मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मटाची मैफल - मिपाचा सहभाग

नीलकांत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, मराठी साहित्य जगताचा आढावा घेण्यासाठी तसेच साहित्य जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची एक मैफल महाराष्ट्र टाइम्सने येत्या शनिवार रविवारी आयोजीत केली आहे. यात मिसळपाव तर्फे रामदास काका सहभागी होत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी यात सहभाग घ्यावा असे सुचवतो.

वाचने 9352 वाचनखूण प्रतिक्रिया 36

शिद 19/12/2014 - 18:58
वाह मस्तच. रामदास काकांना भरपूर शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/12/2014 - 21:22
रामदास काका जोरदार होऊ दे परीसंवाद. होऊ दे, मिपाचा धमाका. :) वृत्तांत येऊ द्या भो. -दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम 19/12/2014 - 21:26
नक्की जाऊन येईन.पुस्तक प्रदर्शन आणि विक्री हे शब्द ' जेवण तयार आहे ' आणि ' The Salary is credited ' एवढेच जादुई आहेत!

In reply to by खटपट्या

सखी 20/12/2014 - 05:00
अनेक शुभेच्छा, वृत्तांत वाचायला मिळावा जे जाणार असतील त्यांना विनंती.

मितभाषी 19/12/2014 - 21:38
हेच बोलतो.

खेडूत 19/12/2014 - 21:44
शुभेच्छा. नंतर तू नळीवर हा कार्यक्रम पहायला मिळाला तर बहार येईल! (. . हे भडकमकर म्हणजेच आपल्या इथले मास्तर काय? )

In reply to by टवाळ कार्टा

सतिश गावडे 20/12/2014 - 10:19
रामदास काकांच्या हापिसात मिपाकर जमले की गप्पांचा मैफल अशी काही जमते की विचारु नका. त्यात सुनील काका आणि डॉ. खरेंसारखे ज्येष्ठ मिपाकर असतील तर दुग्ध शर्करा योग असतो तो.

प्यारे१ 19/12/2014 - 23:27
रामदासकाकांचं 'रामदास' असं अधिकृत नामकरण झालं का काय? ;) मूळ नावाचा किस्सा त्यांनी ठाणे भेटीत सांगितला होता. सगळ्यांना शुभेच्छा आहेतच.

ज्ञानोबाचे पैजार 20/12/2014 - 08:31
अरे वा, मस्तच. रामदासकाका आगे बढो हम तुम्हारे साथ है. पैजारबुवा,

गवि 22/12/2014 - 09:48
सकाळीच रामदासकाका अन भुस्कुटेताई या जालीय मित्रांना मटामधे पाहून अन वाचून खुषी जाहली.. झकास..

In reply to by गवि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/12/2014 - 09:55
आधुनिक प्रकारात साहित्य प्रसिद्घ करणे सोपे आणि स्वस्त असल्याने जातीय-धार्मिक तेढ किंवा अश्लील स्वरूपाचा मजकूर प्रसिद्घ होणे सुरू झाले आहे. त्यावर सरकारी वा कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. हे वाढीस लागले तर धोकादायक असल्याने ई-साहित्य व्यवहारावर कोणाचे तरी नियंत्रण असायला हवे, असे मत सामंत यांनी मांडले. मात्र, बिवलकर व भुस्कुटे यांनी या मताशी फारकत घेत नियंत्रण लादणे अयोग्य ठरेल, असे मत मांडले. व्वा रामदास का व्वा..!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुनील 22/12/2014 - 09:58
मात्र, बिवलकर व भुस्कुटे यांनी या मताशी फारकत घेत नियंत्रण लादणे अयोग्य ठरेल, असे मत मांडले.
बाडिस!!

In reply to by सुनील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/12/2014 - 10:08
मिपाचा जन्म मुळीच संपादकीय 'कात्रीशी' काडीमोड घेऊन झालाय. मिपा चटकदार चवदार आणि तर्रीबाज करण्यात या 'कमी कात्रीचा' मोठा वाटा आहे, हं आता भविष्य काळात काय काय वाढून ठेवलं असेल ते देवालाच माहिती. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतकी बोथट धारेची कात्री असुनही माझा धागा कापला जातो याचे मला दु:ख होते, म्हणजे दु:ख असे होते की माझा धागा इतका नाजुक कि या बोथट धारे च्या कात्री ने ही कमी कात्री ने हि कापला जावा ? म्हणजे कुछ तो नाजुक मिजाज है हम और ये जख्म भी जवॉ है अभी तुमची वरती ओळख असेल तर आमच्या भावना पोचवा हो प्रा डॉ साहेब अजुन एक दु:ख म्हणजे आमच्याहुन कठीण धागे म्हणजे उदा,. तुम्हाला कोण स्पायसी वाटते इ. चालतात मात्र आमचा... म्हणजे वो कत्ल भी करते है तो चर्चा नहि होता और हम आह भी भरते है तो असो हा व्य नि आहे असे समजुन वाचा अपने दोनो मे की बाते है दिवारो के भी कान होते है. और इस सिमेंट मे जान है.... हि संपादकांविरोधात तक्रार नाहि हे स्वगत आहे, व व्यक्तीगत संवाद आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/12/2014 - 11:34
esahitya (छा.चि.म.सौ) -दिलीप बिरुटे