पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती.
च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.
च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला.
किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर.
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘
विषकन्या’
.
वाचने
4172
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंहं
कुछ जम्या नही !
पुलेशु.
हम्म्
In reply to अंहं by सस्नेह
येईच्च बोलां मैं.
+२
In reply to हम्म् by एस
+२
ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत
काय टेकून?
;)
नक्की काय विचारायचे आहे...
In reply to ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत by यसवायजी
नक्की काय विचारायचे आहे..."काय टेकवुन" की "कशाला टेकुन"
रच्याकने...हा लेख "थोडा है थोडे की जरुरत है" टाइप झालाय...मसाला कमी पडला
एक बदल..
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘
याऐवजी
आईग! त्याने डोळे मिटले. क्षणभरा करता वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. त्याचे लक्ष तिच्या पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ विषकन्या’
हे कसे वाटते???
हे पटतंय.
In reply to एक बदल.. by योगी९००
हे पटतंय.
मेलेला माणूस बघू शकत नाही.
In reply to एक बदल.. by योगी९००
मेलेला माणूस बघू शकत नाही. ठीक वळणा आधी तिची कार उभी होती. ती बाहेर कदाचित 'शिकार साठीच उभी का नसेल? विचार करा.
जम्या
जम्या
काय झेपलं न्हाई बा ..........
काय झेपलं न्हाई बा ..........
योगी९०० .
हे बरोबर वाटतंय
वा छान मस्तं जमलं आहे. आवडले.
वा छान मस्तं जमलं आहे. आवडले.
ति पुस्तक आधि वाच्ते मग
ति पुस्तक आधि वाच्ते मग पुस्तकाचे नाव?
चांगला प्रयत्न
मला तरी कथा समजली.
पण
मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. पुस्तक वाचायला आहे की नाही ते माहित नाही.
भूतं असतील ही सगळी!
In reply to पण by तिमा
भूतं असतील ही सगळी! :P
चूक..
In reply to पण by तिमा
>>>>मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे.
महामार्गावर (हायवे वर) नाहीये, द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे वर) आहे. तिथेही खंडाळापरिसरात नाहीए.
पटाईत
विवेक नमस्कार,
कविता आवडली. एक धागा मी सोडलाय. त्यातील कथनाप्रमाणे कवित्व करून सादर करावे ही विनंती.