचायतीतली वाटतात! एकदम झक्कास फोटू! O:) पेठकरकाका, बाकी पदार्थांचं वर्णन एकदम फर्मास हो! =P~ =P~ आंबेहळदीचे लोणचे, वाळवून तळलेल्या तुरीच्या शेंगा (मला वाटतं त्या गवारीच्या होत्या), भजी, तळलेल्या पापड-पापड्या, भाकरी, पिठलं (सपक होतं सालं. एखादी हिरवी मिरची हवी होती. नाही मिळाली.),अळूचे फदफदे (वा..वा..वा माझ्यासारख्या भटांसाठी पक्वान्न), शेवयांची भाजी, कढी, कोशिंबीर, खीर, श्रीखंड आणि मसालेभात सदृश काही पदार्थ होता. जेवण चांगलं होतं. फक्त 'शेवयांची भाजी'?? ये बात कुछ हजम नहीं हुई, बहुदा शेवग्याची भाजी असावे! :W अजून उरलेले फोटू आपापल्या मसाल्यासहित टाका राव!! B) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2008 - 23:07 नवीन

शेवेची...

फक्त 'शेवयांची भाजी'?? ये बात कुछ हजम नहीं हुई, बहुदा शेवग्याची भाजी असावे च्यायला दूसरी चूक. 'शेवयांची' नाही, 'शेवेची' भाजी. खानदेशी टाईप पण अज्जाबात तिखट नाही, तेलाचा तवंग नाही. त्यामुळे 'शेवेची ड्युप्लिकेट खानदेशी भाजी' म्हणयला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Sun, 08/24/2008 - 23:18 नवीन

शेवेची भाजी! येस, समझ गये!

पण शेवेच्या भाजीला ना तेल, ना तिखट? म्हणजे बिन ग्लोव, बिन पॅडचा सचिन तेंडुलकर म्हणा की? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sun, 08/24/2008 - 23:21 नवीन

मऊ शेव..

अरे ती शेवही 'मऊऽऽऽऽ' पडली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अनिल हटेला Mon, 08/25/2008 - 09:27 नवीन

चांगली मजा

चांगली मजा केलीये मंडळी !! अजुन माल मसाला असेन तर येउ देत !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 08/25/2008 - 09:41 नवीन

माल मसाला असेन

है भाय है .. अजुन डान्या अन स्वातीताईचे फोटु यायचेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
अ
अमोल केळकर Mon, 08/25/2008 - 09:39 नवीन

मुंबईत कट्टा कधी ?

सचित्र वर्णन वाचायला मजा आली. फोटोमुळे मिपाकर सदस्यांची ओळख झाली. अमोल (स्वगतः कट्टे भरवण्यात मात्र पुणेकरांनी मुंबईकरांवर मात केलेली दिसत आहे. आता आपण मुंबईकरांनी देखील वेळ काढुन भेटायला पाहिजे ) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Mon, 08/25/2008 - 09:55 नवीन

'दो हंसोका जोडा '

डॉ दाढे आणि विजुभौ 'दो हंसोका जोडा' दिसत आहेत एकदी. द्रुष्ट नाही लागली म्हणजे मिळवली
  • Log in or register to post comments
म
मिंटी Mon, 08/25/2008 - 10:11 नवीन

पेठकर काका

पेठकर काका वॄत्तांत आवडला.......... मी पुण्यात आसुन येऊ शकले नाही याची खंत वाटतीए फक्त.......... पण खुप मज्जा केलेली कळतीए फोटोवरून.............. सुरेख वृत्तांत आणि फोटोंसाठी धन्यवाद............. :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 18:19 नवीन

नो प्रॉब्लेम..

सितारोंके आगे जहाँ और भी है....! अजून भरपूर सात्विक आणि असात्विक कट्टे व्हायचे बाकी आहेत. आगामी आकर्षण मुंबै कट्टा....(कोणीतरी वर म्हणत होते बुवा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
व
विजुभाऊ Mon, 08/25/2008 - 10:21 नवीन

वरातीमागुन घोडे

हे बघा वरातीमागुन घोडे http://www.misalpav.com/node/3208 पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/25/2008 - 12:29 नवीन

मी पण फोटो

मी पण फोटो काढले ... हे घ्या! http://picasaweb.google.com/sanhita.joshi/Abhiruchi ऋचा सॉरी हा ... तुझे फोटो जरा उजेडात काढायला हवे होते किंवा फ्लॅश मारायला हवा होता ... पण माझा आळस! अदिती
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 08/25/2008 - 13:14 नवीन

मस्त

मस्त !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 18:21 नवीन

छे: छे:...

ऋचा सॉरी हा ... तुझे फोटो जरा उजेडात काढायला हवे होते किंवा फ्लॅश मारायला हवा होता एवढी काही ऋचा काळी वाटली नाही. (फोटोतही नाही आणि प्रत्यक्षातही नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/26/2008 - 18:59 नवीन

ऋचाचे फोटो

ऋचाचे फोटो यायला पहिजेत तेवढे क्लीयर नाहीयेत, म्हणून सॉरी! ती काळी नाहीचे, वाटणार कुठून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 19:18 नवीन

हा: हा: हा:

हा: हा: हा: जस्ट गंम्मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/26/2008 - 20:11 नवीन

हाहाहा ...

हाहाहा ... मला कळलीच नाही! काका, तुमच्या वयाचा माणूस गंमतपण करू शकतो वाटलंच नाही! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Tue, 08/26/2008 - 21:15 नवीन

हम्म्म्म्म!

काय करणार? प्रॅक्टीस ठेवावी लागते वय झालं तरी... कळेल म्हणा कधीतरी हे कटू सत्य तुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ध
धमाल मुलगा Wed, 08/27/2008 - 10:53 नवीन

काय सांगतेस काय?

अदिती, ह्याचा अर्थ 'तुमने काका को पैचानाच नहीं|' काका एखाद्याला पकडुन एकदा चालु झाले ना की त्या माणसाला पळता भुई थोडी करुन टाकतात :) सध्या संसाराच्या भवसागरात पोहण्याचे क्लिष्ट धडे मी काकांकडुनच 'हसत खेळत शिक्षण' पध्दतीनं घेतोय. काय काका, बरोबर बोल्लो ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विसोबा खेचर Wed, 08/27/2008 - 11:14 नवीन

:)

अगं अदिती, आमचा प्रभाकर हा एक नंबरचा डांबिस माणूस आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/27/2008 - 11:38 नवीन

लोकहो,

लोकहो, पेठकर काकांना प्रत्यक्षात आणि जालावर भेटल्यानंतरच मी हा "विनोद" केला ... क्रूपया हसा! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा