मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कशेळी कट्टा===> मुंबई-ठा णे-कल्याण-नाशिक, इथल्या मिपाकरांसाठी

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, पुणेकरांचे कशेळी कट्ट्याचे आयोजन झाले देखील. पण अद्याप मुंबईकरांचे कुठलेच आयोजन नसल्याने, हा विषय मांडत आहे. कालच माझे आणि कंजूस ह्यांचे बोलणे झाले. शनिवारी १४-०२-२०१५ला, सकाळी ९-२०ची कर्जत लोकल ते डोंबिवलीहून पकडणार आहेत. मी पण तीच लोकल पकडणार आहे. माझ्या बायकोची जर्मनची परिक्षा त्याच सुमारास असल्याने, ती येणार नाही. कळावे, आपलाच मुवि.

वाचने 10162 वाचनखूण प्रतिक्रिया 34

सविता००१ 10/02/2015 - 10:06
पण १०:३० पर्यंत पोचायचय ना? ९:२० ने कर्जत १०.१० ल येइल ना? आणि पुढे १ तास लागणार आहे ना? मी लवकरची लोकल शोधत होते. मेगा ब्लॉक असेल ना? रविवार आहे.

In reply to by सविता००१

सविता००१ 10/02/2015 - 10:07
कल्याण हून येणार आहोत

माम्लेदारचा पन्खा 10/02/2015 - 15:12
एक फायनल लिस्ट टाकाल का कोणीतरी.... शंकराच्या देवळातल्या दुधाच्या अभिषेकासारखं व्हायचं नाहीतर ! दुसरा दूध टाकेल म्ह्णून आपण पाणी टाकायचं आणि नंतर गाभार्‍यात फक्त पाणीच पाणी....

टवाळ कार्टा 10/02/2015 - 15:53
माझे १४ ला येणार की १५ ला हे अजून ठरलेले नाही...बहुतेक १५ ला असेन जास्त करून १५ ला आलो तर "ग्यांग" बरोबर असणारै ;)

सुहास झेले 10/02/2015 - 17:07
मी रविवारी नक्की आहे...मी राहायला चारकोप (कांदिवली).. जमल्यास ठाणे-बोरीवली परिसरातील मिपाकर एकत्रपणे गाडी करून जाऊ शकतो...

भावना कल्लोळ 10/02/2015 - 17:14
वसईवरून यायचे असेल तर कसे यावे आणि कुठे भेटावे कि डायरेक्ट यायचे आहे ? माझ्याबरोबर माझा लहान मुलगा हि असणार आहे.

In reply to by भावना कल्लोळ

वसईहुन ट्रेनने कोपर स्टेशनवर उतरावे लागेल.तिथे कर्जत ट्रेन मिळेल.तिथुन नेरळला उतरुन पुढचा प्रवास धाग्यावर दिला आहे.

उपास 10/02/2015 - 17:33
पण मॅचच्या दिवशी कट्टा.... कसं जमवायचं.. व्हॅलेंटाईन कर्तव्यपण आहेतच.. तस्मात आमचा पास दिसतोय सद्ध्यातरी.. शुभेच्छा...!

संदीप डांगे 11/02/2015 - 10:08
नाशिकहून आमची राज्यराणी सकाळी ८.५० ला कल्याणला पोचते. मला तुमची कर्जत लोकल ९,२९ ला कल्याणहून गाठता येईल. जर थोडा उशीर झाला तर पुढची कर्जत लोकल आहेच अर्ध्या तासानी. मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर व्यनि करतो, तुम्ही पण तुमचा द्या…

किणकिनाट 11/02/2015 - 12:01
मी येणार आहे. सौ. आणि मी दोघे. आम्ही छोट्या चार चाकीने पनवेलवरून सकाळी साधारणपणे ८.३० ते ९.०० वा. नीघूं. मागची सीट रिकामी आहे. अजून ३ (किंवा अ‍ॅड्जस्ट होत असेल तर ४) जण बरोबर येउ शकतिल. पनवेल एस. टी. स्टँड वा रेल्वे स्थानकावरून पीक अप (आणि संध्याकाळी ड्रॉपसुद्धा) करू शकू. कोणाला यायचे असेल तर येथे कळवा अथवा व्यनी करा. आम्ही येणार नक्की. जय मि.पा. जय महाकट्टेकरी.

