चित्रगुप्त उवाच:
दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.
भव्य इमारत, पार्किंगची उत्तम सोय, झाडांनी वेढलेला परिसर, आत गेल्यावर एकदम चकाचक संगमरवरी फरशी, वेलबुट्टीचे खांब-झरोके, भिंतीवर लावलेल्या कलाकृती, शाहू महाराज, अहिल्याबाई इत्यादिकांचे पुतळे, शांत, स्वच्छ, वातानुकूलित विस्तीर्ण दालन, गुबगुबीत सोफे, मुख्य म्हणजे अजिबात गर्दी नाही, हे सर्व बघून सर्वजण अगदी सुखावलो. त्यातून दिल्लीत अभावाने मिळणारे मराठी खाद्यपदार्थ माफक किंमतीत उबलब्ध असल्याचे बघून बरे वाटले. प्रशस्त मोकळ्या भोजन-कक्षात त्यांचा आस्वाद घेत गप्पा सुरु झाल्या.
एकमेकांचा परिचय - म्हणजे अगदी लहानपणापासूनच्या आठवणी सांगण्यात प्रत्येक जण रमून गेला, आणि सहसा कुणाला सांगितल्या न जाणार्या अश्या आठवणीही मोकळेपणाने सांगू लागला. चित्रकला, साहित्य, इ. पासून राजकारण वगैरे पर्यंतचे नाना विषय, आणि अर्थातच मिपावरील लेखनाची गम्मत, अश्या गप्पा चांगल्या चार-पाच तास रंगल्या. शेवटी तिथेच भोजन आटोपून, आता दर महिन्यात असा कट्टा करायचा, असे ठरवून आम्ही निरोप घेतला.
सुरुवातीच्या जागा शोधण्याच्या भानगडीत त्रिवेणी परिसरात असलेली आठ-दहा कलादालने बघण्याचे मात्र राहूनच गेले,
चला, पुढल्या वेळी.
अरूण जोशी उवाच:
तसा दिल्लीच्या कट्ट्यावरचा हा लेख केवळ ऐसीअक्षरे व मिसळपाव या दोनच संस्थळांवर प्रकाशित होत आहे, पण तरीही मी इथे 'मराठी संकेत स्थळे' असा शब्द वापरेन. विविध मसंस्थांवरील वेगवेगळ्या भागातील कट्टे पाहून अगदी जळायला झाले होते. पुण्या मुंबईत तर अनेक कट्टे झाले आहेतच, विदेशातही झाले आहेत हे पाहून माझ्या मनात आमच्या दिल्लीत एक कट्टा का नको असा इर्ष्यात्मक विचार १-२ महिन्यांपूर्वी येऊन गेला होता. चित्रगुप्त यांनी स्थळ, दिवस, वेळ ठरवून एकहाती सारे कोऑर्डीनेशन केले आणि अखेर त्रिसदस्यीय कट्टा काल संपन्न झाला. विवेकजी, चित्रगुप्त नि मी.
तर विवेकजींनी चित्रगुप्तना पाहताच 'अरे, तुम्ही चित्रगुप्त ना, मग आपण ही गॅलरीतली चित्रेच जरा पाहून घेऊ' असे भेटल्यावर पहिल्या मिनिटातच सुचवले. 'नक्कीच' म्हणत आम्ही एका दालनात घुसलो. 'कलादालनात चित्रे पाहणे' कशाशी खायचे असते हा प्रकार मला ठाऊक नव्हता, म्हणून मी त्यांना माझ्या स्टाईलने विचारले कि कोणत्याही एका चित्रात नक्की काय पाहायचे ते सांगाल तर ते मी सगळ्या चित्रांचा आस्वाद घेऊ शकेन. त्यांच्या उत्तराला सुरुवात होईतो विवेकजींची चित्रे पाहून झाली होती नि आम्ही कॅफेटेरियाच्या प्रांगणात गेलो. तिथे १-२ फोटो काढेपर्यंत जाणवले आज दिल्लीत अधिकृतरित्या ह्यूमिडिटी चालू झाली आहे. मग आम्ही कष्टाने पार्क केलेल्या गाड्या काढून तानसेन रोड ते कोपरनिकस रोडवरील महाराष्ट्र भवन असा प्रवास केला. तिथे रखवालदाराने आम्हाला आता इथे कोणतेही कँटीन नाही, तुम्ही कस्तुरबा गांधी मार्गावरील नव्याने बनलेल्या महाराष्ट्र सदनात जा असे सांगीतले. त्याच्यावर विश्वास न ठेवण्यात आमचा बराच वेळ गेला. शेवटी ४ चा कट्टा ४.४५ ला सुरु झाला. पण जागेचा शोध 'वर्थ इट' होता. विदेशातले माहित नाही, पण भारतात मसंस्थकरांचा इतक्या चांगल्या जागी कट्टा झाला नसावा हा विचार सुखावून गेला.
या कट्ट्यात आम्ही तिघेच असल्याने आईस्ब्रेकिंग व्हायला नि मनमोकळेपणाने सगळ्या चर्चा चालू व्हायला किंचितही वेळ लागला नाही. 'चित्रकलेने आम चित्रकाराचे घर चालू शकते का?' या टिपिकल इंजिनिअरिंगची मानसिकता दर्शविणार्या माझ्या प्रश्नाला चित्रगुप्तजींनी मार्मिक उत्तर दिले. त्यात 'त्या काळी मी इंजिनिअरिंग २ वर्षांत सोडून देऊन चित्रकलेचाच कोर्स चालू ठेवला' हा षटकारही होता. या दोन प्रभृती, म्हणजे चित्रगुप्त नि विवेकजी, सुरुवातीला बोलत असताना, मी दिल्लीत इथे होतो, तिथे होतो असे एकमेकांना सांगत असताना, 'त्या देशपांड्यांना ओळखता का?', 'पोतदारही तिथे होते ना तेव्हा? ' असे प्रश्न विचारू लागले, आणिबरेचसे लोकआमच्या ओळखीचे निघू लागले.
