गेल्या काही दिवसांपासून स्वत:साठी घर शोधण्याची मोहीम सुरु आहे. आजकाल घराला 'Flat' असे म्हणतात. पुण्यासारख्या शहरात जर Flat बुक केला असेल तरच त्या माणसाने आयुष्यात काहीतरी मिळवलय असे मानले जाते. कारण भेटणारा प्रत्येक दुसरा माणुस तुम्हाला ' काय, कसे सुरु आहे? ' हे विचारून झाल्यावर 'काय Flat वगैरे बूक केला कि नाही अजुन? 'असा प्रश्न विचारून जातोच.आणि त्याचे उत्तर जर 'हो' असेल तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला काहीही अर्थ उरत नाही. Flat घेतल्यावर माणसाचे 'बरं चाललंय ' हे उत्तर खरं असुच शकत नाही. तो बिचारा ईएमआय आणि डाउन पेमेण्ट या 2 शब्दान्नी पुरता मेटाकुटीला आलेला असतो. जवळपास 20 वर्षांच्या कालावधीनंतर भेटलेल्या एका नातेवाईकाने मला वरील प्रश्न विचारला, त्यावर 'नाही' असे उत्तर ऐकल्यावर ते म्हणाले , "अरे काय अजून किती दिवस भाड्याच्या घरात रहाणार? करा काहीतरी ! " त्यांची ही प्रतिक्रिया ऐकल्यावर माझ्या डोक्यात आलेला सगळ्यात पहिला विचार म्हणजे," मी म्हशीच्या गोठ्यात जरी राहीलो तरी ह्याच्या बापाचं काय जाते? " ते गृहस्थ अजूनही गावात वडिलोपार्जित वाड्यात रहात असल्याचं मला नंतर कळलं !
असो. तर लोकाग्रहास्तव म्हणा किंवा स्वत: ची गरज म्हणा पण आम्ही Flat शोधण्याची मोहीम सुरु केली. थोडीबहुत चौकशी केल्यावर कळलं की साधारण चार माणसांचा महिन्याचा किराणा आणि पेट्रोल च्या खर्चात एक स्क़्वेअर फूट जागा मिळते . ती सुद्धा किराणा, पेट्रोल ज्या ठिकाणी मिळते तिथून ८-१० किलोमीटर दूर !! जसं जसं जवळ येऊ तशी तशी किंमत वाढेल. मग हळुहळु आम्ही बिल्डर्सच्या ऑफिसेस मध्ये जाऊ लागलो. सुरुवातीला काही मोठ्या बिल्डर्स चे ऑफिस बाहेरूनच बघून आत जावं की नाही अशी भीती वाटायची. पण नंतर आम्ही सरावलो. आत गेल्यावर एखादी आकर्षक रिसेप्शनिस्ट मुलगी आपलं स्वागत करते. थोडसं 'हाय - हेलो' करून हळुच आपलं बजेट किती वगैरे ही माहिती काढून घेते. आपल्या बजेट चा आकडा जर कमी असेल (बहुधा असतोच!) तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात (मग आपल्याला बसायला सांगून ती निघून जाते. आणि नेमके त्याच दिवशी तिचे सर इतके बिझी असतात की आपल्याला भेटू शकत नाही. मग ती आपल्याला 'प्रोजेक्ट प्लान ' आणि 'कोस्टिंग शीट' देऊन आपली बोळवण करते.). पण चुकून जर आपल्या बजेटचा आकडा तिच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर लगेच ती सरांना भेटायला आतल्या केबिन मध्ये घेऊन जाते. मग सर बोलायला सुरु करतात.
" सर आमचा हा प्रोजेक्ट इतक्या इतक्या एकरांवर पसरलेला आहे. आसपास असं असं निसर्गसौंदर्य आहे. आम्ही अमुक अमुक फेजेस बांधतो आहे .....वगैरे वगैरे "
खरं म्हणजे आपल्याला दोनचं गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. घराचा एरिया किती ? भाव किती? पण या गोष्टी सर आपल्याला सगळ्यात शेवटी सांगतात. आणि दोघांचा गुणाकार ऐकू आपण तिथुन निघून जातो.
पण काहीही असो , यांच्या सोसायट्यांचे नाव मात्र ऐकण्यासारखे असतात. 'नेस्टोरीया', ,ओनेलीया', 'ग्रेसिया', 'रोझ व्हिला', 'प्रिस्टिन गार्डन' !! नाव ऐकल्यावरच आपण साहेबाच्या देशात आल्यासारखे वाटते. पण मला सांगा नेस्टोरीया धनकवडी ,ओनेलीया हांडेवाडी , ग्रेसिया तळेगाव ढमढेरे , रोझ व्हिला कोंढवा बुद्रुक असे पत्ते साहेबाच्या देशात असतील का हो ? असो. दुसरी ऐकण्यासारखी गोष्ट म्हणजे साइट लोकेशन . ते लोकेशन शहरापासून कितीही लांब असो तरीसुद्धा ते एकतर 'मोस्ट डेव्ह्लप्ड' तरी असतं किंवा 'नेक्स्ट डेस्टीनेशन' तरी असतं. आसपास सगळीकडे जंगल जरी असलं तरी तिथे लवकरच ‘Shopping Mall” किंवा ‘IT Park’ होणार असतो. शिवाय समोर ओसाड पडलेल्या जागेवर एक साठ मीटर रुंद रस्ता मंजूर झालेला असतो. जो एकीकडे विमानतळ आणि दुसरीकडे डायरेक्ट हिंजेवाडीला जाऊन मिळणार असतो. तो रस्ता कोणी मंजूर केला ? कोण बांधणार आहे? कधी बांधणार आहे ? असले मुर्खासारखे प्रश्न विचारायचे नसतात.
एक साइट लोकेशन बघायला गेलो असताना मी तिथल्या माणसाला जास्त किमतीचे कारण विचारले. तो म्हणाला ," साहेब इथून हायवे एकदम जवळ आहे ". आता हायवे आणि ते लोकेशन याच्या मधात साधारण तीन डोंगर होते. आणि कच्च्या रस्त्याने हायवे पर्यन्त जायला वीस मिनिटे लागत होती !! बरं समजा लोकेशन हायवे टच जरी असलं तरी त्याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग असतो ? आपल्या मुलांना जर क्रिकेट खेळायचं असेल तर ते हायवेवर जातील का ? हायवेवरच्या वाहनांचा आवाज आणि उडणारी धूळ यांचा काय उपयोग ? जास्त पैशे नक्के मोजायचे कशासाठी ?
सोसायट्यान्मध्ये मिळणाऱ्या ‘Ammenities’ ही आणखी एक मजेदार बाब आहे. प्रत्येकी बारा मजल्यांच्या बावीस इमारती असलेल्या एका लोकेशनवर मी गेलो होतो. तिथे स्विमिंग पूल, जौग्गिंग रुट, गार्डन, जीम इ. सगळ्या ammenities होत्या. मी नं राहवून एक प्रश्न विचारला ," बावीस इमारती बांधल्यावर सुर्य दिसेल का हो ? की त्यासाठी वेगळा ammenity charge द्यावा लागेल ?
याशिवाय आपल्या लोकेशन पासून सगळ्याच गोष्टी किती जवळ आहे याचा हिशोब अंतरात नाही तर मिनिटात दिला जातो. दिलेला वेळ हा बहुतेक विमानप्रवासाचा असावा असं माझा अंदाज आहे. उदा. खराडी बायपास ते पुणे स्टेशन हे साधारण १० किमी अंतर १७ मिनिटे असं दाखवलं असते. दिवसातल्या कोणत्याही वेळी हे अंतर १७ मिनिटात पार करता येत नाही. विमानाने बहुधा शक्य असावं.
जागेचे दर वाढवण्याचे कारणं तर अनाकलनीय असतात. अक्षरश: "खूप दिवसात भाव वाढवलाच नव्हता म्हणून वाढवला" अशी कारणं सुद्धा सांगण्यात येतात. प्रस्तावित विमानतळ, मेट्रो, आयटी पार्क ह्याच्या नावाखाली भाव वाढवले जातात. आपल्या नातवाच्या लग्नापर्यन्त ते विमानतळ बांधून होत नाही. आणि बांधून झालंच तर नातू विमानात बसून परदेशात स्थायिक व्हायला जातो. मग आयुष्यभर आपण उडणारी विमानं बघायची !
असो. तर घर शोधण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सगळी गणितं जमून आली तर घर नक्के होईल. मग उरलेलं आयुष्य ईएमआयरुपी गणितं सोडवायची आहेतच !!!
-- चिनार
वाचने
25078
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक अंगठ्याचा नियम :
या अंगठ्याच्या नियमामागे काय
In reply to एक अंगठ्याचा नियम : by प्रसाद१९७१
जर भाडे EMI च्या अर्ध्या
In reply to या अंगठ्याच्या नियमामागे काय by आदूबाळ
कैच्याकै लॉजिक...
In reply to जर भाडे EMI च्या अर्ध्या by प्रसाद१९७१
आहो पण घर हे एक स्थावर
In reply to कैच्याकै लॉजिक... by जिन्क्स
तर
In reply to जर भाडे EMI च्या अर्ध्या by प्रसाद१९७१
मला फार काही कळले नाही, पण हा
In reply to तर by आदूबाळ
NAVHouseValue काढाल तेंव्हा
In reply to तर by आदूबाळ
ओके. धन्यवाद!
In reply to NAVHouseValue काढाल तेंव्हा by प्रसाद१९७१
हे काय आहे ते कोणी सांगेल काय
In reply to तर by आदूबाळ
छान !
हल्ली पुण्यात घर घेणे अतिशय जिकिरिचे झाले आहे....
In reply to छान ! by विटेकर
पोलिस ? कारकून
In reply to छान ! by विटेकर
शिवाय शिक्षकांनाही कमी समजू
In reply to पोलिस ? कारकून by कपिलमुनी
+१
In reply to शिवाय शिक्षकांनाही कमी समजू by नगरीनिरंजन
काहीही!
In reply to शिवाय शिक्षकांनाही कमी समजू by नगरीनिरंजन
नगं. आधीच तिथं गाळ भरलाय. या
In reply to काहीही! by बोका-ए-आझम
शिक्षकांविषयी तुच्छता का?
In reply to नगं. आधीच तिथं गाळ भरलाय. या by काळा पहाड
बोकासाहेब आत्ता जन्माला आलो
In reply to शिक्षकांविषयी तुच्छता का? by बोका-ए-आझम
शिक्षण व्यवसाय हा धंदा आहे की सर्व्हिस?
In reply to बोकासाहेब आत्ता जन्माला आलो by काळा पहाड
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे
In reply to बोकासाहेब आत्ता जन्माला आलो by काळा पहाड
"₹" कसे टायपले ते सांगू शकाल
In reply to सर्वात पहिली गोष्ट म्हणजे by बोका-ए-आझम
जस्ट मराठी
In reply to "₹" कसे टायपले ते सांगू शकाल by डॉ सुहास म्हात्रे
आणि मी म्हणतोय की बहुतांशी
In reply to सर्वात पहिली गोष्ट म्हणजे by बोका-ए-आझम
अच्छा! म्हणजे विद्यार्थी
In reply to आणि मी म्हणतोय की बहुतांशी by काळा पहाड
सगळे शिक्षक किंवा सगळे सरकारी
In reply to अच्छा! म्हणजे विद्यार्थी by बोका-ए-आझम
नशीब तुमच्यासारखे लोक या
In reply to अच्छा! म्हणजे विद्यार्थी by बोका-ए-आझम
@काळा पहाड, तुमच्या वरील
In reply to नशीब तुमच्यासारखे लोक या by काळा पहाड
शिक्षकी पेशाची इतकी लाज
In reply to @काळा पहाड, तुमच्या वरील by हाडक्या
बोकासाहेब म्हणजे बायबल नव्हे
In reply to शिक्षकी पेशाची इतकी लाज by काळा पहाड
नकारात्मक विचार
In reply to नशीब तुमच्यासारखे लोक या by काळा पहाड
भडकमकर मास्तर
In reply to नकारात्मक विचार by बोका-ए-आझम
तुम्हाला काहीतरी मानसिक
In reply to भडकमकर मास्तर by बोका-ए-आझम
तुमचा मुद्दा तर्कावर आधारलेला
In reply to तुम्हाला काहीतरी मानसिक by काळा पहाड
पिंकावरुन हि बातमी आठवली
In reply to काहीही! by बोका-ए-आझम
आता विषय निघालाच आहे तर मराठी
In reply to काहीही! by बोका-ए-आझम
धन्यवाद !!
In reply to छान ! by विटेकर
अहो
हिंजेवाडी नाही हो...हिंजवडी
घर - घर
बेक्कर
सध्या फ्लॅट्स जास्त खपत
In reply to बेक्कर by चिरोटा
फक्त
In reply to सध्या फ्लॅट्स जास्त खपत by नगरीनिरंजन
बिल्डर्स चे ऑफिस , फ्लॅट्च्या प्रोजेक्ट्सची नावे युरोपियन्स्टाईल
जाहिरतीचे
In reply to बिल्डर्स चे ऑफिस , फ्लॅट्च्या प्रोजेक्ट्सची नावे युरोपियन्स्टाईल by सिरुसेरि
रिसेलचा घ्या
मित्रांबरोबर पिंपळे सौदागर
हहपुवा
In reply to मित्रांबरोबर पिंपळे सौदागर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मी : हे काय संडासाच्या
In reply to मित्रांबरोबर पिंपळे सौदागर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
(No subject)
In reply to मित्रांबरोबर पिंपळे सौदागर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हं, मात्र बसल्यानंतर गार्डन व्ह्यू होणार नसल्यामूळेत्या व्ह्यूसाठी मिपावरच्या एका प्रस्थापित कवीच्या कविता चाळा... :) ;)एका प्रस्थापित कवीच्या कविता
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
फ्लॅट विकत घेणे आवश्यक असते
वाक्य थोड भंपक वाटू शकत
मग नक्की काय? थोडा भंपकपणा
In reply to वाक्य थोड भंपक वाटू शकत by पिंपातला उंदीर
नाय ओ. राहु दे
झकास अन निखळ हलकाफुलका लेख.
