✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

धरणीकंप!!

प
पिवळा डांबिस यांनी
Wed, 07/30/2008 - 09:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21003 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Wed, 07/30/2008 - 09:42 नवीन

सुखरूप

सुखरूप आहात वाचून आनंद झाला... काळजी घ्या ,बरं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 07/30/2008 - 19:18 नवीन

+१

हेच म्हणतो. तुमची खुशाली ऐकली ; खूप बरे वाटले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
य
यशोधरा Wed, 07/30/2008 - 09:42 नवीन

अरे बापरे!

अरे बापरे! काळजी घ्या हो काका...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/30/2008 - 09:48 नवीन

हुश्श!

चला, सगळे सुखरूप आहेत हे वाचून बरं वाटलं रे डांबिसा.... कुणाला काही अपाय न होवो व सगळे सुखरूप व आनंदात राहोत हीच नियतीचरणी प्रार्थना..! सगळ्यात सांगण्याची गोष्ट ही......... की भूकंप होताक्षणी आणि ती बातमी फार पसरण्याआधी..... आणि भारतातल्या आमच्या फॅमिली मेंबर्सचे फोन चालू व्हायच्या आधी......... मिपावरच्या आमच्या मित्रांच्या पृच्छा आधी सुरू झाल्या........ भाग्यश्री, मुक्तसुनीत, हे आम्ही कधीही विसरणार नाही........ आमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षा आधी तुम्ही चौकशी सुरू केलीत...... कुठे फेडणार आम्ही हे ॠण....... क्या बात है डांबिसा, हे बाकी फार सुरेख लिहिलं आहेस! भडवा आणि रांडिच्या हे शब्ददेखील मनाला आनंद देऊन गेले! :) ( शुद्धलेखनाच्या पुस्तकात रांडिच्या या शब्दाचं र्‍हस्व-दीर्घ तपासलं पाहिजे एकदा! :) ) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 07/30/2008 - 10:25 नवीन

सॉरी तात्या!!

भडवा आणि रांडिच्या हे शब्ददेखील मनाला आनंद देऊन गेले! घटना घडल्यापासून आणि ती वर्णन केल्यापासून फारतर काही तासच लोटले आहेत..... जे मनात आलं ते खरंखरं लिहिलं..... अपशब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जनात क्षमस्व!! (मनातः गेले तेल लावत!!!! इथे भोगतोय आम्ही! यांच्या भावनांची कदर करायला टाईम आणि जाणीव आहे कुणाला!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 07/30/2008 - 10:32 नवीन

जे मनात

जे मनात आलं ते खरंखरं लिहिलं..... अरे तेच खरं! अगदी उत्तम केलंस...! :) समयोचित आणि प्रसंगानुरूप शिव्या ह्या भाषेचं सौंदर्य वाढवतात असं तात्या वाळंबे म्हणतात! ;) बाकी तुझं, 'जनातलं-मनातलं' आवडलं! :) आपला, (जनमनातला) तात्या वाळंबे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मदनबाण Wed, 07/30/2008 - 09:49 नवीन

काकाश्री

काकाश्री काळजी घ्या.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 07/30/2008 - 09:50 नवीन

मुंबईत ही दे धक्का

मुंबई सह पश्चिम महाराष्ट्राला मंगळवारी रात्री १२.३० सुमारास ४.२ स्केल चा धक्का बसला केंद्रबिंदू - कोयना परिसर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 09:51 नवीन

डाम्बीस

डाम्बीस काका हा असला प्रसंग संजयाच्या नेत्राने तुम्ही आम्हाला कळवला. तुमच्या ल्ह्यायच्या ष्टायली बद्दल काय बोलणार . डाम्बीस काका छान लिहितो म्हणणे हे पिवळा पिताम्बर सारखे द्विरुक्ती होते. असो काल आमच्याही कोयना भागात असाच एक पण नेहमी प्रमाणे पावसाळ्यात होतात त्या पैकी एक भुकंप झाला. ( कोण म्हण्तो कोकणचा कॅलिफोर्निया झाला नाहिय्ये) वित्त हानी झाली नाही. कारण त्या भागात रहाणार्‍या लोकांकडे फारसे वित्तच नसते. जीवित हानी म्हणजे दरड कोसळल्याने काही शेळ्या गुरे आणि पाच सहा माणसे दगावली. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 07/30/2008 - 10:27 नवीन

ह्या, ह्या, ह्या!:)

( कोण म्हण्तो कोकणचा कॅलिफोर्निया झाला नाहिय्ये) हे मात्र जबरदस्त!!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सहज Wed, 07/30/2008 - 09:58 नवीन

बापरे

तुम्ही सर्व सुखरुप आहात हे वाचुन बरे वाटले. त्या प्रसंगाचे वर्णन तर असे की जणू...जाउ दे... चक्क जर्मन असुन बेजबाबदार?? आता न विसरता त्याला स्क्रॅम्बलर किंवा असेच काहीतरी ख्रिसमस गीफ्ट देणार तर..
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 07/30/2008 - 11:04 नवीन

जर्मन!

चक्क जर्मन असुन बेजबाबदार?? बेजबाबदार असतील नसतील, पण अमेरिकेत रहाणारे मूळचे जर्मन अतिशय चिक्कू असतात हा आमचा अनुभव आहे.... तुम्ही त्याला जरूर काही शेकडो डॉलर्स पडणारा स्क्रँबलर पाठवा.... परतभेटीदाखल तुम्हाला तो २० सेंटस चे चॉकलेट पाठवतो का नाही ते बघा..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ट
टारझन Wed, 07/30/2008 - 11:08 नवीन

हाहाहाहा

ह.ह.मे. =)) =)) मास्तर लोक फार चिक्कू असतात असा आमचा आन्भव !! ह्यो जर्मन बी त्यातलाच !!! ड्यांबिस काका ... तुम्ही स्क्रँबलर बसवलाय हे वाचून जिव भांड्यात पडला . बाकी त्या फायरमन ने कोणता शब्द ऊच्चरला याची कल्पना खवीस लोक लग्गेच करू शकत्याल. :) अवांतर : पुढचा धरणीकंप कधी ? (सगळं घर हादरवणारा) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 07/30/2008 - 11:15 नवीन

व्वा!

अवांतर : पुढचा धरणीकंप कधी ? शुभ बोल रे नार्‍या... तर म्हणे मांडवाला लागली आग..... खविसा, तू काय सूर्यग्रहण असतांना जन्माला आला होतास काय रे!!:) (ह्.घे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
भ
भडकमकर मास्तर Wed, 07/30/2008 - 09:56 नवीन

अवांतर....

ऑटोमॅटिक स्क्रॅबलर बसवलेला आहे...... तो पॄर, धरणीकंप, वादळ असे काही झाले की ऑटोमॅटिक स्वीच ऑफ होतो..... मुंबईकरांनो...मुंबईतसुद्धा काही ठिकाणी जे गॅस कनेक्षन पाईपमधून दिले जातात, तिथे असले प्रकार आहेत का हो ? ?... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 07/30/2008 - 10:01 नवीन

वा ! शैलेशराव अभिनंदन!

अतिशय धीरोदात्त वागणूक! अशा प्रसंगी कसे वागावे ह्याचे मूर्तीमंत उदाहरण! तुम्हाला मनोमन सलाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 07/30/2008 - 10:28 नवीन

काका,

काका, घराला एक लींबु आणी काळी बाहुली (ऊलटी) बांधा, भुकंप झाला कि ति मस्त हलते....
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/30/2008 - 11:54 नवीन

काही ही काय!!

शैलेन्द्रशेठ, स्वत: काका असून काही फायदा झाल नाही, उगाच लिंबू कशाला वाया घालवा.. (निवृत्त बाहुली) केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/30/2008 - 17:48 नवीन

स्वत: काका

स्वत: काका असून काही फायदा झाल नाही, उगाच लिंबू कशाला वाया घालवा.. =)) :D राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
म
मनिष Wed, 07/30/2008 - 10:49 नवीन

तुम्ही सर्व सुखरुप आहात हे वाचुन बरे वाटले.

तुम्ही सर्व सुखरुप आहात हे वाचुन बरे वाटले. असाच इतरंना धीर द्या!!
सेफ्टी स्क्रँबलर न लावल्याबद्द्ल माझ्या शेजार्‍याच्या आईच्या पातिव्रत्याबद्दल काही अपशब्द काढुन आणि माझ्या शेजारधर्माला जागण्याबद्द्ल कौतुक करून फायरमार्शल निघून गेला......
हे वाचून फुटलो....:)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 10:59 नवीन

काका तोसी ग्रेट हो!

काका, सगळे सुखरूप आहेत हे सांगितलंत बरं वाटलं. आणि मनीषच्या वरील प्रतिक्रियेशी सहमत! सेफ्टी स्क्रँबलर न लावल्याबद्द्ल माझ्या शेजार्‍याच्या आईच्या पातिव्रत्याबद्दल काही अपशब्द काढुन ........ =)) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मेघना भुस्कुटे Wed, 07/30/2008 - 21:35 नवीन

अगदी

अगदी अगदी. मिपा एखाद्या कुटुंबासारखे वाटते ते उगीच नाही.. बाकी ते 'पातिव्रत्य' वाक्य अफलातून धमाल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/30/2008 - 10:57 नवीन

सुखरूप

सुखरूप आहात वाचून आनंद झाला... काळजी घ्या ,बरं... हेच म्हणतो !!! दुर देशी आपलेच बांधव आपली काळजी घेत आहेत हे पाहू आनंद झाला ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 07/30/2008 - 10:57 नवीन

काका,

छान लिहिलाय अनुभव. इकडेही जाणवले तीन-चार मोठे धक्के.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 07/30/2008 - 11:04 नवीन

सगळे

सगळे सुखरूप आहात वाचून आनंद झाला... सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 07/30/2008 - 11:23 नवीन

काका,

काका, तुम्ही सगळे, सही सलमत आहात हे वाचून बरे वाटले. तुमच्या लिहिण्याच्या ष्टाईल बद्दल काय सांगावे? इतका गंभीर प्रसंग पण तुम्ही काय मस्त लिहिला आहेत.... मान गये उस्ताद. बिपिन.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 07/30/2008 - 11:34 नवीन

माझा इथलाच

माझा इथलाच काय आयुष्यातला पहीला धरणीकंप.. :) भारतात व्हायचे तेव्हा अस्मादीक झोपलेले असल्यामुळे कधिही कळला नाही.. इथे आज, सकाळी मस्त उशीरा उठून मिपावर टीपी करत बसले होते तर तासाभरात धबधब्धब आवाज्,सोफा,खिडक्या,दारं,झुंबरं, दिवे सगळं काही हलतंय , उठून उभी राहीले तर माझ्यासकट खालची जमीन आख्खं घर हलतयं हा अनुभव अतिशय स्केरी होता!! असा भुकंप मी भारतात नाही अनुभवला.. कदाचित लाकडाची घरं असल्यामुळे असेल, पण सगळं घर लोकल मधे ठेवल्यासारखं हलत होता.. मी थरथर कापत होते लिटरली..प्रचंड सैरभैर झाले.. त्यातुन वरून्,शेजारून लोकं बाहेर येण्यासाठी पळत सुटली होती, त्याचाही आवाज होत होता.. कशी बशी दारा पर्यंत आले, तर तोपर्यंत भुकंप बंद झाला होता.. मग बसले घरातच.. नवर्‍याला फोन करायचा प्रयत्न केला.. पण नेटवर्क ढपलं होतं.. अजुन १०-१५ सेकंद्स जरी चालू राहीला असता भुकंप तर मी रडायला लागले असते फॉर श्युअर.. पण नशिबाने नवरा पण ऑफीसातून लगेच घरी आला.. आणि एकदाचे हुश्श वाटले.. पुढे अर्धा तासतरी मी कापत होते.. आयुष्यात प्रथम मी इतकी घाबरले.. घर कोसळतंय की काय सुद्धा वाटलं.. पण ठीके आता एकदा कळल्यावर नेक्स्ट टाईम नाही काही टेन्शन येणार.. पिडाकाकांसकट सगळ्या कॅलीफॉर्निया-स्थित आप्तेष्टांनी प्रेमानी हेच सांगितलं 'वेल्कम टू कॅलिफॉर्निया'.. त्यावरून हे असं होतंच राहतं असं दिसतं! :) तेव्हा पहील्याप्रथम बाहेर पळीन! आणि आता नाही घाबरणार.. :)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 07/30/2008 - 21:11 नवीन