दोहोंना संस्कृतचे नि महाभारताचे ज्ञान आणि गोडी असल्याचे जाणवले. चित्रगुप्तांच्या महाभारत कथांवरील लेखांवर, ज्यांत ते भूतकाळच बेमालूमपणे बदलतात, विवेकजींच्या क्षणिकांवर, ज्यांत ते महाभारत सद्य राजकारणांत उतरवतात नि माझ्या ऐसीवरील 'लढवय्या प्रतिगामीत्वाबद्दल' रोचक चर्चा झाली. पुढे काय लिहायचे आहे यावरही चर्चा झाली. विवेकजींना मराठीत कादंबरी लिहायची आहे, चित्रगुप्तना बरेच काल्पनिक ऐतिहासिक, पौराणिक, घटनाक्रम त्यांना सुचतात तसे लिहायचे आहेत नि मला बिझनेस आणि अर्थशास्त्र इ बद्दल लिहायचे आहे असे सामोरे आले. (तरी) विवेकजींचे भारताच्या सार्या प्रमुख प्रकल्पांचे ज्ञान मला मोहवून गेले.
दिल्लीत (किंबहुना अगदी अमेरिकेच्या मानानेही) मराठी लोक कमी असावेत. त्यात ही ते स्थानिक संस्कृतीशी मिसळून गेले आहेत. आणि त्यामुळे ते सम-मूल लोकांशी बोलायला थोडे जास्त आसुसलेलेअसावेत. याचा परिपाक म्हणून कि काय आम्ही खूप वेळ कौटुंबिक चर्चा केली. आम्ही माळवा, मराठवाडा नि विदर्भ अशा वेगळ्या मूळ जागचे, या सर्व गप्पात ४-५ तास कसे गेले ते कळले नाही. मे मधे पुढचा कट्टा निश्चित ठरवून आम्ही रात्री ९ च्या आसपास समारोप घेतला. पुढच्या वेळेस सगळ्याच मसंस्थवर पोहोचण्याचा प्रयत्न असेल.
काही फोटो:
१. (डावीकडून)विवेक पटाईत आणि अरुण जोशी, त्रिवेणीच्या प्रांगणात
२ व ३. महाराष्ट्र सदनातः चित्रगुप्त, विवेक पटाईत आणि अरुण जोशी.
.
२ व ३. महाराष्ट्र सदनातः चित्रगुप्त, विवेक पटाईत आणि अरुण जोशी.
वाचने
9936
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा, वा ! राजधानीत
अरे वा वा!
धन्यवाद.
In reply to अरे वा वा! by पैसा
हाहाहा!
In reply to धन्यवाद. by arunjoshi123
हा हा
In reply to हाहाहा! by पैसा
१.'आपल्या प्रसन्न
In reply to हा हा by arunjoshi123
"यापूर्वी तुम्हाला कोणाला
In reply to १.'आपल्या प्रसन्न by प्यारे१
दिल्लीतल्या लोकांचं मराठी
In reply to "यापूर्वी तुम्हाला कोणाला by arunjoshi123
अरे ये अरुणजोशी नै जानता
In reply to दिल्लीतल्या लोकांचं मराठी by सूड
आता नै जानता तर नै जानता.
In reply to अरे ये अरुणजोशी नै जानता by बॅटमॅन
मेरा ज्ञान थोडा तोकडा हय रे
In reply to आता नै जानता तर नै जानता. by सूड
अरे वा !
मस्त वृत्तांत आणि फोटो.
वृत्तांत आवडला.
असहमत.
In reply to वृत्तांत आवडला. by प्रचेतस
अस्समतीशी सहमत.
In reply to असहमत. by आत्मशून्य
दिल्ली कशी आहे
In reply to अस्समतीशी सहमत. by प्रचेतस
दिल्ली मुंबईच्या तुलनेत कैक
In reply to असहमत. by आत्मशून्य
छानच!
अरे वा, मस्त! ट्रेकला जाताना
वा
लै भारी हो कट्टेकरी!
छान वृत्तांत, फोटूही चांगले
वृत्तांत अन फोटोही छान आहेत .
वाहवा दिल्लीवर स्वारी. छान
फोटो पाहून अगदी भरभरून आले!
मस्त व्रुत्तांत
खाण्याचे फोटो
अरे वा ! या तीन नव्या
In reply to खाण्याचे फोटो by चित्रगुप्त
आधी ही चित्र... गुप्त करा राव
In reply to खाण्याचे फोटो by चित्रगुप्त
या तीन नव्या मिपाकरांची नावे
(No subject)
In reply to या तीन नव्या मिपाकरांची नावे by चित्रगुप्त
अ गा गा
In reply to या तीन नव्या मिपाकरांची नावे by चित्रगुप्त
वावा
In reply to या तीन नव्या मिपाकरांची नावे by चित्रगुप्त
हा हा हा
In reply to या तीन नव्या मिपाकरांची नावे by चित्रगुप्त
मस्तच ह्या कट्या निमित्ताने
खुप छान
मस्त
छान ठिकाण
वा वा वा! झकासच! नेक्ष्ट टाइम
कट्टा एे देहली...
जबराट कट्टा. नेक्ष्ट