लॅटिन नावे आणि स्टाईलिश टॅगलाईन्स
In reply to झकास अन निखळ हलकाफुलका लेख. by गवि
असेच!
In reply to लॅटिन नावे आणि स्टाईलिश टॅगलाईन्स by कपिलमुनी
धन्यवाद !!!
In reply to झकास अन निखळ हलकाफुलका लेख. by गवि
परवडेल तिथे घ्या ना!
एकदम मेट्रो शहरात घर
In reply to परवडेल तिथे घ्या ना! by पैसा
होय ना!
In reply to एकदम मेट्रो शहरात घर by गवि
वा!
आपला पसारा आपल्याला आवरता येईल एवढाच वाढवावा.हे आयुष्यातील सर्वच बाजूना सदासर्वदा लागू आहे. स्वाक्षरीची पद्धत बंद झाली म्हणून नाहीतर हे वाक्य स्वाक्षरीसाठी क्लेम केले असते. पै ताई , पण बर्याच वेळा पीयर/ नेबर/स्पाउस प्रेशर ही भयंकर असते. त्याला तोंड देणे फार अवघड असते. तिथे एकदम ऑट ऑफ क्राउड व्हायला वाघाचेच काळीज पाहीजे. आणखी एक म्हणजे नोकरीतील प्रचंड अनिश्चितता आणि ती वाढत्या वयाबरोबर वाढतच असते ! दैवयोगाने बाका प्रसंग आलाच तर उपयोगी पडावे म्हणून लोक घरे घेऊन आश्वस्त होण्याचा खुळा प्रयत्न करतात. - गरज नसताना तळेगांवात घर घेतलेला विटेकरविटूकाका
In reply to वा! by विटेकर
स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक
@ अनुप ढेरे
In reply to स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक by अनुप ढेरे
स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक
In reply to स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक by अनुप ढेरे
@ अनुप ढेरे
In reply to स्वतःचं एक घर असताना गुंतवणूक by अनुप ढेरे
खरे साहेब, तुमचे मत पटले नाही
In reply to @ अनुप ढेरे by सुबोध खरे
आणि मुंबई-पुण्यात
In reply to खरे साहेब, तुमचे मत पटले नाही by नगरीनिरंजन
+१
In reply to आणि मुंबई-पुण्यात by नगरीनिरंजन
न नि साहेब
In reply to आणि मुंबई-पुण्यात by नगरीनिरंजन
जाता जाता
In reply to न नि साहेब by सुबोध खरे
यात (बांधकाम व्यवसाय) मुख्यत:
In reply to जाता जाता by सुबोध खरे
विटेकर आणि पैसा ++
या धाग्यावर काही वात्रट बोलेल
In reply to विटेकर आणि पैसा ++ by कंजूस
या धाग्यावर काही वात्रट बोलेल तो रौरव नरकातहैला, हे संमंच्या वैधानिक इशार्यात टाकण्याइतके वजनी वाक्य आहे. इतकी सोपी आयड्या अगोदर कशी कुणाला सुचली नाय ???तीव्र सहमती
In reply to या धाग्यावर काही वात्रट बोलेल by डॉ सुहास म्हात्रे
घरघर खरी आहे आणि या धाग्यावर
In reply to विटेकर आणि पैसा ++ by कंजूस
२ वर्षांपूर्वी मी
मलाही असंच वाटत होतं. ते आता
In reply to २ वर्षांपूर्वी मी by पिंपातला उंदीर
दुसर्या घराबद्दल मी बोलत नाही
आपले राहते घर स्वतःच्या
१००% मान्य
In reply to आपले राहते घर स्वतःच्या by प्रसाद१९७१
आम्ही तर
डाउन पेमेन्ट
In reply to आम्ही तर by मनिमौ
आमच्या कामवाल्या मावशींना
तुमच्या कामवाली ला सांगा की
In reply to आमच्या कामवाल्या मावशींना by पिलीयन रायडर
मावशी स्वतः पोळ्या, धुणी
In reply to तुमच्या कामवाली ला सांगा की by प्रसाद१९७१
मस्त खुसखुशीत !
प्रोपोजड रोड्स