सुख म्हणजे नक्की काय?
लेखनप्रकार
आजकाल हा प्रश्न मला सारखा पडतोय. सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते हे अगदी खरं. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? परवा मी दुपारी जेवायला बसलो. झणझणीत वांग्याची भाजी (खान्देशी इष्टाईल), ज्वारीची भाकरी, साधं वरण, कांदा-टोमॅटोची भाजलेले शेंगदाणे घालून केलेली गार-गार कोशिंबीर...अहाहा. दोन भाकरी कुस्करल्या, त्यात साधे वरण घातले आणि त्यात झणझणीत भाजी घातली. थोडे लाल लाल तेल घेतले. आणि गारेगार कोशिंबीरीसोबत हाणायला सुरुवात केली. माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या हा हिशेब न सांगणेच इष्ट ठरेल. जेवण झाल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले. असे मस्त मस्त वाटत होते. कार्यालयातून येता-जाता एका जाहिरातीच्या बोर्डावर मंद हसत असलेल्या दीपिका पदुकोनच्या विशाल नेत्रांमध्ये उगीच डोकावल्यावर कसे प्रसन्न वाटते, अगदी तसेच मला हे जेवण झाल्यानंतर वाटले. हे सुख आहे की फक्त तात्पुरता आनंद? सुखाची भावना देखील तात्पुरतीच असेल ना? सारखं आपलं कुणी 'मी सुखी आहे' असं स्वत:ला बजावत असेल असं वाटत नाही.
अमेरिकेत आमच्या अपार्टमेंटमध्ये मी आणि माझी बायको असे आम्ही दोघंच राहत होतो. एकदा रविवारी सकाळी ७:३० वाजता मी उठलो; सकाळचे कार्यक्रम आटोपले आणि 'द शायनिंग' नावाचा एक हॉरर चित्रपट लावून बसलो. जॅक निकोल्सनचा हा चित्रपट अतिशय दर्जेदार अशा मोजक्या चित्रपटांच्या यादीमधला एक चित्रपट आहे. एक अतिशय निर्जन पर्वतरांगांमधले अवाढव्य हॉटेल, लांबून कुठून तरी तिथे कारने येणारा नायक, त्याची बायको, आणि एक मुलगा. आणि त्या निर्मनुष्य हॉटेलमध्ये घडणार्या थरारक घटना! चित्रपट संपल्यावर काहीतरी वेगळे पाहिल्याचा आनंद जाणवला. तशाच प्रकारचा आनंद 'स्कारफेस', 'कसिनो', 'सिटीझन केन' या व अशा बर्याच चित्रपटांनी दिला. हा आनंद म्हणजेच सुख का? की असा आनंद मिळवण्यासाठी ज्या प्राथमिक गोष्टींची पूर्तता करावी लागते ती पूर्तता म्हणजे सुख? म्हणजे नोकरीच्या ठिकाणी सगळं आलबेल असणं, नोकरीतून मिळालेल्या कष्टाच्या पैशातून टीव्ही, काँम्प्युटर, इंटरनेट, इत्यादी सुखसुविधांचा ताफा आपल्या तैनातीत ठेवणं हे सुख?
आम्ही मित्रमंडळी काही वर्षांपूर्वी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये भेटायचो. तिथे मग मस्त मैफल जमायची. गरमागरम तंदूर चिकन, झणझणीत चिकन हैदराबादी किंवा मुर्ग मुसल्लम, गरम रोट्या, आणि मनमुराद गप्पा अशी रंगीत मैफल जमायची. कुणालाच घाई नसायची. मग गुलाम अली, पंकज उधास, जगजीत सिंग यांच्या अजरामर गजलांचा कार्यक्रम व्हायचा.
तेरी निगाह से ऐसी शराब पी मैने
की फिर ना होश का दावा किया कभी मैने
वो और होंगे जिन्हे मौत आ गयी होगी
निगाह-ए-यार से पायी है जिंदगी मैंने...