कंजूस 11/02/2015 - 17:25
@संदिप डांगे भाऊ ,तुमचा उत्साह पाहून आणखी मिपाकर येतील याची खात्री आहे. तुम्ही शनिवारीच १४ फेब्रु ला येणार आहात ना ?आम्ही (मुवि आणि मी )platform नंबर 1 नेरळ स्टेशनवर -कल्याण टोकाशी तुमची वाट पाहतो. उशिर झाला तर तिथेच कट्टा करू पण तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही. आणखी कोणी या गाडीस येणाऱ्यांनी शुक्रवार रात्री दहापर्यँत व्यनि करावा ही विनंती. (फोनवर विसंबून राहायला नको).

In reply to by कंजूस

संदीप डांगे 11/02/2015 - 18:13
:-) शनिवारी १४ लाच मी नेरळ स्टेशनवर भेटतो आपल्याला... आमची राणी कधी कधी जास्तीत जास्त अर्धा तास लेट होते. त्यामुळे अपेक्षा आहे तुम्हाला जास्त वाट पाहावी लागू नये.

भाते 12/02/2015 - 20:21
पण, रविवारी काही घरगुती कारणामुळे शनिवारी रात्री आणि रविवारी थांबणे शक्य नसल्यामुळे मी फक्त शनिवारीच तिकडे असणार आहे. शनिवारी रात्री ७-८ पर्यंत तिकडुन निघुन मला १०-११ पर्यंत घरी परत यावे लागेल. चालेल ना?

भाते 13/02/2015 - 10:11
रिक्षाच्या वेळेनुसार तिकडुन थोडा लवकर निघुन मी परत येईन. गेल्या वेळेसारखे, उद्या सकाळी मी साडेआठ पावणेनऊ पर्यंत तिकिट घराजवळ येईन.

मोनू 14/02/2015 - 10:23
सर्वांना कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ... पुढील कट्ट्यास येण्याचा नक्की प्रयत्न करेन .

भाते 14/02/2015 - 20:35
मस्त कट्टा… सकाळी कंजुसकाका, श्री. व सौ. मुवि आणि मी (भाते) आधी ठरवल्याप्रमाणे मध्यवर्ती डोंबिवली स्थानकातुन कर्जत गाडीने प्रस्थान केले. नंतर… नेरळला गाडीतुन ऊतरल्यावर नेरळ ते कशेळी रिक्षा प्रवास. फक्त ११-१२ किमी (काटकर नाही हो, किलोमीटर) मग, कशेळीचा तो मिसळपाव, वडापाव, ढोकळा आणि चहा… आहाहा… मस्तच! मिपाकरांना जळवण्यासाठी फोटो काढण्याची तसदी आम्ही अजिबात घेतली नाही. :) मग पुन्हा कशेळी ते आंबिवली रिक्षा प्रवास. इथे आम्हाला सुचना देऊन महाराजांनी मुक्कामासाठी गडावर प्रस्थान केले. मग, श्री. व सौ. मुवि आणि मी वनविहार मध्ये दाखल झालो. मी आणि श्री. मुवि झोपाळ्यावर बसुन रंगित पाण्याचा आस्वाद घेतला. फोटो नाहीत! चुलीवर बनवलेले ते जेवण! आहाहा… जाऊदे, शब्द नाहित वर्णन करायला. पुन्हा, फोटो नाहीत! नंतर, नाईलाजाने पुर्वसुचना दिल्याप्रमाणे मी श्री. व सौ. मुवि यांचा निरोप घेतला. तर, महाराज, ऊद्या सकाळी गडावरून खाली ऊतरतील. बाकीचे, कट्टा नियोजन अधिकारी बघतील. :) आता, ऊद्याचा कट्टा हुकल्याचे मला अजिबात वाईट वाटणार नाही! :)

कंजूस 14/02/2015 - 22:03
शनिवारी रात्री काही मिपाकर येतील आणि मला अगम्य अशा करमणूकीच्या गोष्टी होणार आहेत यातून गडावर पलायन हा मार्ग मी अगोदरच ठरवला होता.