धरणीकंप!!
लेखनप्रकार
आज लॉस एंजेलिस परिसरात सकाळी ११.४० च्या सुमाराला धरणीकंप झाला....
आम्ही आपले रोजच्याप्रमाणे ८.३० ला ऑफिसात आलो होतो.....
पुढ्यातल्या कामाचा आढावा घेतला......
त्यातील किती हाताखालच्या लोकांवर सोपवता येतील ती सोपवली.....
अगदी स्वतःलाच करावी लागणारी कामं उरकून मिसळ्पाव उघडला.......
जरा कुठे इस्ट्-कोस्ट वाल्यांचा मिपा कट्टा वाचून त्यावर एक खट्याळ प्रतिक्रिया लिहून एन्टर करतोय न करतोय तोच.......
सगळी केबिन थरथरायला लागली......
प्रथम वाटलं की बिल्डींगमध्ये काहीतरी ड्रिलींगचं काम वगैरे चालू असेल.........
पण मग माझी चाकं असलेली खुर्ची कंप्यूटरपासून लांब-लांब जाऊ लागली......
आम्ही नेहमी बूट काढून आणि मांडी घालून आमच्या खुर्चीवर बसतो! प्राथमिक शाळेची सवय, दुसरं काय!!!:)
लांब जाणारी खुर्ची सावरण्यासाठी म्हणून पाय झटकन खाली घेऊन जमिनीला टेकवले......
तोच.........
एक विलक्षण ताकदीची थरथरणारी लहर पायाखालून गेली.......
धाड, धाड, धाड!! जोराचा आवाज झाला.......
अरे हा तर धरणीकंप!! कॅलिफोर्नियात इतकी वर्षे राहिल्यामुळे लगेच अनुमान केलं......
हा धाड-धाड आवाज लिफ्टसचा!!
जेंव्हा धरणीकंप होतो तेंव्हा लिफ्टस कधीकधी आपल्या पोकळीतून निसटून बाजूच्या भीतींवर आदळतात!! त्यांचा मोठा आवाज होतो........
ऑफिसातली प्रत्येक वस्तू भरतनाट्यम केल्यासारखी थरथर नाचत होती.......
लगेच धावत जाऊन बाजूच्या प्रयोगशाळेत जाऊन बघितलं........
प्रत्येक काचेची वस्तू, म्हणजे ९०% लॅब किणकिण आवाज करत थरथरत होती........
काही वस्तू जमिनीवर पडत होत्या, आपटुन फुटत होत्या.......
माझ्या सहकार्यांनी तेव्हढ्यात चातुर्याने गॅस, इलेक्ट्रीसिटी हीटींग वगैरे बंद केलं होतं.....
पण अगोदरच उकळत असलेल्या द्रव्यापासून स्वतःचं संरक्षण करीत ते दूर उभे होते.......
तेव्हढ्यात इमर्जन्सी मॉनिटरवर घॉषणा झाली......
"ही इमर्जन्सी आहे, हे ड्रील नाही! कॄपया बिल्डिंगमधून बाहेर पडा व बाहेर आपापल्या अगोदरच निर्देशित केलेल्या जागेवर जाऊन उभे रहा......."
या घोषणेचा हजर असलेल्या लोकांवर दोन प्रकारचा परिणाम झाला......
जे नवीनच कॅलिफोर्नियात आले होते ते तडक बिल्डिंगच्या बाहेर पडले.......
जे आमच्यासारखे इथे बरीच वर्षे राहिले होते त्यांची प्रतिक्रिया वेगळी होती.......
मी माझ्या ऑफिसात आलो....
स्क्रीनवर मिपा अजून चालूच होतं......
बघतो तर भाग्यश्रीचा मेसेज आला होता धरणीकंपासंबंधी......
म्हटलं ही पोर नवीनच इथे आलीय लगीन करून, जरा हिचं टेन्शन कमी करूया......
तिला जरा विनोदी रिप्लाय पाठवला......
"गमन" केलं, मिपा बंद केलं.......
हो! जर बिल्डींग कोसळली तर नंतर उगीच सिक्युरिटीने नको पाहायला आमचं काय काय चाललं होतं ते......
घड्याळाकडे पाहिलं.....