किंवा
मैं तेरी मस्तनिगाही का भरम रख लुंगा
होश आया भी तो कह दुंगा मुझे होश नही
ये अलग बात हैं साकी के मुझे होश नही
वरना मैं कुछ भी हूं एहसानफरामोश नही
अशा शराबी, धुंद गजलांच्या माहोलमध्ये भरपूर गप्पा रंगायच्या. मध्येच
सब चमन से गुलाब ले आये, हुस्नवाले शबाब ले आये
शेखसाहब ने मांग ली जन्नत, हम वहां से शराब ले आये
अशी एखाद्या गजलेची सुरुवात व्हायची. मग गाडी हळूच "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या..." वरून "एकटेच जगू, एवढंच ना, आमचं हसं, आमचं रडं, ठेवून समोर एकटेच बघू..." ही दु:खाची स्टेशने घेत घेत "सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गयी हैं सारी मंजिले, हो सारी मंजिले, सो गया हैं रस्ता..." असा पेंगलेला निष्कर्ष काढून रात्री १-२ वाजता आपापल्या घरांच्या यार्डात जायची. या मैफलींमध्ये खूप मजा यायची. खूप गप्पा-गाणी आणि मनमुराद हसणे (खिदळणे, दात काढणे म्हटलं तरी चालेल) चालायचे. हे सुख आहे का? की हे क्षणभंगूर सुख आहे? मग या न्यायाने सगळीच सुखे क्षणभंगूर नाहीत का? भविष्याच्या चिंतेचे, विचारांचे, योजनांचे शेवाळ लगेच चढते आजकाल वर्तमानाच्या सुरेख शिल्पावर! मग वर्तमान कितीही सुसह्य केला तरी सुखी झाला असे म्हणता येईल का?
माझा एक मित्र आहे. त्याला फिरण्याची, पर्यटनाची अजिबात आवड नाही. महिनोनमहिने तो, त्याची बायको आणि एक छोटा मुलगा कुठेच जात नाहीत. तो फक्त रोज कार्यालयात जातो. राजस्थानी असल्याने बायकोला मैत्रिणी वगैरे फारशा नाहीत. बायकांनी घराबाहेर पडणे जवळ-जवळ अशक्य! शनिवार-रविवारी अगदी जवळच्या कुठल्यातरी मित्राकडे किंवा कुठल्यातरी नातेवाईकाकडे जाणे एवढाच काय तो बदल! पण त्याला नवनवीन गॅजेट्सची हौस भारी! आयपॅड, आयफोन, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, महागडी घड्याळे यावर तो बर्यापैकी पैसे खर्च करतो. अशी कुठली वस्तू घेतली की तो ४-२ दिवस खूप खुश असतो. ही खुशी म्हणजे सुख म्हणता येईल का? पण ही खुशी पण चार दिवस टिकते; नंतर अंगवळणी पडून नाहीशी होते.
एका अतिगरीब माणसाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असू शकतील, नव्हे, वेगळ्या असतातच. दोन वेळेला स्वतःला आणि कुटुंबाला पोटभर खायला मिळाले आणि सगळ्यांचे आरोग्य उत्तम असले म्हणजे देखील एखादी व्यक्ती स्वतःला सुखी म्हणवून घेत असेल. सुखाची ही भावना चिरकाल टिकणारी असते का? मला वाटते ही भावना चिरकालीन टिकणारी नसावी कारण त्या भावनेला हादरे देणार्या अडचणी असतातच की. कधी काम मिळते, कधी नाही मिळत, कधी घरादारावर गदा येते, कधी मुले-बाळे व्यसनी होतात, कधी मुलीचे लग्न फसते अशा समस्यांचा लकडा असतोच. म्हणजे शुद्ध सुखाची भावना कायम टिकणारी आहे असे म्हणता येणार नाही. शेवटी ती देखील क्षणभंगूरच!
मिसळपाव.कॉमवर लिहिलेल्या लेखाला खूप प्रशंसा मिळाली किंवा फेसबुकवर टाकलेल्या फोटोला भरपूर लाईक्स मिळाले म्हणजे मन सुखावते. ही सुखावलेपणाची भावना तशी अल्पायुषीच असते. फार तर दोन दिवस!
सुख मानण्यावर असते असेही म्हटले जाते. आम्ही न्यू यॉर्क, नायगाराच्या सहलीला गेलो तेव्हा अमेरिकन सरकारचा बंद होता. ही नवीनच भानगड ऐकली होती. सरकारच बंद! आणि ते बंद असून देखील सगळे सुरळीत चालू होते. आपले सरकार पूर्ण वेळ जागे असून देखील इतका गोंधळ असतो. असो. त्या बंदमुळे वॉशिंग्टन डीसी मधली महत्वाची वस्तूसंग्रहालये, स्मारके, काही खूप सुंदर असे बगिचे वगैरे पर्यटकांसाठी बंद होते. सगळे बुकिंग आधीच झाल्याने काही करता येणे शक्य नव्हते. सगळ्यांनी आमचे सांत्वन केले. "अब क्या देखोगे? तुम्हारे पैसे तो बेकार गये. ठीक हैं, जितना मिले उतना ही देख लेना, क्या कर सकते हैं? थोडा लेट जाना चाहिये था..." वगैरे वगैरे. आता आम्हाला काय स्वप्न पडलं होतं की बराकभाऊंनी होर्डिंग लावलं होतं की त्यांचं सरकार झोपणार आहे म्हणून! पण आता हे सांत्वन ऐकून घावं लागणार होतं. आम्ही सहलीला गेलो. सहल खूप छान पार पडली. डीसी मधली काही ठिकाणे नाहीच पाहता आली. पण रिव्हर पोटोमॅकमध्ये दोन तासांचा क्रुझ करता आला, व्हाईट हाऊस, युएस कॅपिटॉल, राष्ट्राध्यक्षांच्या मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय (मादम तुसॉ) बघता आले, डीसीच्या भव्य रस्त्यांवरून फिरून तिथल्या भव्यतेचा आनंद लुटता आला. आम्ही घरी परत आल्यावर आम्हाला छान वाटले. आपण काही मिस केले म्हणून वैषम्य अजिबात वाटले नाही. इतके पैसे खर्च केले आणि सगळं डीसी नाही बघता आलं असा खेद नावालाही वाटला नाही. हे ही सुख अल्पायुषीच. मनाची समजूत म्हणा हवं तर.
मग सुख सुख म्हणजे आहे तरी काय नेमकं? राजकारण्यांना सत्तेसाठी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष म्हणजे सुख? की इच्छित सत्तास्थान काबीज केल्यानंतर मिळणारा आनंद म्हणजे सुख? एखादी अवघड गोष्ट ठरवून, कष्ट घेऊन हासिल केल्यानंतर जी भावना मनात उचंबळते तिला सुख म्हणता येईल? मग तसं म्हणायला गेलं तर कित्येक कुठलीही ध्येये नसणारी, साधी सरळ माणसे सुखातच दिसतात की! साधा टपरीवर काम करणारा मुलगा देखील मजेत असतो. मजेत असणं म्हणजे सुख असते का? जबाबदार्या वाढल्या की आयुष्यातली मजा हळू-हळू कमी होत जाते म्हणजेच सुख देखील कमी होत जाते का?
अलिशान घर, गाडी, जाडजूड बँक बॅलन्स म्हणजे सुख असू शकेल काय? भौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्तेने घेता येतात पण सुख, मजा, आनंद विकत घेता येऊ शकतो का? बहुधा खूप संपत्ती जमा केल्यावर सुख मिळवणं थोडं सोपं जात असावं. अर्थात ते पुन्हा तुमच्या सुखाच्या व्याख्येवर अवलंबून आहे. माणसांसोबत जोडलं जाण्यात काहींना सुख वाटतं तर काहींना फक्त पैसे कमवण्यात. काहींना पर्यटनात आनंद मिळतो तर काहींना खेळण्यात किंवा वाचण्यात.
माझ्या मते आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते (अर्थात चांगलं कृत्य, वाईट कृत्य सहसा नंतर अपरिमित दु:ख देतात) ते करण्याची इच्छा निर्माण होणं, ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं, ती गोष्ट करण्यासाठी कष्ट उपसणं, ती गोष्ट हळू-हळू मूर्त स्वरूपात आकार घेत असतांना बघणं आणि ती पूर्ण झालेलं बघणं या प्रवासात जे भावनांचे चढ-उतार असतात त्या एकूण परिणामाला सुख म्हणत असावेत. मनाला आनंद देणार्या गोष्टी सुख देतात आणि पुढच्या प्रवासासाठी धीर देतात असा अनुभव आहे. मनाला समाधान मिळण्याला सुख म्हणत असावेत. एखादं आवडीचं गाणं ऐकलं (मग ते अगदी 'तुम तो ठहरे परदेसी' किंवा 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है' असेल किंवा 'चांदण्यात फिरतांना' किंवा 'बगळ्यांची माळफुले' असेल) की मन प्रफुल्लित होतं, मनाला बरं वाटतं. एखादा छान चित्रपट पाहिला की समाधान वाटतं. एखादं चांगलं पुस्तक वाचलं की समृद्ध वाटतं. एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते. कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते. आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो. ज्या क्षणाला असा आनंद मिळतो, तो क्षण खरा सुखाचा धनी! तो क्षण आपला. अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं मला वाटतं. आणि अशा ऊर्जाक्षणांमध्ये चिंब भिजणं म्हणजे सुख असावं. तुमचं काय मत?
वाचने
27576
वाचनखूण
प्रतिक्रिया
79
आवडलं
मस्तच
माझा मुलगा काल अचानक पळत येऊन
In reply to माझा मुलगा काल अचानक पळत येऊन by पिलीयन रायडर
नक्कीच
लेख प्रचंड आवडला.
"स्व" ची जाणीव होणे यालाच सुख म्हणतात.
खुप छान समीर.....
छान लिहिलय.
खूप छान !
In reply to खूप छान ! by मितान
+११११
हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे
In reply to हवी ती गोष्ट हवी तेव्हा मिळणे by अरणी
नाही पटलं!
सुख म्हणजे क्न्पुची गरज स्न्पने.
