Skip to main content

भविष्य (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 03/09/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत. अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच ! पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.'' ''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . '' ''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते! म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.'' ''नको. . . हिंदीत नको. '' ''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?'' ''छेछे , भलतंच काय?'' ''ठीकाय तुमची इच्छा! परत कधी लागलं तर कळवतोच.'' मोठ्या कष्टाने गोपाळराव घरी निघाले. आपल्याच कार्यक्रमाचं प्रारब्ध कसं नाही कळालं हा एकच विचार त्याना सतावत होता. (शतशब्दकथा)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3924
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

एकशे एक शब्द आहेत एकूण. :-P बाकी कथा आवडली.

गोपाळरावानी त्यांचे आडनाव थडानी/ सहानी /जुमानी / शुक्ला / पांडे असे केले असते तर त्यांचे प्रारब्ध चांगलेच सुधारले असते.

आवडली कथा !!