पावणेबारा वाजल्येत!! म्हणजे ऑलमोस्ट लंच टाईम झालाच की..........
मी खाली आलो.......
तोवर धरणीकंप थांबला होता.........
:)
आता प्रथम काम आपले फॅमिली मेंबर्स कसे आहेत ते पहाणे.......
सेलफोनवरनं कॉल्स केले......
सगळे सुखरूप होते......
नेक्स्ट काम आपल्या घराला काही नुकसान पोहोचलेय का ते पहाणं.......
हो! इथे हॉलिवूडच्या परिसरात तुमचं घर सगळ्यात मौल्यवान!! बाकी दागिने वगैरे काही नाही!! दागिने काय, पुन्हा करता येतात!!!
मी आणि काकू घरी आलो. हो, ती ही तिथेच काम करत्ये!!!!
घरात आतून बाहेरून तपासणी केली....
सर्व ठीक-ठाक होतं.....
तपासणी करता करता माझ्या गॅस मीटरवर आलो......
इथे जळणाचा गॅस पाइपलाइनमधून येतो.....
गॅसचा वास येत होता......
माझ्या गॅस मीटरवर मी ऑटोमॅटिक स्क्रॅबलर बसवलेला आहे......
तो पॄर, धरणीकंप, वादळ असे काही झाले की ऑटोमॅटिक स्वीच ऑफ होतो.....
बघतो तो तो स्वीच ऑफ झालेला होता. मग हा वास कुठून येतोय?
बघतो तर माझ्या शेजारच्याच्या गॅस पाईपलाईनमधून लीक होत होतं!!!
भडवा! चिक्कू जर्मन साला!!
स्क्रॅम्बलर बसवायला काय झालं होतं रांडिच्याला!!
गॅस त्याच्या लाईनमधून लीक होतोय हे खरं, पण तो जास्त लीक झाला आणि ठिणगी पडली तर ती त्याच्या घराबरोबर माझंही घर भस्मसात करणार!!
काय करावं? त्याला कॉल करावा की आपणच मॅन्युअली त्याचा सेफ्टीव्हॉल्व बंद करावा.....
मोठा स्पॅनर (अमेरिकेत "रेंच") घेऊन येण्यासाठी माझ्या घरात आलो तर लॅपटॉपवर मुक्तसुनीताचा मेसेज.....
"भूकंप झाला असं कळलं, काय ती खुशाली कळावावी.......
त्याला कसाबसा रिप्लाय पाठवला, "बाबारे जरा थांब! सर्व खुशाल आहेत पण जरा तुला नंतर सविस्तर मेसेज पाठवतो....."
माझ्या घरातला सर्वांत मोठा रेंच घेऊन मी माझ्या शेजार्याच्या गॅस लाईनपाशी आलो.....
आता हा वर्षानुवर्ष न वापरलेला, गंजलेला व्हॉल्व्ह कसा बंद करायचा याच्या चिंतेत मी....
तेव्हढ्यात देवदूत यावा तर फायरब्रिगेडचा ट्रक आला......
त्यातून फायर मार्शल उतरला.....
आमच्या भागातील सगळ्याच घरांची पहाणी करत चालले होते म्हणे ते.....
मी परिस्थिती निवेदन करताच त्याने त्याच्या ट्रकमधून एक भला थोरला रेंच काढला आणि तो गॅस व्हॉल्व्ह बंद केला......
सेफ्टी स्क्रँबलर न लावल्याबद्द्ल माझ्या शेजार्याच्या आईच्या पातिव्रत्याबद्दल काही अपशब्द काढुन आणि माझ्या शेजारधर्माला जागण्याबद्द्ल कौतुक करून फायरमार्शल निघून गेला......
हुश्यऽऽऽ........
सर्व डेंजर आता संपलं होतं......
खरा प्रकार झाला तो असा,,,,,
लॉस अँजेलिसच्या चिनो हिल्य्स या उपनगराच्या खाली ८ मैल खोलीवर ५.४ रेक्टर स्केलचा धरणीकंप झाला.....
त्याच्या प्रभाव लास वेगास (नेव्हाडा) पर्यंत जाणवला.....
