✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भविष्य (शतशब्दकथा)

ख
खेडूत यांनी
Wed, 09/03/2014 - 19:04  ·  लेख
लेख
''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत. अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच ! पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.'' ''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . '' ''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते! म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.'' ''नको. . . हिंदीत नको. '' ''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?'' ''छेछे , भलतंच काय?'' ''ठीकाय तुमची इच्छा! परत कधी लागलं तर कळवतोच.'' मोठ्या कष्टाने गोपाळराव घरी निघाले. आपल्याच कार्यक्रमाचं प्रारब्ध कसं नाही कळालं हा एकच विचार त्याना सतावत होता. (शतशब्दकथा)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
3900 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

या logical fallacy चं नेहेमीच

आदूबाळ
Wed, 09/03/2014 - 19:41 नवीन
=)) या logical fallacy चं नेहेमीच आश्चर्य वाटतं.
  • Log in or register to post comments

+१

आतिवास
Wed, 09/03/2014 - 21:17 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सगळ्या भविष्य/पत्रिका

टवाळ कार्टा
Wed, 09/03/2014 - 19:47 नवीन
सगळ्या भविष्य/पत्रिका बघणार्यांच्या घरात पाठवा याची छापिल प्रत \m/
  • Log in or register to post comments

१०० + १

एस
Wed, 09/03/2014 - 19:49 नवीन
एकशे एक शब्द आहेत एकूण. :-P बाकी कथा आवडली.
  • Log in or register to post comments

छेछे ! अहो हा एकच शब्द धरलाय!

खेडूत
गुरुवार, 09/04/2014 - 18:39 नवीन
छेछे ! अहो हा एकच शब्द धरलाय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

गोपाळरावानी त्यांचे आडनाव

विजुभाऊ
Wed, 09/03/2014 - 19:55 नवीन
गोपाळरावानी त्यांचे आडनाव थडानी/ सहानी /जुमानी / शुक्ला / पांडे असे केले असते तर त्यांचे प्रारब्ध चांगलेच सुधारले असते.
  • Log in or register to post comments

+++१११

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/04/2014 - 05:47 नवीन
+++१११ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बर हाय.

जेपी
Wed, 09/03/2014 - 20:02 नवीन
बर हाय.
  • Log in or register to post comments

आवडली कथा !!

खटपट्या
Wed, 09/03/2014 - 23:28 नवीन
आवडली कथा !!
  • Log in or register to post comments

छान..!!

योगी९००
गुरुवार, 09/04/2014 - 09:27 नवीन
आवडली कथा !!
  • Log in or register to post comments

सर्वांचे खूप आभार !!

खेडूत
गुरुवार, 09/04/2014 - 18:40 नवीन
सर्वांचे खूप आभार !!
  • Log in or register to post comments

क्या बात है ! ग्रेट.

सौन्दर्य
Wed, 04/08/2015 - 20:39 नवीन
क्या बात है ! ग्रेट.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा