शतशब्दकथा ( आतिवासताईना गुरु करून)
‘अरे आज ऑफिसला नाही का जायचे ?’
‘अलीकडे मला ऑफिसला जावेसेच वाटत नाही बघ ! काही मजा नाही राहिली !’
‘ते का ?’
‘अरे, तिथे मी कुणाला आवडत नाही. सगळे मला टाळतात...
...माझ्याबरोबर कुणी बसत नाहीत. मी बोलावल्याशिवाय कुणी माझ्याकडं येत नाहीत. आले तरी कामापुरतं येतात. अन लगेच जातात. कामापुरतंच बोलतात. मी ऑफिसात आलो की हसणे खिदळणे बंद करतात अन गंभीर चेहेरे करून फायलीत खुपसतात. चहाला जाताना मला दिसू नये अशी दक्षता घेतात.
....मी एकटाच डबा खातो. सिगारेट ओढतो. अन परत कामाला लागतो.’
‘अरे पण पूर्वी तू किती उत्साहानं ऑफिसला जायचास !’
‘हम्म.. आता मी बॉस झालो आहे ना !’
वाचने
6127
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
खी खी खी. बॉस इज अल्वेज राईट.
खी खी खी.
बॉस इज अल्वेज राईट.
हा हा हा.. मस्त
एका उमेदवाराची नोकरी साठी मुलाखत सुरु असते.
मुलाखत घेणारा त्याला विचारतो "या आधिची नोकरी का बरं सोडलीत?"
उमेदवार सांगतो "मी नाही सोडली. आमच्या कंपनीने त्यांच कार्यालय दुसरी कडे हालवले पण जाताना त्यांनी मला नव्या कार्यालयाचा पत्ताच सांगितला नाही."
पैजारबुवा,
ही तर माझीच गोष्ट लिहीलीत
ही तर माझीच गोष्ट लिहीलीत तुम्ही.
फक्त ते सिगारेट प्रकरण सोडुन .
आता यावर उपायही सांगा ना प्लीज??????
आत्मनीरीक्षण करा हा फाउल समजला जाईल हा!!!!!!
हे व्यावसायिकांना लागू होत
In reply to ही तर माझीच गोष्ट लिहीलीत by विलासराव
हे व्यावसायिकांना लागू होत नाही, पण मॅनेजर्सना जरूर होतं: दुसरी कंपनी join करा आणि मग जुन्या कंपनीतल्या ज्युनिअर्सशी तुमची मैत्री कशी वाढत जाते ते अनुभवा.
खिक्क.
खिक्क.
असाच एक जोक.
आई: चल रे उठ. शाळेत जायचंय ना?
मुलगा: मी नाही जाणार.
आई: काय झालं?
मुलगा: कुणीकुणी नीट बोलत नाही. सगळे कामापुरतं बोलतात, डबा शेअर करत नाहीत, गप्पा मारत नाहीत, चेष्टामस्करी करत नाहीत, सकाळच्या प्रार्थनेपासून शाळा सुटली तरी उशीरपर्यंत थांबायला लागतं, सगळं नीट पूर्ण करायला लागतं.
आई: अरे पण जायला पाहिजे की तुला..... मुख्याध्यापक आहेस ना तू?
आवडली नाही...
In reply to खिक्क. by प्यारे१
अगदी...अगदी.... त्यावरूनच ही शतशब्द कथा बेतलेली आहे. त्यांमुळे तेव्हढी भावली नाही.
असं काही नसतंय हो.
In reply to आवडली नाही... by प्रभाकर पेठकर
असं काही नसतंय हो.
रामलक्ष्मण, अन्नू मलिक, राजेश रोशन ह्यांचं संगीत आवडतं का? गेला बाजार प्रीतमचं?
'कधीकधी' ते संगीत सुद्धा इन्स्पायर्ड असतं. चालतं थोडंफार.
+१ असेच म्हणतो.
In reply to आवडली नाही... by प्रभाकर पेठकर
+१ असेच म्हणतो.
--
मी ऐकलेले व्हर्जन-
आई- शाळेला का जाणार नाहीस याची २ कारणे सांग
मुलगा - शाळेत माझ्याशी कोणी जास्त बोलत नाही, आणी सगळे चेष्टा करतात. तूच सांग दोन कारणं की मी का जायचं शाळेला?
आई- अरे आता तुझे वय ५५ आहे, आणी तू मुख्याद्यापक आहेस शाळेचा.
(No subject)
:)
मस्त...
लेख आणि प्रतिसाद जबरदस्त...
मुविन्नी प्रतिसादाची
In reply to मस्त... by मुक्त विहारि
मुविन्नी प्रतिसादाची टेम्पलेट्स करून ठेवली आहेत बहुतेक. ;-)
टेंप्लेट्स नाही, ऑटो रिप्लाय
In reply to मुविन्नी प्रतिसादाची by विश्वनाथ मेहेंदळे
टेंप्लेट्स नाही, ऑटो रिप्लाय.