भाग्यश्री,

भाग्यश्री, खरतर तु इतकी घाबरली हे वाचुन मला थोड आश्चर्य वाटलं. पुढच्या वेळी (खरतर ही वेळ येवुच नये हीच देवाकडे प्रार्थना) घाबरुन न जाता स्वताची काळजी घे. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
क
केशवसुमार Wed, 07/30/2008 - 12:01 नवीन

ह्म्म

डांबिसशेठ, अनुभव कथन झकास..(अनुभव झकास नाही) आमच्या जर्मनीत बॉ काही ही हल्ल नाही.. :B (वाचक)केशवसुमार स्वगतः काल पोट बिघडल्यामुळे आम्हाला काही धक्के बसले ते अलाहिदा 8}
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/30/2008 - 17:54 नवीन

हेच म्हणते काका,

डांबिस काका, तुम्ही सगळे सुखरूप आहात हेच खूप झालं. काळजी घ्या. अनुभव कथन छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
स्वाती दिनेश Wed, 07/30/2008 - 12:02 नवीन

हुश्शा..

सगळे सुखरुप आहेत हे वाचून बरे वाटले. स्वाती
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 07/30/2008 - 12:06 नवीन

"शैलेन्द्र

"शैलेन्द्रशेठ, स्वत: काका असून काही फायदा झाल नाही, उगाच लिंबू कशाला वाया घालवा.. (निवृत्त बाहुली) केशवसुमा"" हाहाहा...
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 07/30/2008 - 12:14 नवीन

काका

काका काळजी घ्या येणा-या बिग वन करता तयार आहात ना‍? नाना
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 07/30/2008 - 12:31 नवीन

सॉलिड

सॉलिड अनुभवकथन!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 07/30/2008 - 12:54 नवीन

बापरे!

अशा प्रसंगाच असं अनुभव कथन प्रथमच वाचलं. मस्त लिहिल आहे. पण प्रसंग बाकाच होता.. भाग्यश्री, धक्क्यातुन सावरलीस का?
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 07/30/2008 - 14:06 नवीन

हो गं,

हो गं, दुपारीच.. :) आता ते घाबरणं आठवून हसतीय.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 15:02 नवीन

येणा-या

येणा-या बिग वन करता तयार आहात ना‍? नाना का घाबरवताय पोराना पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 07/30/2008 - 15:10 नवीन

ए

ए बाबा म्या नाय घाबरवत अन भित बी नाय त्ये लय मोठे मोठे लोक म्हनु रायले कवाधरन की येनार येणार म्हनुन म्या म्हटल की कुणि येनार हाय तर तयार नगो का रायला? यात घाबरायचा का मुन रे लेका? वाच , http://www.msnbc.msn.com/id/7832219/ (शायंटीष्ठ) नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
य
येडा अण्णा Wed, 07/30/2008 - 15:35 नवीन

पुण्यातही जाणवला

आज सकाळी न्यूज मध्ये कळाले की पुण्यामध्ये भूकंपाचा धक्का बसला. बाकी आम्ही नेहमीप्रमाणे झोपेत असल्यामुळे रात्री काहीच कळाले नाही.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 07/30/2008 - 16:06 नवीन

विठ्ठलाची कॄपा आहे ...