आमच्या इथल्या बिल्डिंग्ज थरथरा हलल्या.....
पत्त्याचे बंगले थरथराव्या अश्या.....
शेल्फवर ठेवलेल्या वस्तू खाली पडल्या पण मनुष्यहानी झालेली नाही....
कॅलिफोर्नियातील बहुतेक नव्या इमारती भूकंपाला रेजिस्टंट अशा बांधलेल्या आहेत त्यामुळे इमारत कोसळ्ल्याची अजून तरी बातमी नाही......
डांबिसकाका आणि त्याची फॅमिली सुखरूप आहे........
भाग्यश्रीही सुखरूप असावी........
सगळ्यात सांगण्याची गोष्ट ही.........
की भूकंप होताक्षणी आणि ती बातमी फार पसरण्याआधी.....
आणि भारतातल्या आमच्या फॅमिली मेंबर्सचे फोन चालू व्हायच्या आधी.........
मिपावरच्या आमच्या मित्रांच्या पृच्छा आधी सुरू झाल्या........
भाग्यश्री, मुक्तसुनीत, हे आम्ही कधीही विसरणार नाही........
आमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षा आधी तुम्ही चौकशी सुरू केलीत......
कुठे फेडणार आम्ही हे ॠण.......
आपला,
डांबिसकाका
वाचने
21096
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
सुखरूप
In reply to सुखरूप by भडकमकर मास्तर
+१
अरे बापरे!
हुश्श!
In reply to हुश्श! by विसोबा खेचर
सॉरी तात्या!!
In reply to सॉरी तात्या!! by पिवळा डांबिस
जे मनात
काकाश्री
मुंबईत ही दे धक्का
डाम्बीस
In reply to डाम्बीस by विजुभाऊ
ह्या, ह्या, ह्या!:)
बापरे
In reply to बापरे by सहज
जर्मन!
In reply to जर्मन! by पिवळा डांबिस
हाहाहाहा
In reply to हाहाहाहा by टारझन
व्वा!
अवांतर....
वा ! शैलेशराव अभिनंदन!
काका,
In reply to काका, by शैलेन्द्र
काही ही काय!!
In reply to काही ही काय!! by केशवसुमार
स्वत: काका
तुम्ही सर्व सुखरुप आहात हे वाचुन बरे वाटले.
In reply to तुम्ही सर्व सुखरुप आहात हे वाचुन बरे वाटले. by मनिष
काका तोसी ग्रेट हो!
In reply to तुम्ही सर्व सुखरुप आहात हे वाचुन बरे वाटले. by मनिष
अगदी
सुखरूप
काका,
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सगळे
काका,
माझा इथलाच
In reply to माझा इथलाच by भाग्यश्री
भाग्यश्री,
ह्म्म
In reply to ह्म्म by केशवसुमार
हेच म्हणते काका,
हुश्शा..
"शैलेन्द्र
काका
सॉलिड
बापरे!
In reply to बापरे! by पद्मश्री चित्रे
हो गं,
येणा-या
In reply to येणा-या by विजुभाऊ
ए
पुण्यातही जाणवला
विठ्ठलाची कॄपा आहे ...
बरे वाटले...
In reply to बरे वाटले... by विकास
असेच म्हणतो!
In reply to बरे वाटले... by विकास
खुशालीचा आनंद आहे !!!
In reply to बरे वाटले... by विकास
असेच म्हणतो
तुम्ही तर ग्रेट आहात.
सर्व कुटुंबासहित आपली आणि इतर मिपाकरांची
खुशाली
कॅलिफोर्नियात भुकंप..
भूकंपाचे भाकीत वर्तवता येणे शक्य आहे काय?
In reply to भूकंपाचे भाकीत वर्तवता येणे शक्य आहे काय? by प्रकाश घाटपांडे
भाकीत
In reply to भूकंपाचे भाकीत वर्तवता येणे शक्य आहे काय? by प्रकाश घाटपांडे
भु़कंप
In reply to भु़कंप by आनंद
नाही, असं काही होत नाही
५.४ ? फक्त ? ;-)
In reply to ५.४ ? फक्त ? ;-) by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आधी ५.८
In reply to ५.४ ? फक्त ? ;-) by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आमच्याकडेही