If subject==kavita reply mast kavita, aavaDali
फक्त कुठे "कट्टा", "डंबोली",
In reply to टेंप्लेट्स नाही, ऑटो रिप्लाय by यसवायजी
फक्त कुठे "कट्टा", "डंबोली", "मध्यवर्ती", "बियर" असे शब्द दिसले तरच ते फिल्टर आऊट होऊन खरे (म्हणजे असली. सुबोध नव्हे) मूवि प्रतिसाद देतात.
"कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट
In reply to फक्त कुठे "कट्टा", "डंबोली", by आदूबाळ
"कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट क्याट्यागरीत येतो. मुविंना तात्काळ एसेमेस आणी मेल जातो. मुवी लगेच (आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात. :D
शोधायला कशाला पाहिजे ???
In reply to "कट्टा" हा कीवर्ड हाय अलर्ट by यसवायजी
शोधायला कशाला पाहिजे ??? जगातील सर्वात convinient ठिकाण आणि वेळ ठरलेली आहे.
रविवार रात्रौ ८ वाजता डोम्बोली स्टेशन पासून फ़क्त ४-५ किलोमीटर वर ;-)
असो जास्त अवांतर नको.
टिप:- हलके घ्या हो मुवि.
(आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती
In reply to शोधायला कशाला पाहिजे ??? by विश्वनाथ मेहेंदळे
(आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती ठिकाण शोधतात
-
असो जास्त अवांतर नको.
टिप:- हलके घ्या हो मुवि.
करा थट्टा बिंधास्त...
In reply to (आधीपासून ठरलेले) मध्यवर्ती by यसवायजी
बादवे,
ह्यावेळी पण ठिकाण तेच आहे.
कोण-कोण येणार?
मी हाय..."पक्षी" असेल अशी आशा
In reply to करा थट्टा बिंधास्त... by मुक्त विहारि
मी हाय..."पक्षी" असेल अशी आशा करतो ;)
(No subject)
:-)
.
छ्हान
आवडली
शतशब्दकथा आवडली.
जमलीये की!
जमलीये की!
कथा वाचतानाच त्याच्याशी
कथा वाचतानाच त्याच्याशी संबधित विनोद आठवला त्यामुळे कथा फारशी आवडली नाही. आपल्याला शतशब्दकथा आवडतात त्या फक्त आतिवास तैंच्या. :)
हा जोक आधी ऐकलाय.
हा जोक आधी ऐकलाय.
पण कथा पण जमली आहे. पु.ले.शु. :)
हो. जमलीये. एकदम वास्तववादी
In reply to हा जोक आधी ऐकलाय. by कवितानागेश
हो. जमलीये. एकदम वास्तववादी आहे. मला फ्रेशर असल्यापासून या मुद्द्यावरून manager लोकांबद्दल कणव वाटत आलीये.
हे काय कथा नॉट अॅट ऑल स्नेहातै ट्च
सो नॉट मनको भावींग.
मजा
वरीलपैकी बऱ्याच प्रतिसादांमधून असे जाणवले की हे लेखन आवडले नाही कारण
१. हे लेखन माझ्या चाकोरीत बसणारे नाही.
२. मी कुणाची तरी नक्कल केली.
३. एका विनादावर ते बेतले आहे.
मी हे एक मजेदार प्रयोग म्हणून लिहिले. हेतू फक्त इतरांनीपण ते एन्जॉय करावे. ही काही साहित्यकृती नव्हे. फक्त मजा आहे. Just Fun. काहींना त्याची मजा केवळ वरील कारणांसाठी घेता आली नाही याचे वाईट वाटले.
लेख प्रकाशित केल्यानंतर मला हे वेगळे नाव सुचले. शतशब्दविनोद.
(चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी)
स्नेहांकिता
>>(चाकोरीतून बाहेर पडण्याचा
In reply to मजा by सस्नेह
>>(चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी)
हे आवडले, हा प्रयत्न कायम सुरु ठेवा. कोण काय आपल्याबद्दल लिहित / बोलत आहे याकडे डोळसपणे पहा, पण आपला प्रतिसाद आपल्या लेखनातून द्या.
शुभेच्छा :)
१. हे लेखन माझ्या चाकोरीत
In reply to मजा by सस्नेह
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे
म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)
१. हे लेखन माझ्या चाकोरीत
In reply to मजा by सस्नेह
अशी कुणाची चाकोरी ठरवू नये. मागे एक मित्र संदीप खरे ची बडबडगीते ऐकून म्हणाला होता. संदीप खरे कडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हाही ते पटले नव्हते. आपण बुद्धिबळातील सोंगटया नाहीत. तिरके तर तिरकेच चालायला.
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे
म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
मग ?? परवा अंगूर सिनेमा पाहिला. आवडला. विषय संपला :-)
=))
=)) =))
( मी विनोद पहिल्यांदाच ऐकला आहे !! )
अम्मळ शिरियस असलेला
वाश्या
हा हा!
आवडला!