खुपच आवडला लेख, माझ्या सुखाची
सुंदर!
भुभु लोकांच्या नाकाचा गारगार
In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by प्रकाश घाटपांडे
भुभु लोकांच्या नाकाचा गारगार
In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by शुचि
हाऊ टू बी अॅज टेरीफीक अॅज
In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by प्रकाश घाटपांडे
भूभूच्या नाकावरचा गारपणा ही
In reply to भूभूच्या नाकावरचा गारपणा ही by बॅटमॅन
मला ते ओलं नाक आवडत नाही.
In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by प्रकाश घाटपांडे
छोट्या गोष्टींमधला आनंद
In reply to भुभु लोकांच्या नाकाचा गारगार by प्रकाश घाटपांडे
+१
सुख-दु:ख
In reply to सुख-दु:ख by चित्रगुप्त
रोचक पण इथे
कल्पने पलीकडील आनंदाची अनुभुती म्हणजे सुख होय.
हवेहवेसे वाटाणारे मिळणे
In reply to हवेहवेसे वाटाणारे मिळणे by डॉ सुहास म्हात्रे
मिळालेले हवेहवेसे वाटणे
In reply to हवेहवेसे वाटाणारे मिळणे by डॉ सुहास म्हात्रे
हे छानच! शिवाय डोक्यालाही
छान लेख. आवडला !
In reply to छान लेख. आवडला ! by तुमचा अभिषेक
क्या बात है!
In reply to छान लेख. आवडला ! by तुमचा अभिषेक
सुरेख
In reply to छान लेख. आवडला ! by तुमचा अभिषेक
बिछान्यावर आडवे होऊन
बिछान्यावर आडवे होऊन दिवसभराचे आठवताना लगेच झोप लागू नये असे वाटणे म्हणजे सुख आणि तरीही पडल्यापडल्या लागलीच झोप येणे म्हणजे सुख.
h1> १००% बरोबरBe more with less
In reply to Be more with less by बहुगुणी
सेम आशयाचीच कथा लहानपणी मराठी
छान लेख!
कुणी आपल्याला सुखं व्हावं
In reply to कुणी आपल्याला सुखं व्हावं by स्पंदना
छान
Quotable quotes..!!
छान लिहिलय. आवडलं!
छान लेख्..आवडला
मस्त लिहिलंय!
'माझे खाद्यजीवन' या लेखाच्या
तहानलेले असताना
In reply to तहानलेले असताना by हवालदार
दोन्हीबद्दल प्रचंड सहमत!!!!
छान लेख. विचार करायला भाग
हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप
In reply to हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप by पेट थेरपी
+१
In reply to हे खूप रिवर्स स्नॉबरी टाइप by पेट थेरपी
असेल
समाधान!
आपल्यामुल चारजनाच्या
सुख म्हणजे ..
सुख म्हणजे नक्की काय?
In reply to सुख म्हणजे नक्की काय? by अवतार
क ड क! आवडले!
In reply to क ड क! आवडले! by ऋषिकेश
धन्यवाद
जगी सर्व सुखी असा कोण आहे।
जरूर ऐका .
In reply to जरूर ऐका . by दिव्यश्री
https://www.youtube.com/watch
सुख म्हणजे...
In reply to सुख म्हणजे... by अर्धवटराव
खर आहे
आपल्याला हव्या असणार्या
समीरजी,
In reply to समीरजी, by ज्ञानव
एक आणि अनेक
In reply to एक आणि अनेक by चित्रगुप्त
नियम!!
In reply to समीरजी, by ज्ञानव
मलाही भारीचे अनेकवचन वाचून
खुपच सुंदर.... लिहलय...
@ज्ञानव 'तज्ञ' नाही, 'तज्ज्ञ
In reply to @ज्ञानव 'तज्ञ' नाही, 'तज्ज्ञ by अनिता ठाकूर
"तज्ञ" च अन "रणकंदन" च
In reply to @ज्ञानव 'तज्ञ' नाही, 'तज्ज्ञ by अनिता ठाकूर
होय अनिताताई, चूक लक्षात आणून
मस्त विचारमंथन....
सुरेख लेख.
मेरा
In reply to मेरा by विटेकर
उत्कृष्ट विवेचन
सुख मिळवण्याची साधनं आणि खरं
@शुची, मा.का.देशपांड्यांच्या
In reply to @शुची, मा.का.देशपांड्यांच्या by अनिता ठाकूर
मा.का.देशपांड्यांच्या मराठी
पडल्या पडल्या झोप लागणे,
सुखाच्या शोधात असणारा एक
In reply to सुखाच्या शोधात असणारा एक by शुचि
ये दिन भी जायेंगे!
In reply to ये दिन भी जायेंगे! by अर्धवटराव
नाही हो, दु:खात आहेत म्हणून