Skip to main content

हर्षा भोगले यांचे IIM-Ahmadabad मधील भाषण

लेखक साधा मुलगा यांनी सोमवार, 07/04/2014 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा you tube वर फिरत असताना प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचे IIM A मधील भाषण ऐकले. खरे तर पहिले मी या भाषणाचा एक तुकडा पाहिला. जो ‘talent Vs attitude’ अशा नावाने होता. तो पाहिल्यावर मला संपूर्ण भाषण बघण्याचा मोह आवरला नाही.हर्षा हे स्वतः या संस्थेचे विद्यार्थी होते. ते पट्टीचे वक्ते असल्याने त्यांनी अतिशय कौशल्याने हे भाषण फुलवले आहे. हे भाषण जुने म्हणजे ३० जुलै २००५ चे आहे. भाषणाचा विषय आहे, “achievers of excellence”. हे भाषण अतियश स्फूर्तीदायक असे आहे. सुरुवातीपासून ऐकायला सुरुवात केली कि हळू हळू इतके समरस होऊन जातो कि आपण शेवटपर्यंत थांबत नाही. यातील कित्येक गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात.कित्येक गोष्टी आपण आपल्या जीवनातील गोष्टींशी निगडीत करू लागतो . आयुष्यातील आपले ध्येय, करीअर , आपली प्रगती ,आपण कुठे आहोत याचा विचार करायला भाग पाडते. अंतिम यश महत्वाचे कि यशाचा मार्ग, giving 100% every time, यशस्वी होण्यात नशिबाचा भाग किती, अशा अनेक विषयावर भाष्य केलेले आहे. हे संपूर्ण भाषण साधारण १ तास २० मिनिटांचे आहे. एखादा सुंदर चित्रपट बघितल्यावर जसे समाधान मिळते तसे समाधान मिळते. आपल्या संग्रही ठेवावे असे आहे. आपण हे भाषण जरूर पाहावे. त्याची लिंक मी खाली देत आहे. संपूर्ण भाषण Talent Vs attitude (3.54 min)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3002
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मागच्या वर्षी, हर्ष भोगले यांचे नाशिकला झालेले भाषण ऐकायचा योग आला होता. त्यावेळी पण त्यांनी असेच उत्तम विचार मांडले होते.

In reply to by साधा मुलगा

ट्यालंट कशाशी खातात काही कल्पना नाही आणी त्यामुळे सगळे अटिट्युड वर भागवून न्यावे लागत असल्याने तो नको इतका झालाय... बघुया व्हिडोत काही उपाय भेटला तर. धन्यु.

उपयुक्त माहितिबद्ल आभार .