डांबिसकाका व त्यांचे कुटुंबिय, त्यांचे आप्तेष्ट व समस्त अमेरिकेतील जनता सुखरुप आहे हे वाचुन बरे वाटले .. दुर देशी आपलेच बांधव आपली काळजी घेत आहेत हे पाहू आनंद झाला ! आम्हालासुद्धा "बेंगलोरच्या स्फोटावेळी" आपल्या मायबाप मिपाकरांनी असाच धिर दिला. लोक येथे नुसते टवाळक्यासाठी येत नसुन एकमेकांची काळजी घेतात हे पाहुन बरे वाटले .. बाकी लिहण्याच्या शैलीबद्दल काही बोलत नाही पण गंभिर प्रसंग अतिशय हलक्या शैलीत लिहल्याचे कौतुक वाटते... अवांतर : काल रात्री १२.४५ - १.१५ च्या सुमारास "पुणे -मुंबई" भागात पण भुकंप झाला का ? रात्रीच मित्राचा फोन आला होता. नंतर आमचे नेटकनेक्शन गंडल्याने जास्त चौकशी नाही करता आली. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 07/30/2008 - 16:36 नवीन

बरे वाटले...

आपण सर्व खुशाल असल्याचे ऐकून आनंद झाला. स्वानुभवकथन मस्तच आहे!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 07/30/2008 - 16:50 नवीन

असेच म्हणतो!

आपण सर्व खुशाल असल्याचे ऐकून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 17:14 नवीन

खुशालीचा आनंद आहे !!!

आपण सर्व खुशाल असल्याचे ऐकून आनंद झाला. स्वानुभवकथन मस्तच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ध
धनंजय Wed, 07/30/2008 - 22:08 नवीन

असेच म्हणतो

बरे वाटले. शिवाय तुमची विनोदबुद्धी त्या परिस्थितीतही तल्लख राहिली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
शितल Wed, 07/30/2008 - 17:46 नवीन

तुम्ही तर ग्रेट आहात.

काका तुम्ही धरणीकंपाचे वर्णन ही जबरा करता हो. कोणतीही जिवीत हानी झाली नाही हे मेन आहे. त्या भागातील सर्व मिपाकर आणि कुटुंबिय सुखरूप आहेत हे वाचुन आनंद झाला. :) आणी भाग्यश्रीला तुम्ही धीर दिलात आणि तीचे टेन्शन कमी केलेत हे तर खुप छान.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/30/2008 - 19:11 नवीन

सर्व कुटुंबासहित आपली आणि इतर मिपाकरांची

खुशाली समजली आणि जिवाला स्वस्थता आली! मागे किल्लारीचा मोठा भूकंप मी स्वतः अनुभवला पण त्याविषयी पुन्हा कधीतरी. चतुरंग
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 07/30/2008 - 19:27 नवीन

खुशाली

खुशाली कळवली त बर केलत. ते करता करता हसवलत भरपुर :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Wed, 07/30/2008 - 20:45 नवीन

कॅलिफोर्नियात भुकंप..

त्या भागातले आपले मि.पा. कर सुरक्षित आहेत, हे वाचुन जीव भांड्यात पडला. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 07/30/2008 - 21:06 नवीन

भूकंपाचे भाकीत वर्तवता येणे शक्य आहे काय?

भूकंपाचे भाकीत वर्तवता येणे शक्य आहे काय? हे बघा एस के केळकर काय म्हणत होते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/31/2008 - 00:00 नवीन

भाकीत

भाकीत ... अनुमान .. निष्कर्ष... ( स्वगत)... काका इथेही त्यांच्या फेव्हरीट विषयावर पोचले... :) ह. घ्या.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा